साहित्य क्रिस्पी सेसमी प्राँससाठी:
१०-१५ कोळंबी साफ करु घेणे
पाऊण वाटी मैदा (ह्यातील थोडा बाजूला काढून ठेवा कोटींगसाठी)
पाऊण वाटी भाजलेले पांढरे तीळ
शेजवान सॉस / चटणी (चिंग्सची शेजवान चटणी भारतात सहज मिळते, मस्तचं लागते)
मीठ
तेल
पाकृ:
एका बाऊलमध्ये मैदा, शेजवान चटणी, थोडे मीठ (चटणीत मीठ आहे त्याप्रमाणे घालावे) व थोडे पाणी घालून बॅटर तयार करावे.
एका प्लेटमध्ये भाजलेले तीळ पसरवून घ्या व दुसर्या प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेला मैदा घ्या.
पॅन / कढईत तेल मंद आचेवर गरम करायला ठेवा.
कोळंबीला प्रथम मैद्याने कोट करा, मग तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून तीळाने व्यवस्थित कोट करुन घ्या.
गरम तेलात अलगद सोडून डीप-फ्राय करा.
सोनेरी रंगावर क्रिस्पी तळून पेपर टॉवेलवर काढून ठेवा.
साहित्य सॅलॅड:
१/२ वाटी पातळ, उभे चिरलेले गाजर
१/२ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी
थोडासा पातळ उभा चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून लिंबाचा रस
मीठ चिमूटभर
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
साहित्य सोया + शेजवान सॉस:
डार्क सोया सॉस
चिंग्स शेजवान चटणी / सॉस
मध
बारीक चिरलेले आले
कांद्याची पात व भाजलेले तीळ
सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे.
पाकृ सॅलॅड:
गाजर + कोबी + कांदा + थोडी कांद्याची पात + लिंबाचा रस + लाल तिखट + मीठ सगळे एकत्र करावे.
पाकृ सोया + शेजवान सॉस:
सोया सॉस + शेजवान चटणी + मध + चिरलेले आले एकत्र करुन फेटणे.
त्यात कांद्याची पात व थोडे भाजलेले तीळ घालून आबंट , गोड, तिखट सॉस तयार.
सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी.
त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे.
थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.
हॅप्पी व्हॅलेंटाईंस डे !! :)
प्रतिक्रिया
14 Feb 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि
दंडवत....
आयला इथे आम्हाला एक फोटो धड काढता येत नाही आणि इथे ह्या ताई सुरेख फोटो काढतातच शिवाय ह्यांची पा.क्रु. कधी बिघडत पण नाही...
असो...
परत एकदा त्रिवार दंडवत....
14 Feb 2014 - 10:44 pm | रुस्तम
+११११११
14 Feb 2014 - 10:43 pm | रुस्तम
लई भारी....
14 Feb 2014 - 10:50 pm | आयुर्हित
जबरदस्त कलरफुल फोटो आणि तिळ+प्रौन्झची एक आगळीवेगळी पाककृती
धन्यवाद.
14 Feb 2014 - 11:05 pm | अर्धवटराव
किती निगुतीने केली आहे पाकृ. जबरदस्त.
15 Feb 2014 - 5:26 am | चिन्मय खंडागळे
दिसायला भन्नाटच आहे, पण हे खायचं कसं? कुरकुरीत कोलंबी आधी खाऊन नंतर खालचा मसाला पानासारखा तोंडात घालायचा? का कोलंबी लेट्युसमध्ये गुंडाळूनच खायची? ते जरा विचित्र नाही का वाटत, म्हणजे बुरखा घातलेल्या तरुणीचे चुंबन घेण्यासारखं??
17 Feb 2014 - 1:50 pm | एस
च्यामारी, ह्यातलं नेमकं काय खायचं असतं आणि काय पानात टाकायचं असतं बरं?
बादवे, नेहमीप्रमाणेच नादखुळा... आणि बॅकलायटिंग चा ह्याही छायाचित्रांमध्ये मस्त वापर.
17 Feb 2014 - 3:11 pm | सानिकास्वप्निल
हे असच्या असचं खायचं असतं (लेट्युस कप्ससकट- शेवटी ते सॅलॅडच), जबराट लागतं.
17 Feb 2014 - 3:14 pm | सानिकास्वप्निल
सर्व्हिंगः
15 Feb 2014 - 7:47 am | अजया
हॅपी वॅलेंटाइन डे,सानिके ;)
15 Feb 2014 - 8:19 am | कच्ची कैरी
एकदम जबरदस्त !!!!!
15 Feb 2014 - 11:45 am | मारकुटे
उगाच इंग्रजी नाव टाकलं म्हणजे चांगला स्वयंपाक येतो असे नाही
15 Feb 2014 - 12:31 pm | प्रसाद गोडबोले
लय भारी !!
15 Feb 2014 - 12:35 pm | धन्या
फोटो आवडले.
15 Feb 2014 - 12:45 pm | तुमचा अभिषेक
जीवघेणे आहे ...
15 Feb 2014 - 1:01 pm | यशोधरा
सुर्रेख!
15 Feb 2014 - 1:32 pm | michmadhura
खूप मस्त रेसिपी सानिका.
15 Feb 2014 - 5:51 pm | गणपा
खल्लास सादरीकरण.
_/\_ घ्या पामराचा.
15 Feb 2014 - 6:11 pm | स्वाती दिनेश
क्लासच दिसत आहेत ग,
स्वाती
15 Feb 2014 - 6:31 pm | प्यारे१
सुंदर दिसत आहेत. अॅज युज्वल!
15 Feb 2014 - 7:55 pm | रेवती
ग्रेट दिसतायत. रंगीबेरंगी पाकृ!
15 Feb 2014 - 8:29 pm | अत्रन्गि पाउस
एखाद दुसरे खाऊन काय होणार? एकावेळी पोट भरण्यासाठी सुमारे ३०-४० तरी खावीत का? म्हणजे ते करणे आले...
अतिशय गहन प्रश्न आहे !!!
(विचारमग्न)!!!
15 Feb 2014 - 9:03 pm | यशोधरा
३० -४०?? मग पोट सांभाळा!
15 Feb 2014 - 9:09 pm | सानिकास्वप्निल
अहो ते स्टार्टर म्हणून खायचे.
15 Feb 2014 - 9:32 pm | अत्रन्गि पाउस
;) जरा अतीच आकडा लिहिला नही का?
16 Feb 2014 - 11:32 am | दिपक.कुवेत
फोटो क्लास आलेत.
16 Feb 2014 - 11:46 am | स्पंदना
मश्तू!!
16 Feb 2014 - 2:24 pm | सुहास झेले
कोळंबी तर जीव का प्राण. कसले जबरा फोटो आलेत... पाककृती ही अल्टीमेट.... :) :)
17 Feb 2014 - 1:52 pm | पिलीयन रायडर
देवा मला सानिकाचा नवरा कर.. प्लिझ प्लिझ प्लिझ..
17 Feb 2014 - 3:26 pm | इरसाल
तथास्तु.
आणी मग सानिकाला पिलीयन रायडरचा........ठीक है !
17 Feb 2014 - 2:19 pm | Mrunalini
अप्रतिम.... यम्म्म्म्म्म दिसतय एकदम.
17 Feb 2014 - 2:29 pm | सौंदाळा
नेहमीप्रमाणेच मस्त.
(कालच मनसोक्त खापी हादडलेला)सौंदाळा
17 Feb 2014 - 3:47 pm | शिद
एकदम नजाकती ने केलेली पाकृ... झक्कास्स...
17 Feb 2014 - 4:03 pm | मदनबाण
चिकन बिकन पेक्षा मत्स्य पाकॄ पाहिली की मला कधी तरी मी मासळी खाईनच ही भिती वाटते ! :)
शेवटच्या फोटु पाहिल्यावर हे प्राँस चांगलेच कुरकुरीत लागत असणार असं वाटतय ! :)