जातिवंत भ्रष्टाचारी, नराधम, असंस्कृत, गलिच्छ लालूप्रसाद यांनी भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या कलंकांना एक नवी उंची गाठून दिली यात मला तरी शंका वाटत नाही. स्वतःला तुरुंगात (अर्थात व्ह्यायपी कोठडीत जिथे तुरुंग अधिक्षक स्वतः तंबाखू मळून द्यायचे म्हणतात!) डांबल्यावर न डगमगता आपल्या अर्धांगीला मुख्यमंत्री बनवले.
पुण्याचे सुप्रसिद्ध भ्रष्टाचारी सुरेशभाई कलमाडी हेही लोकसभा लढवण्यास उत्सुक आहेत. पण काँग्रेसने त्यांना पक्षातून निलं बित केले आहे. त्यामुळे तसे होणे अवघड वाटते आहे. मग आता त्यांची भार्या मीराभाभी अर्थात पुण्याच्या राबडीदेवी आता इच्छुकांच्या रिंगणात उतरल्या आहेत.
संत मीराबाईंनी कृष्णभक्तीपाई विषप्राशन केले होते म्हणतात. ह्या आधुनिक सती मीराबाईंनी पतीपरमेश्वराकरता सत्तेचे विष * प्यायचा चंग बांधला आहे. आता हा विषप्याला मीराबाईंच्या ओठापर्यंत पोचतो का अन्य कुणी काँग्रेसी दैत्य तो हिसकावतो ते काही दिवसात उघड होईलच.
पण भाईंनी भाभींना मैदानात उतरवायचा मुत्सद्दी डाव घातला आहे त्याला दाद दिली पाहिजे!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/congress/article...
* थोर विचारवंत व भारताचे भावी भाग्यविधाता युवराज राहुलजींची ह्या विषयावरील विषारी टिप्पणी आपल्याला स्मरत असेलच!
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 4:53 am | खटपट्या
चांगलंय !!!
21 Feb 2014 - 11:11 am | आनन्दा
यापुढील वाटचालीसाठी महारष्ट्राला शुभेच्छा!!
21 Feb 2014 - 11:25 am | बाबा पाटील
यांना ठरवुन पाडायचयच्,कार्यक्रम मागच्याच वेळेस लागला होता,पण साहेबांनी शब्द दिला म्हणुन वाचला भाउ,यंदा खैर नाही.... !
21 Feb 2014 - 12:50 pm | इरसाल
याही वेळेस साहेबांनी " शब्द" दिला तर, बाईंना पाडणार का ?( उभ्या राहिल्या तर)
21 Feb 2014 - 7:02 pm | काळा पहाड
भाईनं किंवा बाईंनी साहेबांच्याच पक्षात प्रवेश केला तर काय करणार?
21 Feb 2014 - 11:41 am | चिरोटा
तिकिट देणार्या समीतीचे(प्रतोद्,प्रभारी,श्रेष्ठी वगैरे वगैरे)डो़के ठिकाणावर असेल तर मीराबाईला तिकिट मिळणार नाही.
21 Feb 2014 - 1:06 pm | ऋषिकेश
प्रश्न हा आहे की समजा एखाद्याच्या वडिलांनी/भावाने/मेव्हण्याने/बायकोने/नवर्याने किंवा इतर कोणीही नातेवाईकाने भ्रष्टाचार केला असेल तर त्यात त्या व्यक्तीचा दोष काय? त्या व्यक्तीला संधी का मिळू नये असे वाटते?
21 Feb 2014 - 1:26 pm | प्रसाद गोडबोले
चांगला प्रश्न आहे
थेरॉटीकली : प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते , त्यामुळे तिच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या वाईट गोष्टींवरुन सदर व्यक्ती बद्दल अंदाज बांधला जाऊ नये ...कारण त्या व्यक्तीचा त्यात खरेच काही दोष नसतो ...तस्मात त्या व्यक्तीला संधी मिळायला काहीच हरकत नाही .
प्रॅक्टीकली : सहसा असे नसते , आजुबाजुच्या व्यक्तींच्या व्यक्तीवर प्रभाव नक्कीच पडतो , शिवाय जग ठेरॉटीकली वाट्टतं तितकं सरळसोट नसतं , खुप गुंतागुंतीचं आणि कॉम्प्लेक्ष असतं तेव्हा नातेवाईकांच्या मित्रांच्या भ्रष्टाचारात सक्रिय किंव्वा अक्रिय सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही . तेव्हा संधी देणं योग्य नाही .
असो .
21 Feb 2014 - 1:38 pm | ऋषिकेश
कॉम्प्लेक्ष प्रतिसाद आहे. यातस तुमचे मत कुठाय? त्यामुळे प्रतिवाद काय करणार?
21 Feb 2014 - 1:41 pm | प्रसाद गोडबोले
संधी द्यायला हरकत नसावी ... पुर्वग्रहदुषित होवुन संधी नाकारणे हे पटत नाही .
21 Feb 2014 - 1:42 pm | ऋषिकेश
सहमत आहे, खालील प्रतिसाद बाद समजा :)
21 Feb 2014 - 1:42 pm | सुनील
त्यालाच "चांगला प्रश्न" अर्थात गूड क्वेश्चन, असे म्हणतात!
21 Feb 2014 - 1:41 pm | ऋषिकेश
दुसरे असे की हे नाते लपलेले नसते, अशावेळी केवळ उमेदवारीची संधी मागतेय ती व्यक्ती. नेत्याची निवड शेवटी जनताच करणार आहे! बहुमताला तुमचे तथाकथित प्रॅक्टिकल मत मंजूर असेल तर नाहिच निवडून येणार ती व्यक्ती. हो की नाही?
21 Feb 2014 - 6:46 pm | हुप्प्या
वशिलेबाजी, घराणेशाही ही अस्तित्त्वात नाहीच असे अट्टाहासाने मानायचे ठरवले असेल तर प्रश्नच मिटला.
पण यात मीराबाईंनी त्यांना अचानक राजकारणात गोडी निर्माण झाल्यामुळे आपले घोडे पुढे दामटायचे ठरवले आहे असे मला तरी वाटत नाही. ह्या भाभीजी आपल्या पतीची कुठलीही पुण्याई न वापरता स्वतंत्रपणे निवडणूक लढवतायत असे मानणे बावळटपणा आहे.
ज्या वेळेस कलमाडी तिकिट मिळवण्यास नालायक ठरतायत तेव्हाच ही "स्वतंत्र" राजकारणी उबळ मीराबाईंचे ठाई निर्माण व्हावी ह्याला योगायोग मानणे जअअअअअअअअरा जड जात आहे. तेव्हा कलमाडीसाहेब नथीतून तीर मारणार हे आरशासारखे स्वच्छ आहे (माझ्या मते).
राहता राहिला प्रश्न कायद्याचा. अहो, कायद्याला ह्यात काही करता येत नाही ह्याचाच तर फायदा घेतला जातो आहे. एका प्रकारची बेनामी इस्टेटच ही. भारतासारख्या देशात पुरेसे मूर्ख मतदार आहेत जे एका उमेदवाराची पुण्याई सरसकट त्याच्या/तिच्या मुलाला/मुलीला/पतीला/पत्नीला देतात.
एक आशा आहे की कलमाडींची ठार काळी कारकीर्द पाहून काँग्रेस असे करणार नाही. दुसरी आशा अर्थातच ही की पुणेकर कलमाडींना रिटायर करायचा चंग बांधतील.
21 Feb 2014 - 8:23 pm | मुक्त विहारि
स्वतांत्र्य मिळाल्या नंतर पण ती कमी झाली नाही.
नेहरू ==> इंदिरा,राजीव्,सोनिया
पवार ===> सुप्रिया,अजित
ठाकरे ===? उद्धव,आदित्य
त्यामुळे, जे काही आहे ते असेच राहणार....
21 Feb 2014 - 8:29 pm | विवेकपटाईत
अर्धनारीश्वर म्हणत्यात ते हेच. नवऱ्याच अर्धांग म्हणजे नवरी. मग नवरा मंत्री तर बायको पण मंत्रीच बनणार त्यात नवल काय. हीच परंपरा आहे, आपल्या देशातील. जे लोक या परंपरेला मानीत नाही त्यांची खुर्चीवर बसण्याची शक्यता कमीच असते. असो.
25 Feb 2014 - 11:32 am | हुप्प्या
http://www.loksatta.com/mumbai-news/congress-back-kalmadi-for-lok-sabha-...
भारताच्या क्रीडाक्षेत्रात भ्रष्टाचाराचे बीज लावून त्याचा झपाट्याने मोठा विषवृक्ष करुन अन्य क्षेत्रातील भ्रष्टाचाराशी स्पर्धा करु शकेल अशा पातळीवर नेण्याचे महान काम ज्यांनी केले अशा राष्ट्रकुलदीपक कलमाडींनी लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाच्या शर्यतीत आघाडी मिळवली आहे की काय अशी शंका येत आहे.
नामवंत खुनी दीपक मानकरला ह्या राष्ट्रकुलदीपकाने शह देऊन आपण खिलाडियोंके खिलाडी आहोत असे सिद्ध केले आहे.
इतकी ठार काळी, निसंदेह भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असतानाही कलमाडीजी विभाजित मतांचा फायदा घेऊन पुन्हा निवडणुक जिंकतात की काय अशा अशुभ शंकेची पाल वारंवार चुकचुकत आहे! हर हर!