साहित्यः
१ वाटी नाचणीचे पीठ
१/२ वाटी तांदळाची पिठी
१ हिरवी मिरची बारीक चिरून
५-६ कढीपत्ता बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
पाकृ:
नाचणीचे पीठ, तांदळाची पिठी, चिरलेली मिरची, चिरलेली कोथींबीर, चिरलेला कढीपत्ता व मीठ एकत्र करावे.
त्यात थोडे-थोडे करून पाणी घालून घावने / नीर डोश्याप्रामाणे पातळ मिश्रण बनवावे. (ताकात भिजवले तरी चालेल)
नॉन-स्टीक तवा गरम करायला ठेवावा व डावाने मिश्रण तव्यावर ओतावे. (घावनाप्रमाणे मिश्रण ओतावे, नेहमीच्या डोश्याप्रमाणे वाटीने पसरवायचे नाही.)
थोडे तेल सोडून हलकेच काढावे.
गरम-गरम डोसे नारळाच्या, लसणीच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 10:22 pm | सस्नेह
काय रेखीव फोटो आहेत ! मार डाला. जाळी तर इतकी सुरेख नक्षीदार पडलीये !
मस्त लागतात हे डोसे. मी रात्री पीठ भिजवते अन सकाळी करते. त्यामुळे जरा हलके होतात.
21 Feb 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि
-/\-
21 Feb 2014 - 10:46 pm | शिद
अहाहा...!!! काय ते सादरीकरण आणि काय ते जाळीदार डोसे... जबरा... _/\_
21 Feb 2014 - 11:15 pm | मुक्त विहारि
"_/\_"
ही खूण कॉपी-पेस्ट करून ठेवतो...
ह्या ताईंच्या लेखाला आता इतकाच प्रतिसाद...
22 Feb 2014 - 9:50 am | सुबोध खरे
+१
21 Feb 2014 - 11:40 pm | आयुर्हित
मनापासून आवडली ही पाकृ! एक उत्तम पर्याय दिला आहे आपण!
आजपर्यंत फक्त नागलीच्या पापडासाठी बनवलेले तयार पीठ खात होतो. त्यासोबत "फक्त लाल मिरची पूड, मीठ आणि तेल" हे खूप चांगले लागते. या डोस्या बरोबरही चांगले लागेल असे वाटते.
धन्यवाद.
21 Feb 2014 - 11:46 pm | अत्रुप्त आत्मा
22 Feb 2014 - 2:09 am | रेवती
मस्त फोटू. मी थोडे वेगळे करते हे दोसे पण त्याला जरा वेळ लागतो. म्हणजे उडदाची डाळ भिजवून मग तांदळाची पिठी व नाचणी पीठ वगैरे. पण ते फर्मेंट करावे लागते. हे खरेच झटपट दिसतायत. उद्या करून बघावेत म्हणते. कळवीनच!
22 Feb 2014 - 4:27 am | अजया
मस्त. मस्त. मस्त ..........................
22 Feb 2014 - 9:39 am | स्पंदना
झकास!!!
22 Feb 2014 - 11:10 am | सुहास झेले
जबरी... सादरीकरण नेहमीसारखे अप्रतिम :)
22 Feb 2014 - 11:17 am | पैसा
पण याला डोसे म्हणण्यापेक्षा घावन/धिरडे म्हणावे काय?
22 Feb 2014 - 11:21 am | भाते
पहिला आणि शेवटचा फोटो कातिल आहे.
पाकृ अजुन वाचलीच नाही आहे. सध्या इतकेच.
22 Feb 2014 - 11:47 am | गौरीबाई गोवेकर
मस्तच आणि पौष्टीकसुध्दा.........बर्याच दिवसाने आलीये ईथे. दोन्ही गुढघाबदल शस्त्रक्रिया. मला तर फार आवडली ही कॄती..
22 Feb 2014 - 12:06 pm | कच्ची कैरी
पौष्टीपाकक्रुतीसाठी धन्यवाद ! सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम !
22 Feb 2014 - 1:46 pm | स्वाती दिनेश
मस्तच!
नाचणीचे पीठ आहे घरात.. आता सत्कारणी लावते.
स्वाती
22 Feb 2014 - 4:45 pm | अनन्न्या
आता त्याचे आधी डोसे करून पाहते.
22 Feb 2014 - 5:48 pm | michmadhura
खूप आवडीचा प्रकार. आता उद्या करून पाहते.
22 Feb 2014 - 7:01 pm | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच.....
22 Feb 2014 - 7:54 pm | रेवती
आत्ताच केलेत. मस्त लागतायत. मी एक दोसा खाऊन प्रतिसाद द्यायला आलीये. पीठ ताकात भिजवले. रात्री झोपण्याआधी मिश्रण तयार करून ठेवले. एक टिप सानिकेची (ताकाचा वापर) दुसरी स्नेहांकिताताईंची(आधी भिजवून ठेवण्याची) असे केले आहे.
23 Feb 2014 - 3:43 pm | सानिकास्वप्निल
ताकात भिजवले की चव ही छान येते. कधी ताक कधी पाणी असे करत बनवत असते मी.
आता मी पण स्नेहांकिताताईंची टीप फॉलो करेन पुढच्यावेळेस.
धन्यावद.
22 Feb 2014 - 8:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
_/|\_
-दिलीप बिरुटे
22 Feb 2014 - 10:52 pm | मनीषा
छान पाकृ.
सध्या माझा एक हात दुखावल्याने पोळ्या करायला त्रासच होतो आहे. त्या ऐवजी असे दोसे करायला हरकत नाही.
23 Feb 2014 - 11:35 am | आरोही
मस्त हा मला आवडले ...........
7 Apr 2014 - 3:22 pm | वन्दना सपकाल
खुपच मस्त.
7 Apr 2014 - 4:24 pm | Anvita
Breakfast करता पण छान आहे.
सादरीकरण उत्तमच !
20 Apr 2014 - 5:49 pm | चाणक्य
तुमच्या सादरीकरणाला सलाम
20 Apr 2014 - 9:26 pm | Prajakta२१
करून बघते :-)
20 Apr 2014 - 9:54 pm | प्यारे१
बघून करा, करुन बघा! ;)