पाक-कला - अननसाचा शिरा (पाईनॅपल)

प्रमोद्तम्बे's picture
प्रमोद्तम्बे in पाककृती
23 Mar 2014 - 5:49 am

अननसाचा शिरा (पाईनॅपल)
साहित्य : दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर (अननस जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड.

कृती : एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घ्या. एकीकडे अननस शिजत असतांना एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात काजुच्या पाकळ्या व बेदाणे टाळून घेऊन बाजूला टिश्यू पेपरवर काढून ठेवावेत. त्याच तुपात जाड रवा घालून सारखा परतत राहून सोनेरी गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. अननस शिजला की फक्त अननसाच्या फोडी किंवा काप रव्यात घालुन पुन्हा परतून घ्या. अननस शिजवून उरलेल्या पाण्यात गाईचे दूध व साखर घालुन उकळवून घ्या,मग त्यात रवा आणि अननसाचे मिश्रण घालुन सारखे ढवळत राहून शिजवून घ्या. शिरा सुकायला लागला की त्यात साखर, केशर दुध, बेदाणे , काजू पाकळ्या आणि वेलची पूड घालणे व पूर्णपणे शिजवून घ्या.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Mar 2014 - 5:58 am | कंजूस

छान !
दुध अननस शिजवलेल्या पाण्यात मिसळण्यापूर्वी फाटते का हे थोड्या पाण्यात टाकून पाहावे .

गणपा's picture

23 Mar 2014 - 11:30 am | गणपा

दुसरा फाऊल.
मिपावर फोटूशिवाय पाककॄती फाऊल गणली जाते. ;)
तांबेसाहेब फोटू बी यवंद्या की.

अत्रन्गि पाउस's picture

23 Mar 2014 - 9:23 pm | अत्रन्गि पाउस

काही उडुपी उपहार गृहात खाल्ला होता .... त्याची आठवण झाली...
करून पाहण्यात येईल

फोटो ? नसल्याने पास म्हणतो !

{आमरस शिरा प्रेमी} :)

ओ काका शिरा खायला घरी बोलवा. अनायासे फोटो काढून इथे टाकत येतील.. हाय काय आणि नाय काय..

जातवेद's picture

7 Apr 2014 - 8:17 pm | जातवेद

फोटो कुठायत फोटो??? Angry Fist