गाभा:
मिसळपाव चा सभासद झाल्यापासून (वाचनमात्र असताना सुध्दा) अनेक लेखांच्या प्रतिसादांमधे "माझा गणेशा झालाय" आणि अशाच प्रकारचे कोड्यात पाडणार्या कमेंट्स असायच्या..
नंतर लक्षात आले कि गणेशा या आयडी ला लेखांमधील चित्रे दिसत नसत, त्यामुळे हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला आहे.
चित्रे न दिसण्याचे कारण म्हणजे अनेकांच्या ऑफिसेस मधे बर्याच image sharing sites ब्लॉक्ड असतात. यासाठीच हा काथ्याकूट.
सर्वांनाच काही धाग्यांमधील चित्रे दिसतात तर इतर धाग्यांमधील नाही दिसत. सर्वांनी आपापल्या ऑफिसेसमधल्या proxies मधून कोणत्या sites वरच्या share केलेल्या images मिपावर दिसतात हे नमूद केले तर एखादा कॉमन image sharing प्लॅटफॉर्म ठरवता येऊ शकेल असे वाटते, ज्यायोगे सर्वांनाच गणेशा मोड पासून मुक्तता मिळेल.
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 3:47 pm | शिद
स्नेहांकिता यांनी 'माझ्या बहिणीच्या आवडीची डाएट पाकृ' व चित्रगुप्त ह्यांच्या 'विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)' ह्या धाग्यात टाकलेले फोटो मला दिसताहेत. त्यांच्याकडुन त्या-त्या वेब-सायटीची माहीती उपलब्ध झाली तर बरे होईल.
नोटः फोटो असलेले हे धागे सध्या बोर्डावर सगळ्यात वर आहे म्हणुन उल्लेख केला.