गाभा:
संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय
नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.
कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .
आउटरनेट नामक ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च अपेक्षित आहे.
यासाठी कोणी मोठा उद्योजक /charity / संस्था पुढे येईल का?
http://www.ndtv.com/article/world/us-company-to-beam-free-wi-fi-to-entir...
प्रतिक्रिया
26 Feb 2014 - 11:23 am | धर्मराजमुटके
कल्पना चांगली आहे पण आत्याबाईला मिशा असत्या तर या प्रकारातील वाटते.
म्हणजे फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते हे मान्य मात्र जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून हे १००% अमान्य.
26 Feb 2014 - 11:29 am | मंदार कात्रे
आउटरनेट चे क्युब-सॅट पुढच्या वर्षी लाँच होत आहेत . मग का शक्य नाही?
26 Feb 2014 - 11:37 am | धर्मराजमुटके
बहुतेक माझी विरामचिन्हे चुकलीयत...
१. फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते - हे मान्य आहे आणि शक्यदेखील आहे.
२. जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून इंटरनेट सेवा दिली जाऊ शकते - हे मान्य नाही आणि शक्य आहे असे वाटत नाही.
उसकी मर्जीबिना एक पत्ता हिलता नही |
रब जो चाहे वही तो होना है | आदमी खिलोना है |
टीप : रब च्या जागी युएस / उसगांव / आम्रिका यापैकी कोणताही शब्द वापरा.
26 Feb 2014 - 11:32 am | खटपट्या
हि गोष्ट कठीण वाटत असली तरी अशक्य बिलकुल नाही.
लोकसत्तामध्ये सुद्धा बातमी आली होती
http://www.loksatta.com/desh-videsh-news/us-company-to-beam-free-wi-fi-t...
26 Feb 2014 - 11:36 am | मंदार कात्रे
PROJECT TIMELINE
DECEMBER 2013
Phase I Technical Assessment
JUNE 2014
Development of prototype satellites and testing of long range WiFi multicasting.
SEPTEMBER 2014
Transmission testing in flight-like environments (requesting time on the International Space Station)
JANUARY 2015
Launch and testing of constellation operations
APRIL 2015
Establish manufacturing process for hundreds of satellites
JUNE 2015
Begin deployment of Outernet as launch schedule permits
26 Feb 2014 - 11:40 am | खटपट्या
आता सुद्धा विमानतळे, स्टारबक्स सारखी ठिकाणे या ठिकाणी unsecure Wi-Fi असतच कि.
नजीकच्या काळात हे होईल असे वाटते.
सद्याच्या पिढीला स्मार्ट फोन ने घातलेला विळखा पाहता. येत्या काही वर्षात सब कुछ स्मार्ट फोन होईल असे दिसतेय. जाहिरातदार देखील एक नवीन माध्यम म्हणून स्मार्ट फोने कडे पाहत असावेत.
26 Feb 2014 - 11:54 am | अत्रुप्त आत्मा
काय काय आणि किती दिवस फुकट देणार?
आमच्यामते..
नंतर करवुन घ्यायची असेल चांदी
तर पहिली काही दिवस द्यावी फु-कट'ची फांदी! :D
26 Feb 2014 - 12:03 pm | जेपी
सध्या इंटरनेट पुरवणार्या कंपन्या हे सहजपणे होऊ देतिल का ?
26 Feb 2014 - 12:15 pm | कंजूस
एकाच प्रश्नाचे उत्तर हो आणि
नाही .
लोखंडाचे सोने करता येईल ?
हो .-वैज्ञानीक
नाही -अर्थतज्ञ
26 Feb 2014 - 1:39 pm | माहितगार
+१ सहमत अगदी थोडक्यात :)
26 Feb 2014 - 12:24 pm | आत्मशून्य
मी गुंतवणुक करायला तयार आहे ? प्लिज सेंड मी द ब्रोशर अँड ऑल अदर डिटेल्स ए एस ए पी!
- बेस्ट रिगार्ड्स
(तो खर्च बहुदा एका सटेलाइटचा असावा संपुर्ण सेवेचा नाही. )
ते जी संकल्पना सांगत आहेत त्यानुसार होय तुम्ही एखाद्या देशाच्या सर्वरमधुन रीक्वेस्ट करत नाही आहात तर तुमचा काँम्प्युटर डायरेक्ट अंतराळातील उपग्रहाशी संपर्क करेल ज्यातुन तुमच्या देशाने बसवलेले सर्व फिल्टर्स बायपस होतिल. तिच गोश्ट डेटा सेंटर्सची ति सुधा अंतराळात हलवली तर त्यावर कोणत्याही देशाचे नियंत्रण उरणार नाही.
26 Feb 2014 - 12:27 pm | धर्मराजमुटके
लॉजीकली शक्य. प्रॅक्टीकली अशक्य.
अहो सर्वच अंतराळात हलविले तरी तेथेही कोणीतरी / कोणतातरी फिल्टर / बिग बॉस असणार की ?
26 Feb 2014 - 12:39 pm | आत्मशून्य
देर इज आल्वेज-अ-बॉस, हु इज अल्वेज राइट... वी नेम इट हॅकर्स!
ते सोडुन आणखी कोणालाही शक्य नाही, अधिकृतपणे तर नाहीच नाही इतकी सुरक्षित व्यवस्था नक्किच बनवता येइल अंतराळाचा वापर केला तर. याचा फायदा अर्थातच अशा व्यावसायिकांना आहे जे स्पायवेअर न वापरता जाहिरात करु इच्छीतात.
26 Feb 2014 - 12:47 pm | मदनबाण
या संदर्भात अनेक कंपन्या धाव घेत आहेत, आणि त्यात गुगल सुद्धा असणारच ! ;)
गुगलने मध्यंतरी बलुनचा वापर करुन इंटरनेट देण्याचा प्रयत्न केला होता {New Zealand }मधे.तसेच त्यांचे इतरही प्रयत्न चालु आहेत / असतील...
इंटरनेटचा स्पीड हा अर्थातच फार महत्वाचा आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. मध्यंतरी या संदर्भात एक स्पीड टेस्ट घेतली गेली होती, जी 410km (255-mile) link between the BT Tower in central London and Ipswich. या मधे घेतली गेली ज्यात १.४ टीबी {1.4 terabits} इतका स्पीड अचिव्ह केला गेला. हा वेग नक्की कसा आहे याचा अंदाज घ्यायचा झाला तर ४४ एचडी मुव्हीज दर सेकंदाला कंप्रेस न-करता तुम्हाला पाठवता येतील.
साउथ कोरिया इंटरनेट स्पीड युसेजच्या बाबतीत वर्ल्ड लिडर आहे, हो अमेरिकेचा या बाबतीत नंबर बहुतेक ८ वा किंवा ९ वा लागतो.सध्या साउथ कोरिया ५ जीवर या वर्षी स्वीच होत आहे आणि 300Mbps वायरलेस इंटरनेट स्पीड वापरकर्त्यांना मिळेल.
आपण कुठे आहोत ?
संदर्भ :-
Google to use balloons to provide free Internet access to remote or poor areas
Google Is Making a Major Play to Provide Your Internet
'Fastest ever' broadband passes speed test
South Korea's Internet Is About to Be 50 Times Faster Than Yours
Korean carriers to launch broadband-shaming 300Mbps LTE-Advanced network this year
26 Feb 2014 - 12:57 pm | आत्मशून्य
मी ८४ एम् बी पी एस ने डिसी++ मधुन डाउनलोड मारत असतो. किंबहुना निव्वळ डाउनलोड मारायलाच मी तिकडे वारंवार येत असतो म्हटले तर अतिशयोक्ती नाही. वेळ पैसा वाचतोच पुन्हा वेस्ट्बाजुला स्टेशनाबाहेर मुन्मुन मिसळही चापता येते :)
26 Feb 2014 - 1:36 pm | मदनबाण
डिसी++ चा अनुभव घेतला आहे,माझ्या मित्राच्या एका नातेवाईकाकडे हे कनेक्शन होते... त्यावेळी ते वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाले होते. ;)
27 Feb 2014 - 2:06 am | पिवळा डांबिस
पेंडसे नगर हे पूर्व डोबिवलीत आहे ना?
तुम्हाला विष्णुनगर म्हणायचंय का?
27 Feb 2014 - 2:35 am | आत्मशून्य
मुनमुन मिसळ स्टेशन बाहेर(पश्चिम) आल्यावर जेरोक्स दुकानाची लाइन आहे त्या जवळ एवरेस्ट होल मधे मिळते.
26 Feb 2014 - 2:20 pm | सांजसंध्या
डोक्याबाहेरचं काम आहे. येईल तेव्हां बघू.. बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं का ?
26 Feb 2014 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा
@ बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं का ? >>> =)) शेवटी आकाशातलं ते वरवरचं आणि गोडंतेल स्वस्त झालं का ? >>> हेच्च खरं! ते फुकट गावेल तो सुदिन. :)
26 Feb 2014 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
बजेटमधे गोडंतेल स्वस्त झालं का ?
पाय वस्तुस्थितीत घट्ट रोवलेले आहेत26 Feb 2014 - 3:00 pm | मदनबाण
आता थोडी अधिक माहिती द्यावी वाटते आहे ती देतो...
इंटरनेटवर कोणाचे नियंत्रण आहे, याचे उत्तर आहे अर्थातच अमेरिका ! स्नोडेन प्रकरणामुळे प्राव्हसीला जशी मोठी वाचा फुटली तशीच इंटरनेटवर नियंत्रणावर देखील मोठा विचार विनिमय सुरु झाला ! आणि अर्थातच या मधे उडी घेतली युरोपयन कमिशन ने. जसे तुमचे आयएसपी प्रोव्हाडर तुम्ही इंटरनेटवर काय पाहु शकता यावर नियंत्रण ठेवु शकतात तसेच संपूर्ण इंटरनेवर नियंत्रण ठेवण्याच्या कल्पनेचा तुम्ही जरा विचार करुन पहा.सध्या इंतरनेटच्या काही कार्यक्षमतेच्या भागावर काम करणार्या कंपन्यांवर अमेरिकेचे नियंत्रण आहे, म्हणजे टॉप लेव्हल डोमेन {डॉट कॉम,डॉट नेट, डॉट ओआरजी इ.}
तसेच आयपी अॅड्रेस स्पेस मेंटेन करणारी कॅलिफोर्निया स्थित ICANN यांच्यावर अर्थातच अमेरिकेचे नियंत्रण आहे.यावर युरोपात बराच खल चालु आहे,आणि येणार्या काळात इंटरनेटवर कोणाचे नियंत्रण,वर्चस्व राहिल हा कळीचा मुद्धा राहणार आहे.
तुम्हाला Archive {अर्काईव्हज{} हा शब्द माहित नाही हे आता जवळपास शक्यच नाही...पण मग इंटरनेटच अर्काईव्हज करता येइल का ? गमतीदार आणि जरा अशक्य कोटीतला प्रश्न वाटतो नाही ? ;)
याचे उत्तर इथे सापडते का ते पहा जरा :-https://archive.org/ & https://archive.org/about/
जाता जाता :- तुम्हाला या बद्धल माहिती नाही अस क्षणभर समजतो... {मलाही संपूर्ण माहिती नाहीच म्हणा !}
Akamai Technologies, Inc ही जगताल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांमधली कंपनी असुन डिस्ट्रुब्युटेड कॉप्युटिंग करणारी आणि इंटरनेटचा जवळपास ३०% वेब ट्रॅफिक सांभाळणारी कंपनी आहे. ;) हा वेब ट्रॅफिक नक्की किती आहे तर १० टेराबाईट प्रति सेकंद. यांचे क्लाउडचे ८७ देशात 137,000 सर्व्हर्स आहेत ज्यात जवळपास 1,150 नेटवर्कसचा सहभाग आहे.680 मिलियन युनिक आयपी हे Akamai इंटलिजंट प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत.जुलै २०१३ पर्यंत Akamai कडे 127,000 सर्व्हस लावले गेले होते.अॅपल ने १२.५ मिलियनची गुंतवणुक आधीच Akamai मधे करुन ठेवली आहे.
त्यामुळे यापुढे जालावर मुशाफिरी करताना Akamai हे नाव नजरेस पडले तर तुम्हाला नवल वाटु नये ! ;)
संदर्भ :-
Is Internet Freedom Under Threat From Internet Service Providers?
EU body calls for US to give up internet control, pushes for international governance
Who Controls the Internet?
Akamai Technologies
how Akamai works
End-User FAQ
Facts & Figures
Akamai Releases Third Quarter 2012 'State of the Internet' Report
Who Has the Most Web Servers?
{एके काळी एका युरोपियन कंपनीचे ८०० + सर्व्हर्स +राउटर+स्वीचेस +अॅक्सेस पॉइंट मॉनिटर करणारा} ;)
26 Feb 2014 - 5:28 pm | आत्मशून्य
गुगल अथवा इतर कोणतेही सर्च इंजीन हे त्यांच्या जन्मापासुन हेच काम करत आले आहेत. दररोज संपुर्ण इंटरनेटचा आढावा व बॅकप घेणे. पुन्हा पुन्हा.
26 Feb 2014 - 6:03 pm | लंबूटांग
सर्वप्रथम इंटरनेट archive करणे म्हणजे नक्की काय? सर्व वेब साईट्स वरील वेब पेजेस? मग डेटाबेस बॅक्ड पेजेस चे काय जी लॉग ईन केल्याशिवाय दिसत नाहीत? बरं हा डेटा बहुतेकदा sensitive ह्या प्रकारात मोडतो. त्याचा बॅकप असा कोणालाही घेता येणार नाही. कंपन्या घेऊही देणार नाहीत.
गूगल व इतर सर्च इंजिन्स फक्त HTML क्रॉल करून सेव्ह करतात. मिपाचे आर्काइव्ह केले तर फक्त लेख आर्काइव्ह होतील.
26 Feb 2014 - 9:22 pm | आत्मशून्य
हे जे वेब क्रॉलर अथवा सर्च बोट असतात ते फ्रेमवर्क बेस्ड वेब साईट जसे जूमला द्रुपल वगैरे यांना ऑटोमेटिक/टेड लॉग इन साठी ट्रेन असतात... आशा अनेक साईट/ यु आर एल आहेत जे सर्च रिजल्ट मधे येतात पण यूजर जेव्हा साईट वर रिडायरेक्ट होतो तेव्हा लोग इन करावे लागते... ते याच मुळे.
तसेही माझा मुख्य रोख गूगल वगैरे आख्खे अंतर्जाल आधीच अर्काइव करायची क्षमता राखून/ वापरत आहेत हे सांगणे हां आहे जे तुम्ही सर्च रिजल्ट मधील लिंक्स cach केलेल्या असतात हे प्ड्ताळ्ता लगेच उमजेल :)
26 Feb 2014 - 9:02 pm | मदनबाण
गुगल अथवा इतर कोणतेही सर्च इंजीन हे त्यांच्या जन्मापासुन हेच काम करत आले आहेत.
अहं... त्याला web crawling म्हणतात.
अधिक इथे :- Web crawler
Google Scholar
Googlebot
The Google spider & you: What you need to know to get your site indexed
@ लंबूटांग
एका दॄष्टीने तू बरोबरच आहे, आख्खे इंटरनेट कधीच डाउनलोड किंवा अर्काईव्ह करु शकत नाही. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्या दिलेल्या लिंकवर जाउन मिळतात का ते पहा.
26 Feb 2014 - 9:41 pm | आत्मशून्य
क्राव्ल न्हवे अर्काइव केल्यावर डेटा बेस तयार होत असतो जो फिल्टर करून युजरला दाखवला जातो. थोडक्यात होय गूगल आख्खे अंतरजाल दर दिवशी/ आठवड्याने/ महिन्यांने पवेब्साइट्च्या माहिती/ ऐड अपडेट करायच्या रेट नुसार विभागणी करून पुन्हा पुन्हा अर्काइव करत असते....!
यासाठी काय हार्ड वेअर लागते हेच मुख्य ट्रेड सीक्रेट आहे बाकीचे सग्ळे जसे नेमका सर्च रिजल्ट डिस्प्ले करणे वगैरे डेटा स्ट्रक्चर्स आणि एडवांस अल्गोरिदम अभ्यासाचा खेळ आहे. फार किचकट नाही
26 Feb 2014 - 9:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
मला वाटते हे प्रत्यक्षात होणे फार कठीण नाही.
उदा. आपणा घरी जे ईंटरनेट कनेक्शन घेतो ते बहुधा एखाद्या छोट्या ISP चे असते आणि तो बॅक एंड्ला दुसर्या मोठ्या ISP ला जोडलेला असतो.
एकेकाळी भारतातुन बाहेर जायला फक्त VSNL चे अंडर सी फायबर लिंक होते आणि सगळे ISP शेवटी VSNL ला कनेक्ट होत. म्हणजे VSNL हाच TIER-1 ISP होता. मग सर्वांनी आपापले स्वतंत्र गेटवे बनवायला सुरुवात केली.
जर एखाद्या कंपनीने अवकाशात ईंटरनेटचा गेटवे बनवला आणि त्याला वाय-फाय,जीपीआर एस किंवा दुसर्या एखाद्या मार्गे कनेक्ट करता आले तर सरकारी हेरगिरि/निर्बंध टाळता येउ शकतील.
पण कोणतेही सरकार हे होउ देणार नाही आणि त्यासाठी जॅमर बनवणॅ वगैरेसुद्धा एकीकडे चालु असेलच.
26 Feb 2014 - 9:59 pm | रामपुरी
हे बहुधा एकदिशामार्गी आहे. म्हणजे फक्त डाऊनलोड. बातम्या/व्हिडीओ बघता येतील पण काही पाठविता येणार नाही.
26 Feb 2014 - 11:14 pm | खटपट्या
आता हे नाही आहे. Reliance सारखे लोक आता tier - १ होऊ पाहत आहेत किवा आहेत. हे आपले दुर्दैव.
27 Feb 2014 - 4:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
Reliance ने केवळ तेव्हढ्यासाठी ऑस्ट्रेलियामधली रिच ही ISP विकत घेतली. तसेच वोडाफोन्,एअरटेल वगैरे लोकांनी केले.
27 Feb 2014 - 6:56 pm | धर्मराजमुटके
दुर्दैव काय त्यात ? उलट बरंच आहे की ?
पुर्वी आंतरराष्ट्रीय लीज्ड लाईन घ्यायची ठरली की VSNL च्या हापीसात कितीतरी चकरा मारलेल्या आहेत. साहेब, साहेब म्हणत या टेबलापासून त्या टेबलापर्यंत फिरलो आहे. तेव्हा आता हे बरेच आहे की. रिलायन्सचा माणूसच ऑफीसमधे येतो, आपल्यालाच सर सर म्हणतो आणि कामही झटपट करुन देतो.
27 Feb 2014 - 10:01 am | विकास
हा प्रकार इरीडीयम प्रॉजेक्टसारखा वाटला... काही अंशी यशस्वी झाला तरी परीपूर्ण होईल असे वाटत नाही.
27 Feb 2014 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय व्हावं.
-दिलीप बिरुटे
27 Feb 2014 - 7:44 pm | कंजूस
कोणत्याही /कोणाच्याही निर्बँधाशिवाय ही एक आदर्श स्थिती येईल
याबद्दल साशंक आहे .
27 Feb 2014 - 8:58 pm | आदूबाळ
लय भारी चर्चा! वाचतो आहे!
सुमारे $100,000 to $300,000 इतका खर्च - एका उपग्रहाचा म्हटला तरी - कमी वाटतो आहे. फक्त २ कोटी रुपये? आमचे गुंठामंत्री सुद्धा पाचसात सॅटेलाईट सोडू शकतील. होऊ दे खर्च!
28 Feb 2014 - 9:19 am | सुनील
जगात चकटफू चीज हे फक्त उंदराच्या पिंजर्यातच मिळते, असे म्हणतात!
तेव्हा जरा सावधान!!
28 Feb 2014 - 5:24 pm | मदनबाण
आता इंटरनेटचा प्रसार / नियंत्रण आणि ट्रॅफिक या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात आल्या असतील आता याचे एक उदाहरण द्यावेसे वाटते.
अमेरिका विरुद्ध अल जज़ीरा {Al Jazeera}आणि Akamai Technologies, Inc
खरं तर या दोन्हींचा संबंध अमेरिकेशी आणि अरब जगताशी आहे,बीबीसी चे अरेबिक भाषेतील कार्यक्रम ऑरबिट या सौदी कंपनीशी करार करुन चालु होते हा काळ १९९५ चा.त्याच सुमारास {एप्रिल १९९६} बीबीसीच्या शरियत कायदा आणि मानवाधिकार या संदर्भात गुन्हेगारांची मुंडकी उडवण्याची फुटेज दाखवली गेली, आणि इथेच मिडीया वॉरला सुरुवात झाली.
१ नव्हेंबर १९९६ अल जजीरा ने स्वतः पाय रोवले आणि एक अलिखीत नियम बनवला की अरब जगतात एकमेकांविरोधात कोणी बोलायचे नाही.जगाला अमेरिकेच्या दॄष्टीकोनातुन न दिसणार्या बातम्या आणि चॅनल मिळाला आणि अर्थातच अल जज़ीरा ची लोकप्रियता झपाट्याने वाढु लागली.या चॅनलवर देखील अनेक आरोप लागु लागले /होत आहेत आणि त्यामुळे देखील त्यांना प्रसिद्धी मिळतच होती ! सर्वात मोठा आरोप होता तो म्हणजे अल कायदाचे किंवा ओसामा बिन लादेनचे मुखपत्र असणे.बीबीसी,सीएनएन तसेच अनेक नामांकित आणि तज्ञ मंडळींना या चॅनल ने आधीच आपल्याकडे बोलवले होते.यांचा विस्तार जगभर झाला आणि आता तुम्हालाही अल जज़ीरा हे नाव नक्कीच माहित असेल...
मग यांचा आणि Akamai Technologies, Inc चा संबंध कसा काय आला ? तर जसे सॅटॅलाईट प्रक्षेपणात आघाडी मिळवली तसेच इंटरनेटवरही यांना आघाडी घ्यायची होतीच... यांनी त्यांची इंग्रजीत वेबसाईट काढली.अर्थात जगभर आपली उपस्थीती दर्शवण्यासाठी त्यांना Akamai Technologies, Inc आधार घ्यावा लागला.
पण नंतर काही वेगळ्याच घटना घडत गेल्या त्यात एक वेगळी होती ती म्हणजे Akamai Technologies, Inc को-फाउंडर Daniel Lewin यांचा फ्लाइट ११ च्या अपघातात मॄत्यु ! हो हीच तीच फ्लाईट होती जी ११ सप्टेंबर २००१ ला ट्वीन टॉवरला धडकली होती. ही एक ठिणगीच उडाली म्हणा !या नंतर अल जज़ीरावर ओसामा बिन लादेन आणि त्याच्या सहकार्यांच्या अनेक टेप्स , फुटेजेस रिलीज झाल्या आणि सगळ्या जगाचे लक्ष अपोआप अल जज़ीरा कडे ओढले गेले.या शर्यतीत पुढचा डाव लक्षात येउन आणि मडीयात आघाडी घेण्यासाठी अमेरिकेने पहिले काम केले ते म्हणजे अल जज़ीरा चे काबुल मधेले ऑफिस बॉम्ब ने उडवले ! १ एप्रिल ला बगदाद ब्युरोच्या तारिक अय्युबला ठार केले, आणि सगळ्यात मोठा वार करण्यात आला तो म्हणजे त्यांची वेबसाईट हॅक करण्यात आली आणि त्यावर अमेरिकेचा ध्वज फडकवु लागला आणि नंतर Akamai वर दबाव आणुन त्यांचा अल जज़ीराशी असलेला कॉन्ट्रॅक्ट कँसल करायला लावला.अल जज़ीरा यामुळे तात्पुरता हा होइना पांगळा झाला होता. अमेरिकन सैनिकांचे मॄतदेह दाखवण्याची चूक अल जज़ीरावर केली होती त्याची परिणीती अशी झाली.
संदर्भ :-
http://news.cnet.com/1200-1035-995546.html
Tech world mourns loss of employees
Akamai Cancels a Contract for Arabic Network's Site
Al Jazeera Denied Akamai Services
Al Jazeera
28 Feb 2014 - 10:30 pm | विकास
आता गोष्टी बदलल्या आहेत. अल जज़ीरा आता अमेरीकेत अनेक केबल कंपन्यांकडून दिसू शकते. आमच्याकडे अल जज़ीरा चॅनल लागते. अतिशय प्रोफेशनल आहे आणि चांगले कव्हरेज असते असे वाटले. त्यांचे संस्थळ http://america.aljazeera.com/ पण चांगले आहे. अर्थात अजून सगळे नवीनच आहे, त्यामुळे जसे पुण्याचा माणूस सवयीने सकाळ आणि मुंबईचा म.टा. वाचतो तसेच आमच्या बाबतीत सीएनएन बघणे होते.
जेंव्हा केबल कंपन्यांनी अल जज़ीरा चॅनल सामावून घेतले तेंव्हा त्या विरुद्ध जरा बोंबाबोंब झाली. पण समान हक्क आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या देशात त्यावर अशी अघोषित बंदी घालणे शक्य झाले नाही.
1 Mar 2014 - 9:59 am | मदनबाण
होय... त्यांच कंटेंट खरचं चांगल असत,जेव्हा केव्हा शक्य होत तेव्हा मी त्यांचा चॅनल पाहतोच पाहतो, मागच्या वर्षी त्यांच्या संकेतस्थळावर दुबईतील कामगारांबाबतचा लेख मी वाचला होता.
जाता जाता :- यामुळे जसे पुण्याचा माणूस सवयीने सकाळ आणि मुंबईचा म.टा. वाचतो
इथे फक्त म.टा च्या जागी लोकसत्ता म्हणतो. :) {हे आपल सहज हो.}
28 Feb 2014 - 5:28 pm | मदनबाण
एक दुवा द्यायचा राहिला होता :-
http://allied-media.com/aljazeera/jazeera_history.html
28 Feb 2014 - 5:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही वेबसाईट म्हणजे जबरदस्त प्रकरण आहे. मायक्रोसॉफ्ट्,ओरॅकल,सिमँटेक असे अनेक दिग्गज आपापले नवेनवे पॅचेस रिलीज करतात आणि ते सर्वांना डाउनलोड करायला अकामाई वरुन उपलब्ध करुन देतात..अर्थात त्यांनी त्यासाठी अकामाईबरोबर काँट्रॅक्ट केलेले असते.
28 Feb 2014 - 5:44 pm | आत्मशून्य
याच कारणाने अक्का-माइ नेट सेशन वापरले आहे. :)
6 Mar 2014 - 10:23 am | मदनबाण
चला आता या इंटरनेटच्या स्पर्धेत चक्क फेसबुक {चेपु} ने उडी मारली आहे ! ;)आणि त्यासाठी ड्रोन वापरण्याचा विचार आहे.
Facebook’s drones could bring internet to the developing world—and stick it to mobile carriers