नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
3 Apr 2014 - 12:33 pm
गाभा: 

एकीकडे
घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल

दुसरीकडे
पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट

आणि सगळ्यात शेवटी

नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय...

कधी सुधारणार आपण ??

प्रतिक्रिया

बर. मग काय करायला हवं म्हणता?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Apr 2014 - 1:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पावसा, जे काही लिहिलेस ते खूपच vauge का काय म्हणतात तसे आहे.उदाहरणे दिलीत तर कळेल.
(अत्रंगी उन्हाळ्यात) माई

माहितगार's picture

5 Apr 2014 - 11:34 am | माहितगार

अत्रन्गि पाउस आपण खरेच एका चांगल्या विषयावर धागा काढला आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि धाग्यास(चर्चेस) आमच्या हार्दीक शुभ्च्छा.

प्रसंगानुरुप खालील दोन दुव्यांची जाहीरात करतो आहे (धाग्याच्या रुपाने जाहीरात संधी बद्दल धन्यवाद :) )

*मिपा धागा चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता

* आमचे इंग्रजी विकिपीडियावरील लेखन Legal awareness

धन्यवाद

कुणी काही चांगल आणि नियमानी करू इच्छित असेल तर कायदे/नियम नेमके त्यांनाच आडवे जातात तिथे फ्लेक्झीबिलीटीचा अभाव जाणवतो. कायदा सर्वांसाठी मात्र राबवला जात नाही याने सामान्य व्यक्तीचा कायद्यावरचा विश्वास उडू लागतो कायद्याला पळवाट काढण्याची प्रवृत्ती बळावते.

**आपली विधानमंडळे कायद्यांच्या बाबातीत नाका तोंडातून पाणि गेल्यानंतरच थोडीफार हलताना दिसतात जुन्या कायद्यांचे पुर्नपरिक्षण सुधारणा आणि नवीन आलेल्या विषयांना समजून घेऊन त्याकरीता वेळे कायदे बनवणे यात मागे असणे.
**न्याय प्रणालीतील कालापव्यय आणि तांत्रिक अद्ययावततेचा अभाव (यात अंशतः सुधारणा होत असली तरी एकुण व्य्वस्थेचा आकार पाहता खूपच मागे आहे.)