फ्लॉवर ची भजी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in पाककृती
2 Feb 2014 - 10:26 pm

फ्लॉवर ची फूले वेगळी करून घ्यावीत. देठे जास्तीत जास्त काढून घ्यावीत. फूले धुवून घ्यावीत.
फ्लॉवर ची फूले

देठे जास्तीत जास्त काढावीत
डाळीचे पीठ , तांदुळाचे पीठ यांचे ६०:४० असे मिश्रण करावे. त्यात तिखट. मीठ. हळद ,आमचूर ,ओवा हे सर्व टाकावे, (प्रमाण चवी प्रमाणे / अनुभवाने ठरवावे किंवा तज्ञ व्यक्तीला विचारावे.)

बेसन आणि तांदुळाचे पीठ
कढईत तेल गरम करत ठेवावे. पिठाच्या मिश्रणात थोडे पाणी आणि फ्लॉवर ची फूले टाकून कालवावे.

ओवा आणि आमचूर टाकायचे राहून गेले होते
घट्टसर मिश्रण करावे. तेल कडकडीत गरम झाल्यावर थोडे तेल चमच्याने या मिश्रणात टाकावे.
मिश्रण एकजीव करावे.
कढईत नीट पोह्तील या प्रमाणात पिठात भिजलेली फूले सोडावीत.
नीट पोह्तील अशी फूले तळणीत सोडावीत

नीट तळून बाहेर काढावीत.
चव पाहून काही बदल हवा असल्यास करावा आणि उरलेली फूले याच प्रमाणे तळावीत.
झाली भजी तयार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Feb 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि

आम्ही कधी-कधी उकडलेल्या अंड्याचा पांढरा भागाची भज्जी करतो.

जेपी's picture

2 Feb 2014 - 10:42 pm | जेपी

+1
मस्त............

आयुर्हित's picture

2 Feb 2014 - 10:50 pm | आयुर्हित

फोटो पाहूनच भूक चाळवली! उत्तम प्रयत्न!
किंचितसा खायचा सोडा घातल्यावर अजून खुसखुशीत होतात.

देठासकट मोठे मोठे तुकडे सुद्धा चालतात, फक्त त्यांना ३ मिनिटे पाण्यात शिजवून घ्यावीत. ह्यामुळे देठात असलेले तंतुमय पदार्थ(fiber such as cellulose, lignin, and pectin) सुद्धा मिळतात.

अजून नवीन पदार्थ येऊ द्यात.

दोनचार निवडक देठे कच्ची खाल्ली

अजया's picture

3 Feb 2014 - 8:26 am | अजया

मस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2014 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे व्हिजीटीयरीन चखण्याला सर्रास ऑर्डर करतात.
पाहतो आज घरी करुन. फोटो डकवतो. (डकवण्यासारखे झाले तर)

-दिलीप बिरुटे

दिपक.कुवेत's picture

3 Feb 2014 - 10:35 am | दिपक.कुवेत

वा मागच्या बिना फोटोच्या धाग्याची सगळि कसर भरुन काढलीत कि राव! मस्त दिसत आहेत. आत्ता ईथे मस्त रीमझीम पाउस पडतोय. त्यात हि भजी खायला मिळाली तर पावसाने झालेलं कुंद क्लायमेट अजुन एंजॉय करता येईल.

सुबोध खरे's picture

3 Feb 2014 - 11:00 am | सुबोध खरे

एक अनाहुत (आणी आगाउ) सल्ला भटक्या खेडवला याना.आपली भजी उत्तमच झाली आहेत जर शेवटचा फोटो एखाद्या सुन्दरशा चिनी मातीच्या प्लेट मध्ये ठेऊ बाजूला कांद्याच्या चकत्या आणी मध्ये पुदिन्याची एक डहाळी ठेवून काढला असतात तर तोच फोटो अधिक चांगला दिसला एस्टा असे वाटते
आपण मराठी माणसे बर्याच वेळेस शेवटच्या पाच टक्क्यात कमी पडतो आपली उत्पादने दर्जेदार असतात पण शेवटचिया सजावट कमी असल्याने त्याला योग्य ती दाद मिळत नाहि असे आमचे एक माजी नौद्लाचे उपाध्यक्ष म्हणात असत.आपण उत्तम कोठिंबीर वडी करतो आणी त्याची एक प्लेट चाळीस रुपयाला विकतो.पण तेच आपण गोल वड्या करून त्याला धनिया कबाब म्हणून चार कांद्याच्या चकत्या अनी एक पुदिन्याची काडी लावून चकाचक प्लेट मध्ये विकले तर लोक शंभर रुपये सहज देतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Feb 2014 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> शेवटचा फोटो एखाद्या सुन्दरशा चिनी मातीच्या प्लेट मध्ये
ठेऊ बाजूला कांद्याच्या चकत्या आणी मध्ये पुदिन्याची एक
डहाळी ठेवून काढला असतात तर तोच फोटो अधिक
चांगला दिसला एस्टा असे वाटत

आपण म्हणता त्याचा उद्देश शंभर टक्के मान्य आहे, पण आपल्या असे म्हणन्यामुळे माझा फोटो टाकायचा कोंफिदन्स लूज झाला आहे.

आमच्याकडे जर्मल चे भगुने सॉरी पातेलं... ताटं कल्हई केलेली आमच्या कड़े कुठून यायची हो चकचकीत भांडी कुंडी :)

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

3 Feb 2014 - 3:51 pm | प्यारे१

सल्ला रास्त आहे पण....

अशा पद्धतीनं सजावट होईस्तोवर भजी फस्त झाली असतील तर काय करु शकतंय कोणी?
कशी बशी ताटात पडून खाण्याइतपत निवेस्तोवर तोंडाला आवर घालून दम काढू शकतो माणूस.
एकदा पट्ट्यात सापडली की हर हर महादेव! ;)

दक्षिणा's picture

3 Feb 2014 - 1:10 pm | दक्षिणा

फ्लॉवरची मोठे तुकडे ( बरेच लोक झाडं म्हणतात) तशी करूनही भजी करता येतील असं वाटलं.

सानिकास्वप्निल's picture

3 Feb 2014 - 3:23 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ.

पैसा's picture

5 Feb 2014 - 8:17 pm | पैसा

मस्त पाकृ!

रुस्तम's picture

6 Feb 2014 - 9:48 pm | रुस्तम

मस्तच....

भजीचा धागा असल्याने शेवटचा फोटो मोठा करुन पहाण्याचा मोह आवरता आला नाही.
:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2014 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे