कुंदनच्या आग्रहाखातीर....
साहित्य:
मेथीची पालेभाजी बारीक चिरलेली - २ वाटी
शेंगदाणे - १/२ वाटी
हिरवी मिरची - ६ ते ७ (चवीनुसार)
लसुण पाकळ्या - ५ ते ६
कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार
फोडणी साठी - जिरे, मोहरी
मीठ चवीनुसार
तेल
कृती :
शेंगदाणे व मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे , कोथिंबीर, लसुण पाकळ्या, जिरे एकत्र मिक्सरवर बारीक वाटण करुन घ्यावी.
कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वरील वाटलेली चटणी घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकुन २ मिनीटे चांगले परतावे. त्यात रस्स्यासाठी जरुरी प्रमाणे गरम पाणी व मीठ घालुन एक उकळी आणावी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन गरम गरम पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
टिप - अशाप्रकारे आपण गवार, वांगी, दोडका, ढेमसे, बटाटा, चवळी, वाल, सांडगा याची भाजी करू शकतो. फक्त भाज्या फोडी करून शिजवून किंवा वाफवुन घ्याव्यात.
प्रतिक्रिया
24 Jul 2008 - 3:53 pm | शेखर
खरच चांगली लागते..
शेखर
(अवांतर : माझी बायको ही भाजी फारच छान करते)
25 Jul 2008 - 7:24 am | गुंडोपंत
वा वा अगदी चव जिभेवर आली आहे हे वाचून.
त्यात नंदुरबारच्या मिरच्यांना चवच काही वेगळी आहे!
गवारीच्या शेंगांची दाण्याचा कुट घालून भाजी मस्त होते.
आपला
गुंडोपंत खाऊ
7 Aug 2008 - 5:50 pm | सुमेधा
योगिता ताई ,
खरेच...... खुपच मस्त...... चव एकदम झकास लागली हो....आमच्या कडे फक्त कान्दा , मिर्चि आणि खोब्रे घालतात्......पण तुमचि रेसिपी खुप छान...
सुमेधा :)
7 Aug 2008 - 7:15 pm | शितल
करून पहायला हव्वी .
:)
8 Aug 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
सह्ही पाकृ!
आपला,
(मेथीप्रेमी) तात्या.