भारतीय क्रिकेट नियामक मंड्ळाच्या अध्यक्षपदी गावस्कर यांची नियुक्ती

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
4 Apr 2014 - 1:12 pm
गाभा: 

एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणुन गावस्कर हे अद्वितिय आहेत, त्यांची कारकिर्द दैदिप्यमान आणि अभिमानास्पद आहे आणि ते आजही आमच्या पिढीचे हिरो आहेत ही वस्तुस्थिती असुनही मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी सुचविणे ही बाब मला बुचकळ्यात टाकणारी आहे.

एखाद्या व्यक्तीचे वा वागणे घट्नाबाह्य, नियमबाह्य आहे, त्यांच्या अधिपत्याखालील कारभारात अनियमितता, गैरपरकार आहेत म्हणुन अशा व्यक्तीला पायउतार व्हाययास सांगणे अथवा लावणे हे योग्यच आहे पण समितीमधील अन्य सदस्यांबाबत कोणतीही कारवाई झालेली नसताना रिक्त अध्यक्षपदाची निवड होण्याची मंड्ळाची असलेली घटनात्मक प्रक्रिया डावलुन त्या जागी कोणी तिह्राईताने अध्यक्ष व्हावे हे अशा रितीने तडकाफडकी 'sue moto' प्रकाराची कारवाई करुन ठरविणे ----??

शेवटी हे विसरता येत नाही की आज ज्या फिक्सीग वा बेटींग च्या राक्षसांमुळे क्रिकेट रसातळाला जात असल्याची भीती वाटु लागली आहे त्याची क्षीण का होईना सुरवात ह्या्च विक्रमादित्याच्या कारकिर्दीत होवु लागली होती. 1987 च्या विश्वकप सामन्यांत भारत सेमी फायनल मध्ये ईंग्लंड कदुन हरला तेव्हा या महाशयांच्या वडीलांनी ईंग्लंडच्या विजयावर सट्टा लावला होता अशी चर्चा होती.

अलिकडच्या क्रिकेट्वर अतिक्रमण करणार्या जाहिरातबाजी आणि प्रायोजकत्व ह्या बाबत ही गावस्कर काळाच्या बराच पुढे होते. बॅटच्या मागे जाहिरातीसाठी अतिषय ठ्ळक स्टीकर लावुन मेदानात येणारा ते त्याकाळी एकमेव फलंदाज होते. 'पॅकर सर्कस' नावाच्या प्रयोगांत सामील होण्यावरुनही त्यांनी भारताच्या निवड्समितीशी संघर्षाची तयारी ठेवली होती.

खेळांतर्गत राजकारण, वैयक्तीक महत्वाकांक्षा, आप-पर भाव, कंपुबाजी वशिलेबाजी अशा सर्वच प्रकरणांत सुनील गावस्कर हे एक हमखास आढ्ळणारे नाव असे आणि या निकषांवर तरी त्यांची पार्श्व्भुमी नक्कीच धुतल्या तांदळासारखी म्हणता येणार नाही.

आजही त्यांचे लिखाण पाहिले तर त्यात प्रामाणिकपणा पेक्षाही मुत्सद्देगिरीचाच प्रभाव जास्त असतो. महत्वाच्या कोणत्याही विषयावर नेमकी. स्पष्ट भुमिका न घेता काहीतरी गुळ्मुळीत लिहुन सर्व दगडांवर पाय ठेवायचे यातच धन्यता मानली जाते, ... बाकी तुलनेने किरकोळ असे मुद्दे वा खेळाडु ( म्हणजे सचिन ऐवजी मुनाफ ) असल्यास मात्र साहेबाच्या लेखणीला धार येते......

निवड्समितीच्या सदस्यांना खेळाचे ज्ञान व अनुभव असावा असे समजणे गैर नाही, मात्र नियामक मंड्ळाचे कार्य प्रत्यक्ष खेळापेक्षा वेगळेच असते, तेथे प्रामाणिकपणा, निःस्वार्थी, निपक्षपाती वृत्ती, व्यवस्थापन कौशल्य ह्या गुणांना महत्व द्यायला हवे. केवळ महान खेळाडु आहे म्हणुन अशी जबाबदारी सोपविणे म्हणजे ईब्राहिखान गारद्याला वाटाघाटी करावयास पाठविण्याचा प्रकारच म्हणावयाचा

असो, मा. न्यायालयाच्या आदेशाचा आपंण आदर करुया....गावस्कर सरांना शुभेच्छा