सांघिक खेळ

सुधारक's picture
सुधारक in काथ्याकूट
25 Jul 2008 - 10:04 pm
गाभा: 

हे असे कां व्हावे? कर्मधर्मसंयोगाने विंबल्डनची अंतीम फेरी तीन ठिकाणी बसून बघितली. ज्याला त्याला फ़ेडरर जिंकावा असेच वाटत होते. नादालचे परतावे जबरदस्त दिसत असतानाही सहानुभूती त्या फ़ेडररलाच दिसत होती. तीसया सेटला नादालचा पाय दुखावला तेव्हा त्याची लंगडी चाल पाहून ’पुरे झाली तुझी नाटकं’ अशी टिपण्णी देणारे देखील होतेच. एकूण केबलचा पैसा वसूल करणारी मॆच होती हे नक्की.

आणि हो, प्रेक्षकांत बसलेल्या बोर्गला हसताना पहिल्य़ांदाच पाहिले.

आता सायकल शर्यत सुरु आहे. मला ही स्पर्धा जास्त शैक्षणिक वाटते. खरी संघभावना या स्पर्धकांमध्ये दिसून येते. तीन आठवडे चालणाया या स्पर्धेत बयाच strategic गोष्टी बघायला मिळतात. आपल्य़ा संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रथम यावा म्हणून बाकी सदस्यांनी केलेल्या व्यूहरचना व त्याग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुकरणीय असू शकतात.

आपल्या इतिहासात सांघिक खेळाचे एकही उदाहरण मिळू नये हे आपल्या संस्कृतीबद्दल बरेच काही सांगून जाते कां?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

25 Jul 2008 - 10:16 pm | यशोधरा

सांघिक खेळ - कबड्डी

सुधारक's picture

3 Aug 2008 - 4:17 pm | सुधारक

:S किती जुना खेळ आहे हा? ऐतिहासिक लेखांत कधी प्रथम उल्लेख आला? हॉकी आणि फुट्बॉलला भारतीय खेळ म्हणावे कां?

धनुर्विद्येत, कुस्तीत व साठमारीत आपल्या खेळांची संस्क्रुती सापडते. इतर कलांमध्ये देखील वैयक्तिक नैपुण्यालाच वाव दिसतो. आपल्या रक्तातच संघभावना कमी आहे कि काय?

येडा अण्णा's picture

29 Jul 2008 - 11:55 am | येडा अण्णा

हॉ़की, फूट्बॉल