आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा आणि मराठी विकिपीडिया संपादनेथॉन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
7 Mar 2014 - 3:29 pm
गाभा: 

नमस्कार ,

८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. त्या निमीत्त हार्दीक शुभेच्छा. ज्ञानक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा असे विकिपीडिया ज्ञानकोशाचा कणा असलेल्या विकिमीडिया फाऊंडेशनचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे.

ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शनिवार दिनक ८ मार्च २०१४ ला "महिला संपादनेथॉन" आयोजित करीत आहे. सर्व महिला सदस्यांना ह्या उपक्रमात मराठी विकिपीडियातील लेखांच्या लेखनात संपादनात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!

आपण आपल्या कोणत्याही लेखात लेखन करू शकता तरी पण आपल्या सोई साठी काही दुवे :

* विकिपीडिया:महिला
* विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प

* विकिपीडिया आणि ज्ञानकोश या संकल्पने बाबत मिपावर या पुर्वी फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते
या धाग्यावर माहिती दिलेली आहे.

*वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने या मिपा धाग्यावरही मराठी विकिपीडियातील काही लेखांचे दुवे उदाहरणार्थ उपलब्ध आहेत.

मागच्या वर्षी बेंगलोर येथे महिला दिवसाच्या निमीत्ताने झालेल्या विकिपीडिया कार्यशाळेचे एक छायाचित्र (सौजन्य:विकिमिडीया कॉमन्स)

Wikipedia Workshop in Benglore

पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उपक्रमातील सहभागाबद्द्ल धन्यवाद.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

7 Mar 2014 - 4:09 pm | माहितगार

महिला संपादनेथॉन- २०१४

पहिल संपादन या चित्राने आल आहे

editthon

आदूबाळ's picture

7 Mar 2014 - 4:30 pm | आदूबाळ

संपादनेथॉन?!

संपादनसत्र किंवा संपादनयज्ञ वगैरे बरा शब्द घ्या की

माहितगार's picture

7 Mar 2014 - 4:42 pm | माहितगार

संपादनसत्र किंवा संपादनयज्ञ दोन्ही शब्द आवडले. संपादनसत्र मॅरेथॉन मधील अर्थछटेस जवळचा वाटतो. प्रतिसादाकरिता धन्यवाद

जेपी's picture

7 Mar 2014 - 5:41 pm | जेपी

शुभेच्छा

पैसा's picture

7 Mar 2014 - 10:08 pm | पैसा

महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आजच विकि वर खाते तयार केलंय. बघते.

माहितगार's picture

8 Mar 2014 - 8:18 am | माहितगार

मराठी विकिपीडियावर अवश्य लिहा. तुमच्या रूचीच्या कोणत्याही विषयावर लिहू शकता. मी मागे महिला बचत गटांच्या स्वयंरोजगार उपक्रम (तीन एक) कार्यशाळांना मार्गदर्शन केले आहे; त्यामुळे बँकींग आणि खेळते भांडवल (वर्कींग कॅपीटल) या विषयावरही माहितीत आपल्या सवडीनुसार काही भर टाकता आल्यास पाहावे महिला व्यावसायिक आणि उद्योजकांना उपयूक्त ठरू शकेल असे वाटते.

खरेतर गोवा आणि दक्षीण भारतातील काही शहरातून आज महिला विकि कार्यशाळा सुद्धा आयोजीत केल्या गेल्या आहेत. (मुंबई पुण्यात पुर्वी झाल्या आहेत).

इंग्रजी विकिपीडियावर भारतीय विकिपीडिया महिला गटांनी भारतीय स्त्री खासदार आणि स्त्री संशोधक असे विषय निवडले आहेत.

मराठी विकिपीडियावरील विकिपीडिया:महिला प्रकल्पाचा परिघ/उद्देश सध्या खालील प्रमाणे लिहिला आहे. यात काही सुधारणा सुचवाव्यात असे आवाहन आहे.

विकिपीडियाचा उद्देश ज्ञानाच्या कक्षा प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवण्याच्या आहेत,सर्व सधारणतः महिला वर्गाचा सहभाग अपेक्षेपेक्षा कमी असतो त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महिलावर्गाच्या रूचीस अनुसरून त्या विषयासंदर्भात विकिपीडिया:महिला दालनःमहिला सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. साधारणतः स्त्री अभ्यास महिला शिक्षण, आरोग्य, निगा, बाल संगोपन, महिलांचे व्यवसाय, महिला समाजकारण, महिला राजकारण,विवीध क्षेत्रातील कर्तबगार महिलांची चरित्रे.

फॅशन,ज्वेलरी खाद्यपदार्थ,इंटिरियर डेकोरेशन, हे तत्सम विषयही चालू शकतील अशा स्वरूपाचे इतर विषयही सूचवावेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2014 - 8:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या आयुष्यामधे माता, भगिनी, बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण आदी भुमिका निभावुन आमच्या सुख**-दु़खा:त* सहभागी होणार्‍या महिलांना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्चा.
*दु़ख्ख:=सुट्टीच्या दिवशी पहाटे नऊ वाजता उठवुन ५-६ तास शॉपिंगच्या नावाखाली उभे करणे, मॅच चालु असताना कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याकडुन कोथिंबीर आणायला लावणे ईत्यादी :)....<३

आत्मशून्य's picture

8 Mar 2014 - 6:18 pm | आत्मशून्य

बेष्ट मैत्रिण, खास मैत्रिण

यात ख़ास मैत्रिण प्रकार मैत्रिण विद बेनिफिट या अर्थानचे घ्यायचा का ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2014 - 6:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बेष्ट मैत्रिण आणि खास मैत्रिण फरक अस्तोय भौ!!!! अर्थात मैत्रिण विथ बेनिफिट ह्या अर्थानी नाही.

मराठी विकिपीडियावरील अलीकडील बदल बघीतले तर आज दुपार पासून मराठी विकिपीडियावर केवळ महिलांच राज्य असल्या सारखे वाटते आहे केवळ महिलांचीच संपादने दिसताहेत !