'शाक भाजी ' नाव वाचून काही जणांना कळले नसेल काय प्रकार आहे तो ,पण हा वांग्याचा अत्यंत साधा पण चवदार असा प्रकार आहे ,तसे याला शाक भाजी का म्हणतात हे मला देखील ठाऊक नाही मी माझ्या एका मावशीच्या घरी हि भाजी खाल्ली होती आणि तेव्हापासून मला हि भाजी खूप आवडते ती तेव्हा या भाजीचे नाव शाक भाजी असेच म्हणाली होती ,असो आपल्याला नावाशी काय करायचे आहे आपण भाजी कशी करतात ते बघुयात ...
साहित्य : ४ वांगी,१ बटाटा ,१ टोमाटो,५-६ कढीपत्ता पाने ,वाटीभर उकडलेले चणे .२ लवंग ,४ काळीमिरी ,१,तमालपत्र .मीठ ,तेल ३ चमचे ,पाणी
वाटणासाठी :एक ते दीड इंच आले,६-७ लसुन पाकळ्या ,१चमचा जिरे ,१ चमचा लाल तिखट ,अर्धा चमचा हळद, १ चमचा गोडा किवा गरम मसाला हे सर्व पाणी घालून बारीक वाटून घ्या.
(टीप : आपल्याला हि भाजी फार रस्सेदार करायची नसल्याने येथे कांदा वगेरे वाटून घातले नाहीयेत अगदी थोडेसे वाटण पुरेसे होते )
कृती :वांगी बटाटा यांचे मध्यम आकाराचे काप करून ते पाण्यात घालून ठेवा ..
प्रथम कढाई मध्ये तेल घालून त्यात कढीपत्ता आणि वाटलेला मसाला घाला .
२ मी. परतून त्यात वांगी बटाटे चिरलेला टोमाटो आणि उकडलेले चणे ,मीठ टाका .आता लवंग ,काळीमिरी आणि तमालपत्र टाका .
नीट एकजीव करा ..
आणि त्यावर एक ताट झाकून त्या ताटावर त्यावर पाणी घालून भाजी शिजू द्या ...
वांगी बटाटे बटाटे वाफेवर शिजू द्यायचे आहेत ..मध्ये एखादा पाण्याचा हबका मारून पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजू द्या ...तटावरील पाण्यामुळे आत वाफ तयार होईन भाजी शिजेल वांगी लगेच शिजतील पण बटाटे शिजले असे वाटले कि आच बंद करावी ..
आणि भाजी तय्यार आहे ..
हि गरम गरम वरण भाता बरोबर अप्रतिम लागते ..
(टीप : चणे ६-८ तास भिजवून कुकर मध्ये ४ शिट्या करून वाफवून घ्यावेत )+)
प्रतिक्रिया
11 Mar 2014 - 3:18 pm | जेपी
मी पयला
12 Mar 2014 - 2:56 pm | सूड
बरं बरं, वाढदिवसाच्या शुभेच्छा !! मोठे व्हा (लवकर)!!
11 Mar 2014 - 3:24 pm | अजया
छान पा. कृ. उद्याच करुन बघते !
11 Mar 2014 - 3:25 pm | दिव्यश्री
वा...मस्तच...करूण पाहण्यात येयील... :) मला आतापर्यंत वाटायचं शाक भाजी म्हणजे फक्त बटाट्याची भाजी ...कारण काही लोक बटाट्याच्या भाजीला शाक भाजी म्हणत होते.
11 Mar 2014 - 3:27 pm | अत्रुप्त आत्मा
हाय..हाय... ! स्स्स्स्स्!
11 Mar 2014 - 3:50 pm | शिद
आमच्या घरी ह्या पद्धतीने नेहमीच चण्याची भाजी बनवली जाते पण ह्यास 'शाकभाजी' म्हणतात हे माहिती नव्हते. धन्यवाद.
बाकी पाकृ तोंपासु.
11 Mar 2014 - 4:10 pm | तुषार काळभोर
आमच्याकडे, म्हणजे पुण्यच्या ग्रामीण भागात, लग्नाचा फिक्स मेनु असायचा: आमटी-भात, तोंडी लावायला शाकभाजी आणि बुंदी! एखाद्याची ऐपत असेल तर, याच्यात पुरीसुद्धा अॅड व्हायची.
(आता तर काय... लग्नातल्या जेवणात ८-९ पेक्षा कमी ऐटम असतील तर लग्न कायदेशीर ठरत नाही, असा समज आहे.)
12 Mar 2014 - 2:52 pm | आरोही
अरे हो मी सुद्धा पुण्यात च खाली होती हि भाजी ....+)
11 Mar 2014 - 4:41 pm | Mrunalini
वा वा.. मस्त दिसतीये शाक भाजी. नावावरुन मला वाटल होत की पालक किंवा कुठलीतरी पालेभाजी वापरुन भाजी केली असेल.
11 Mar 2014 - 8:35 pm | रेवती
एकदम भारी दिसतीये.
11 Mar 2014 - 9:27 pm | मुक्त विहारि
बेस्ट काँबिनेशन.
आणि ही जर चूलीवर शिजवलेली असेल तर , जबराटच.
आणि ह्या नंतर मस्त ताक हवेच.
14 Mar 2014 - 3:39 pm | आठवणीतला अनमोल
आमच्याकडे, म्हणजे वाशिम-अमरावती-अकोला (विदर्भ) ग्रामीण भागात, लग्नात ही शाकभाजी आमच्याकडे "शाक" म्हणतात.... आधि फिक्स मेनु असायचीच......
14 Mar 2014 - 4:18 pm | सुहास झेले
जबरी काँबिनेशन... वांगी तर फेवरीट :) :)
14 Mar 2014 - 4:26 pm | बॅटमॅन
काँबो तर मस्तच दिसतेय. यद्यपि वांगं बटाटा अथवा चण्याबरोबर कितपत चांगलं लागेल काय माहिती. लेख अन प्रतिसादांवरून मात्र एकदा खाऊन पाहण्याची इच्छा होतेय.
30 Dec 2015 - 3:34 pm | आंबट गोड
शाक भाजी