मिस्टी पिकॉक बे

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in भटकंती
16 Jan 2014 - 10:15 am

मिस्टी पिकॉक बे

नवीन वर्षाचा विकांत कोठे जायचे याचा विचार चालला होता. सुट्टी टाकून मोठ्या ट्रेकला जायचे का घरीच पडून राहून घरच्यांना सरप्राइज द्यायचे ह्या विचारातच "नवीन वर्षाचे तरी घरात थांबा जमले तर! " अश्या वाक्याने आता घरच्यांना वेळ द्यायला पाहिजे हे जाणवले. बऱ्याच दिवसांनी घरात आमचे पाऊल थांबल्याचे बघून मातोश्रींना ही जरा बरे वाटले होते. पण त्यांचा तो आनंद जास्त टिकू न देता त्यांच्यासकट कुठेतरी जायचा प्लान केला.

कुटुंबा बरोबर फिरायचीही मजाच वेगळी हेच खरे. रविवारी सकाळी ६ वाजता सगळ्यांना गाडीत भरून निघालो पिकॉक बे ला. २-३ तासात परत यायचे असल्याने खाण्या पिण्याचे काही घेतले नव्हते. त्यामुळे ते लटांबर कमी झाले. १० पर्यंत घरी येऊ असा अंदाजाने रविवार हि वाया जाणार नव्हता.
मोर आणि हरीण पाहायला जायचंय म्हणून बच्चे मंडळी फुल खूश होती. सकाळी सहालाच उठून सगळे तयार.

कोथरूड पासून वारजे कडे जाणाऱ्या रोड ने कोंढवे धावडे कडे जावे. NDA ची हद्द चालू होते तसा मस्त निसर्ग दिसू लागतो. कोंढवे धावडे गावापासून कुडजे पर्यंत जो रोड आहे तिथे सकाळी मोर आणि हरणे दिसतात. तोच रोड पुढे एक फाटा फुटून डोणजे-सिंहगड तर सरळ गेल्यास खडकवासला (उजवी बाजू), निलकंठेश्वर, पानशेत ते थेट वेल्हे येथे जाते. निलकंठेश्वर येथून २५ किमी आहे. पावसाळ्यात पानशेत परिसर पण फार भारी असतो.

थंडीचे दिवस असल्याने भन्नाट धुके होते. रोड हि चांगले होते. फार मजा आली गाडी हाकायला.
.
सगळीकडे मिस्टी असे वातावरण होते, कमाल!
.
.
गाडी एकदम संथ चालली होती. जंगल सफरीला निघाल्याचाच भास होत होता. सगळेजण गाडीतून कुठे काय दिसतंय ते बघत होतो, तेवढ्यात भाच्ची ला झाडावरचे हे महाशय दिसले.
.
या स्पॉटला हरणे दिसतात. मस्तपैकी सकाळी सकाळी अंघोळीला येत असावीत. पण हरणे अंघोळ करतात का? आणि त्यात आज रविवार. अंघोळीला सुट्टी असेल तर?
.
तसेच झाले. एकही हरीण दिसले नाही. येथेच एक दोन वेळा हरणे पाहिली होती.
हरीण तर नाही पण आता मोर तरी दिसतोय का नाही या विचारातच गाडी चालवताना थोडेसे अंतर गेल्यावर लगेच थोडेसे कोवळे ऊन पडलेले दिसले आणि मोरांचे अख्खे कुटुंब किडे खात ब्रेकफास्ट करताना दिसले. गाडीतून न उतरताच हे फोटू काढले. उतरले की आपली चाहूल लागून ते दूर पळून जात होते.

सगळ्यात पहिले लक्ष वेधले ते या मोराने. वाह कमाल! निसर्ग कोणाला किती सुंदर बनवू शकतो काही लिमिटच नाहीये. पाहताक्षणी प्रेमात पडावे असा, ३-४ फूट उंचीचा हा मोर डौलात हिंडत होता. डोक्यावरचा तुरा पण अहाहा.
.
यातला डावीकडून २ नंबर चा मोराची मान बघा कसला भारी कलर आहे.
.
प्राणी-पक्षी स्वातंत्र्यात, मुक्त असताना अजून नजाकतदार दिसतात. मागे कर्नाळ्यात मोर पहिला होता पिंजऱ्यात. लांडोरीने कानफटात मारल्यासारखा दिसत होता.
.
मोर आणि लांडोर.
.
सगळेजण खाण्यात मग्न होते. त्यांना कोण आपले फोटो काढतंय वैगरे काही पडलेली नव्हती. सकाळची वेळ असल्याने रहदारीही जास्त नव्हती. त्यामुळे त्यांना त्रास द्यायला कोणीही नव्हते आजूबाजूला.
.
२०-२५ मिनिटे तेथेच थांबून होतो. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. येथून गाडी वळवली आणि घरी.
.
अजूनही धुके सरलेच नव्हते.
.
अवतार मधल्या पॅन्डोरा वर आल्यासारखे वाटत होते.
.
.
हा आम्हाला घेऊन गेलेला इंडो-जॅपनीज प्राणी. याची खाण्यापिण्याची व्यवस्था तेवढाच काय तो खर्च. बाकी अगदीच नो खर्च. पुण्यातच बरीच बघण्यासारखी ठिकाणे आहेत. फक्त गर्दी चुकवायचे गणित जमले पाहिजे.
.
दहापर्यंत परत घरी आल्यावर कुटुंबासोबत नाश्ता, गप्पा टप्पा, फोटो. खऱ्या अर्थाने रविवार सत्कारणी लागला म्हणता येईल.

सागर
http://sagarshivade07.blogspot.in

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

16 Jan 2014 - 10:53 am | अनुप ढेरे

वा! मस्तं !

संजय क्षीरसागर's picture

16 Jan 2014 - 11:27 am | संजय क्षीरसागर

तिथलं स्प्लेंडर कंट्री हे माझं अत्यंत आवडतं ठिकाण आहे. जस्ट औट ऑफ द वर्ल्ड!

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2014 - 11:46 am | पिलीयन रायडर

मस्तच की हो..
तुम्ही कान्हा नॅशनल पार्कात गेलाय का? तुमचा उत्साह पाहता नक्की जा.. आणि जायच्या आधी कुठे नि कसे जायचे हे मला विचारा.. तुम्ही लय लय लय खुष व्हाल बघा.. (लेख टाकायचाय मला खर तर..)

आदूबाळ's picture

16 Jan 2014 - 12:39 pm | आदूबाळ

कान्हा नॅशनल पार्क

म्हणजे मध्य प्रदेशातलं ना? फार आवडलं होतं मला ते. (वाघ एक पण दिसला नाही, पण वातावरण कमाल होतं)

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2014 - 1:19 pm | पिलीयन रायडर

वाघ मलाही दिसला नाही.. पण बाकीच्यांना दिसला.. मी फक्त फोटो पाहिले.!!पण तरीही ती माझी बेस्ट ट्रिप आहे.. फार मस्त वातावरण होतं..!!

सुज्ञ माणुस's picture

16 Jan 2014 - 1:42 pm | सुज्ञ माणुस

कान्हा नॅशनल पार्कात गेलाय का? >> नाही ना. खूप दिवस मनात आहे पण फक्त मनातच आहे. :( आपण लेख लिहिलात तर आपला ट्रीप प्लान पण लिहाल का? मदत होईल.
गाडीतून जंगल फिरायला तेवढी मजा येते का? पण अनुभव भारीच असणार. :)

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2014 - 5:14 pm | पिलीयन रायडर

तुमच्या मुळे आज २ महिन्यांनी शेवटी लिहिलाच लेख... हा घ्या..

http://www.misalpav.com/node/26757

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 5:28 pm | प्यारे१

झैरात!

धाग्याविषयी :

मोरांचे फोटो देखणे आहेत.

दिपक.कुवेत's picture

16 Jan 2014 - 12:20 pm | दिपक.कुवेत

आणि वर्णनहि छोटसचं पण साजेस.

arunjoshi123's picture

16 Jan 2014 - 12:49 pm | arunjoshi123

छान फोटो.

पुण्याचा इतका जवळ असणारा हा spot अजून माहित नवता . माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अजून अश्या पुण्याच्या जवळच्या जास्त publicity न झालेल्या परंतु भेट देण्यासाठी छान असलेल्या ठिकाणांची माहिती दिली तर बरं होईल

सूड's picture

16 Jan 2014 - 3:11 pm | सूड

मस्त !!

नगरीनिरंजन's picture

16 Jan 2014 - 7:37 pm | नगरीनिरंजन

खूपच छान!
पण एवढ्या छान छान फोटोंमध्ये गाडीचा फोटो टाकायची अवदसा का सुचावी?

बॅटमॅन's picture

16 Jan 2014 - 7:59 pm | बॅटमॅन

लेख आवडला. फोटो, विशेषतः मोरांचे फार देखणे आहेत.

कवितानागेश's picture

16 Jan 2014 - 11:55 pm | कवितानागेश

मस्तच आहे जागा. :)

रेवती's picture

17 Jan 2014 - 12:01 am | रेवती

फोटू आवडले.

इन्दुसुता's picture

21 Jan 2014 - 7:00 am | इन्दुसुता

फोटो आवडले.

सुहास झेले's picture

22 Jan 2014 - 6:04 pm | सुहास झेले

मस्तच... जायला हवे नक्कीच :)

पैसा's picture

26 Jan 2014 - 12:40 pm | पैसा

मस्त वर्णन आणि फोटो! आपल्या जवळपास अशी खूप ठिकाणे असतात. मात्र अतिपरिचयात अवज्ञा अशी अवस्था होते!

कोकणी पुणेकर's picture

27 Feb 2014 - 2:42 pm | कोकणी पुणेकर

हा धागा वाचुन गेल्या रविवारीच NDA ला जाउन आलो. बरेच मोर / लांडोर दिसले.