केक रस्क
साहित्यः
मैदा - १५० ग्रॅम
साखर - १५० ग्रॅम
बटर - १५० ग्रॅम
अंडी - ३
बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी
मिठ चिमुटभर
कृती:
१. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे.
२. दुसर्या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे.
३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे.
४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे.
५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही.
६. हे सर्व करताना ओव्हन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
७. Preheat झालेल्या ओव्ह्न मधे केक टेवुन १५-२० मिनिट बेक करुन घ्यावा.
८. १५-२० मिनिटात केक तयार झाला असेल.
९. केकचा ट्रे बाहेर काढुन १ तास थंड होउन द्यावा.
१०. केक पुर्ण थंड झाल्यावर त्याचे १ इंचाचे तुकडे करुन घ्यावेत,
११. हे सर्व एका ट्रे मधे ठेवुन ओव्हन मधे १५० degree celcius ला १५ मिनिटे परत बेक करावे. १५ मिनिटांनी ओव्ह्न बंद करावा व तो ट्रे ओव्ह्न मधेच १० मिनिटे ठेवावा.
१२. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढल्यावर केक रस्क तयार झाले असतील.
१३. हे केक रस्क वाफाळत्या चहा सोबत किंवा नुसतेच सुद्धा खुप छान लागतात.
प्रतिक्रिया
23 Feb 2014 - 3:32 am | आयुर्हित
व्वा, केक रस्क काय आलेत फोटोमध्ये,एकदम खुसखुशीत दिसताय!
सुंदर फोटो आणि सादरीकरण !
एवढा मैदा आणि साखर आहे म्हणून एकच तुकडा घेतो चहाबरोबर.
23 Feb 2014 - 7:38 am | मुक्त विहारि
झक्कास
23 Feb 2014 - 9:21 am | कच्ची कैरी
तोंडाला पाणी सुटलय , फोटो एकदम झक्कास !!!!!
25 Feb 2014 - 11:16 am | पियुशा
कड्क चहाबरोबर क्रिस्पी रस्क क्या कॉंबो हे ! सिंप्ली ग्रे8
23 Feb 2014 - 3:40 pm | सानिकास्वप्निल
केक रस्क खुसखुशीत दिसत आहेत, करुन बघेन म्हणतेय.
फोटो मस्स्त्त्त्तं :)
23 Feb 2014 - 3:43 pm | सुहास झेले
सहीच... :)
23 Feb 2014 - 4:15 pm | मधुरा देशपांडे
मस्त.
आज ही केकृ पाहून लगेच केक बेक केला आहे. केक तर मस्त दिसतोय. तो पूर्ण गार करून पुन्हा बेकिंग करेपर्यंत धीर धरवत नाहीये. पण धीर धरून केक रस्क तयार झाले की फोटू टाकेन.
23 Feb 2014 - 4:19 pm | Mrunalini
अरे वा मधुरा... नक्की टाक फोटो. :)
पाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांना धन्स. :)
23 Feb 2014 - 4:24 pm | स्वाती दिनेश
छान दिसतो आहे,
स्वाती
23 Feb 2014 - 4:47 pm | अनन्न्या
फोटो मस्त!
23 Feb 2014 - 5:14 pm | रेवती
सुरेख आलेत फोटू! वेगळीच पाकृ!
23 Feb 2014 - 6:08 pm | मदनबाण
आहाहा... :)
23 Feb 2014 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा
केकात अंडे आहे हे माहित असूनही,केकच्या प्रेक्षणीयपणामुळे खायची इच्छा झालेला---
आत्मू! 
23 Feb 2014 - 11:21 pm | पैसा
काय मस्त फोटो आहेत! पाकृ तर चांगली झालेली दिसतेच आहे!
24 Feb 2014 - 1:49 am | अभ्या..
मस्त आहे एकदम प्रेझेंटेशन अन पाक्रु.
थ्यांक्यु मृणालिनी. ग्रेट फ़ोटो. :)
24 Feb 2014 - 2:21 pm | सूड
सहीच !!
24 Feb 2014 - 11:07 pm | सखी
कसला भारी दिसतोय केक रस्क आणि चहासुद्धा, अफलातुन रंग आला आहे.
26 Feb 2014 - 2:25 pm | सस्नेह
पण केकनंतर रस्क होईपर्यंत दम निघेलसं वाटत नाही.