स्ट्फ्ड मटार पराठे

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
3 Mar 2014 - 4:25 pm

साहित्यः

नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
१ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत)
१-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता)
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून गरम-मसाला
१/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता)
१/२ टीस्पून जीरेपूड
मीठ चवीप्रमाणे
१-२ टेस्पून बेसन
बारीक चिरलेली कोथींबीर

.

पाकृ:

पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करुन त्यात आले + लसूण + हि.मिरची पेस्ट परतवून घेणे.
त्यात भरडसर वाटलेले मटार घालून परतणे.
त्यात मीठ व सर्व मसाले घालून थोडे कोरडे होईपर्यंत परतणे.
त्यात बेसन घालून , ते शिजेपर्यंत परतणे. (बेसनामुळे सारण खमंग होतं व पराठा लाटताना फाटत नाही)
वरुन थोडी कोथींबीर घालावी व मिश्रण गार होऊ द्यावे.

.

कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.

.

गरमा-गरम मटारचे पराठी बुंदी रायत्याबरोबर सर्व्ह करावे.
आवडत असल्यास टोमॅटो सॉस, चटणी - लोणच्याबरोबरही सर्व्ह करु शकता.

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

3 Mar 2014 - 4:27 pm | सुहास झेले

खल्लास !!

झक्कास्स...हा प्रकार मला जाम आवडतो... मस्त मिरचीचे लोणचे व चाट-मसाला मिसळलेले दही सोबत एकदम जबरा लागते... आता बायकोकडे थोडा हट्ट (म्हणजे विनंती ;) ) करावा लागणार बहुदा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2014 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ.......
काल खालेल्या पराठ्यांची अठवण जागी झाली. :)

सानिका, तुझे नाव वाचुन माझ्या लेकाने पा. कृ. माझ्याआधी वाचली! रात्रीसाठी मटार पराठेच करावे लागणार!

स्नॅक्सच्या वेळेत उघडला धागा, आता काहीतरी हादडून आल्याशिवाय पर्याय नाही.

जेपी's picture

3 Mar 2014 - 5:38 pm | जेपी

मस्तच ......

आरोही's picture

3 Mar 2014 - 5:43 pm | आरोही

खरेच सानिका खूप सुंदर सादरीकरण आहे नेहमीप्रमाणे ...पाककृती हि मस्त .+)

प्यारे१'s picture

3 Mar 2014 - 6:06 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणेच असं म्हणता म्हणता थबकलो....

शेवटच्या फोटोतला पराठा आवडला नाही.
पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय. :(

>>पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय.

ओ काका, तूप/तेल जरा उजव्या हाताने लावलं की असं दिसतं ते.

प्यारे१'s picture

3 Mar 2014 - 6:17 pm | प्यारे१

बरं.
'मला' शेवटच्या फोटोतला पराठा आवडला नाही. :)

काही हरकत नाही, मी खाईन तो पराठा!

तुमच्यासाठी शिल्लक राहीला पाहिजे ना! ;)
फोटो आवडला नाही म्हणून खाणार नाही असं थोडीच्चे? :)

सानिकास्वप्निल's picture

3 Mar 2014 - 7:04 pm | सानिकास्वप्निल

प्यारे काकांना उगाच चुका काढायच्या असतात.
पराठ्याला तेल/ तूप लावले, फोटो काढेपर्यंत ते पराठ्यात जिरले म्हणून तसे दिसत आहे.

पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय

असं तुम्हाला उगाचचं वाटतंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2014 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो दुसर्‍या कोणी खावू नये यासाठी ती आयडियाची कल्पना असावी ;)

प्यारे१'s picture

3 Mar 2014 - 8:42 pm | प्यारे१

हल्लीच्या पोरांची घाई हो एक्का शेठ, घाई! दुसरं काही नाही. ;)

पोळी मस्त भाजली गेल्यावर फुलली की मग त्यावर हळूच तेला/तुपाची धार सोडावी, ती धार पोळीच्या फुगवट्यावरुन मस्त घरंगळत यावी नि मस्तपैकी गरम गरम ताटात पडावी.... आहाहा!
करुन बघा सानिका/सूड. बरं सांगितलं की असं चुका काढतो म्हणतात बघा! :-/

कोल्ह्याला द्राक्ष आंबट ;)

सानिकास्वप्निल's picture

4 Mar 2014 - 12:14 am | सानिकास्वप्निल

सहमत अजया ताई ;)

नेहमीप्रमाणेच छान फोटू व कृती.

त्रिवेणी's picture

3 Mar 2014 - 7:00 pm | त्रिवेणी

प्रत्येक वेळी नवीन प्रतिक्रीया काय द्यावी. तुझ्या सगळ्या रेसिपींसाठी एकच प्रतिक्रीया अफलातुन.

मधुरा देशपांडे's picture

3 Mar 2014 - 7:58 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते

अनन्न्या's picture

3 Mar 2014 - 7:32 pm | अनन्न्या

मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त!

मुक्त विहारि's picture

3 Mar 2014 - 8:52 pm | मुक्त विहारि

झक्कास.

(आयला, रोज रोज नविन शब्द आणायचे तरी कुठून?)

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Mar 2014 - 11:22 pm | भ ट क्या खे ड वा ला

काय सुंदर सादरिकरण आहे.
डोंबिवलीत फडके रोड ला "शमी गृह उद्योग " नावाचे एक दुकान आहे तेथे "खर्डा" नावाचा एक प्रकार मिळतो लालभडक, असल्या खंग्री पराठ्या सोबत असा खर्डा हवाच

त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.

ही क्रिटिकल ष्टेप करायला लय तपश्चर्या लागते. माझे पराठे सारण उतू गेल्याने सनी लियॉनसारखे तरी दिसतात, किंवा कणीक जास्त झाल्यामुळे अलका कुबलसारखे तरी दिसतात.

सीरियसली - ही ष्टेप बरोब्बर जमण्यासाठी सुग्रणीचा सल्ला मिळेल का सानिकातै?

सानिकास्वप्निल's picture

4 Mar 2014 - 12:22 am | सानिकास्वप्निल

१. सारणात बेसन घातल्यामुळे सारण कोरडे झाले त्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही, करुन बघा जमेल :)
किंवा
२. सारण भरलेल्या कणकेच्या गोळ्याला हातानेच हलके दाबून पसरवणे व कोरडे पीठ लावून हलके लाटले की सारण बाहेर येत नाही.
किंवा
३. २ लाट्या घेऊन पात़ळ लाटावे. एका पोळीत सारण भरून, हलके पसरवणे व त्यावर दुसरी पोळी ठेवून, कडा दाबून बंद कराव्यात. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.

आदूबाळ's picture

4 Mar 2014 - 5:47 pm | आदूबाळ

धनवा!

तिसरा उपाय सोपा वाटतोय. करून बघतो.

तुझ्या नी मृणालीनीच्या पाकृ मी नुसत्याच पहातो. :)

मूनशाईन's picture

4 Mar 2014 - 3:22 am | मूनशाईन

बेक्कार थंडी पडली आहे आज गरमागरम पराठा करतेच.

किती छान हिरवेगार सारण दिसते आहे. करुन पहाणार.

michmadhura's picture

4 Mar 2014 - 11:56 am | michmadhura

एकदम झकास पाकृ.

मदनबाण's picture

4 Mar 2014 - 12:40 pm | मदनबाण

मस्त ! :)

मस्तच... छान दिसतायत अगदी पराठे.

पैसा's picture

4 Mar 2014 - 8:23 pm | पैसा

खल्लास पाकृ आहे ही! जाम टेस्टी असणारे!!

वा! वा! झकास! फोटो बघून मेले.

कच्ची कैरी's picture

5 Mar 2014 - 4:55 pm | कच्ची कैरी

हिरवे हिरवेगार गालिचे ..... ही कविता आठवली फोटो बघुन :)
मस्त !!!