जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
प्रतिक्रिया
20 Mar 2014 - 12:36 am | बाळकराम
दिग्गीराजा सनी लिओन आहे
पण ते राजकारणातले निनाद कुलकर्णी आहेत ना? ;) की निनाद आणि सनी लिओनी दोन्ही आहेत?
20 Mar 2014 - 2:20 am | निनाद मुक्काम प...
बालका दोष तुझा नाही आहे.
तुम्ही आप समर्थक
केजू कसा स्वतः राज्य न करता दुसरे सलग ३ टर्म प्रशासन चालवत आहेत. तेथे जाऊन अभ्यास दौरा कम नौटंकी करतो.
तुम्ही सुद्धा स्वतः लिखाण मते ,मुद्दे मिपावर न मांडता केवळ इतर लिहितात त्यांच्या लिखाणाच्या शैली वर अभ्यासपूर्ण मते देतात.
अवांतर
अभ्यास दौर्यात केजू केमेरे पाहून मुझे अंदर करो अशी पोलिसांना गळ घालतो ,काही वर्षांनी झलक दिख ला जा मध्ये तो असाच जनेतेला एस एम एस चा जोगवा मागेल.
19 Mar 2014 - 7:35 pm | विकास
इंडीया टूडे मधील बातमी प्रमाणे केजरीवाल यांनी अर्थसंकल्पात पैशाची तरतूद न करताच आप समर्थकांना (आणि एकूण 24,036 वीजग्राहकांना) ५०% वीजबिल माफी असल्याचे सांगत होते. एकीकडे असले चुकीचे निर्णय जाहीर करून अनिष्ठ पायंडा पाडत होते तर दुसरीकडे स्वत:च्या समर्थकांशीच खोटे बोलत होते...
Kejriwal's power sop tripped by fund shock
19 Mar 2014 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी
आज राजीव बजाज यांनी आआप ला बजाज पल्सर या मोटरबाईकची उपमा दिली.
माझ्या मते आआपसाठी याहून समर्पक उपमा मिळणे कठीण आहे. ज्याप्रमाणे बजाज पल्सरने दुचाकीचालनाच्या संस्कॄतीतील उद्दामपणाला नवे परिमाण मिळवून दिले तसेच आआप भारतीय राजकारणात करीत आहे.
19 Mar 2014 - 11:59 pm | विकास
मला बजाज पल्सरच्या लाँगटर्म उपयुक्ततेची काळजी वाटते. :)
20 Mar 2014 - 12:21 am | संपत
आपला काय बोलायचे ते बोला.. पल्सरला बोलायचे काम नाही.. :)
20 Mar 2014 - 12:40 am | विकास
"पल्सर"बाबतीत(च) जर नकळत भावना दुखावल्या असल्या तर क्षमस्व. :) पण गैरसमज नसावा, स्वतःचा उद्योग सोडून कोण कुठले मॉडेल आहे हे जर "आप-का बजाज" सांगत बसणार असेल तर पल्सरची (आपची नाही) काळजी वाटते असे म्हणणे आहे.
20 Mar 2014 - 1:18 am | बाळकराम
बजाज ग्रुप ची तुम्हाला "काळजी" वगैरे वाटते ते बघून मौज वाटली ;) मला वाटते त्यांच्या ग्रुप ची काळजी घ्यायला त्यांनी पगारावर हजारो लोक ठेवले आहेत आणि तुम्ही त्यांची "काळजी" करत आहात!- नाही म्हणजे परत तेच- मनपा- उंदीर मारणे विभाग इ.इ. असो. (आप विरोधकांचा आंधळा विरोध आता विरोधाभक्तिमध्ये रुपांतरित होउ लागलाय की काय असे वाटते ;)
20 Mar 2014 - 1:27 am | विकास
आप विरोधक हे अरविंद केजरीवाल यांच्या आणि त्यांच्या गणंगांच्या आचरटपणास कंटाळून फक्त त्यांच्यावरच ताशेरे मारताना दिसताहेत.
पण आप समर्थक मात्र मोदी-भाजपा बरोबरच जे कोणि मिपासभासद आप विरोधक असतील त्यांच्यावर देखील सातत्याने टिका करताना दिसत आहेत. मग कधी "उंदीर मारणार्यांचा विभाग" हा तोच तोच गेले ३०-४० वर्षे चालणारा विनोद काय, दिव्य बुद्धी काय, वगैरे...
चालूंदेत. कदाचीत हा आपसमर्थक आणि आपचे तात्विक विरोधक यांच्यातला सांस्कृतिक फरक असावा, झालं! या वरून आजच पाहीलेले खालचे एक कार्टून आठवले...
20 Mar 2014 - 1:43 am | बाळकराम
महाप्रतापी नेत्याच्या आणि त्यांच्या त्यागी, सुसंस्कृत तसेच प्रखर देशभक्तीची शिकवण देणार्या संघटनेचे खंदे समर्थक असलेल्यांना एवढे हळवे होऊन चालणार नाही ;) असे जर तुम्ही हताश झालात तर मग आप सारख्यांना तुम्ही कसा धडा शिकवणार? आता मला तुमची काळजी वाटायला लागली आहे ;) (नाही म्हणजे चालेल ना केली तर- तुम्ही करताय तर मीही थोडी करुन घेतो ;) ) ह.घ्या. तुमच्या मतांबद्दल मतभेद असले तरी आदरच आहे हे मनापासून सांगतो.
20 Mar 2014 - 1:52 am | विकास
मी देश हा व्यक्ती-पक्ष-संघटने पेक्षा मोठा मानतो म्हणून असलो तर देशाचा खंदा समर्थक आहे. आणि त्याअर्थाने देशाला आत्ता कोण योग्य असू शकेल ह्याचा विचार करतो.
निरिक्षण करणारी व्यक्ती हळवी झालेली असते हा गैरसमज देखील असू शकतो. तेव्हा काळजी नसावी, गरज पडत असेल तर अवश्य घ्यावीत!! ;)
असो. :)
19 Mar 2014 - 11:59 pm | संजय क्षीरसागर
केजरीवाल सुरुवातीलाच म्हणाले होते की मोदी आणि गांधी इतके एकमेकांविरुद्ध आहेत तर ते एकमेकांविरुद्ध उभे का राहात नाहीत? (थोडक्यात, देशाला एकच पंतप्रधान हवायं तर लगेच फैसला होईल!). ते दोघंही (खरं तर सगळेच) सेफ मतदार संघातून उभे राहातात आणि निवडून आले की लुट सुरु! (पण इतकी उघड गोष्ट इथले राजकीय समालोचक आता कशी ट्विस्ट करतात ते पाहा!... थोडं आदर्शवादी वाटेल पण ज्याला देशाचा पंतप्रधान व्ह्यायचंय त्याला कोणत्याही मतदार संघातून निवडून येण्याची खात्री हवी. असो, ती गोष्ट फार दूरची झाली.)
मुद्दा असाये की भाजपनी सगळा विचार करुन मोदींसाठी वाराणसी निवडली. मग केजरीवाल आआपाच्या मॅनिफेस्टो बरहुकूम (`जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा'); त्यांच्या विरुद्ध तिथून लढायला तयार झाले. आता हा सरळ सामना होता. जनमताचा निर्विवाद कौल असाच आजमावायला हवा.
आणि अजून केजरीवालांनी अर्ज सुद्धा दाखल केला नाही तर मोदींची गाळाण उडाली. लगेच दुसरा अर्ज सेफ इलेक्टोरेट मधून! यावर किमान बुद्धी असलेला नागरिक सुद्धा म्हणेल की He is not ready to fight. खरं तर निवडणूक लढण्यापूर्वीच मोदी पराभूत झालेत! He is a coward.
मला इथल्या काही सदस्यांच्या दिव्य तर्कबुद्धीचं कायम आश्चर्य वाटत आलं आहे. ते म्हणतात आता केजरीवाल गुजराथमधून दुसरा अर्ज भरणार का? What is the need? तुमचा भावी पंतप्रधान ज्याला बिजेपीसारख्या महान राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा आहे तो एका साध्या नवोदित पक्षाच्या उमेदवाराशी समोरासमोर लढू शकत नाही यातंच सगळं आलं. तुमच्या ब्याणो, शहाण्योच्या भंपक फिगर्स, अमक्यानं फलाण्या वेळी काय केलं होतं आणि तमक्याचं सतराशे सत्तावनमधे काय झालं होतं याची इतकी उघड गोष्ट समजायला काहीही गरज नाही.
20 Mar 2014 - 12:54 am | विकास
मग केजरीवाल आआपाच्या मॅनिफेस्टो बरहुकूम (`जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा'); त्यांच्या विरुद्ध तिथून लढायला तयार झाले. "जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा" त्यांच्या विरुद्ध तिथून लढायला तयार झाले.
धन्यवाद. मला आत्तापर्यंत मॅनिफेस्टो / निवडणूक जाहीरनामा हा निवडून आलो तर काय करू याचा वचननामा/जनतेशी करार असे वाटायचे. केजरीवाल लई अॅडव्हान्स असल्याने मॅनिफेस्टोमधेच कुणाबरोबर लढणार हे सांगितले असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसतय. पण गंमत म्हणजे अजून त्यांचा लोकसभेसाठी मॅनिफेस्टो जाहीर झालेला नाही असे किमान त्यांचे संस्थळ शोधल्यावर वाटले... तरी देखील जर, `जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा' असा बाणा असला तर याचा सरळ सरळ अर्थ त्यांना मोदी नकोत मात्र राहूल गांधी चालतील (पक्षी: रागांना पाठींबा) असा देखील होऊ शकतो.... उत्तम!
मला इथल्या काही सदस्यांच्या दिव्य तर्कबुद्धीचं कायम आश्चर्य वाटत आलं आहे. ते म्हणतात आता केजरीवाल गुजराथमधून दुसरा अर्ज भरणार का? What is the need?
अहो आता तुम्हीच वरच्या वाक्यात म्हणत आहात की "जो नेता नकोय त्याला निवडणूकीत पराभूत करा" त्यांच्या विरुद्ध तिथून लढायला तयार झाले. मग वाराणसी मधे मोदी नकोत पण वडोदरा मधे चालतील असे केजरीवालना म्हणायचे आहे का?
खरं तर निवडणूक लढण्यापूर्वीच मोदी पराभूत झालेत!
अगदी कसे बोललात! एकेंनी मात्र सगळ्या किमान बुद्धी असलेल्या नागरीकांची (जे आपल्या मते, "He is not ready to fight." म्हणतात, त्यांची) मने जिंकली.
20 Mar 2014 - 1:54 am | संजय क्षीरसागर
भ्रष्टाचार मुक्त देश आणि विनम्र प्रशान हा आआपाचा Manifesto आहे. आणि भ्रष्ट नेत्यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काय करायचं (The procedure for implementation) याचा, `भ्रष्ट उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढणं' हा एक भाग आहे. Right to Recall अणि जनलोकपाल या त्यात अनुस्युत असलेले इतर दोन गोष्टी आहेत .
Manifesto : Public declaration of Principles, Policies, Purposes etc by a group of persons,etc (Oxford Advanced Learners' Dictionary of English)
अर्थात इतक्या सुसूत्र विचाराची अपेक्षा दिसत नाही. त्यापेक्षा `निवडून आल्यावर काय करु' याची आश्वासन फेकली की झालं! मग निवडून आल्यावर जनतेला फाट्यावर मारायला मोकळे.
आता इतका भन्नाट ज्योक मारल्यामुळे सगळा प्रतिसाद तसाच झालायं.
20 Mar 2014 - 2:08 am | विकास
आता इतका भन्नाट ज्योक मारल्यामुळे सगळा प्रतिसाद तसाच झालायं.
मग आपचा मॅनिफेस्टो फक्त दिल्लीपुरताच मर्यादीत का आहे ते सांगू शकता का?
Aam aadmi Party released its Manisfesto for Delhi today. In a press conference held at the Constitutional Club at New Delhi, Yogendra Yadav walked the media through the details of the manifesto. Here is how you can find more details.
http://www.aamaadmiparty.org/Manifesto-for-Delhi
Aam Aadmi Party releases manifestos for 28 Assembly constituencies
थोडक्यात या ठिकाणी हा manifesto त्या ठिकाणि तो manifesto... काहीच पाळायचे नाही आणि मग रस्त्यावर गडाबडा लो़ळायचे, खाकरायचे आणि राजीनामा देऊन पळून जायचे. गणंग आहेतच टाळ कुटायला...
आणि हो अजून एक: आपचा तुम्ही म्हणता तसा "manifesto" म्हणून कुठे आहे ते दाखवलेत तर बरे होईल. नसला मिळत तर तसे देखील सांगू शकता.
20 Mar 2014 - 2:49 am | उपास
चर्चा वाचतोय पण संक्षि तुमची मत फार म्हणजे फारच एकतर्फी होताहेत, बघा पटतय का..
>> थोडं आदर्शवादी वाटेल पण ज्याला देशाचा पंतप्रधान व्ह्यायचंय त्याला कोणत्याही मतदार संघातून निवडून येण्याची खात्री हवी. असो, ती गोष्ट फार दूरची झाली
अहो भारतिय लोकशाही आहे ही, हामेरिकन नव्हे! पंतप्रधान हा जिंकलेल्या प्रतिनिधींचा नेता असतो. उगा वाजपेयींमध्ये दम नाय, बारामतित पवार साहेबांना पाडून दाखवा तर तुम्ही लायक पंतप्रधान व्हायला असं म्हटलं तर कसं चालायचं!
शिवाजी महाराजांनी डावपेच खेळूनच लढाया मारल्या ना! अफझलखानाला विजापूर दरबारात जावून मारण्यापेक्षा जावळीच्य खोर्यात सैन्यासह आणून त्याची गाफील क्षणी खांडोळी करणंच योग्य होतं हे इतिहासाच सांगतो! तस्मात त्यांना काय ते ठरवु देत, उगाच ह्यांव नाही त्यांव नाही असं दुसर्याला म्हणताना आपल्यातला आत्मविश्वासाचा अभाव प्रदर्शित होतोच ह्याची जाणीव असायला हवी केजरीवाला समर्थकांना (की भक्तांना)! :)
केजरीवालने वार्यावर सोडल्याने दिल्लीकरांचे हाल बघवत नाहीयेत, तसं भारताचं नाही झालं म्हणजे मिळवलं, केजरी हा लालू किंवा तत्सम भ्रष्टाचारी नेत्यासमोर उभा राहिलेला आवडला असता पण..
झालय काय की आम्हाला सेना आणि मनसे एकत्र हवी होती पण ते बसले आपापसात लढत.. आम्हाला केजरीने केलेले भ्रष्टाचार निर्मूलन आणि मोदींनी केलेला विकास हवाय पण तेही बसले आपापसात लढत, दुर्दैव आपलच दुसरं काय.. कॉग्रेसी राजकारण ह्या विभाजनावरच तर तग धरून आहे!
- (उद्विग्न) उपास
20 Mar 2014 - 2:57 am | विकास
संपूर्ण प्रतिसादाशीच सहमत. वर एकीकडे म्हणल्याप्रमाणे केजरीसमर्थक हे व्यक्तीगत हल्ले करताना दिसताहेत तर केजरीविरोधक जे फक्त केजरीवालांवरच (आणि आपवर) टिका करताना दिसताहेत.
झालय काय की आम्हाला सेना आणि मनसे एकत्र हवी होती पण ते बसले आपापसात लढत.. आम्हाला केजरीने केलेले भ्रष्टाचार निर्मूलन आणि मोदींनी केलेला विकास हवाय पण तेही बसले आपापसात लढत, दुर्दैव आपलच दुसरं काय.. कॉग्रेसी राजकारण ह्या विभाजनावरच तर तग धरून आहे!
त्यातील भावनात्मक मुद्याशी १००००% सहमत. पण सेना-मनसे नुसते एकत्र येणे हे स्वप्न असून चालणार नाही तर त्यांना आजच्या काळाला अनुरूप होणे महत्वाचे आहे. नाहीतर वडापाव आहेच... तेच केजरीवालांच्या बाबतीत माकडचाळे आणि निदर्शने हे कुठल्याही नेतृत्वास शोभा देणारी नाहीत हे कळणे महत्वाचे आहे. मोदींच्या बाबतीत (त्यांचा समर्थक म्हणून नाही पण) आत्ता स्पष्ट्पणे दिसेल इतके सगळ्यांना घेऊन जाण्याची वृत्ती किंचीत जास्त दिसू लागली आहे. पण त्याच बरोबर तमाम (फक्त समर्थक नाही) जनतेला आवडू शकेल असा व्यक्तीमत्वात किंचित सॉफ्टनेस दिसणे गरजेचे आहे असे वाटते. पण त्यामुळे काही त्यांचे अडत नसले तर ठीकच आहे... त्यांचे त्यांच्यापाशी! :)
20 Mar 2014 - 1:37 pm | श्रीगुरुजी
>>> आणि अजून केजरीवालांनी अर्ज सुद्धा दाखल केला नाही तर मोदींची गाळाण उडाली.
खरं की काय!
>>> लगेच दुसरा अर्ज सेफ इलेक्टोरेट मधून! यावर किमान बुद्धी असलेला नागरिक सुद्धा म्हणेल की He is not ready to fight.
पण असे फक्त थोडेच नागरिक म्हणत आहेत आणि ते 'आप'चेच कार्यकर्ते आहेत. म्हणजे थोडक्यात 'आप'चे काही कार्यकर्ते सोडले तर भारतात उर्वरीत नागरिकांना किमान बुद्धी सुद्धा नाही.
>>> खरं तर निवडणूक लढण्यापूर्वीच मोदी पराभूत झालेत! He is a coward.
बरोब्बर! केजरीवालांनी अत्यंत निधड्या छातीने ४९ दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अशी बेडर वृत्ती इतरांमध्ये कशी असणार?
काँग्रेस वा भाजपचा पाठिंबा घेणार नाही अशी शपथ घेणार्या केजरीवालांनी अत्यंत निधड्या छातीने काँग्रेसचा पाठिंबा घेतला. अशी बेडर वृत्ती इतरांमध्ये कशी असणार?
सरकारी घर घेणार नाही, लाल दिव्याची गाडी घेणार नाही, सुरक्षा घेणार नाही असे उच्चरवाने सांगणार्या केजरीवालांनी अत्यंत बेडरपणे याच्या बरोब्बर विरूद्ध वर्तन केले. अशी बेडर वृत्ती इतरांमध्ये कशी असणार?
शीला दिक्षितांविरूद्ध माझ्याकडे ढीगभर पुरावे आहेत असे सांगणार्या केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावर "पुरावे द्या. लगेच आरोपपत्र दाखल करतो" अशी बेडर भूमिका घेतली. अशी बेडर वृत्ती इतरांमध्ये कशी असणार?
रागा व नमो कॉर्पोरेट कंपन्यांची हेलिकॉप्टर वापरतात अशी बेधडक टीका करणार केजरीवाल इंडिया टुडेच्या चार्टर्ड विमानातून अत्यंत निधड्या छातीने दिल्लीला गेले. अशी बेडर वृत्ती इतरांमध्ये कशी असणार?
केजरीवाल वगळता इतर सगळे कॉवर्डच आहेत.
निवडणुक झाल्यावर, "मी हरलो असलो तरी नैतिक विजय आमचाच झाला", "भाजप व मोदींनी गैरप्रकार करून निवडणुक जिंकली", "मोदींनी मुस्लिमांना दहशत दाखवून मते मिळविली" अशी वक्तव्ये 'आप'कडून वाहिन्यांवर येतीलच अशी खात्री आहे. असे आरोप करणे हे काही खायचं काम नाही. एखादा निधड्या छातीचा वीरच अशी वक्तव्ये करू शकतो.
>>> मला इथल्या काही सदस्यांच्या दिव्य तर्कबुद्धीचं कायम आश्चर्य वाटत आलं आहे. ते म्हणतात आता केजरीवाल गुजराथमधून दुसरा अर्ज भरणार का? What is the need?
मोदी कोणत्याही परिस्थितीत हरलेच पाहिजेत अशी मनीषा असणार्यांनी मोदी जिथून जिथून उभे राहतील त्या सर्व ठिकाणी स्वतः उभे राहिले पाहिजे. किंबहुना केजरीवालांनी राहुलविरूद्ध अमेठीतून, सोनियाविरूद्ध रायबरेलीतून, मुलायमविरूद्ध आझमगड व मैनपुरीतून ... अशा सर्व भावी पंतप्रधानांविरूद्ध उभे राहिले पाहिजे.
21 Mar 2014 - 3:34 am | बाळकराम
भारतात उर्वरीत नागरिकांना किमान बुद्धी सुद्धा नाही
उर्वरित लोकांचं माहित नाही पण काही अल्पसंख्य लोकांना मात्र किमान बुद्धी (सुद्धा) नसावी बहुधा- त्यांच्या संघटना "बौद्धिक" वगैरे घेऊन उजेड पाडायचा जीवापाड प्रयत्न करत असतात, त्यावरून तरी तसेच म्हणावे लागेल ;)आणि तुम्ही बेडरपणाबद्दल बोलताय म्हणजे जरा जास्तच झालं राव- तुमच्या संघटनेची "बेडरवृत्ती" ६५ वर्षापूर्वी सगळ्या जगाने बघितली होती आणि अजूनही कुठे-कुठे त्याचा प्रत्यय येतच असतो- उदा- १९९६ मध्ये जिवावर उदार होऊन १३ दिवसातच अतिशय बेडरपणे वाजपेयींनी दिलेला राजीनामा, जसवंतसिंहानी अतिशय धीरोदात्तपणे, बेडरपणे आस्थापूर्वक दहशतवाद्यांना विमानाने सोडून येणे, "सत्तेवर आल्यावर एन्रॉनला समुद्रात बुडवू वा दाऊदला खेचत भारतात घेऊन येवू" अशी चेतनादायी वक्तव्ये केल्यावर मनावर दगड ठेवून अतिशय बेडरपणे त्याचे केलेले विस्मरण, "मंदिर वही बनायेंगे" अशी दाहक डरकाळी फोडल्यानंतर २५ वर्षे आणि ३ केंद्र सरकारे होऊन गेल्यानंतरही मंदिर बनवणे तर सोडाच जनतेलाच **** बनवण्याचा बेडरपणा....खूप उदाहरणे देता येतील. काल-परवा आलेल्या, अजून राजकीय दृष्ट्या नवजातच असलेल्या शेंबड्या आआप वर आज जिवाच्या कराराने टीका करण्याची वेळ तुमच्यावर गेली ९० वर्षे राजकारणात असूनही येते ही एकच गोष्ट तुमचा बेडरपणा सिद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आआप आणि जनतेच्या सदिच्छांशी लढण्याचा बेडर पणा तुमच्यात यावा हीच इच्छा! आजवर भारतीय सुजाण जनता वि. देशद्रोही संघटना यामध्ये भारतीय जनताच जिंकली आहे आणि अंतिमतः जनताच जिंकेल- भलेही एखाद दुसरी निवडणूक देशद्रोही जरी जिंकले तरी! याची खात्री नक्कीच बाळगा
बाळकराम
(देव पाण्यात घातलेला)
21 Mar 2014 - 2:49 pm | श्रीगुरुजी
त्याचं काय आहे, तुम्हाला उठसूट, जळी-स्थळी-काष्ठी-पाताळी संघ, नथूराम, भाजप इ.च दिसतात. दुसरं काही दिसतंच नाही. तुम्हाला भगव्या/केशरी रंगाची तीव्र अॅलर्जी आहे असं दिसतंय. तेव्हा जरा उपचार करून घ्या आणि लवकर बरे व्हा आणि (कधीतरी) मोठे व्हा!
20 Mar 2014 - 3:32 pm | पिलीयन रायडर
संक्षी... सरळ सरळ उत्तर देणार असाल तर एक विचारु का?
मग राहुल गांधी / सोनिया गांधी विरुद्ध का नाही उभे रहात ए.के?
मला हाच एक प्रश्न सतत पडत आहे की आप जर भ्रष्टाचारा विरुद्ध असेल तर खर तर त्यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या मागे हात धुवुन पडायला पाहिजे.. पण हे तर मोदींच्याच मागे लागलेत..
मोदी काही धुतल्या तांदुळाचे आहेत असा भाग नाही, पण ते "उपलब्ध पर्यायातील सर्वात उत्तम पर्याय" आहेत. मोदी वगळता काँग्रेस कडुन राहुल गांधी हा पर्याय आहे, त्या पेक्षा कदाचित मनमोहनही चालुन जातील (तत्वतः फरक नाहीये म्हणा.. काहीही झालं तरी मॅडमच खर्या पंतप्रधान आहेत.. पण मननोहन माकडचाळे तरी करणार नाहीत..) आणि आप कडुन खुद्द ए.के.. पण ज्यांनी "पुरेसं संख्याबळ नाही.. म्हणुन पुर्ण ताकदीनी सत्तेत येऊ आणि मग मुखमंत्री होऊ" असा पर्याय निवडलाय त्यांना ह्या हिशोबानी पंतप्रधान तर होता येणार नाही..
बाकी काही कॉम्बिनेश्न असतील तरी मला जास्त माहित नाही..
संक्षी.. तुम्ही फकत बोल्ड केलेल्या प्रश्नाच उत्तर द्या.. बाकीच नाही वाचलत तरी चालेल..
20 Mar 2014 - 3:37 pm | मंदार दिलीप जोशी
जबराट प्रश्न
20 Mar 2014 - 3:47 pm | क्लिंटन
पिराताई तुम्ही केजरीवालांचे दिल्ली विधानसभेतले भाषण, राजदीप सरदेसाईंनी घेतलेली मुलाखत आणि आता इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केलेले भाषण ऐकले असतेत तर असे प्रश्न तुम्हाला पडले नसते :)
20 Mar 2014 - 8:24 pm | श्रीगुरुजी
>>> पिराताई तुम्ही केजरीवालांचे दिल्ली विधानसभेतले भाषण, राजदीप सरदेसाईंनी घेतलेली मुलाखत आणि आता इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केलेले भाषण ऐकले असतेत तर असे प्रश्न तुम्हाला पडले नसते
'आप'वाल्यांना हे प्रश्न पडतच नाहीत कारण ते फक्त केजरीवालांची भाषणे व मुलाखतीच ऐकतात. 'आप'वाल्यांच्या दुर्दैवाने या देशातील बहुसंख्य जनता केजरीवालांची भाषणे व मुलाखती बघते आणि त्यांची कृती व त्यांच्या मर्कटलीलाही बघते आणि लगेच जनतेच्या लक्षात येते की केजरीवालांची उक्ती आणि कृती याच्यात महद््अंतर आहे व त्यामुळेच (केजरीवालांच्या दुर्दैवाने) जनतेला असे प्रश्न पडतात.
20 Mar 2014 - 5:59 pm | संपत
जर का ते रागाविरुद्ध उभे राहिले असते तर ते नमो विरुद्ध उभे का राहिले नाहीत हा प्रश्न विचारला गेला असता. 'उपलब्ध पर्यायातील सर्वात उत्तम पर्याय' हे तुमचे मत आहे, केजरीवालांचे नाही. ह्या निवडणुकीत बहुधा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून येईल असेच आतापर्यंतचे सर्व अंदाज सांगत आहेत , तेव्हा ज्याला संसदेत विरोध करायचा आहे त्याविरुद्ध लढण्यात जास्त महत्व आहे.
राहुल गांधींविरुद्ध कुमार विश्वास हा आआपचा प्रमुख नेता निवडणूक लढवत आहे.
20 Mar 2014 - 8:26 pm | श्रीगुरुजी
>>> मग राहुल गांधी / सोनिया गांधी विरुद्ध का नाही उभे रहात ए.के?
अगदी सोपं उत्तर आहे. 'आप' ही काँग्रेसचाच 'ब' संघ असल्याने आपल्याच 'अ' संघाच्या कर्णधाराविरूद्ध केजरीवाल कसे उभे राहतील?
20 Mar 2014 - 10:59 pm | विनोद१८
असेल तर तो समोर ठेवावा नुसत्या वान्झोट्या प्रतिक्रीया देवू नयेत.
आणि अजून केजरीवालांनी अर्ज सुद्धा दाखल केला नाही तर मोदींची गाळाण उडाली. लगेच दुसरा अर्ज सेफ इलेक्टोरेट मधून! यावर किमान बुद्धी असलेला नागरिक सुद्धा म्हणेल की He is not ready to fight. खरं तर निवडणूक लढण्यापूर्वीच मोदी पराभूत झालेत! He is a coward. हे कसे समजले ??? जरा सविस्तर खुलासा करावा.
20 Mar 2014 - 12:44 am | अर्धवटराव
मोदी दोन मतदारसंघातुन निवडणुक लढवतील याचा फैसला कधि झाला? मला आठवतय त्याप्रमाणे त्यांना प्रचारप्रमुख नेमलं (गोव्यात तेच नेमलं होतं का त्यांना?) किंवा पंप्र.पदाचा उमेदवार घोषीत केले त्यावेळी. त्याबाबतीतल्या सकाळ/लोकसत्ता मध्ल्या बातम्या मला अजुनही आठवतात. जोशी, अडवाणी वगैरे मंडळींना राज्यसभेत पाठवायचं, शक्यतो मोदींच्या मर्जीतले उमेदवार लोकसभेकरता निवडायचे, मोदिंनी गांधिनगर आणि युपीतली एक सीट (लखनौ किंवा वाराणसी) लढायची, अशा बातम्या भाजपने/मोदी गटाने पद्धतशीरपणे पसरवणं सुरु केलं होतं. पक्षांतर्गत वातावरण निर्मीती, दबावगट त्यादृष्टीने सक्रीय झाले होते.
मोदी केजरीवालांना लाइटली घेणार नाहि. पण म्हणुन ते केजरीसाहेबांना घाबरुन पळुन गेले हा विनोद केजरीभक्तीचं सुख मिळवुन देत असला तरी त्यात तथ्य नाहि. केजरीवाल मोदिंविरुद्ध वाराणसीतुन उभे राहण्याची शक्यता देखील पुर्वीपासुन भाजपने कन्सीडर केलेली होती. इफ आय एम नॉट राँग, केजरीवाल सर्व शक्तीनीशी लोकसभा निवडणुकीतला फायन ठोसा मोदिंविरुद्ध लगावतील हे भाजपला काहि महिन्यांपुर्वी क्लीअर झालं होतं. आआपतर्फे देखील मोदी वाराणसीतुन उभे राहिले तरच केजरीवाल त्यांना प्रत्यक्ष्य टक्कर देतील अशाच बातम्या होत्या. दोन्हि पक्ष आपापले आराखडे बांधुन तयार होते व आहेत. त्यामुळे आज केजरीसाहेब मोदिंविरुद्ध लढण्याची घोषणा करतात व मोदी गुजराथला पळतात हे समर्थकांना/भक्तांना जरी फार प्रेरणादायी वाटत असलं तरी प्रत्यक्ष्य उमेदवारांची राजकीय समज एव्हढी अपरिपक्व खचीतच नाहि. असो.
20 Mar 2014 - 1:19 am | संजय क्षीरसागर
इतका भाबडा तर्क कुणीही करणार नाही.
अत्यंत साधी गोष्ट आहे. जर मोदींचा स्वतंत्र अजेंडा आहे आणि केजरीवालांना पराभूत करुन ते सरळ जनमताचा कौल आजमावू शकत होते तर त्यांना पराभवाची भीती का वाटली? It shows only one thing, he is not sure of his manifesto. वाराणसीच्या भाषणात त्यांनी `रामराज्य लाएंगे' असं दुहेरी आणि गर्भित अर्थ असलेलं स्टेटमंट केलंय. लोकांच्या भावनांना हात घालण्यापलिकडे त्यांच्याकडे काहीही नाही त्यामुळे मतदारसंघाचा कल बघून ते भाषण ठोकतात. आणि हे त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसेल.
Kejariwal is sure of himself कारण भ्रष्टाचार निर्मूलन या मुद्यावर ते ठाम आहेत. आणि त्यांना मतदारसंघाची फिकिर नाही कारण मुद्दा निर्वैयक्तिक आणि वॅलिड आहे. मोदी जर रामराज्य आणणार असतील तर वाराणसी हाच त्यांच्यासाठी योग्य मतदारसंघ होता. मग आता दुसरा अर्ज का भरतायंत? It shows only one thing, he is split inside. He doesn't believe what he wants to do. In fact he doesn't know what exactly he wants to do. त्यांना फक्त पंतप्रधान व्ह्यायचंय, मग बाकी तिकडे काही का होईना!
20 Mar 2014 - 2:03 am | अर्धवटराव
धन्यवाद. कुणिही हा तर्क केलेला नाहि हे वाचुन बरं वाटलं.
मोदिंच्या स्वतंत्र अजेंड्यात केजरीवालंना पराभूत करण्याचा अंतर्भाव असण्याची शक्यता कमि आहे. मुद्दाम कुणाला पराभूत करायला म्हणुन मोदि निवडणुकीचा घाट घालणार नाहित. मोदिंना पराभवाची भिती वाटतेय असं मत बनवायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. मोदि किंवा कुणीही राजकारणि/खेळाडु/बिझनेसमन हार-जितचा विचार करुनच पाउलं उचलत असावा. पण मोदि केजरीवालांना घाबरण्याइतके पक्व राजकारणी असावे असं मला तरी वाटत नाहि.
अगदी शंभर टक्के लोकांना आपला मॅनीफेस्टो आवडावा असं कुणिही राजकारणी गृहीत धरत नसावा.
आय अॅम शुअर त्यांनी तसं केलं असेल. तो त्यांच्या राजकारणाचा भागच आहे. असे गर्भीत अर्थाचं बोलणं, योग्य वेळी खोकणं वगैरे टेक्नीक राजकारणी लोकं वापरत असतात.
लोकांच्या भावनेला हात घालण्यापलिकडे केजरीसाहेबांकडे सुद्धा सध्यातरी काहिच नाहि. मतदारसंघाचा, व्यासपीठाचा कौल बघुन भाषण देणं (उदा. आआपची निर्मीती अल्ला आणि ईश्वराने केली आहे वगैरे) हे देखील राजकारणी लोक करत असतात. इट्स ग्रॅण्टेड. मोदिंकडे भाषण देण्यापलिकडे एक-दोन गोष्टी तरी जास्त असाव्या मात्र. अॅट्लिस्ट अंबानी-अदानी उद्योग समुह तरी लाभार्थी करण्याची ताकत मोदींमधे आजघडीला आहे :) . केजरीसाहेब सत्तेवर आले कि त्यांचीही लाभार्थींची लिस्ट तयार होईल. ते सहाजीक आहे.
आय डाऊट. पण तुम्हाला तसं वाटत असल्यास तुमच्या मताचा आदर आहेच.
सो इज मोदी. तुम्हाला तसं वाटत नसल्यास त्या मताचा देखील आदर आहे.
मोदिंकरता वाराणसीच योग्य आहे हे तुमचं मत झालं. जर दोन ठिकाणी उभं राहुन रामराज्य आणायचे त्यांचे प्लॅन असतील तर आपण कशाला आडकाठी आणावी? केजरीसाहेबांनी येनकेनप्रकरेण दिल्लीतच तळ ठोकुन, मुख्यमंत्री बनुन, जनलोकपाल पास करुनच लोकसभेला उतरावं असं कोणि म्हटलं तर ते चुक होणार ना? राजकारण्याल त्याच्या योजना ठरवु देत कि. आणि लोकसभा पर्स्पेक्टीव्हने केजरीवाल सध्या नथींग टु लुज मोडमधे आहेत. हा लाभ कि तो लाभ अशी परिस्थिती आलि कि केजरीसाहेब देखील मतदारसंघ आणि इतर बर्याच गोष्टींची फिकीर करतील.
साहेब, ते इनसाईड-आउटसाईड स्प्लीट वगैरे शिक्के त्या दोघांनाहि लावु नका हो. त्यांना आपल्या मातिच्या पायांनी राजकारण करु देत. हे इनसाईड-आउटसाईड स्प्लीट प्रासंगीक आहे त्या दोघांसाठीही. लेट देम ब्रीद इन देअर ऑवन स्पेस. मोदिंबद्दल म्हणाल, तर मला तरी खात्री आहे कि त्यांना व्यवस्थीत माहित आहे कि त्यांना काय हवय (स्वतः करता, आणि जनतेसाठी सुद्धा. ) आय डाऊट फॉर केजरीवाल दौ.
पहिल्या भागाशी १००% सहमत. मोदिंना प्रधानमंत्रीपदाची प्रचंड महत्वाकांक्षा आहे. (केजरीसाहेब देखील वैयक्तीक महत्वाकांक्षेच्या बाबतीत कमि नाहित) माझ्यासारखे काहि लोकं त्यांना त्याबद्दल अॅडमायर देखील करतात. आणि मोदि प्रयत्नांची कसुर करणार नाहि हे नक्की. पण जनतेप्रती ते बेपर्वा आहेत असं मल तरी वाटत नाहि.
20 Mar 2014 - 3:48 pm | क्लिंटन
+१
20 Mar 2014 - 3:57 am | अर्धवटराव
काहि अपवादात्मक प्रतिसाद वगळता या धाग्यावरची २००+ प्रतिसादांची चर्चा छान चालली आहे. संपादक मंडळाला फार काहि त्रास दिला नसावा या धाग्याने. इतकी हीट जनरेट झाली, पण मन करपुन जावं अशी परिस्थिती काहि आलि नाहि (अजुनतरी :) ). खरच आनंद वाटतोय.
20 Mar 2014 - 8:33 am | सव्यसाची
+१००
अगदी मनातले बोललात..
20 Mar 2014 - 8:45 am | विकास
कारण सगळी आप लीच माणसे आहेत ना! ;)
20 Mar 2014 - 5:14 pm | मराठी कथालेखक
(बहूधा सध्या माझे वाचन/ बातम्या बघणे कमी झालेले असल्याने ) मला एक प्रश्न पडला आहे कि मोदी गुजरात मधूनच लोकसभा का लढवत नाहीत ? गुजरात सोडून अन्यत्र जाण्याची त्यांना गरजच काय ?
20 Mar 2014 - 5:33 pm | विकास
मोदी वडोदरा मधून पण निवडणूक लढवत आहेत. दोन ठिकाणहून का? वाराणसी का? या संदर्भात इथल्या सदस्यांची मते जाणून घेयची असतील तर वरील चर्चा वाचा. :)
20 Mar 2014 - 5:38 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद.
खूप मोठ मोठे प्रतिसाद आहेत...वाचतो हळूहळु.
बाकी मला मोदींनी पंतप्रधान होण्यात रस आहे. देशाचा चांगला विकास होवून शेअर मार्केटमधील माझ्या गुंतवणूकीला चांगली फळे येतील ही आशा...
20 Mar 2014 - 8:36 pm | श्रीगुरुजी
गेल्या १२ वर्षात गुजरात विधानसभेने दोन तृतीयांश बहुमताने मंजूर केलेली अनेक विधायके काँग्रेसप्रणित राज्यपालांनी स्वाक्षरी न करता परत पाठविली आहेत (उदा. महाराष्ट्रातील 'मोक्का'च्या धर्तीवर आखलेला गुजरात मधील संघटित गुन्हेगारांविरूद्ध असलेला प्रस्तावित कायदा). पण मोदींनी याचे निमित्त करून पळ काढलेला नाही. २००७ मध्ये राजस्थानमध्ये वसुंधराराजे मुख्यमंत्री असताना देखील राजस्थान विधानसभेने मंजूर केलेली काही विधायके तत्कालीन राज्यपाल प्रतिभा पाटील यांनी परत पाठविली होती. त्यांनीदेखील पळ काढला नव्हता.
परंतु जनलोकपाल विधेयक मांडायला दिल्लीच्या नायब राज्यपालांनी परवानगी नाकारल्याचे निमित्त करून केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पळ काढला. यावरूनच हे भविष्यात काय करणार याचा अंदाज येतो.
20 Mar 2014 - 8:47 pm | विकास
मोदींनी राजीनामा दिला नाही कारण ते सत्तेसाठी हपापलेले आहेत. केजरीवाल यांनी तात्काळ राजीनामा दिला कारण ते सत्तेसाठी हपापलेले नसून आम जनतेचे भले करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांना सत्तेचे काही पडलेले नाही. ;)
20 Mar 2014 - 10:26 pm | क्लिंटन
हहपुवा
20 Mar 2014 - 11:06 pm | विनोद१८
विनोद१८
20 Mar 2014 - 11:10 pm | विकास
तुम्ही माझ्या प्रतिसादाला जर "बिन्डोक प्रतिसाद....!!!!!" म्हणत असलात तर "हेची फळ काय मम तपाला" म्हणायची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल! *fool*
(स्वगत) चमचाभर पाण्यात बुडी मारायची वेळ आली (/स्वगत) *cray2*
21 Mar 2014 - 12:32 am | अर्धवटराव
वेलकम टु मिपाज् मोस्ट वादग्रस्त व्यक्तीमत्व कोशीश ग्रुप =))
24 Mar 2014 - 5:14 pm | प्यारे१
24 Mar 2014 - 5:14 pm | प्यारे१
24 Mar 2014 - 5:15 pm | प्यारे१
24 Mar 2014 - 12:38 am | निनाद मुक्काम प...
विनोंद्जी
विकास ह्यांनी उपहासपूर्ण प्रतिसाद दिला आहे .
आपण त्यांचे आधीचे प्रतिसाद पाहावेत
25 Mar 2014 - 12:13 am | विनोद१८
ते मी नीट वाचायला हवे होते. असो.
विनोद१८
25 Mar 2014 - 12:23 am | विकास
ते मी नीट वाचायला हवे होते.
चर्चांमधे असे होते कारण आपण एकमेकांसमोर उभे राहून बोलत नसतो... पण, उद्या असेच वास्तवात (जालावर नाही) केजूसमर्थकांना म्हणायची वेळ येणार आहे त्याची काळजी वाटते हो! *unknw*
20 Mar 2014 - 11:35 pm | लोटीया_पठाण
सध्या आप समर्थकांच ब्रीगेडी लोकांसारख झालाय, विचारलेल्या शंकांचं निरसन करायचे नाही अन आपलाच घोडं दामटवत बसायचं.