"दहावीचा अभ्यास" हा माझा शाळाशाळातून चालणार्या कार्यक्रमातील काही वेताळ अनुभवापैकी हा एक.संबोधन चालू असताना माझे मुलांवर बारीक लक्ष असते.कुठे ठिणगी पडते आहे का? त्या वर्गातील शेठ मंडळीपेक्षा(८५%+ ची हुशार(?) मंडळी) अशा ठिणगीमध्ये मला जास्त रस असतो.
भांडुप मधील एक बेताची शाळा . मुलांमध्ये प्रोटीन आणि हिमोग्लोबीनची कमतरता दिसत होती. कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगी आली व पाया पडली. ठिणगी सापडल्याचा आनंद झाला.
मुलगी: सर मी आईला शिवणकामात मदतकरते.अभ्यासाला वेळ मिळत नाही.तुम्ही सांगीतलेल्या पद्धतीने दोन तास अभ्यास केला तर ९०% नक्की मिळवीन.
मी: मग अडचण काय आहे?
मुलगी: बाबा रात्री दहा नंतर अभ्यास करू देत नाहीत
मी:हॅ. तू अभ्यासाच्या नावाने डुलक्या काढत असशील.
मुलगी:तसं नाही सर, आमच्या फक्त दोन खोल्या आहेत.
मी:मग किचनमध्ये बस .
मुलगी: सर ,तुम्हाला कळलं नाही का?
मुख्याध्यापीकेच्या हातातला चहा सांडता सांडता वाचला आणि डोस् क्यात उजेड पडला.
हा आग्यावेताळ प्रश्न होता. विक्रमादित्याने सुद्धा शंभर छकलांचा पर्याय स्विकारला असता.
मुख्याध्यापीकेच्या डोळ्यात आता सोडवा प्रश्न चे आव्हान होते.क्षणभर डोळे बंद केले.मॉंसाहेब आणि गुरुवर्य मामासाहेबांचे स्मरण केले.
मॉंसाहेब अशिक्षीत तर मामासाहेब एक सुप्रसिद्ध डॉक्टर पण दोघांचेही संभाषण व मांडवलीचे चातुर्य वादातीत.
मुख्याध्यापीकेला विश्वासात घेउन एक स्क्रीप्ट तयार केले.त्यात मुलीच्या बाबांकडे रोखून बघण्याचा रोल समजावला.बाबा आले.
दहा मिनीटे इतर गप्पा झाल्यानंतर मूळ विषयाला हात घातला. मुख्याध्यापीका बरोबर होत्या म्हणून की काय निर्भीड बोलता आले. हायलाईट्स असे :
आपण चांगले चित्रकार आहत असे ऐकून आहे. मुलीला नव्वद टक्के मिळण्याची शक्यता आहे. एक तर घरातील चित्रकला सहा महिने आवरा किंवा वेळ बदला.
अकरावी बारावीचा खर्च माझा. मात्रा लागू पडली लीओनार्ड द विंसी खजील झाले जाता जाता हा विषय परत घरात नाही अशी तंबी देण्याचे काम मॅडम नी केले.
मुलीला दहावीला नव्वद टक्के मार्क मिळाले.आज बारावीला मुलगी गूड (?) कॉलेज मध्ये .झालंच तर शक्कर कॉलेज मध्ये पहिल्या पाचात आहे.मराठी मिडीयम ची असून सुद्धा कभी कभी अदीतीचा अभीभी संसर्ग नाही. सीइटी ला १८५+ मार्क मिळाले तर शासकीय रुग्णालयात MBBS करता हलवाई शोधायची कामगीरी आता पासून सुरु केली आहे, तुळशीपत्र तयार आहे.आजही त्या शाळेतल्या सर्व शिक्षीका आपला ताण दूर करायला वरील आठवण काढतात.मुख्याध्यापीकेला ऑस्कर देऊ शकत नाही याची खंत.कंसामध्ये कंस वर परत प्रश्नचिन्ह ही सवय जन्मात जाणार नाही.आदरणीय चिटणीस सरांची कृपा.माझ्यासारख्या दर दुसर्या शब्दाला अडखळणार्या जीवाला एक उत्कृष्ट वक्ता बनवण्यात त्यांचा मोठा हातभार.
दहावीमध्ये शिक्षक , अकरावी -बारावी मध्ये सुपरवायजर्स (प्रयोग शाळा) आणि प्रोफेसरच्या गूड बूक्स मध्ये राहणे करीयर ला किती फायद्याचे असते याची विद्यार्थ्यांना कल्पनाच नसते. छळवादी असोसीएशनचे मेंबर भुक्कड सीरीयलमधील कॉलेज लाईफ चे अनुकरण करण्यात धन्यता मानतात.
ग्यारावी का साल धमाल का साल ब्रीदवाक्य. आणि हेच बारावीत सालं काढते.असे कसे झाले च्या विच्छेदनात मोबाईल ,मॉल, मिडीया व मित्र मैत्रीणीवर ठपका येतो ही तर घर घर की कहानी.
जाता जाता:९०%+ मध्ये खूप वाढ झाली आहे असे ऐकून आहे.
दोन वर्षानी मेल ओपन नावाच्या पिडीत जमातीच्या पालकांची डबल फ्राय भजी होणार हे नक्की.या कढईतून माझ्या चिरंजीवांनी वाचवले.यात पालकांनी दिलेल्या आशिर्वादाचा भाग असावा.
ता.क.वरील मुलगी अजूनही शिवणकामाला मदत करते.टाईम मॅनेजमेंट नावाच्या खूळचट रोगाची लागण अद्याप नाही.
ठिणगीच्या शोधात
गाभा:
प्रतिक्रिया
28 Jul 2008 - 8:31 pm | रामदास
सर ,लिहीत रहा . चांगले मार्गदर्शन होते आहे.
28 Jul 2008 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या अशा वेगवेगळ्या ठिणग्या !!!
मस्त लिहित आहात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
28 Jul 2008 - 9:45 pm | सहज
प्रभूसर आपले अजुन लेखन वाचायला आवडेल.
29 Jul 2008 - 5:09 am | धनंजय
तुमच्या कार्याबद्दलचे आणखी अनुभव लिहावेत.
28 Jul 2008 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते
सर, अजून ठिणग्या येऊ द्या.
बिपिन.
29 Jul 2008 - 12:40 am | चतुरंग
अशीच ठिणगी-ठिणगी करुन एक दिवस वणवा व्हायला हवा!
विनायक प्रभू आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.
आपल्या अशाच अनुभवांबद्दलचे थेट लिखाण, शक्य झाल्यास अधिक विस्ताराने, अजून वाचायला आवडेल.
चतुरंग
29 Jul 2008 - 12:57 am | प्राजु
पाडून गेली ठिणगी. अजूनही येऊदेत आपले अनुभव.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Jul 2008 - 4:56 am | मदनबाण
ताईशी सहमत.....
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
29 Jul 2008 - 5:49 am | विसोबा खेचर
लेख फारसा समजला नाही. आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे तेच कळले नाही!
आपला,
(डायरेक्ट जीवनाच्या शाळेतच बर्याचश्या गोष्टी शिकलेला) तात्या.
30 Jul 2008 - 8:06 pm | टारझन
मला पण नाय समजलं नक्की काय म्हणायचंय ... फक्त वेळ बदला हे मुख्याध्यापिकेने सांगितले आणि चित्रकाराने वेळ बदलली ... यापुढे ?
टारझन (गेल्या जन्मीचा खविस)
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
30 Jul 2008 - 7:54 pm | रामदास
हे मेल ओपन काय आहे हो?
30 Jul 2008 - 10:54 pm | नारायणी
लेख आवडला पण मलाही नंतर नंतरची काहि वाक्यं समजली नाहित. (तसे लिहायला घाबरत होते:)) "मेल ओपन" आणि "कभी कभी अदीतीचा अभीभी संसर्ग नाही" हेहि नाही कळले.
तुमचे अनुभव वाचायला छान वाटत आहेत . थोडं विस्तारने लिहिलं तर अजुन आनंद घेता येइल.
(माझी प्रतिक्रिया प्रकाशित झाल्यावर बोल्ड का दिसत आहे?)
30 Jul 2008 - 11:08 pm | विसोबा खेचर
लेख आवडला पण मलाही नंतर नंतरची काहि वाक्यं समजली नाहित. (तसे लिहायला घाबरत होते:))
घबरण्याचं काहीच कारण नाही! प्रभूंचा लेख मलाही समजला नाही म्हणून मीही 'समजला नाही' असंच म्हटलं आहे! यात कुणाला घाबरण्याचं काहीच कारण नाही!
तात्या.
30 Jul 2008 - 11:57 pm | रामदास
कभी कभी अदीती हे सध्याचे इनगाणे आहे.
पालकांच्या हॅपी अवर्स मुळे मुलीला घरत अभ्यासाला जागा मिळत नव्हती.प्रभूंना हे लिहीणे अवघडल्यासारखे वाटत होते.
त्यामुळे चित्रकारीचे वाक्यं समजली नव्हती.खुलासा करून घेतल्यावर समजलं.
मेल ओपन म्हणजे मलाही कळलं नाही.
31 Jul 2008 - 12:08 am | चतुरंग
एस्.सी, एस.टी इत्यादी रिजर्वेशन आणि स्त्रियांसाठीचे रिजर्वेशन वगळून राहिलेली 'ओपन कॅटॅगरीतली मुले' म्हणजे 'मेल ओपन' असे म्हणायचे असावे!
चतुरंग
31 Jul 2008 - 12:31 am | भडकमकर मास्तर
हा लेख खूप मोटिव्हेशनने भरलेला आहे... मला आवडला... पण खूप अडखळत लक्ष देऊन वाचावा लागला...
ते हॅपी अवर्स चं मला जरा वाटत होतंच... दोन चार वेळा तेवढं ओळींमध्ये अडकलेलं शोधायला परत परत वाचलं...प्रत्येक वेळेला तेच वाटलं...पण म्हटलं तसं नसून काहीतरी वेगळं शैक्षणिक असायचं , आणि आपले डोळेच पापी की काय ? मीच ओशाळलो हो ...
अवांतर : त्या बापाला मुख्याध्यापिकेसमोर हे ऐकायला काय झालं असेल ??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
31 Jul 2008 - 12:07 am | प्रियाली
लेख समजला पण अनेकांना तो समजला नसेल तर त्यात आश्चर्य वाटले नाही. प्रबोधनपर लेखन हलके फुलके असावे, थोडीफार विनोदाची पेरणी असावी त्यामुळे ते वाचताना किंवा ग्रहण करताना ताण येत नाही हे खरे आहे. परंतु रुपकांचा अतिवापर, जागोजागी केलेले विनोदाचे प्रयत्न हे लेखाला मारक ठरते आहे असे वाटते. लेख प्रबोधनासाठी न लिहिता विनोदनिर्मितीसाठी लिहिलेला आहे का काय असे वाटले.
विषय गंभीर असेल तर त्यात मॉसाहेब, चित्रकार, लिओनार्दो द विन्ची, कभी कभी अदिती, ऑस्कर हे सर्व खटकते. लेखाला सलगताही असल्याचे वाटत नाही. काही वाक्ये तोडून-मोडून एकत्र जोडल्यासारखी वाटतात. लेख परिणाम साधत नाही.
स्पष्ट मताबद्दल राग मानू नये परंतु जर असे लेख अनेकांपर्यंत पोहचवायचे असतील तर उपहासात्मक शब्दांचा वापर करणे कमी करावा असे वाटते.
चित्रकाराचे उदाहरण देण्याऐवजी, वडिलांना एकांत हवा असे साधेसरळ वाक्य वापरून प्रश्न सोडवता आला असता.
असो, प्रभू आपले लेखन आवडते. जाणून बुजून दुर्लक्ष करत असलेल्या एका कोपर्यावर प्रकाश पाडणारे लेख असतात. अजून येऊ दे!
31 Jul 2008 - 12:10 am | चतुरंग
अपचन होईल इतके जड लेखन नको. बाकी आपले विषय हे छानच असतात.
पुलेशु.
चतुरंग
31 Jul 2008 - 2:15 am | भाग्यश्री
सहमत आहे.. प्रबोधनपर लेख एकदा वाचून झेपला पाहीजे.. त्यामुळे अती रुपकं नसावीत..
कभी कभी अदितीचा संदर्भ पाहून तर हसूच आलं.. काय संबंध त्या गाण्याचा? अशी गाणी आवडणारी मुलं नापास का तुमच्या दृष्टीने? उलट ते गाणं तर किती छान फिलॉसॉफी सांगतं,दुख्खं आली तरी पण परत हसायचे, चांगले दिवस येतात इत्यादी.. ! :)
खाली सर्कीट म्हणतात ते पटलं.. जुनं ते सोनं आणी नवं ते खुळं असा एकांगी विचार वाटतो हा...
हे असे रुपकं, आणी असे संदर्भ नका लिहू.. लेख,विषय,आशय चांगला असला तरी नसतं त्या रुपकात, आणी संदर्भांमधे अडकायला होतं.. आणि चांगल्या आशयाकडे जरा दुर्लक्ष होतं..
31 Jul 2008 - 1:54 am | सर्किट (not verified)
ता.क.वरील मुलगी अजूनही शिवणकामाला मदत करते.टाईम मॅनेजमेंट नावाच्या खूळचट रोगाची लागण अद्याप नाही.
ह्या दोन वाक्यातला संबंधच कळला नाही.
टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित समजली आहे, म्हणूनच तर शिवणकाम करायला वेळ मिळतो.
माफ करा, प्रभू साहेब, पण गेले कित्येक दिवस तुमचे म्मार्गदर्शनपर लेख वाचतो आहे. एकंदरीत "जुने ते सोने" आणि "नवीन ती खुळे" हा एकच धागा कायम आहे.
शिक्षणाविषयीचे सार हल्लीच वाचलेल्या जॉर्ज कॉल्डवेल नावाच्या लेखातून कळणे सोपे जाते.
चुभूद्याघ्या.
- (जुन्या नव्यांची व्यवस्थित सांगड घालणारा) सर्किट
31 Jul 2008 - 3:15 am | संदीप चित्रे
आणि समजलाही सर :)
तुमचे अनुभव लिहीत रहा ही विनंती .
----
'सर ,तुम्हाला कळलं नाही का' आणि 'एक तर घरातील चित्रकला सहा महिने आवरा किंवा वेळ बदला' ही वाक्यं तर अंडरलाईन करून लिहिल्यामुळे नक्की प्रॉब्लेम काय आहे ते लगेच समजले !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------