गाभा:
प्लेसमेंट क्षेत्रात इंग्रजी भाषेचा प्रभाव बर्यापैकी दिसतो.कृपया मराठीमधील समर्पक शब्दांचा वापर सुचवावा.
कॅम्पस रिक्रूटमेन्ट
करिअरच्या
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही
टर्निग पॉइंट
इंटरव्ह्य़ूसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या
बेसिक संकल्पना
कट् ऑफ
मार्केटिंग टीममध्ये
स्ट्रेटेजी
विद्यार्थ्यांची पॅशन
पॅनेलला
अॅप्टिटय़ूड
ऑफर
परदेशात पोस्टिंग
प्रोजेक्ट
वरील सर्व शब्द आजच्या लोकसत्ताच्या करीयर पुरवणीत आढळले. ( http://www.loksatta.com/career-vrutant-news/campus-recruitment-343829/2/ ).
याशिवायही लिड, रेझ्युमे, सिव्ही, जॉब साईट, नेटवर्क, रेफरन्स, सिलेक्शन इत्यादी शब्दही सर्रास वापरले जातात.
प्रतिक्रिया
14 Jan 2014 - 9:01 pm | आदूबाळ
असू देत की. चुकीचं मराठीकरण केलेले शब्द फार बुचकळ्यात टाकतात. मागे एका महाभागाने "भारतीय कंत्राट कायदा" असा वरचेवर उल्लेख केलेला दस्त दिला होता, तेव्हा ब्याक्कार हसलो होतो.
अवांतरः शोलेमध्ये उल्लेख झालेलं "ताजीराते हिंद" काय असेल बरं?
14 Jan 2014 - 11:27 pm | आनंदी गोपाळ
ताजिराते हिंग की हिंद काय ते ठाऊक नाही.
पण दस्त लागणे मंजी जुलाब असे म्हाईत हाये ;)
14 Jan 2014 - 11:35 pm | आदूबाळ
:))
काय सांगताव!
मला फक्त "ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट" याअर्थी वापरलेलाच "दस्त" माहीत होता.
15 Jan 2014 - 12:57 pm | बॅटमॅन
दस्त सफा नामक औषधाची जाहिरात रेडिओवर लागायची- "दस्त सफा तो आप सफे, आप सफे तो दुनिया सफी". तेव्हा कळ्ळं दस्त म्हणजे काय ते. मग पत्त्यांच्या खेळात इतके दस्त झाले इ.इ. ला एक वेगळंच परिमाण प्राप्त झालं होतं.
14 Jan 2014 - 9:24 pm | अगोचर
वरील सगळ्या शब्दांचे मराठीकरण खरच अवघड आहे, जे सुचले ते असे -
स्ट्रेटेजी - डावपेच
अॅप्टिटय़ूड - कल (व क्षमता)
बेसिक (संकल्पना ) - मूलभूत
चांगला धागा आहे, मला पण असेच काही प्रश्न आहेत -
रियल टाइम - ?
20 Jan 2014 - 4:34 pm | llपुण्याचे पेशवेll
रियल टाईम = प्रत्यक्ष
14 Jan 2014 - 9:50 pm | अगोचर
रिक्रूटमेन्ट = नोकर भरती सत्र (हॅ)
करिअरच्या - व्यवसायिक यश
इंटरव्ह्य़ू - मुलाखत (प्रत्यक्ष भेट / चर्चा)
टिअर - स्तर
पॅशन - जिद्द (विशेष आवड) (हॅ जमलं नाही)
दमलो बुवा ..
14 Jan 2014 - 10:04 pm | लॉरी टांगटूंगकर
कॅम्पस रिक्रूटमेन्ट-थेट भरती
करिअरच्या- कारकीर्दीसाठी
टर्निग पॉइंट- दिशा दर्षक बिंदू,
इंटरव्ह्य़ूसाठी-मुलाखतीसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या- पहील्या दुसर्या आणि तिसर्या पट्टीच्या( आवरा!!!) कंपन्या
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या- अभियांत्रिकीच्या गाभ्यातील काम पहाणार्या संस्था
बेसिक संकल्पना-मुलभूत संकल्पना
कट् ऑफ- किमान पात्रता गुण
मार्केटिंग टीममध्ये- विपणन संघात
स्ट्रेटेजी - डावपेच
विद्यार्थ्यांची पॅशन- खूळ
पॅनेल- संघ
पोस्टिंग-नेमणुक
प्रोजेक्ट-प्रकल्प
15 Jan 2014 - 1:19 pm | आनन्दा
तिसर्या श्रेणीच्या
पॅनेल- मंडळ पण चालेल
कल/ ओढा हा शब्द जास्त बरोबर वाटतो
18 Jan 2014 - 12:23 pm | चिगो
की वळण बिंदू? :-)
18 Jan 2014 - 4:42 pm | शैलेन्द्र
नाही हो, ध्यास जास्त योग्य आहे..
"कलाटणी" जास्त योग्य वाटतो..
विद्यापीठ भरती..
पहील्या दुसर्या आणि तिसर्या "प्रतीच्या"
14 Jan 2014 - 10:50 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
रेझ्युमे -प्रार्श्वभूमी व कौशल्य तक्ता
14 Jan 2014 - 10:50 pm | धन्या
काही वेळेला मराठीकरण न करणंच समजण्याच्या दृष्टीने हिताचे असते. मराठी शब्द सुटसुटीत आणि सोपा असला तर वापरायला नक्कीच हरकत नाही. मात्र ओढून ताणून न कळणारा भाषांतरीत शब्दसमुच्चय वापरण्यात काहीच तथ्य नाही.
14 Jan 2014 - 11:42 pm | आनंदी गोपाळ
कॅम्पस रिक्रूटमेन्ट : महाविद्यालयातून थेट नोकरभरती.
करिअर : कारकिर्द
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही : :( कॉर्पोरेटचा प्रतिशब्द्/समुह डोक्यात येत नाहिये.
टर्निग पॉइंट : मैलाचा दगड / महत्वाचे वळण
इंटरव्ह्य़ूसाठी : मुलाखतीसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या : प्रथम, द्वितिय, तृतिय श्रेणीतील कारखाने / आस्थापना / संस्था
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या : मूलभूत अभियांत्रिकी (कंपनीचे वर दिलेय)
बेसिक संकल्पना : मूलभूत
कट् ऑफ : गाळणीचा निकष
मार्केटिंग टीममध्ये : विक्रेता चमू
स्ट्रेटेजी : मोर्चेबांधणी / योजना / योजनेची आखणी
विद्यार्थ्यांची पॅशन : समरसता, उत्कटता, दिल्लगी
पॅनेलला : आयोगाला, मंडळाला.
अॅप्टिटय़ूड : लायकी
ऑफर : प्रस्ताव, देकार
परदेशात पोस्टिंग : नेमणूक
प्रोजेक्ट : कंत्राट,
14 Jan 2014 - 11:47 pm | खेडूत
वरील शब्दांशी बराच सहमत/ काही बदल:
कॅम्पस रिक्रूटमेन्ट: संस्थेत येउन केलेली भरती / पदवीपूर्व भरती
करिअरच्या: कारकीर्दीच्या
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही: मोठ्या उद्योग समूहांसाठी ही
टर्निग पॉइंट: निर्णायक वळण
इंटरव्ह्य़ूसाठी: मुलाखत तांत्रिक/ विषयासंबंधी चर्चा
टिअर वन, टू, थ्री कंपन्या: पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या रांगेतील उद्योग :)
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या: मूलभूत अभियांत्रिकी उद्योग
बेसिक संकल्पना: मुलभूत संकल्पना
कट् ऑफ: किमान पात्रता गुण
मार्केटिंग टीममध्ये: विपणन गटात
स्ट्रेटेजी: डावपेच
विद्यार्थ्यांची पॅशन: विषयातले वेड/ कल्पकता
पॅनेल : संघ/ तज्ञ गट
अॅप्टिटय़ूड: नैसर्गिक बौद्धिक क्षमता/ कौशल्य
ऑफर: देऊ केलेले वार्षिक वेतन
परदेशात पोस्टिंग: परदेशात तात्पुरती नेमणूक
प्रोजेक्ट: प्रकल्प
प्लेसमेंट : नेमणूक
जॉब साईट: नोकरीविषयक संस्थळ
रेफरन्स: संदर्भ/ ओळख
सिलेक्शन: निवड
रेझ्युमे: माहिती / पात्रतेचा गोषवारा
नेटवर्क: परिचितांचा समूह, जाळे
पूर्वी १९८०-८५ दरम्यान नागपूरचे चं. ग. देशपांडे यांची तांत्रिक पुस्तके मराठीतून आली होती. काहीही काळात नसे- इंग्रजीतून तोच विषय वाचल्यावर भयंकर हसू येत असे.
असं करण्याचं कारण काय तर म्हणे रशियन आणि जपानी लोक आपापल्या भाषेत शिकतात म्हणून प्रगती करतात!
14 Jan 2014 - 11:52 pm | आनंदी गोपाळ
शक्यतो रोजच्या वापरातले शब्द घेऊन एका इंग्रजी शब्दाला २-३ मराठी शब्दांचा समूह वापरावा लागला तरी हरकत नाही असे म्हणून मराठीत भाषांतर करता येईल.
रेझ्युमे : स्वतःची ओळख
नेटवर्क : मित्रमंडळ / जनसंपर्क
कॉर्पोरेट शब्दास गूगल 'संयुक्त' असा मराठी प्रतिशब्द देतो, तर कंपनीसाठी 'कंपनी' ;)
15 Jan 2014 - 1:34 am | प्रभाकर पेठकर
कॅम्पस रिक्रूटमेन्ट - शिक्षण संस्थेतून केलेल्या नेमणूका.
करिअरच्या -
कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही - संयुक्त आस्थापनांसाठी
टर्निग पॉइंट - बदलाच्या वळणावर
इंटरव्ह्य़ूसाठी - मुलाखतीसाठी
टिअर वन, टू, थ्री कंपन्या - भिन्नस्तरीय आस्थापना
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या - अंतस्थ अभियांत्रिकी आस्थापना
बेसिक संकल्पना - मूलभूत संकल्पना
कट् ऑफ - निर्णायक पातळी(?)
मार्केटिंग टीममध्ये - विपणन संघात
स्ट्रेटेजी - (युद्ध)निती, (व्यवसाय) निती
विद्यार्थ्यांची पॅशन -
पॅनेलला - मंडळाला
अॅप्टिटय़ूड - कलदर्शिका
ऑफर - प्रस्ताव
परदेशात पोस्टिंग - परदेश नियुक्ती
प्रोजेक्ट - प्रकल्प
15 Jan 2014 - 2:05 am | मराठे
करिअर : (काही लोकांच्या उच्चारानुसार) सायकलचा/दुचाकीचा मागची सामान ठेवायची जागा
टर्निग पॉइंट : वळणारी बिंदू
इंटरव्ह्य़ूसाठी : बघायला (इश्श)
अॅप्टिटय़ूड : अक्कल
15 Jan 2014 - 9:06 am | नाखु
अनुक्रमे जनसंपर्क्,संदर्भ्,निवड (निवडून नेमणूक)व विद्यार्थ्याचा कल्/ध्यास
15 Jan 2014 - 10:01 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
अँप्टीट्युड =मानसदर्शक परीक्षा
15 Jan 2014 - 11:24 am | प्रमोद देर्देकर
var c=document.getElementById("myCanvas");
var ctx=c.getContext("2d");
ctx.font=" 12px Arial";
ctx.fillText("कॉलींग आंनन्द घारे साहेब! नाहीतर असे करा ना की तुम्ही त्यांच्या अनुदिनीवरच जाना. खुप मदत होइल तुम्हाला.सगळे वैज्ञानिक शब्द मराठित मिळतील तुम्हाला",0,12);
15 Jan 2014 - 11:25 am | प्रमोद देर्देकर
कॉलींग आंनन्द घारे साहेब! नाहीतर असे करा ना की तुम्ही त्यांच्या अनुदिनीवरच जाना. खुप मदत होइल तुम्हाला.सगळे वैज्ञानिक शब्द मराठित मिळतील तुम्हाला
18 Jan 2014 - 10:55 am | वडापाव
इथे जा...
या संकेतस्थळावर ३५ विषयांतील २,६७,००० इंग्रजी पारिभाषिक शब्दांचा व त्यांच्या मराठी प्रतिशब्दांचा अफाट संग्रह आहे.
स्वानुभवावरून एक टीप - शक्यतो अडलेल्या शब्दाचं एकवचन टंका, आणि क्रियापद असेल तर त्याला s, ed हे प्रत्यय लावणं टाळा.
18 Jan 2014 - 4:05 pm | प्यारे१
असं मराठी मराठी म्हणून मराठीचा उत्कर्ष वगैरे होणार आहे का?
मराठी वृत्तपत्रांची भाषा बिघडले आहे वगैरे बाबत बोलणार असाल तर ठीक आहे.
मूठभर इंग्रज जगभर गेले नि राज्यकर्ते झाले. त्याचा 'परिणाम' म्हणून वरचे शब्द दैनंदिन वापरात आहेत.
इंग्रजी, इंग्रजी करुन छाती पिटत बसले असते अथवा 'हाऊ लक्की वुई आर टु बी बॉर्न इन इंग्लंड अॅण्ड हॅव इन्ग्लिश- अ व्हेरी डेव्हलप्ड लँग्वेज अॅज मदरटंग' म्हणून सुद्धा काही झालं नसतं.
मराठी प्रतिशब्द शोधणे नि फुकाच वापरणे हा अत्यंत वरवरचा उपाय झाला असं वैयक्तिक मत आहे. ह्या संज्ञा मूलतः मराठीमध्ये/ आपल्याकडं नाहीतच का? कॅम्पस इन्टरव्ह्यू नोकर्या शोधणारांसाठी असतील तर त्या विद्यार्थ्याला उगाच अडचणीचा शब्द आणून बुचकळ्यात पाडणार आहोत का आपण?
मुलभूत बदल आधी व्हावेत नि नंतर वरवरचे तांत्रिक बदल व्हावेत.
मूळ ढाचा /गाभा बदलल्यानंतर तांत्रिक बदल व्हायला फारसा वेळ नाही लागायचा.
आत्ता आहे तिथं येऊन मोडकं तोडकं अरेबिक, फ्रेंच समजून घेणं ही माझी गरज आहे. माझ्या रोजी रोटीची गरज आहे.
तसं मराठी उद्योग धंद्यांचं, माणसांचं झालं, भरमसाट वाढ झाली तर (तशी व्हायला काय करावं लागेल हा मूळ विषय असावा) इतर लोक गरज म्हणून मराठी शिकतील.
नंतर त्यांना मिसळपाव वर बोलवून खणखणीत मराठी शिकवू. हाय काय नि नाय काय! ;)
18 Jan 2014 - 4:48 pm | शैलेन्द्र
य्क्झॅक्टली अस्संच.. :)
18 Jan 2014 - 4:58 pm | प्रभाकर पेठकर
>>>>मराठी प्रतिशब्द शोधणे नि फुकाच वापरणे हा अत्यंत वरवरचा उपाय झाला असं वैयक्तिक मत आहे.
सहमत आहे. परंतु, ह्याचा मराठी माणसाची 'मानसिकता' बदलण्यात नक्कीच फायदा होईल. ते झाले तर बाकीचे बदल प्रत्येकाच्या उत्स्फुर्त प्रयत्नातून (मराठीची कास धरल्यामुळे) होतील.
अमेरिकेत नकारात्मक विधाने करीत नाहीत. सकारात्मक विधानांचीच त्यांना शिकवण असते. इथे आखाती प्रदेशात, एकेकाळी ज्या देशातून वस्तू आयात केली जायची, त्यांच्या वाणिज्य कार्यालयातून मिळणार्या प्रमाणपत्रावर ती 'वस्तू बनविताना त्यात इस्राएली घटक वापलेले नाहीत किंवा इस्त्राएली कामगाराचे परिश्रम वापरलेले नाहीत, असे विधान लागायचे. पण अमेरिका तसे विधान न करता 'हि वस्तू बनविताना त्यात पूर्णपणे अमेरिकेतील घटक वापलेले आहेत' असे विधान करायची. (इथल्या सिमाशुल्क विभागाला ते मान्य करावेच लागायचे) वाक्य साधेच आहे, अर्थही तोच आहे पण विधान सकारात्मक आहे. अशा बारीक सारीक गोष्टीतून नागरिकांची मानसिकता घडत जाते.
>>>> कॅम्पस इन्टरव्ह्यू नोकर्या शोधणारांसाठी असतील तर त्या विद्यार्थ्याला उगाच अडचणीचा शब्द आणून बुचकळ्यात पाडणार आहोत का आपण?
चेहरापुस्तकावरील आणि मिपावरील असंख्य संक्षिप्त स्वरूपे सर्वांनी आत्मसात करून घेतली आहेतच नं? तरूणाईकडे तर माझ्या पिढीच्या अनेकांच्या डोक्यावरून जातील आणि फक्त त्यांच्या समवस्कांनाच कळतील अशा अनेक, त्यांनी स्वतःच जन्माला घातलेल्या, शब्दांचा संग्रह असतोच. त्यामुळे मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर नविन नविन शब्द कोणीही शिकून घेऊ शकतो. अर्थात, शब्द बोजड नसावेत, ओढून ताणून बनविलेले नसावेत.
>>>>आत्ता आहे तिथं येऊन मोडकं तोडकं अरेबिक, फ्रेंच समजून घेणं ही माझी गरज आहे. माझ्या रोजी रोटीची गरज आहे.
ही जशी तुमची गरज आहे म्हणून तुम्ही हे शब्द, भाषा शिकण्याचे कठोर प्रयत्न करून शिकता आहातच. तर मग त्या प्रमाणात कित्येक पटीने सोपे असणारे मातृभाषेतील 'आपलेच' शब्द शिकण्यात प्रयास का पडावेत?
20 Jan 2014 - 1:17 pm | प्यारे१
भाषेच्या सहज वापराबद्दल बोलताना बर्याचदा गरज असेल तर मार्ग निघतो नि ही मराठीची गरज निर्माण कशी होईल
ह्याचा वापर व्हावा. कारण उपयुक्तता हाच निकष असलेल्या आजच्या जगात अकारण प्रेम कोणीही करत नाही ही वस्तुस्थिती आहे. अस्खलित मराठी निव्वळ मराठीच्या अभिमानाखातर शिकू देखील. २-४ हजार शब्द पाठ देखील करु.
मात्र त्याचा वापर करण्याची वेळ कधी येईल ह्याची वाट बघणं एवढंच साध्य होईल ना?
मुळात भारतासारख्या अनेकानेक भाषा नि संस्कृती असणार्या खंडप्राय देशामध्ये एकच एक मध्यवर्ती संकल्पना ठेवून भारतीयत्वाचा समग्र विचार होणं नि तो वाढवणं जास्त उचित का निव्वळ मराठीच्या त्यामानानं संकुचित विचाराचा विचार होणं जास्त उचित?
आपण मराठीचा विचार करताना अनाठायी न्यूनगंड अथवा अहंगंड सुद्धा बाळगू नये हे तितकंच खरंय.
माझा मुद्दा आपल्याला समजलेला आहेच.
मी फक्त मराठीचा भाषेचा विचार करु नका तर मराठी नि त्याबरोबर भारतीय माणसाचा नि त्याच्या आर्थिक प्रगतीचा विचार व्हावा असं मांडतो आहे.
20 Jan 2014 - 6:59 am | निनाद
स्ट्रॅटेजी साठी धोरण हा शब्द चालेल. डावपेच या शब्दाला थोडी निराळी अर्थछटा आहे असे वाटते.
21 Jan 2014 - 6:22 pm | नरेंद्र गोळे
प्लेसमेंट = कार्यायोजन
एम्प्लॉयमेंट = सेवायोजन
कॅम्पस रिक्रूटमेन्ट = महाविद्यालयांतून केलेली भरती
करिअर = कारकीर्द, कार्यरेखा, कर्तबगारी, व्यावसायिक कार्यसंचिते
कॉर्पोरेट कंपन्या = संस्थागत पेढी
टर्निग पॉइंट = वळण, कलाटणीचा बिंदू,
मैलाचा दगड / महत्वाचे वळण, निर्णायक वळण हे अर्थही बरोबरच आहेत.
इंटरव्ह्य़ू = मुलाखत
टिअर वन, टू, थ्री कंपन्या = प्रथम, द्वितीय आणि तृतिय श्रेणीच्या पेढ्या
कोअर इंजिनीअरिंग कंपन्या = सम्यक अभियांत्रिकी पेढ्या
बेसिक संकल्पना = आधारभूत संकल्पना
कट् ऑफ = निर्णय निकष
मार्केटिंग टीम = विपणन चमू
स्ट्रेटेजी = व्यूहरचना
विद्यार्थ्यांची पॅशन = विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा,
खूळ, ध्यास हे दिलेले अर्थही बरोबरच वाटत आहेत.
पॅनेल = (निवडलेला) संच
अॅप्टिटय़ूड = बुद्धिमत्ता,
ह्याचा अर्थ लायकी असा जो दिलेला आहे तो चूक आहे. लायकी म्हणजे पात्रता.
.
ऑफर = देकार
पोस्टिंग = पदनियुक्ती
प्रोजेक्ट = प्रकल्प
लिड = प्रमुख, पुढारी, नेता, अग्रेसर
रेझ्युमे = कारकीर्दीचा आलेख,
प्रार्श्वभूमी व कौशल्य तक्ता असा जो अर्थ दिलेला आहे तोही बरोबरच वाटतो आहे.
सिव्ही = पात्रताकौशल्यांची सूची
जॉब साईट = कामाचे स्थान, कार्यस्थळ, कामाचे ठिकाण
नेटवर्क = संपर्कजाल, कार्यजाल
रेफरन्स = संदर्भ
सिलेक्शन = निवड
इंडियन काँट्रॅक्ट ऍक्ट = भारतीय कंत्राट कायदा
असा अनुवाद केला असेल तर तो चुकीचा ठरत नाही. मात्र “भारतीय मक्तेदारी कायदा” असा अनुवाद अधिक योग्य ठरेल.
.
ताजीरात-ए-हिंद की दफा-३०२ = भारतीय दंडविधानाचे कलम-३०२
.
डॉक्युमेंट = दस्त, दस्त-ऐवज
रिअल टाईम = प्रचलित वेळेसोबत (चालणारा)
.
काही वेळेला मराठीकरण न करणंच समजण्याच्या दृष्टीने हिताचे असते. मराठी शब्द सुटसुटीत आणि सोपा असला तर वापरायला नक्कीच हरकत नाही. मात्र ओढून ताणून न कळणारा भाषांतरीत शब्दसमुच्चय वापरण्यात काहीच तथ्य नाही.>>> टेबल, बस इत्यादी शब्द ह्याचे उदाहरण म्हणून सांगता येतील. मात्र वरीलप्रमाणे सामान्यीकरण करू नये हेच अंतिमतः हिताचे ठरेल.
.
स्ट्रॅटेजी = व्यूहरचना, धोरण नव्हे. धोरणचा अर्थ इंग्रजीत पॉलिसी होतो.
22 Jan 2014 - 2:24 pm | कलंत्री
गोळे साहेब : मनपूर्वक धन्यवाद.
21 Jan 2014 - 6:29 pm | नरेंद्र गोळे
कॉल आंनन्द घारे साहेब!>>>
देर्देकर साहेब तुम्हाला आनंद घारे म्हणायचे आहे असे दिसते.
त्यांच्या नावात एवढे नकार घातलेले पाहून ते सुद्ध थक्क होतील!