मुहुर्त बघणे ,हे शास्त्र आहे कि थोतांड?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture
टॉपगिअर्ड फिलोसॉफर in काथ्याकूट
14 Jan 2014 - 6:11 pm
गाभा: 

मुहुर्त बघणे हा भारतीय लोकांचे एक आवडता विषय आहे. साडेतीन मुहुर्त ,गोरज मुहुर्त असे मुहुर्ताचे अनेक प्रकार असतात म्हणे,
काही दिवसांपुर्वी माझ्या मित्राच्या दुकानाचे उद्घाटन होते, त्याने मुहुर्त वगैरे बघितला नसल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते. यावरुन मला काही प्रश्न पडले आहेत. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

1.मुहुर्तावर कार्यारंभ करण्याची सुरवात कधी झाली असावी?
2.मुहुर्तावर आरंभलेली कार्ये तडीस जातात म्हणे, याचा काही विदा आहे काय ?
3.भारतीय सोडले तर इतर जग मुहुर्ताच्या फंदात पडत नाही ,तरीही ते भारतापेक्षा प्रगत कसे?
4.पेशवाईचा पराभव मुहुर्त बघण्याच्या नादापायी झाला होता. ३१ डीसेंबर १८१७ रोजी पेशवे भीमा कोरेगाव इथे इंग्रजांवर हल्ला करणार होते ,परंतु पेशव्यांच्या पुरोहितांनी दुसर्या दिवशीचा मुहुर्त शुभ असल्याचे सांगितले व जोशात असलेले सैन्य पेशव्यांनी लढाईपासून रोखले .ही बातमी इंग्रजांचा सेनापती एलफिन्स्टनला समजल्यानंतर त्याने झोपलेल्या गाफील मराठ्यांवर हल्ला करुन मराठा साम्राज्य अस्ताला नेले. मराठेशाहीचा अस्त मुहुर्ताच्या वेडापायी झाला .
एकढा अनर्थ मुहुर्त बघण्याने होत असेल तर लोक मुहुर्त का बघतात???

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Jan 2014 - 6:19 pm | प्रसाद गोडबोले

का काथ्याकुट काढताना तुम्ही मुहुर्त पाहिला होतात का ?
नाही आपलं आज संक्रांत आहे म्हणुन विचारलं शिवाय

Tue, 14/01/2014 - 18:11

ही वेळ आज प्लुटोकालात येते , प्लुटोकालात केलेल्या गोष्टी सहसा रेंगाळतात ...

का काथ्याकुट काढताना तुम्ही मुहुर्त पाहिला होतात का ?
नाही आपलं आज संक्रांत आहे म्हणुन विचारलं शिवाय
ही वेळ आज प्लुटोकालात येते , प्लुटोकालात केलेल्या गोष्टी सहसा रेंगाळतात ...
>>>>>>>>>>>>>> बघा हेही चुकले धाग्याने २ दिवसात शंभरी साजरी केली

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 5:36 pm | प्यारे१

त्यालाच रेंगाळणं म्हणतात!

ब्रॅडमॅन नं एका दिवसात त्रिशतक केलेलं.
नि गविंच्या धाग्यानं ४ तासात शतक केलेलं आहे.
बाबा पाटील तर मटण खाऊन दोन तास झोपले नि परत येऊन बघतात तर इकडे शतक!
काळ खराब हो खराब!

बाबांनी मटण खाण्याआधी मुहुर्त पाह्यलेला का विचारा त्यांनाच. ;)

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 5:37 pm | प्यारे१

सचीनशेठ, 'तुमचा' काळ खराब हो खराब!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2014 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा

नव्या बाटलीत जुनी दारू..
तस्मात... त्वांड गोड करा!
http://0.tqn.com/d/indianfood/1/I/R/2/-/-/jalebi.jpg

प्यारे१'s picture

15 Jan 2014 - 4:01 pm | प्यारे१

>>> त्वांड गोड करा!

खिक्क्क्क्क.

मला तरी मुहूर्त थोतांड वाटते.

पण तुम्ही योग्य जागी हा प्रश्न उपस्तिथ केलात तुमच्या सर्व शंकांना इथले तज्ञ व्यक्ती उत्तरे देवू शकतात.

पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत...
आणि प्रगत देशांमधील म्हणाल तर चांगल्या कामाला १३ तारीख / आकडा सहसा टाळतात असे ऐकून आहे त्याला मुहूर्तच म्हणावे कि आणि काही?
शेवटी हे सिद्धांत किंवा गृहीतके आहेत पटली तर घ्या नही तर सोडून द्या

जाता जाता : समजा उद्या केम्ब्रिज / हार्वर्ड अश्या एखाद्या विद्यापीठात 'मुहूर्त' विषयावर संशोधन होऊन हा एक अलौकिक प्रकार आहे असे सिध्द झाले तर आपलं म्हणणं सध्या आहे तेच राहील का बदलेल?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

14 Jan 2014 - 7:31 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

प्रगत देशांमधील म्हणाल तर चांगल्या कामाला १३ तारीख / आकडा सहसा टाळतात असे ऐकून आहे त्याला मुहूर्तच म्हणावे कि आणि काही?

अन्धश्रद्धा म्हनाव

जाता जाता : समजा उद्या केम्ब्रिज / हार्वर्ड अश्या एखाद्या विद्यापीठात 'मुहूर्त' विषयावर संशोधन होऊन हा एक अलौकिक प्रकार आहे असे सिध्द झाले तर आपलं म्हणणं सध्या आहे तेच राहील का बदलेल?

बदलेल

अत्रन्गि पाउस's picture

14 Jan 2014 - 10:01 pm | अत्रन्गि पाउस

का बुवा???

ह्यावर काय म्हणणे आहे आपले?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

14 Jan 2014 - 10:19 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच वापरुन कार्यकारण भाव स्पष्ट केल्यास विश्वास ठेवण्यात मला अडचण नाही.

अत्रन्गि पाउस's picture

14 Jan 2014 - 10:34 pm | अत्रन्गि पाउस

"सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोचं" वगैरे फार जड आहे हो
म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष अनुभवाला किंवा नवीन कल्पनेला तिकडून(किंवा त्या विचारधारेकडून) प्रमाणपत्र मिळत नही तो पर्यंत आपण स्वीकारत नही का?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

14 Jan 2014 - 10:38 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

प्रमाणपत्र इकडचे किंवा तिकडचे असे नसते हो ,ते फक्त 'शास्त्रीय' असते...

अत्रन्गि पाउस's picture

14 Jan 2014 - 10:51 pm | अत्रन्गि पाउस

आपली व्याख्या काय?

आणि
पेशवाईतले विजय मुहुर्त बघूनच झाले असावेत... ह्या विधानावर आपले काय म्हणणे आहे?

पेशवाई बुडाली ती पण मुहुर्त चुकल्यामुळे का?
काय राव..

ह्यावर काय म्हणणे आहे आपले?

सायंटीफीक रीडक्शनीस्ट एप्रोच वापरुन कार्यकारण भाव म्हणजे काय?
आम्हाला layman समजून, सोप्या भाषेत जरा अधिक समजावून सागितले तर बरं होईल.
आपला मिपास्नेही: आयुर्हीत

आनंदी गोपाळ's picture

15 Jan 2014 - 1:10 am | आनंदी गोपाळ

गूगल नामक एक लै भारी सुविधा आपल्या सारख्या लेमन साठीच उपलब्ध आहे.

अभिनंदन, नव्या युगात जन्माला आल्याबद्दल ;)

प्रसाद१९७१'s picture

14 Jan 2014 - 7:00 pm | प्रसाद१९७१

आंतर जालावर घासुन घासुन कंटाळा आलेले विषय काय काढताय?

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

14 Jan 2014 - 7:41 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

या विश्यावर एकतरि धागा दाखवा ,माझ्या मते हा पहिलाच धागा असावा.

ओक्के, तुम्हीच पयले. खुश??

पुर्ण प्रतिसाद देण्यासाठी मुर्हुत शोधतोय .

शिवाजी महाराजांनी कोणतीच लढाई मुहूर्त बघून लढली नव्हती.

आयुर्हित's picture

14 Jan 2014 - 11:17 pm | आयुर्हित

मुहुर्त बघणे हे एक शास्त्र आहे असे माझे ठाम मत आहे.
मुहुर्त बघणे, हा आपल्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे.
पूर्वी जसे राजवैद्य असावयाचे तसेच राज ज्योतिषी हि असायचे असे ऐकिवात आहे.
आजकालच्या जमान्यात ह्याचा संपूर्ण अभ्यास असलेली व्यक्ती मिळणे अवघड नाही.
गर्भाधान हा संस्कार काही मुहूर्तावरच जास्त चागला/फायद्याचा ठरतो.(पौष महिना याला वर्ज्य आहे असे वाटते)

पण आपल्यासारखे करंटे आपणच! इतका छान विषय असूनही यावर पूर्ण संशोधन होऊ शकत नाही हे दुर्भाग्यच.
मिपावर ही नक्कीच ह्या विषयी मार्ग दर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे.

आपला मिपास्नेही : आयुर्हीत

ता.क. एक अनुभव आहे, एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.

गर्भाधान हा संस्कार काही मुहूर्तावरच जास्त चागला/फायद्याचा ठरतो.(पौष महिना याला वर्ज्य आहे असे वाटते)

जास्त चांगला किंवा फायद्याचा म्हणजे कसा? पौष महिना वर्ज्य आहे म्हणजे काय?

इतका छान विषय असूनही यावर पूर्ण संशोधन होऊ शकत नाही हे दुर्भाग्यच.

संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?

ता.क. एक अनुभव आहे, एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.

या विधानाला समर्थन देणारा विदा आहे का तुमच्याकडे?

संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?
तुम्हाला व सर्व सामान्यांना पडणारे प्रश्न कोणते? त्याची समर्पक उत्तरे शोधून त्याकरणे मागची शास्त्रीय करणे शोधून सर्वांसमोर मांडायची!
असे केल्यास इतर दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
सध्या माझे संशोधन मधुमेहावर सुरु आहे, त्यामुळे आपण स्वत:व इतर मिपाकर यांनी लक्ष घातल्यास बरे होईल.

आपला मिपास्नेही: आयुर्हीत

आनंदी गोपाळ's picture

15 Jan 2014 - 1:10 am | आनंदी गोपाळ

अहो लेमन,
शास्त्रीय कारणे म्हणजे काय?
सांगता का जरा?

चौकटराजा's picture

15 Jan 2014 - 8:54 am | चौकटराजा

मुहुर्त बघणे हे एक शास्त्र आहे असे माझे ठाम मत आहे.
माझेही असेच मत आहे. शुभकार्यासाठी कोणताही क्षण चांगल्या मुहूर्ताचा असतो असे मी ही मानतो. मी माझी एम ८० ही गाडी पितृपंधरवड्यात खरेदी केली आहे व १८ वर्षात काहीही संकट नाही.

एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त उपग्रह satellite सोडले जातात.
असतील. कारण एकादशीला ही काही खगोलशास्त्रीय अर्थ असू शकेल. जसा अमावास्येला आहे.

ज्योतिष शास्त्रावर त्याच्या विरोधकानी नाही तर त्याच्या पाठीराख्यानी संशीधन करावयाचे आहे.त्यात करंटेपण त्यांचे आहे विरोधकांचे नव्हे.

हे अगदी खरे, तसा कोणी दावा केला आहे का ?? नसेल तर महाराजाना या चर्चेत न ओढलेलेच बरे.

विनोद१८

महाराजांना यात ओढायचा अजिबात हेतू नाही. बऱ्याच थोर माणसांनी मुहूर्त विचारात घेतले नाहीत एवढेच म्हणायचे आहे.
बाकी चालुदे…

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2014 - 11:10 am | प्रसाद गोडबोले

लढाई हा शब्द विसरलात ... फक्त लढाई साठी मुहुर्त बघितले नाहीत ....

बाकी सुवर्णतुला , राज्याभिषेक , सिंधुदुर्गाचे पायाभरणी , रायगडावर राजधानी हलवणे , दक्षिण दिग्विजया करिता घराबाहेर पडणे अशा अगणित गोष्टींसाठी महाराजांनी मुहुर्त नक्कीच बघितले असणार ..

असू शकेल, जाणकार सांगतीलच (पण ते विषयांतर होईल परत)

मनीषा's picture

15 Jan 2014 - 8:45 am | मनीषा

पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे..
पण शास्त्रीय कसोट्यांवर खरी ठरताना दिसत नाही.

चांगले मुहुर्त पाहून केलेले विवाह अयशस्वी होताना दिसतात. हे एक चटकन आठवणारे उदाहरण . अशी अनेक देता येतील.

माझ्या माहितीतील एकजण शनिवारी कुठलेही नविन काम्/कार्य सुरू करित नसत (म्हणजे अजूनही करत नसतील) कारण म्हणे न कर्त्याचा वार शनिवार. पण शनिवारी सुरू केलेले काम अयशस्वी होते आणि इतर दिवशी केलेली यशस्वी होतात असे काही मला अढळले नाही.

न्युमरॉलॉजी बद्दल आपले काय मत आहे?

१) मुहूर्त बघणे
२) पेशव्यांनी मुहूर्त बघणे

आणखी काही प्रश्न

३) याच लढाईची निवड करण्याचे कारण?
४) मुहूर्त पाहिल्यामुळे लढाई पुढे ढकलली असं बखरी सोडून एखाद्या पत्रात वगैरे लिहिले आहे का?
५) दुसरा बाजीराव युद्धतज्ञ नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का?
६) पहिल्या बाजीरावाबद्दल आणि माधवराव पेशव्यांबद्दल तुमचे काय मत आहे?
७) पुन्हा सवर्ण/दलित वाद उकरून काढायचा आहे का? (कारण या लढाईचा तसा वापर काही लोक करतात)
८) फक्त पेशवेच मुहूर्त बघत असत का?
९) एक वैयक्तिक वाटू शकेल असा प्रश्न. तुमच्या घरात तुम्ही मुहूर्त पाहून काही करता का?

चर्चा प्रस्ताव ठेवताना तो काही पुरावे वगैरे देऊन आणि प्रत्येक मुद्द्यावर स्वतःचे अनुभव/माहिती/मते मांडून परिपूर्ण असावा याची कृपया काळजी घ्यावी. नाहीतर त्याला अनेक तर्‍हेचे फाटे फुटतात. अर्थात तसेच काही घडावे हा तुमचा उद्देश असेल तर संपूर्ण प्रतिसाद मागे घेत आहे.

(क्रमशः)

प्रभाकर पेठकर's picture

15 Jan 2014 - 10:03 am | प्रभाकर पेठकर

हायला! प्रतिसादाला 'क्रमशः'?

खटपट्या's picture

15 Jan 2014 - 10:42 am | खटपट्या

*ROFL*

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

15 Jan 2014 - 10:14 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

तुम्ही समजता तसे काही नाही, पेशवाईचा अस्त ही एक विलक्षण घटना आहे ,म्हणून ते उदाहरण दिले आहे.

उद्दाम's picture

15 Jan 2014 - 10:47 am | उद्दाम

जवळपास सगळी हिंदु लग्ने मुहुर्तावर होतात. त्यातली किती यशस्वी होतात? इतके एकच उदाहरण पुरेसे नाही का?

-- मुहुर्तावर लगीन करुनही पस्तावलेला उद्दाम.

मृत्युन्जय's picture

15 Jan 2014 - 11:18 am | मृत्युन्जय

आयला तुमचे मत मुहुर्ताच्या बाजुने पडेल असे वाटले नव्हते.

पैसा's picture

16 Jan 2014 - 4:43 pm | पैसा

:ROFL:

विटेकर's picture

15 Jan 2014 - 11:00 am | विटेकर

आम्ही दासबोध उघडायला मुहुर्त पाहात नाही .. पण वैधृति आणि व्यतिपात हा मुहुर्तावर शुभ कार्याची सुरुवात करणारा मूर्ख आहे असे समर्थांचे सांगणे आहे !
वैधृति आणी वितिपात| नाना कुमुहूर्तें जात |अपशकुनें करी घात| तो येक मूर्ख ||२-१-३६||

त्याचबरोबर शकुन या गोष्टिवर त्यांचा विश्वास नाही , तो भ्रम आहे असे त्यांचे म्ह्णणे आहे..

दुश्चिन्हें अथवा अपशकुन| मिथ्या वार्तेनें भंगे मन |वचके पदार्थ देखोन| या नांव भ्रम ||१०-६-२०||

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 12:46 pm | बॅटमॅन

समर्थ इथे स्वतःलाच काँट्रॅडिक्ट करताहेत असे वाटते.

विटेकर's picture

15 Jan 2014 - 1:07 pm | विटेकर

दासबोधात ते अनेक ठिकाणी परस्परविरोधी लिहितात ! म्हणून तर त्यांनी आपल्याला " विवेक" दिला आहे .
लगेच लक्षात येणारे उदाहरण म्हणजे एकाच ओवीत समर्थ लिहितात:
परंपरा तोडूं नये| उपाधी मोडूं देऊं नये |ज्ञानमार्गे सोडूं नये| कदाकाळीं ||१४-१-२६||
आणि त्याच समासात लगेचच्याच ओवीत लिहितात
कांहीं उपाधी करूं नये| केली तरी धरूं नये |धरिली तरी सांपडों नये| उपाधीमध्यें ||१४-१-३०||

एका त्या अंतिम सत्याशिवाय बाकेची सारी सत्ये ( भासमान ) ही सापेक्ष असतात, अपूर्ण असतात आणि म्हणूनच त्यांनी विवेकाची कास धरुन योग्य निर्णय करा असे सांगितले आहे!
विवेकामधें सापडेना| ऐसें तो कांहींच असेना |येकांतीं विवेक अनुमाना| आणून सोडी ||१९-६-२८||
दासबोधामध्ये विवेक हा शब्द २१० वेळा आलेला आहे !!

बॅटमॅन's picture

15 Jan 2014 - 2:39 pm | बॅटमॅन

विटेकरजी अन प्रसादः मला मारकुट्यांचे म्हण्णे पटते आहे. वेगवेगळ्या कालखंडात ग्रंथ लिहिला गेला असल्याने मतपरिवर्तन होणे शक्य आहे अगदी. शिवाय संदर्भानुरूप ते ते वचन पाहिले पाहिजे हेही पटते. आपल्या दोघांच्या विवेचनाबद्दल धन्यवाद.

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2014 - 1:11 pm | प्रसाद गोडबोले

माझ्यामते समर्थांचे बहुतांश वाङ्मय हे ३ पातळीवरचे आहे ...
१) ठार मुर्ख लोकांसाठी
२) सर्वसामान्य प्रापंचिक मुमुक्षुंसाठी
३) अध्यात्ममार्गात बर्‍यापैकी उन्नत झालेल्या साधकांसाठी

वरील पैकी एक एक श्लोक मुमुक्षुंसाठी आहे तर दुसरा साधकांसाठी ....त्यामुळे मलातरी वरील श्लोकात काही कॉन्ट्रॅडिक्शन वाटले नाही .
(अवांतर : असे वरकरणी कॉन्ट्रॅडिक्शन वाटेल असे अनेक श्लोक सापडतील , रादर एका लेव्हलच्या लोकांकरीता लिहिलेला श्लोक दुसर्‍या लेव्हलच्या लोकांकरिता डिझास्टर ठरु शकेल ...तेव्हा आधी आपली लेव्हल ओळखणे महत्वाचे !
उदाहरणार्थ : "ज्ञान आणि अज्ञान | दोन्ही वृती रुपे समान || श्रीराम|| " हा श्लोक साधकावस्थेतील लोकांसाठी आहे , तो जर मुर्ख किंव्वा मुमुक्षु लोकांनी गृहीत धरला तर त्यांची वाटच लागेल .)

|अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे ||

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 1:13 pm | मारकुटे

इतर कुठल्याही धर्मग्रंथाप्रमाणेच दासबोध वेगवेगळ्या काळात, मनस्थितीत आणि परिस्थितीत लिहिला गेला आहे त्यामुळे काही असे गंमतीशीर विधाने आढळतात.

शशिकांत ओक's picture

15 Jan 2014 - 11:32 am | शशिकांत ओक

मुहुरत पाहून विवाह किंवा सिनेमा यशस्वी होताना दिसत नाही... हे खरे
चांगला या शब्दाने जरा घोळ होतोय असे मानले तर?
पुढील घटनांच्या वाईट परिणामांचा प्रादुर्भाव कमी व्हावा असे वाटून त्यातल्या त्यात कमी नुकसान दायक असा 'चांगला' मुहुर्त पकडणे अभिप्रेत असू शकते.
काळ सदा समान आहे. परंतु प्रत्येका गोष्टीला एक विशिष्ठ समय येतो. मुहुर्त फार चांगला म्हणून कोणी विवाहयोग्य वय नसेल तर लग्नाचा घाट घालत नाही. बहार ही निसर्गतः विशिष्ठ त्या हंगामात येते.
मानवी जीवनात काही आडाखे रचून त्यानुसार काही केले तर कमी धोका किंवा नुकसान होईल असा ही विचार त्यामागे असावा.
गुरूपुष्ययोगावर सोने किवा तत्सम मालमत्ता घरात आणून व्यक्तीची वा प्रतिष्ठेची शोभा वाढावी म्हणून खरेदी केली जाते. विविध सण वा जत्रा, किंवा मेळावे भरवताना सिंक्रॉनिसिटीचे कारण असावे. एकाच कामासाठी अनेकांच्या मानसिक लहरी एकत्र आल्याने एक वेगळे प्रभाववलय तयार होते. दिंडीतून वा जत्रातून विशिष्ठ धार्मिक स्थळांना जाताना केला जाणारा नाम घोष वा करबल्याच्या भीषण कत्तलीची आठवण म्हणून छातीवर हातानी आघात करून केली जाणारी सांघिक साश्रु आठवण यातून एक मानसिक एकात्मता निर्माण होते. ती व्यक्तीच्या प्रभाव वलयातून झटपट कार्य करते असे वाटून प्राचीनकाळापासून कुंभ वा हज सारख्या यात्रा विशिष्ठ तास, दिवस, महिन्यांच्या मुहुर्तावर साकारल्या जातात असे ही विचार करता वाटते. अशा घटनांचा मानसिक प्रभाव मोजायचे एखादे यंत्र वा परिमाण प्रगत झाले तर या प्रभावाला पुरावा मिळेल तोवर याकडे समजून घ्यायच्या गोष्टी असे मानावे लागेल.

चौकटराजा's picture

15 Jan 2014 - 12:05 pm | चौकटराजा

विविध सण वा जत्रा, किंवा मेळावे भरवताना सिंक्रॉनिसिटीचे कारण असावे हे पटले. पण सणवार व खाजगी जीवन वेगळे असते. एखादे लग्न व पूजा एका मर्यादित जनसमुदायाची गरज असते . एक सण फार मोठ्या प्रमाणावर जनांचे कार्य वा हालचाल घडवीत असतो. लोक दसर्‍याच्या दिवशी भारलेपणाचे मंगलमय होतात. हा एक मानसिक प्रयोग असतो रूढीने केलेला.
रूढी माणसासाठी आहेत माणूस रूढीसाठी नाही हे पटले की गणवेश ,तिरंगा, घोष, राष्ट्रगीत यांचे महत्व कमी होऊन उत्कट देशप्रेम महत्वाचे ठरते. सर्व सणाना दिखाउ सिंक्रॉनिसिटी येऊन उपयोगी नाही. मूळ हेतू साध्य होणे आवश्यक असते. असो हे थोडे विषयांतर झाले खरे !

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 11:35 am | मारकुटे

तोच विषय तोच मुद्दा तीच व्यक्ती आयडी वेगळा !

पकडले गेले बघा तुम्ही ... आयडी तयार करण्याचा मुहूर्त चुकला

पैसा's picture

15 Jan 2014 - 11:38 am | पैसा

टॉप गिअरमधल्या गाडीला एकदम ब्रेक लावताय का?

हो ना !! डुआयडी घ्यायची बिचार्‍याची इतकी इच्छा होती जरा हौस भागवून घेऊ देत म्हणावं.

सचीन's picture

15 Jan 2014 - 2:51 pm | सचीन

मुहूर्त न पाहणाऱ्या इंग्रजांनी जवळपास साऱ्या जगावर राज्य केल तर सदान कदा मुहूर्त पाहणारी पेशवाई हि हरून नष्ट झाली .

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 3:18 pm | मारकुटे

एकंदर धागा पेशवाई कशी मुर्खांची होती आणि ईंग्रज कसे हुस्शार होते हे सांगायला काढला आहे असे दिसते.

हल्ली एक इंग्रजप्रेमी सदस्य दिसत नाहीत....

इंग्रज हे हुशार होते ह्यात वादच नाही.

मग हुशार इंग्रजांच्यात राहायला जा, तुमच्या दृष्टीने मागासलेल्या पेशव्यांच्या महाराष्ट्रात काय करताय?

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 3:39 pm | मारकुटे

तुम्हाला हुशार करण्याचे असिधारा व्रत घेतले आहे त्यांनी ! असं बोलू नये... कान पकडून सॉरी म्हणा पटकन.

>>कान पकडून सॉरी म्हणा पटकन.

मी त्यांचा कान पकडायला तयार आहे हो, पण व्हर्च्युअली कसा पकडणार कान?

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2014 - 6:12 pm | टवाळ कार्टा

खिक्क :)

अनिरुद्ध प's picture

15 Jan 2014 - 3:53 pm | अनिरुद्ध प

+१ हेच लिहायला आलो होतो.

कुठे राहायला जायचे ते नंतर बघू. पण इंग्रज हे हुशार होते हे नक्की.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2014 - 4:56 pm | अत्रुप्त आत्मा

@इंग्रज हे हुशार होते हे नक्की.>>> वादच नाही! हेच विधान "आपण मूर्ख होतो" असंही करता येतं... नै का?

सचीन's picture

15 Jan 2014 - 5:26 pm | सचीन

आपण हुशार होतो.

पण इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो.

चैतन्य ईन्या's picture

15 Jan 2014 - 5:41 pm | चैतन्य ईन्या

आपल्याहूनही हां शब्द आधी घातला असता तरच वरचा अर्थ ध्वनित होतो बुवा नाहीतर फक्त "इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो." एवढाच होतो ना आपण हुशार होतो किंवा मुर्ख होतो असा ध्वनित होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2014 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

@सचीन

आपण हुशार होतो.
पण इंग्रज आपल्याहूनही हुशार होते असाही ह्याचा अर्थ होतो.>>> थोडक्यात... तुंम्ही त्या मूर्खांपैकी एक नाहीत... असच तुंम्हाला म्हणायचय ना!?

विद्युत् बालक's picture

15 Jan 2014 - 9:47 pm | विद्युत् बालक

अशी स्वतःच्या हुशारीची गुपिते जगजाहीर करू नयेत सचिन राव !

मारकुटे's picture

15 Jan 2014 - 3:37 pm | मारकुटे

चला तुम्ही खुश झाले ना ? इतिहासाची ऐशीतेशी.

आमच्या नवीन ऑफिसची उद्या पूजा आहे...
सकाळी म्हणाजे भल्या पहाटे ४ वाजता " ज्यांना स्वारस्य आहे अशा लोकांनी तिथे यावे "
अशी घोषणा मॅनेजमेंटने केली आहे...

पहाटे ४ वाजताचा मुहूर्त यासाठी की पूजा सांगणार्‍याला पूजा आटोपून त्याच्या हापिसला पळायचे आहे..
अर्थात हे मला अकाउंट्समधील एकाने खाजगीरीत्या सांगितले...

बाकीच्यांना मात्र मुहूर्त ४ वाजताचा आहे हे सांगताहेत...

माझे ऑफिस कतारमधे आहे...

कदाचित पूजेच्या वेळी पोलीस येऊ नयेत म्हणून पहाटे ४ वाजता उरकत असावेत.. असा माझा कयास आहे.

म्हणजेच मुहूर्त बघणे हे शास्त्र असले तरीही सोयीचा मुहूर्त बघणे ही कला आहे..

मुहूर्त बघणे हे शास्त्र असले तरीही सोयीचा मुहूर्त बघणे ही कला आहे..

अगदी अगदी!!

स्थळ जुळत असले, पसंत असले तर मग अगदी रिजेक्ट न करता ८ वा/१२ वा गुरु आहे त्यामुळे लग्न यावर्षी करता येत नाही वगैरे सांगतात.

हिंदी सिनेमात तर मुहुर्त प्रकरण लैच असते, हिरवणीचा (अ-हिरो किंवा विलनशी)लग्नाचा मुहुर्त असा ठेवतात की हिरोला बरोबर वेळात स्वतःचा मुहुर्त साधता येईल.

कुछ कुछ होता है मध्ये काजोल्-सलमानचा लग्नाचा मुहुर्त लांबणीवर पडणे कसे शारुखच्या पथ्यावर पडते तसे.

या पिक्चरांचे पण शुटींग, रिलीज वगैरेचे मुहुर्त असतात म्हणे.

रमजानात बहुतेक सिनेमा रिलीजचे मुहुर्त नसतात.

नाखु's picture

15 Jan 2014 - 6:02 pm | नाखु

सदान कदा मुहूर्त पाहणारी पेशवाई हि हरून नष्ट झाली .

नेहमीप्रमाणे बेधडक बिना पुराव्याचे सरधोपट (जनरल) विधान. मिपा कु.के.आपले इतीहासाचे ज्ञान अचाट (मुल्यवान) आहे आणि ते जपून ठेवा (आपल्यापाशीच).
मात्र कुठलाही धागा/विषय जात्-धर्म्-(जमल्यास संघ) यांचेपाशी आणून सोडण्याचे आपले कसब आ(वा)गळे आहे हे मात्र निर्विवाद..

परिंदा's picture

15 Jan 2014 - 6:18 pm | परिंदा

मुहुर्त म्हणजे ठराविक गोष्टीसाठी योग्य वेळ जेणेकरुन ती गोष्ट सुरळीत पार पडेल.

चातुर्मासात भारतात लग्नाचे मुहुर्त नसतात कारण पावसाळा असल्याने पूर्वी मंडप वगैरे घालणे, पुर आलेल्या नद्या वगैरे ओलांडणे असा प्रवास करणे कठीण होते, तसेच लोक शेतीच्या कामात गुंतलेले असत त्यामुळे दिवाळीनंतर(तुळशीच्या लग्नानंतर) लग्नाचे मुहुर्त ठेवत.

हे मुहुर्तपण प्रांताप्रांतात वेगळे असतात. मराठी लोक सहसा दिवसा(फार फार तर गोरज मुहुर्तावर) लग्न करतात, तर उत्तरेत अगदी मध्यरात्री १-२ चे मुहुर्त असतात. सौथवाले बहुतेक पहाटेच लग्ने उरकतात.

बाकी लढाई, आक्रमण वगैरेचा अनुभव नसल्याने त्यांच्या मुहुर्ताविषयी काही ठाऊक नै ब्वा!!

इकडे एखादी नवीन गोष्ट सुरू केल्यावर लगेच काय बरेवाईट घडते याकडे लक्ष असते .
पेशवाईचे म्हणाल तर तो १८१७चा बराच काळ त्या पेशव्याला वाईट असावा त्यातल्या त्यात जरा कमी नुकसानीचा मुहूर्त काढला असावा .
मुहूर्त काढा अथवा नाही बरा वाईट काळ येतच असतो .
१.चोर लोकपण चोरीला निघतांना काही शकून(=मुहूर्त ?)बघतात .वाईट शकून झाला तरी जावेच लागते .घर चालायला हवे ना .

२मुहुर्तावर केलेली लग्नेदेखील फिसकटतात तरी परंपरा चालूच आहे .

३राज्याभिषेकानँतर लगेच जिजाऊचा मृत्यु ही गोष्ट शिवाजीला खंत देऊन गेली ,पुन्हा विधि करवला .

४मुहूर्त पाहाणे एखाद्याला पटले नाही तरी घरातल्या इतर चार जणांना हवे म्हणून त्याप्रमाणे तो जातो .

उद्दाम's picture

16 Jan 2014 - 9:33 am | उद्दाम

शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 1:51 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

शिवराज्याभिषेकानंतर जिजाऊ गेल्या, रायगडावर वीज पडून घोडे की पागा काहीतरी जळाला आणि कुठल्यातरी चकमकीत एक चांगला योद्धा कामी आला. इतक्या घटना एकदम घडल्या. ( चु भु दे घे)

याचा अर्थ गागाभट्ट मुहुर्त काढायला चुकला असा घ्यायचा काय....
कि मुहुर्त वगैरेचा काहिच प्रभाव मनुष्याच्या आयुष्यात दिसत नाही याअर्थी हे थोतांड असावे असा अर्थ यातून ध्वनीत होतो.

उडन खटोला's picture

16 Jan 2014 - 10:11 am | उडन खटोला

मी स्वतः वर्शाचे ३६५ दिवस सारखे ,असे मानणार्या पैकी एक

पण वयाच्या २५ व्या वर्शी असे काही अनुभव आले की सगळे विचारच बदलून गेले

म्हणजे असे की अमावास्या /पौर्णिमा या दिवशी मनः स्वास्थ्य बिघडणॅ .वाइट स्वप्ने पडणॅ वगैरे प्रकार सुरू झाले

माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.

यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील

या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 2:00 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.

पुन्हा तेच सांगतो, या अमानवी शक्तीचे अस्तित्व सिद्ध करण्याची कुठली पद्धत आहे का जी 'कॉमन सेन्स'वर आधारलेली आहे ?(सायंटीफीक मेथेडेलॉजी वगैरे थोडा काळ लांब ठेवा)
एखाद्या दूश्ट शक्तीचे अस्तित्व परीणामांनी सिद्ध करता येईल, असा वाईट परीणामांचे दुश्ट शक्तीशी असलेले causal nature स्पष्ट करणारे संशोधन झाले आहे काय?असल्यास प्रकाश त्यावर टाकावा..

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2014 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

@अत्रुप्त आत्मे* अन दुश्ट पाशवी # आसुरी शक्ती http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते. >>> http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

आंम्हाला* दोनच दिवसांपुरतं सीमीत केल्याबद्दल तीव्र णिषेढ! :-/

आंम्ही* हवे तेंव्हा कार्य रत होऊ शकतो!
http://www.sherv.net/cm/emoticons/halloween/vampire-in-casket.gif

बाकिच्यांचं # माहीत नै! =))

पैसा's picture

16 Jan 2014 - 3:05 pm | पैसा

नवा आयडी आहे पण "अत्रुप्त आत्मा, "दुश्ट पाशवी शक्ती" आणि "गुगळे" या मिपावरच्या हिट्ट मंडळींची नावे घेतल्यामुळे उडन खटोला हे मिपावर नवीन आहेत असे वाटलेच्च नाही!!

उडन खटोला's picture

16 Jan 2014 - 3:55 pm | उडन खटोला

हम कौन है, खुद हमे भी अब पता नही ...

यही तो है खासियत हमारी
कि लोग जाने हमे हैसियत से
रहते है हम तो पर्दा-नशीन
जमाने को हर्ज है हमारे वजूद से

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 3:57 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

आदाब आदाब उच्चदाब रक्तदाब

१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)

मंदार कात्रे's picture

16 Jan 2014 - 11:34 am | मंदार कात्रे

(हुशारीची परिसीमा) याचा अर्थ काय?

पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ???

???

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 1:46 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

पेशव्यांचा पराभव झाला म्हणून भारतात पहिली ट्रेन धावली ???
???

इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.

कवितानागेश's picture

16 Jan 2014 - 5:37 pm | कवितानागेश

म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं... ;)

>>म्हणजे पेशव्यांनी काढलेला मुहुर्त देशासाठी योग्यच होता म्हणायचं..
छे छे !! असं म्हटलं तर पेशव्यांना मुर्ख कसं ठरवता येईल.

वडापाव's picture

16 Jan 2014 - 1:53 pm | वडापाव

माननीय गुगळे बाबा च्या सहाय्याने अधिक आन्तर-जालीय सन्शोधन केले असता असे समजले की या प्रकारास Energy Vampirism असे नाव आहे. अत्रुप्त आत्मे अन दुश्ट पाशवी आसुरी शक्ती अमावास्या /पौर्णिमा या दिवशी अधिक तीव्रतेने कार्यरत असतात ,असे दिसुन येते.

यास्तव जर वाइट शक्ती म्हुर्त बघुन हल्ला करत असतील, तर शुभ शक्ती देखील नक्कीच शुभ मुहुर्तावर मदत करत असतील

या तर्काने मुहूर्त या सन्कल्पनेचे स्पश्टीकरण सापदते

अरे बापरे!!!!!

१८१७ साली पेशव्यांचा दारूण पराभव झाला. इंग्रजांचे राज्य १८१८ च्या आसपास पूर्ण भारतावर स्थापित झाले. नि अवघ्या ३५ वर्षात १८५३ साली भारतात पहिली ट्रेन धावली.(हुशारीची परिसीमा)

'मिपाचे कुके' हा किताब योग्यच आहे.

इंग्रजांच्या बुद्धीचातुर्ताने ट्रेन धावली असे सचीनजी सांगत आहेत.

मानलं बुवा गो-यांच्या बुद्धिचातुर्ताला!!

चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्त :)

वडापाव's picture

16 Jan 2014 - 2:26 pm | वडापाव

चर्चेत उडी घ्यायला आजचा मुर्हुत चांगला आहे वाट्त

तुम्ही सुद्धा आजचाच मुहूर्त गाठलात की!! :)

मंदार दिलीप जोशी's picture

16 Jan 2014 - 2:29 pm | मंदार दिलीप जोशी

ट्रेन धावली कारण व्यापाराला इंग्रजांना दळणवळणाची जलद साधने हवी होती इथे.
(सचीनजींना एवढे समजू नये म्हणजे त्यांच्या पिढीजात मतिमंदत्वाची परिसीमा) :P :D

प्यारे१'s picture

16 Jan 2014 - 2:55 pm | प्यारे१

>>> दळणवळणाची जलद साधने
कशाला? लूट वाहून न्यायला?

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2014 - 2:58 pm | टवाळ कार्टा

होय

प्यारे, ह्याच दळणवळणाच्या साधनात बसून लाखो लोक प्रवास करतात. नाहीतर टांग्यातून प्रवास करावा लागला असता.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jan 2014 - 4:10 pm | प्रभाकर पेठकर

राईट बंधू ह्या दोन अमेरिकन भावांनी इंग्रजांना विमान दिलं, नाहीतर बसले असते रेल्वेने खुरडत खुरडत भटकत. म्हणजे आता, अमेरिकन्स सर्वात जास्त बुद्धीमान म्हणायला लागतील. इंग्रजही त्यांच्या पुढे मट्ठच.

पण ह्या सर्व शोधांचा मूलाधार भारताने दिलेल्या 'शून्या'त आहे, असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं. म्हणजे पुन्हा भारतियच सर्वश्रेष्ठ असं सिद्ध होतं.

च्यायला, बराच गोंधळ आहे राव! नक्की कोण सर्वात जास्त बुद्धीवान? इंग्रज, अमेरिकन्स की भारतिय?

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.

गिरीश कुबेर लिखित 'युद्ध जीवांचे' आणि 'अधर्मयुद्ध' वाचल्यानंतर मला अमेरिकन्स आणि इंग्रज हे सगळ्यांत मठ्ठ वाटायला लागले आहेत. असो.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jan 2014 - 5:06 pm | प्रभाकर पेठकर

भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.

ह्या लाखात त्यांचा 'एक' आणि भारताची पांच 'शून्य' येतात. शून्यच नसते तर 'लाख' कुठून आणि कसे केले असते?
तरीपण हे (त्यांनी त्याचे 'लाख' केले) जसे त्यांचे कौतुक आहे तसेच भारताला रेल्वे दिल्यानंतर देशाच्या कानाकोपर्‍यात (की कोनाकोपर्‍यात?) रेल्वेचे जाळे पसरवून भारतिय रेल्वेला जगाच्या सर्व देशांच्या रेल्वेत बर्‍यापैकी वरचे स्थान भारतियांनीच मिळवून दिले आहे. तसेच, गरीबात गरीबाला परवडेल अशी रेल्वे भारतातच आहे. किफायतशीर मालवाहतूकही भारतिय रेल्वेतूनच होते. हे सर्व भारतियांनी केले आहे इंग्रजांनी येऊन नाही. त्यामुळे त्यांनी 'लाख' केले म्हणून ते हुशार ठरतात तर रेल्वे क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीने भारतियही तितकेच हुशार ठरतात.
फाळणी नंतर भारताने केलेली लक्षणीय प्रगती आणि पाकिस्तानची नगण्य प्रगती लक्षात घेतली तरी भारतियांची हुशारी अधोरेखित होईल.

सचीन's picture

16 Jan 2014 - 5:13 pm | सचीन

पेठकरांशी सहमत.
देशाला स्वातंत्र्य मिळाले. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ठ अशी राज्यघटना मिळाली.आणि मुख्य म्हणजे विकासाची दृष्टी असणारे राज्यकर्ते मिळाले देश स्वातंत्र्य झाल्यापासून जवळपास ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य आहे.कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताने अफाट प्रगती केलीय हे खरे आहे.आज देश मंगळावर जावून पोहोचलाय.

अनिरुद्ध प's picture

16 Jan 2014 - 5:15 pm | अनिरुद्ध प

+११११ पेठकर काका झक्कासच उत्तर आवडले.

खरच पेठकर ह्यांच्या झकास उत्तराबद्दल आभार. देशाचा विकास असाच कायम राहायचा असेल तर कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही.

प्रभाकर पेठकर's picture

16 Jan 2014 - 5:29 pm | प्रभाकर पेठकर

सचिनसाहेब,

नविन वादाला तोंड फोडण्याचा तुमचा प्रयत्न समजतो आहे. तरीपण, उत्तरादाखल एवढेच म्हणेन, काँग्रस पक्ष काय आकाशातून पडला नाही भारतियांचा उद्धार करायला. इथल्या मातीतच जन्मला आणि रुजला. तदवत इतर पक्षही इथल्या मातीतच जन्मले आणि रुजले आहेत. काँग्रेस जसे चुका करत करत शिकला (तुम्ही म्हणता म्हणून) तसेच दुसरा एखादा किंवा पक्षसमुदायही शिकेलच.

आता अपेक्षा काय आहे. इतरांनी काँग्रेसला शिव्या घालाव्यात आणि वादावादी चालू राहावी?

गब्रिएल's picture

16 Jan 2014 - 10:21 pm | गब्रिएल

सचीन कवाधर्न तुमची रेकाट बिगाडलीय. त्ये जून्या गोल्गोल फिरनार्‍या रेकाटिसार्क त्येच त्येच परत परत कानग्रिस कान्ग्रिस गातीया. दिल्लिचि माय्बी वाचत अस्ती तर लईच बोर झाली अस्ती. त्या रेकाटीला जर्रा भंगारात टाका नायतर भंगार माल दुरुस्त करनारा एकादा लाला गाटा आनी विकून चार पयश्ये गाटिला बांदा बर्का.

नाखु's picture

16 Jan 2014 - 2:59 pm | नाखु

मंदार भाऊ जर पेशवे हरले नसते तर ईंग्रज आले नसते आणि ट्रेन धावली नसती म्हणजे ट्रेन येण्यासाठी किति मोठा त्याग पेशव्यांनी केला हेच मिपा कुकेंना सूचीत करायचे आहे (आता या त्यागाकरिता कोण किरकोळ लोग मेले असतील तर तिकडे अज्जिबात लक्ष देऊ नका)
वेब दुनियाला सशक्त पर्याय देणार्या कुकेनां धन्यवाद.

टॉपगिअर्ड फिलोसॉफर's picture

16 Jan 2014 - 3:35 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर

पेशव्यांना व्यापार उदीम करायचाच नव्हता असा याचा अर्थ घ्यायचा का?

शिवाजीराजेंनी आरमार ऊभे करुन इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले व दळणवळणाचे नवे क्षेत्र जनतेला दिले .आजच्या नेव्ही वगैरेची सुरवात राजेंनी केली होती ..काळाच्या पुढचे विचार...

सचीन's picture

16 Jan 2014 - 3:24 pm | सचीन

१८१८ ला पुरा भारत इंग्रजांच्या ताब्यात आला आणि इंग्रजांच्या राज्यात लॉर्ड विल्यम बेंटिंकने ४ डिसेंबर १८२९ रोजी सती-बंदीचा कायदा केला आणि सती जाणे, हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला.

उडन खटोला's picture

16 Jan 2014 - 4:00 pm | उडन खटोला

तुम्ही काय इंग्रजांना भारतीय जनतेचे तारणहार वगैरे मानता की काय?

असेल असेल ...तसेही असेल ... इटालीकरीण मॅडम आणी पप्पू बाबा पण भारतीय जनतेचे तारणहारच नाही का?

विसरलोच तुमच्या मागच्या जिलब्या...............!

इंग्रजांनी जे काही चांगले काम केले त्याला चांगले म्हणण्यात कसला आलाय संकोच. सतीची प्रथा बंद पाडली हे काम चांगले नव्हते का?

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 4:41 pm | मारकुटे

सहमत आहे.

फक्त प्रश्न इतकाच आहे की खरोखर सतीबंदी इंग्रजांमूळे झाली? खरोखर ती समस्या इत्की गंभीर होती? जाऊ द्या इअत्का विचार करण्यापेक्षा इंग्रज हुस्शार हेच मानावे अन डोक्यावर पांघरुण घेऊन झोपावे

प्रभाकर पेठकर's picture

16 Jan 2014 - 5:12 pm | प्रभाकर पेठकर

इंग्रजांनी नक्कीच कित्येक चांगली कामे भारतात केली. पण म्हणून ते 'हुशार' आणि आपण 'मठ्ठ' ठरत नाही. भारतियांची सत्ता इंग्लंडावर प्रस्थापित झाली असती तर भारतियांनीही तिथे चार चांगली कामे केली असती.

चैतन्य ईन्या's picture

16 Jan 2014 - 5:03 pm | चैतन्य ईन्या

जगातील सर्वात बुद्धिमंत लोक इंग्रज.(अमेरिकन्स हेही मुळचे इंग्रज ).भारताने शून्याचा शोध लावला पण ह्या शून्याचे लाख पाश्चिमात्यानी केले.>>>
हुशार नक्कीच आहे पण हुशारी पेक्षा स्वार्थी जास्त आहेत. अमेरिका ही इंज्राचीच आहे. त्यांनी मूळ रेड इंडिअन १.२ कोटी लोकांना मारले. संदर्भ आशिष नंदी, हा बाबा स्वतः बंगाली ख्रिश्चन आहे -- हे आपल्या माहिती साठी. ह्यांच्या हुशारीमुळे मानवाचे जीवनमान भरपूर वाढले पण जगात सगळीकडे युद्धे आणि दुसऱ्याची प्रचंड प्रमाणात पिळवणूक करणे ह्याच्वर हे अजूनही जगात आहेत. इराक आणि इराण काय आणि आता पाकिस्तान-अफगाणिस्तान सगळीकडे ह्यांनीच युद्धे केली फक्त तेलासाठी आणि नैसर्गिक साधन सामुग्रुसाठी. जगात गेले तिथे आधीच्या धर्माला नावे ठेवून स्वतःचाच धर्म कसा चांगला म्हणजे जे सगळे जेते करतात तेच त्यांनी केले. तेंव्हा नक्की काय पाहायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. बाकी जाता जाता सध्या पर्यावरणाचा सगळ्यात जास्त ऱ्हास ह्याच लोकांनी केला आहे आणि आपण पुन्हा त्यांनाच आंधळेपणाने फॉलो करतो आहोत. एवढे तुमच्या सारख्या हुशार लोकांच्या कच्छपी आणि येत जात ब्राह्मण लोकांना जातीयवादी म्हणवणाऱ्या खऱ्या जातीयवाद्यांच्या लक्षात आले म्हणजे झाले.

अमेरिका आणि इंग्लंड दुष्ट आहेत हे पटले.

मग का आपण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो?

पोरगा किंवा सगा सोयरा अमेरिकेला गेला कि का आपल्याया कृतकृत्य वाटते?

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 5:40 pm | मारकुटे

डोक्यात पाणी झाले काय ?
=))

=))

=))

चैतन्य ईन्या's picture

16 Jan 2014 - 5:41 pm | चैतन्य ईन्या

गम्मत वाटली तुमचे वरचे प्रश्न वाचून इतका वेळ तुम्हीच तर त्यांचे कौतुक करत होतात? आणि तसेही तुमचा सगळा रोख फक्त ब्राह्मण समाजावरच आहे. तेंव्हा नक्की काय ते ठरवा बुवा जातीयवादी कोणाला म्हणावे. नक्की कोण कसा काय हुशार आणि नक्की कोण कसा मुर्ख ते.

तुमचा अभिषेक's picture

16 Jan 2014 - 10:18 pm | तुमचा अभिषेक

ना शास्त्र ना थोतांड. हा एक व्यवसाय आहे. ज्याला जमतो तो कलाकार !