हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे
हि पाककृती वाचून पूर्वी केलेली एक पाककृती सुचली ती देत आहे.त्या मूळे फोटू नाहीत
वाकबगार मंडळी योग्य ते बदल करून हि पाककृती करू शकतील.
हिवाळ्यातील स्वत आणि मस्त फ्लॉवर चा तुकतुकीत पांढरा गड्डा आणावा.
एवढा कशाला आणलात असे सौ ने विचारावे. तुला भाजी ला किती लागेल तेव्हढा ठेव , बाकीच्याचे मी काय ते करतो असे सांगून स्वयंपाक घरावर अतिक्रमण करावे. अतिक्रमण पूर्वनियोजित असेल तर बेसन सुद्धा आधीच आणावे. ( कधी कधी बेसन संपत आलंय असली कारणे देऊन बेत हाणून पाडायचा प्रयत्न होतो)
फ्लॉवर ची फुले खुडून घ्यावीत ,धुवावीत. बेसन ,तिखट मीठ यांचे मिश्रण थोडे पाणी टाकून करावे चवीपुरते आमचूर टाकावे फुले त्यात भिजवून घ्यावीत. (देठ कमीतकमी ठेवावा फुलांचा)
कढईत तेल गरम करत ठेवावे चांगले तापले कि फुले त्यात सोडावीत मस्त तळून घ्यावीत , पहिला घाणा स्वयंपाक घराच्या मालकिणीला पेश करावा
आता अचानक आक्रमण रद्द करून विजय झाल्याच्या थाटात तो साजरा करायची तयारी करावी
.
.
.
आपोआप आपल्या डिश मध्ये गरमागरम फ्लॉवर ची भजी येतात
आपण युद्धभूमी वर केलेल्या पसार्या बद्दल काही ऐकू येऊ नये या साठी छानसे संगीत लावावे
प्रतिक्रिया
24 Jan 2014 - 2:40 am | अमित खोजे
झकास...
24 Jan 2014 - 7:38 am | मुक्त विहारि
झक्कास...
ते ड्राय गोबी मांचूरियन खाण्यापेक्षा, आपली फ्लॉवरची भज्जीच मस्त.
आणि त्या सोबत, झणझणीत मिरच्यांची भज्जी पण हवीतच.
24 Jan 2014 - 10:51 am | पैसा
पाकृची पद्धत आवडली! आता आजच्च फ्लॉवर आणून करा आणि फोटो टाका बघू!
24 Jan 2014 - 11:19 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO:
24 Jan 2014 - 12:17 pm | दिपक.कुवेत
बिना फोटोंची भजी आवडली. भज्यांच्या पीठात थोडा ओवा घातला तर भजी आणि सौं ची बडबड (पसारा घालुन ठेवल्याबद्द्ल) दोन्हि पचायला मदत होईल.
24 Jan 2014 - 12:20 pm | भाते
अवश्य करा. फक्त त्याआधी मला व्यनि करून कळवा म्हणजे मीही येईन तुमच्याकडे.… भजी खायला :)
24 Jan 2014 - 12:54 pm | गणपा
फा ऊ ल.
24 Jan 2014 - 2:34 pm | सूड
असेच म्हणतो !!
24 Jan 2014 - 2:03 pm | अजया
सोपी आणि छान आहे पा.क्रु. आजच फ्लॉवर आणा ,परत भजी करा आणि फोटू टाका ! मग परत वाचु.
24 Jan 2014 - 2:41 pm | अनिरुद्ध प
आहे पा क्रु आवडली.
24 Jan 2014 - 3:15 pm | अत्रुप्त आत्मा
वुई वॉंट फोटु... वुई वॉंट फोटु! :-/
2 Feb 2014 - 10:33 pm | भ ट क्या खे ड वा ला
फोटू सकट पाकृ टाकली आहे
25 Jan 2014 - 6:29 pm | मदनबाण
आह्ह... भजी ती पण फ्लॉवरची ! कप्लना उत्तम आहे. :)
वरती मुवि म्हणतात त्याप्रमाणे ते ड्राय गोबी मांचूरियन खाण्यापेक्षा फ्लॉवरची भज्जी एकदा ट्राय मारली पाहिजेत.
फोटु ?