गाभा:
परवा शनिवारि पुण्यात टिळ्क रोडवर खाद्डी करता गेले होते. तिथे एका हॉटेलात एक मुलगि सिगारेट होधत होती...आणि छान हवेत वलय सोडत होति..बघुन आश्चर्य वाटले..(बाई आणी सिगारेट अशि सवय डोळ्याला आणी मनाला झालि नाहिये :() नंतर एका हॉटेल मध्ये मुलिंना दारु पिताना पण बघितले...पुणेरि असल्यामुळे हे बघायचि सवय नव्हति.. मनात विचार आला खरच आपलि संस्क्रुति बद्लत आहे का? बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का? माझ्या मनाला पट्त नाहिये...तुमचि मद्त हवी आहे.......
प्रतिक्रिया
24 Jul 2008 - 11:35 am | सर्किट (not verified)
मिनल ताई,
आपल्या थोर भारत देशातल्या राजधानीत आम्ही १९८८ साली अशा प्रकारची लैंगिक समता अनुभवली आहे. आपल्याला २० वर्षे उशीर जाहला. आणि मी काय म्हणतो, स्त्रीयांना पुरुषांपेक्षा वेगळे वागवणे, हे पुढारलेल्या भारतात कसे जमायचे ? पुरुष सिग्रेट दारू पितात हे तुम्हाला पटते, आणि फक्त स्त्रिया पीतात, ते पटत नाही, हे कसे बुवा ?
- सर्किट
24 Jul 2008 - 11:49 am | छोटा डॉन
मी पण असे दॄष्य पुण्याच्या "फर्ग्युसनबाबा रोड" वर किमान "५ वर्षापुर्वी" पाहिले होते ...
आता बेंगलोरला तर हे दॄष्य "अतिसामान्य" , किंबहुना त्याच्या पुढच्या गोष्टी पण आता नजरेला सरावल्या आहेत त्यामुले त्याचे काहीच वाटत नाही.
योग्य की अयोग्य ठरवताना त्यात "पुरुष की स्त्री" हा भेदभाव नसावा ...
संस्कॄतीचा आणि "दारु किंवा सिगारेट" पिणे याच्याशी संमंध आहे असेही नाही. फारफार तर ह्या गोष्टी आपण "सभ्य / असभ्यतेच्या " कक्षेत तोलु शकतो ...
पण ही कक्षा ही "सापेक्ष" च ....
कारण जर आपण एखाद्या मेट्रो किंवा महानगरातील परिस्थीती आणि एखाद्या छोट्याश्या गावातील परिस्थीतीची तुलना एकाच मोजमापाने करत असु तर हे अयोग्य...
त्यामुळे एका निर्णयावर येणे अवघड ....
शेवटी हा प्रत्येकाचा व्यैयक्तीक प्रश्न मानायला हरकत नसावी ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
24 Jul 2008 - 4:11 pm | टारझन
अर्रे डॉनी .. सही बोललास .... कुणी काय ___ घालावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे यार ... काळ फार बदलला लेको... बदलली नाही ती काही लोकांची मेंट्यालिटी .... जुन्या काळी (माहीत नाही किती जुन्या) मुलींनी पँट घातली तरी मानसिक दृष्ट्या न बदललेले लेकाचे त्यालाही नाव ठेवतंच की ? मग कोण्या पोरी नी दारू ढोसली काय किंवा कॅलिफोर्निया ड्रॉप घेतला काय ? आपल्याला काय फरक पडावा ? काही वर्षंपुर्वी .. पुण्यात सिंहगड रोड ला झालेली रेव्ह पार्टी आठवते का ? मुली पण होत्या म्हणे त्यात !
मला स्वता:ला दारू सुपारी, गुठखा मावा , तंबाकू , बिड्या (अजुन काय ते ... ) चा अज्जिबात तिटकारा आहे.. पण कोणी ते करतो तर त्याचे मला काहिही वाटत नाही. आणि कोणालाही वाटू नये. माझ्या कॉलेजात असता पब्लिक दारू-सिगरेट च्या पार्ट्या करायचे .. मी त्यांचा चकना का काय ते (कुरकुरे , शेंगदाणे ,ई) संपवायचो. .. मजा यायची ...मला कधीही कोणी काय विचित्र करतो/करते याचं नवल नाही वाटत ... हा आता कोणी कपडे काढून हिंडला/ली तर नक्की वाटेल ...पण त्याकडे पुन्हा दुर्लक्ष..नेव्हर माईंड (जसे मी मल्लिका/बिपासा*/लिस्ट मोठी आहे.. कडे दुर्लक्ष करतो (!?!) )
आपल्या लोकांचा (मुख्यत्वे पुणे/मराठी लोकांचा) मेन प्रॉब्लेम काय आहे ना की आपण दुसर्याच्या (जनरल ते अतिपर्सनल) गोष्टींकडे जरा जास्तच लक्ष देतो आणि आपले मत ठाम पणे मांडतो .. की झालं .... नावं ठेऊन मोकळे,....
अवांतर : डॉन भाय जरा अफ्रिका मे आना ..तुम जितना पाणी नही पी सकता .. ईधर की लडकीया दारू पीती है ... बोले तो बोतल के ऊप्पर बोतल ... टकिला, कॉकटेल , ईत्यादी (काय ते माहित नाय) असले प्रकार दाबून एकदम ... आपली ग्यारंटी हाय... मिपा वरचा एक पण सुरा बहाद्दर त्यांना टफ नाय देऊ शकणार ....
(निर्व्यसनी) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
25 Jul 2008 - 7:19 am | गुंडोपंत
पुरुष सिग्रेट दारू पितात हे तुम्हाला पटते, आणि फक्त स्त्रिया पीतात, ते पटत नाही, हे कसे बुवा ?
सर्किटरावांशी सहमत आहे.
आणि फक्त दारूच का?
लैंगिक स्वातंत्र्यही मानणार्या प्रोतिमा बेदीं सारख्या व्यक्ती पुर्वी पासूनच आहेत.
शेवटी आयुष्याकडे पाहण्याचा आपला आपला विचार आहे...
आपला
गुंडोपंत
4 Aug 2008 - 10:41 am | खट्याळ मुलगा...
अहो मिनलताई,
प्रत्येक बाबतीत मूला बरोबरी करण्यास मुली तत्पर असतात....
त्यात एवड॑ मनाला लावून घेवु नका..
24 Jul 2008 - 11:44 am | अमितकुमार
ह्या सगळ्या OMS मुलि असाव्यात.
24 Jul 2008 - 11:48 am | सर्किट (not verified)
अमित कुमार,
ओ एम एस म्हणजे "ऑफ मोदीज स्टेट" असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
- सर्किट
24 Jul 2008 - 11:55 am | छोटा डॉन
व्याख्या बदलली आहे ...
" ओ एम एस" म्हणजे " आउट ऑफ महाराष्ट्रा स्टेट " ...
म्हणजे थोडक्यात "मप्र, उप्र, झारखंड, बिहार" येथील मस्तावलेले विद्यार्थी [ सर्वासाधारण व्याख्या ]
अवांतर : आजकाल काहीही झाले की सगळे खापर ह्या "ओ एम एस" च्या डोक्यावर फोडायची एक वाईट परंपरा सुरु झली आहे. ती पोरं उनाड, टवाळ आहेत, नाही असे नाही. पण ह्यामुळे सर्वच "मराठी महाविद्यालयीन जनता" ही सभ्य होत नाही.
माझ्या समोर अशी बरीच उदाहरणे आहेत की एखाद्या गॄपमध्ये जर " २ अमराठी व ५ मराठी" मुले असली आणि त्यांनी काही केले की लगेच " साले हे भैय्ये" म्हनुन आपण मोकळे होतो पण त्यात गोष्टीत कुनाचा सहभाग किती हे बघायचा त्रास कुनी करुन घेत नाही ...
असो. फारच अवांतर झाले ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
24 Jul 2008 - 3:14 pm | अमितकुमार
मोठे सर्किट....तूमचे आमच्या श्री. मोदिजिंनि काय घोडे मारले आहे हो ?
24 Jul 2008 - 11:44 am | मनस्वी
कोणी काय करावे, काय करू नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.
पण कधी कधी हा 'आधुनिक' पणा अंगावर येतो. नको वाटतो!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
24 Jul 2008 - 11:45 am | अमोल केळकर
पुणेरि असल्यामुळे हे बघायचि सवय नव्हति..
खरं आहे तुमचे. पुण्यात आणी टिळक रोडला ? :O अरेरे ( कॅम्प मधे एकवेळ चालुन गेले असते :? ह. घ्या.)
बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का? माझ्या मनाला पट्त नाहिये...तुमचि मद्त हवी आहे.......
बाकी विषय मस्त निवडला आहात. आता इथे सर्वसामान्य मत ( माझे ही )असेच असेल की बायकांनी असे करु नये. पण खालील मुद्दे चर्चेचे होऊ शकतात.
१) बायकांनी का म्हणुन असे करायचे नाही ?
२) मग पुरुषांनी असे केले तर चालते का?
३) दुष्परिणाम फक्त बायकांनाच होतात का ?
४) तुम्ही पुरुष म्हणुन बायकांना नाही म्हणता का ?
५) सध्याच्या युगात स्त्रियांना काही स्वातंत्र्य आहे की नाही ?
६) मुंबईत सर्रास बायाका दारु , सिगरेट पितात मग आम्ही पुणेकरीन का मागे?
माझ्याकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कुणी अधिक प्रकाश टाकु शकेल का?
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
24 Jul 2008 - 12:03 pm | सहज
तुमचि मद्त हवी आहे.......
अहो म्हणजे नक्की काय हवे आहे? ते कळवा तोवर चला आमची देखील एक "ओरीजीनल" पिंक होऊन जाऊ दे [बहुतेक ओरीजीनल]
"च्यायला ह्या बायकांनी सिग्रेट, दारु महाग केली राव!" असा अर्थ घ्यायचा का?
धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड धताड! पार्श्वसंगीत हो
24 Jul 2008 - 12:07 pm | छोटा डॉन
>>"च्यायला ह्या बायकांनी सिग्रेट, दारु महाग केली राव!" असा अर्थ घ्यायचा का?
=)) =)) =))
ठ्या:.....ठ्या:...ठ्या:.....
चेष्टा सोडा, पण सहमत आहे ...
महागाईने त्रस्त - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
24 Jul 2008 - 12:08 pm | पक्या
>>बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का?
आपल्या प्रश्नांची गंमतच वाटत आहे.
का म्हणून पिऊ नये?
समानतेच्या या युगात पुरषांना आणि बायकांना वेगवेगळे नियम लागू असावेत असे तुम्हाला वाटते का?
१८ वर्षावरील मुले मुली 'ऍडल्ट' असतात. कायद्याच्या दृष्टीने सज्ञान असतात. त्यामुळे त्यांनी काय करावे आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात सार्वजनिक ठिकाणी सिगारेटी ओढून त्याचा इतरांना उपद्रव करणे हे योग्य नव्हेच आणि त्याचे भान स्त्री पुरूष दोघांनीही ठेवायला हवे. माफक प्रमाणात दारू प्यायली तर काय वाईट हो त्यात? दारू पिऊन झिंगणे- दंगा करणे, इतरांना त्रास होईल असे बेताल वर्तन करणे हे वाईट.
24 Jul 2008 - 12:07 pm | यशोधरा
>> पुणेरि असल्यामुळे हे बघायचि सवय नव्हति
नाहीतरी पुणेरी लोकांना स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाहीच!! :D
24 Jul 2008 - 12:23 pm | इनोबा म्हणे
नाहीतरी पुणेरी लोकांना स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाहीच!!
हो! कारण बहूतेक लोक कोकणातून आलेत ना!! :D
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
24 Jul 2008 - 12:11 pm | श्रीमंत दामोदर पंत
मीनल ताई,
पुण्यात आणि तेही टिळक रोडवर असले काहितरी बघायला मिळणं म्हणजे अवघड आहे...
पुण्यात कॅम्प मध्ये मी रोज असे बघतो पण टिळक रोडवर असे कहितरी बघणे म्हणजे डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते......)
4 Aug 2008 - 8:48 pm | विजुभाऊ
सदाशिव पेठेत नऊ वारी नेसुन बायका /मुली रस्त्यावर ज्या वेगाने पन्हे पीत असतात
कधी कधी ते पाहुनच घाम फुटुन तहान लागते असे चिमणरावांच्या कोणत्यातरी पुस्तकात असावे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
24 Jul 2008 - 12:20 pm | बाजीरावाची मस्तानी
बायका किन्वा पुरुष्..कोणीही धूम्रपान, दारु...इ. व्यसने करणे....आरोग्याला घातकच असते. कारण दोघान्च्याही शरीरावर होणारे दुष्परिणाम्...तितकेच घातक असतात.
परन्तु सध्याच्या (कली)युगात, अशी व्यसने करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
महाराष्ट्राबाहेरच्या मुली-मुले..सर्रास...अशी व्यसने करताना आढळतात्..कारण्..इथे..त्यान्ना..ओरडणारे कोणीही नसते..घरच्यान्चा धाक नसतो.
सामाजिक सन्स्थान्नी, पर्यावरण्-समतोल च्या कार्यकर्त्यानी...स्वतःहून पुढाकार घेऊन्...हे प्रकार बन्द पाडले पाहीजेत. "स्वातन्त्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे".. याची जाणीव... या सर्वाना करून देणे... गरजेचे आहे.
24 Jul 2008 - 12:24 pm | मिनल
म्हणजे उद्या आपलि आई आजि दारुचा खंबा घेउन बसल्या तर चालतिल?:) दारु पिउन राडे घातलेले चालतिल? समानता म्हण्ल्यावर हे आलेच ..:)
आणि बाई हि पोटात मुल वाधवत असते..दारु आणि सिगारेट चा परिणाम हा त्याच्यावर होत असतो...(परदेशात हे सिद्ध झाले आहे...कारण हे फॅड तिथलेच आहे) मग मुलांमध्ये व्यंग निम्राण झाले तरि चालेल? :O
आणि समानताच्या नावाखालि काहिहि कसे चालेल? देवानेच जिथे बाइ आणी पुरुश भेद केला आहे तिथे आपण समानता असे म्हणुन कसे चालेल? :)आणी समानता नाहिचे...पुरुश मुलाला जन्म देऊ शकत नाहित्..मग काय समानता आहे??
आणि इथे पुणेकर आणी मुंबइकर हा फरक न करता मि म्हणेन भारतिय संस्क्रुतीत हे चालले पाहि जे का?
24 Jul 2008 - 1:49 pm | पक्या
>>म्हणजे उद्या आपलि आई आजि दारुचा खंबा घेउन बसल्या तर चालतिल? दारु पिउन राडे घातलेले चालतिल? समानता म्हण्ल्यावर हे आलेच ..
माझ्या प्रतिसादाला हा प्रतिसाद असेल तर जरा नीट वाचा प्रतिसाद , मिनल ताई. 'माफक ' शब्द वापरलाय मी त्या प्रतिसादात.
माफक प्रमाणात दारू पिणे म्हणजे 'व्यसन' नव्हे. दारू पिऊन राडे घालणे हे तर केव्हाही वाईटच्...मग ती मुले असो वा मुली. आणि किती वेळा तुम्ही पाहीलयं त्या मुलींना दारू सिगरेट पिताना? ('त्याच मुलींना अनेकदा ' असा वर काही उल्लेख नाही)
>>आणी समानता नाहिचे...पुरुश मुलाला जन्म देऊ शकत नाहित्..मग काय समानता आहे?
समानता शब्दाच्या अर्थाची तुम्ही गल्लत करताय. नैसर्गिक असमानता मानव कशी काय बदलू शकेल? हा मुद्दाच नाहीये इथे.
माझा रोख या मुद्यावर आहे की जर पुरूष सिगरेट , दारू पिऊ शकतात तर बायका का नाही? तुम्ही त्या बद्द्ल काहीच बोलत नाहीत. तुमचा रोख आहे फक्त बायकांवर. त्या जर सज्ञान असतील तर त्या ठरवतील त्यांच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही.
बायकांनी गर्भ पोटात वाढत असताना सिगरेट, अल्कोहोल यांचे सेवन करू नये हे बरोबरच आहे. सिगरेट तर केव्हाही अपायकारकच. ...पक्त बायकांसाठीच नव्हे तर पुरषांसाठी सुध्दा. पण मद्य मात्र माफक प्रमाणात (कधीतरी/ कधी कधी / एखाद्यावेळेस ) सेवन केले तर त्यात वाईट असे काही नाही.
आणि दारू काय सरसकट वाईटच असते का? किती प्रकार माहित आहेत तुम्हाला दारूचे? अल्कोहोल चे प्रमाण प्रत्येक दारूत सारखे नसते. आणि एका ठराविक मर्यादित प्रमाणात अल्कोहोल शरीरात गेले तर त्याचा शरिरावर वाईट परिणाम होत नाही.
माझ्या पुरते म्हणाल तर माझ्या आईने देखील माफक प्रमाणात (चांगल्या प्रतिचे ) मद्य सेवन केले तर मला त्यात काहीही अनुचित वाटणार नाही.
>>...(परदेशात हे सिद्ध झाले आहे...कारण हे फॅड तिथलेच आहे)
हे फॅड परदेशातील आहे असे तुम्ही म्हणता. पण भारतात बायका तम्बाकू, चुना वगैरे खातात , तपकीर ओढतात, मिशरी वापरतात... ह्या बाबतीत काय म्हणाल?
24 Jul 2008 - 12:30 pm | धमाल मुलगा
मिनलताई,
जरा एस.पी कॉलेजसमोरच्या एस.पी.ज बिर्याणीपाशी नजर फिरवा, सकाळी साधारणतः ८:३०-९ च्या वेळी कित्येकदा ४-५ मुली घोळका करुन सिगारेट ओढताना पाहिल्या आहेत. कित्येकदा तर त्यांनी आमच्याच लायटरने स्वतःच्या सिगारेटी पेटवल्या आहेत. हे मी सांगतोय साधारण ४ वर्षांपुर्वीचं....
आता मला लिमयेवाडीतून किंवा चिमणबागेतून एखादी मुलगी ऐन सक्काळी झिंगत जाताना दिसली तरी आश्चर्य वाटणार नाही.
ह्या सगळ्या OMS मुलि असाव्यात.
अमीतकुमार, गेला तो जमाना बरं.
एस.पी.लाच असलेली अस्सल मराठी, जन्माने आणि शिक्षणाने वयाच्या २० वर्षांपर्यंत पुण्यात वाढलेली, पर्वतीला राहणारी माझी एक मैत्रिण, जी ग्रॅज्युएशनपर्यंत अगदी सरळ सोज्वळ होती, तीला गेल्या ४ महिन्यांखाली मी सुदर्शन रंगमंचापाशी आम्हालाही धूराची वर्तुळं काढता येणार नाहीत इतक्या सफाईनं ते काम करताना पाहिलंय.
अर्थात,
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी काय करावं हे सांगणारे आपण कोण?
व्यक्तिस्वातंत्र्य झिंदाबाद!
पण माझं वैयक्तिक मत असं, की स्त्रियांना धुम्रपान-मद्यपान ह्यामुळे बाळंतपणात फार त्रास होतो असं ऐकून आहे, त्यामुळे त्यांनी हे प्रकार करु नयेत. आता, मुलच होऊ द्यायचं नाही, असं ठरवलं असेल तर काय, चालुद्या !!!!
हेच मत प्रत्येकाचं असेलच असं नाही, ते इतरांना पटावं असा आग्रह देखील नाही.
24 Jul 2008 - 12:34 pm | पक्या
>>सामाजिक सन्स्थान्नी, पर्यावरण्-समतोल च्या कार्यकर्त्यानी...स्वतःहून पुढाकार घेऊन्...हे प्रकार बन्द पाडले पाहीजेत.
सामाजिक संस्था, पर्यावरण्-समतोल चे कार्यकर्ते आपले काम करतच असतात. तुम्हाला गैर वाटते ना - मग तुम्ही च का नाही पुढाकार घेत ...हे प्रकार बंद पाडायला? ;)
24 Jul 2008 - 12:59 pm | यशोधरा
>>हो! कारण बहूतेक लोक कोकणातून आलेत ना!!
इनूभाव, इकडे तिकडे प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया लिहित वेळ घालवण्यापेक्षा कबूल करुन विसरलेलं काम कर आधी!! :D
म्हणजे मग तोंड लपवायला पुण्यात किंवा कोकणात जागा शोधायची गरज पडणार नाही!! >:)
24 Jul 2008 - 1:04 pm | विसोबा खेचर
कुणी काय करावं अन् काय करू नये हा माझ्या मते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे..!
आपला,
(स्वत:च्या मनाप्रमाणे वागणारा) तात्या.
24 Jul 2008 - 2:57 pm | प्रियाली
चर्चेनुसार बदलतात बरं का! ;)
24 Jul 2008 - 6:12 pm | विसोबा खेचर
ही विधानं चर्चेनुसार बदलतात बरं का!
म्हणजे काय बुवा? मी समजलो नाही! :)
24 Jul 2008 - 3:20 pm | सुचेल तसं
१००% टक्के सहमत!!!
http://sucheltas.blogspot.com
24 Jul 2008 - 3:02 pm | मनीषा
दारु (जर प्रमाणाबाहेर )स्त्री ने प्यायली काय आणि पुरुषाने प्यायली काय वाईटच.. तेच सिगरेट्स च्या बद्दल...दोघांसाठी घातकच..
तुला स्त्री ने दारु, सिगरेट प्यायली यावर अक्षेप आहे कि पुण्यातल्या टिळक रोड वरील स्त्रीयांनी पिण्यावर अक्षेप आहे ?
आणि तात्या म्हणतात तसे.. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे..
24 Jul 2008 - 3:06 pm | ऍडीजोशी (not verified)
माझ्या मते ह्या विषयावर मुलांनी न बोलता मुलींनाच बोलू द्यावे. चूक बरोबर त्यांनाच ठरवू द्यावं.
कारण, जर मुलं म्हणाली हे चूक आहे तर बुरसटलेले MCP म्हणून शिव्या पडणार आणि जर मुलं म्हणाली बरोबर आहे तर लगेच तुमच्या बहिणीने केलं तर चालेल का असा प्रश्न येणार :)
25 Jul 2008 - 1:21 am | भडकमकर मास्तर
प्रचंड सहमत...
..
हे मुलींनीच आपापले ठरवावे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
24 Jul 2008 - 3:22 pm | सुचेल तसं
कुणी काय करावं अन् काय करू नये हा माझ्या मते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे..!
ह्या तात्यांच्या विधानाशी १००% सहमत.
http://sucheltas.blogspot.com
24 Jul 2008 - 6:43 pm | प्राजु
बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का?
खरंतर, बायकांनीच काय पण पुरूषांनीही सिगारेट किंवा दारू पिणे योग्य नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे.
शेवटी कोणी काय करयाचं हे त्याचं त्यानेच ठरवायचं असतं.
आणि स्त्रियांनी दारू पिण्याचं म्हणत असतील तर आमच्या इथे आमच्या ग्रुपची गेट टुगेदर्स होतात तेव्हा मी माझ्या काही मैत्रिणींना त्यांच्या नवर्यांच्या बरोबरीने दारू पिताना पाहिलं आहे. त्यामुळे आता ते नविन नाही राहिलं..
तू पुण्यात पाहिलंस....स्थळ बदललं इतकंच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jul 2008 - 8:57 pm | धनंजय
स्त्री-पुरुष दोघांनाही. संस्कृतीचा प्रश्न नाही.
दारू पीणे त्या मानाने हानिकारक नाही. प्रमाण - माफक. (माफक = कुठलेही पेय, त्यातून दिवसाला १०-२० मिली शुद्ध आल्कोहल पोटात जाईल, इतके.) शरिराचे वजन कमी असल्यास कमी, धिप्पाड लोकांस अधिक रिचते. स्त्रिया सरासरी पुरुषांपेक्षा वजनाने कमी असतात, ते लक्षात ठेवून, तेवढा फरक करावा.
अधिक दारू पिऊन धिंगाणा घालणे, किंवा मोटारीचा अपघात करणे हे स्त्री-पुरुष दोघांनाही हानिकारक.
मिनल यांनी कोणालातरी टिळक रस्त्यावरच्या एका खानावळीत सिग्रेट ओढताना आणि दारू पीताना पाहिले. अशा परिस्थितीत मला काय वाटले असते?
ती व्यक्ती स्त्री होती की पुरुष याच्याशी मला कर्तव्य नाही - माझे लक्ष गेले नसते.
१. मला सिग्रेटचा धूर आवडत नाही. खानावळीची रचना जर अशी असली माझ्या टेबलावर त्या व्यक्तीचा धूर येत असेल, तर मी टेबल बदलीन, किंवा खानावळीतून उठून निघून जाईन. शक्यतोवर हॉटेलात मी "धूम्रपान-निषिद्ध" भागात बसतो.
२. मी खानावळीत प्रवेश करताना ती व्यक्ती नशेत धिंगाणा घालत असेल, तर मी तसाच बाहेर जाईन. मी जेवण सुरू केल्यानंतर जर त्या व्यक्तीने धिंगाणा सुरू केला तर मला त्रास होईल, हे खरेच. अशा परिस्थितीत कित्येकदा हॉटेलमालक त्या व्यक्तीला घालवतो, असे माझे निरीक्षण आहे. पिणारा मनुष्य धिंगाणा घालत नसेल तर मला त्या व्यक्तीच्या पिण्याचे सोयरसुतक नाही.
(अगदी कधीच लक्ष गेले नसते असे नाही : नऊवारी पातळ नेसलेली 'सदाशिव पेठी' पोक्त स्त्री असती, तर आश्चर्य वाटले असते - कारण हे दृश्य क्वचितच दिसते.)
24 Jul 2008 - 9:18 pm | टिउ
एकदा पुण्यात हिंजेवाडी आयटि पार्कात जाउन बघा...सगळे गैरसमज दुर होतील!
24 Jul 2008 - 9:32 pm | चतुरंग
जग हे जवळ आले आहे. चांगल्या बरोबर वाईटही पसरते, जास्त झटकनच पसरते जरा.
प्रत्येकाला आपापले हित/अहित कशात आहे हे कळते/कळायला हवे. तुम्हाला आणि इतरांना त्रास होत नसेल तर लक्ष न देणे शहाणपणाचे आणि सोयिस्कर ठरते.
तुमचा प्रश्न हा पोटतिडिकीने आलेला आहे पण आपल्याला कितीही न पटले तरी काही फरक पडेल असे नाही तेव्हा मीनल ताई, फार त्रास करुन घेऊ नका!
चतुरंग
28 Jul 2008 - 1:14 am | दनिलेश
माझे तर एकच म्हनने आहे कि ज्याला जे आवदते त्याने ते करावे .................
4 Aug 2008 - 2:16 pm | क्रिष्णा
अगदी परवाचीच गोष्ट, सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलच्या बाजुने चाललो होतो.
एक अगदी १२/१३ वर्षचा मुलगा ऐटित धुर सोडत होता.
आणि गुटखा तर जणु सर्वमान्यच झालाय.
एवढ्या छोट्या वयात हि सगळी व्यसन योग्य आहेत काय?
आपण काहीच करु शकत नाही?
कुणी काय करावं अन् काय करू नये हा माझ्या मते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे..!
तात्या, बरोबर आहे हो!
पण थोडे वाईट वाटते.
4 Aug 2008 - 3:34 pm | विसोबा खेचर
कृष्णा, चुकतो आहेस तू! मी अज्ञान मुलांच्या बाबतीत माझं मत दिलं नव्हतं!
माझं मत मी दिलं आहे त्या चर्चाप्रस्तावात अज्ञान मुलीचा उल्लेख नाही!
तात्या.