स्ट्रॉबेरी सेवबा

टक्कू's picture
टक्कू in पाककृती
5 Jan 2014 - 9:24 am

स्ट्रॉबेरी सेवबा / Strawberry Sevba

लाल चुटुक गोळे हिरव्या रंगाच्या गोंड़यावर! ओळखा बर मी कोण? अशी लहानपणी ओळख झालेली स्ट्रॉबेरी थंडीची खास ओळख. नाजूक पिवळ्या कणात गुंफलेली लाले लाल स्ट्रॉबेरी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी फार्म मध्ये जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे. नुकतेच mapro च्या फार्म मध्ये फ्रेश स्ट्राबेरी मेलबा चाखले. ती अप्रतिम चव जीभेवर रेंगाळत असतानाच सुचले त्याचे variation. ताबडतोब try केले आणि एक hit dish यादीमध्ये add झाली.

स्ट्रॉबेरी लवर्स साठी स्ट्रॉबेरी सेवबा :)

साहित्य:
५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीज,
तीन मोठे चमचे शेवया,
तीन चमचे साखर,
एक चमचा तूप,
एक कप पाणी,
एक कप दूध,
दोन वाट्या व्हिप्ड क्रीम,
तीन मोठे चमचे स्ट्रॉबेरी जॅम,
ड्रायफ्रूट्स चे काप

कृती:
१. सर्वप्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे.
२. स्ट्रॉबेरीज चे अर्धे काप करून फ़्रीज मधे ठेवावेत. व्हिप्ड क्रीम, जॅम आणि दूध एकत्र मिक्सर मधून फिरवून घ्यावे व फ़्रीज मधे सेट होण्यास ठेवावे.
३. सर्व्ह करतेवेळी सर्व पदार्थ फ़्रीजमधून काढावेत. एका ग्लासमधे सर्वात तळाला शेवया घालून त्यावर क्रीम, मधे स्ट्रॉबेरीचे काप, त्यावर पुन्हा क्रीम, आणि सर्वात वरती ड्रायफ्रूट्स चे काप घालून थंडगार सर्व्ह करावे.

a
a
aa

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 9:36 am | कैलासवासी सोन्याबापु

तोंडाला पाणी सुटले!!!! अप्रतिम रिप्रेझेंटेशन!!!

संजय क्षीरसागर's picture

5 Jan 2014 - 10:23 am | संजय क्षीरसागर

कमाल रेसिपी आहे. पुण्यात असाल तर रेसिपी केल्यावर व्य.नि. करावा आणि आनंद द्विगुणित करण्याचे श्रेय घ्यावे.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 11:01 am | प्रभाकर पेठकर

चांगली आहे पाककृती.

ज्या 'स्ट्रॉबेरी मेलबा' चे व्हेरिएशन म्हणजे ही पाककृती आहे. ती मुळ 'स्ट्रॉबेरी मेलबा' ही काय पाककृती आहे?

दुसरे मला वाटते नुसती कच्ची स्ट्रॉबेरी वापरण्यापेक्षा ब्लांच केलेली (अर्धवट शिजवलेली) आणि साखरेच्या पाकात घोळवलेली (किंवा न घोळवता) स्ट्रॉबेरी असेल तर जास्त चांगली लागतील का? वर सुक्यामेव्याच्या सोबतीने एखादी कच्ची स्ट्रॉबेरी सुक्या मेव्याच्या तुकड्यांचा आकारात बारीक चिरून वरून घातल्यास जास्त चांगली दिसेल शिवाय स्ट्रॉबेरीच्या मूळ चवीची चुणूक (हिंट) सुद्धा चाखायला मिळेल.

टक्कू's picture

5 Jan 2014 - 3:05 pm | टक्कू

प्रभाकर काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले तर छानच दिसेल आणि स्ट्रॉबेरी जर साखरेच्या पाण्यात अर्धवत शिजवली तरी छान च लागेल.
मुळ 'स्ट्रॉबेरी मेलबा' ही काय पाककृती आहे? म्हणजे चक्क स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम असा प्रेझेन्ट करतात.

स्ट्रॉबेरी आणि फ्रेश क्रीम असा प्रेझेन्ट करतात.

टक्कू's picture

5 Jan 2014 - 3:13 pm | टक्कू

सोन्याबापु आणि संजय धन्यवाद!
पुण्याची तर नाही पण मुंबईस आल्यास नक्की हाक मारा :)

किसन शिंदे's picture

5 Jan 2014 - 8:34 pm | किसन शिंदे

स्ट्रॉबेरी नाय आवडत, दुसरं काही टाकता येईल का? :) बाकी फोटो नेहमीप्रमाणे अप्रतिम!

टक्कू's picture

8 Jan 2014 - 2:35 pm | टक्कू

आंबा खूप छान लागेल. चिक्कू पण चालेल.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2014 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

जबरी! :)
आम्ही कालच्याला महाबळेश्वरात ह्यातलेच दोन प्रकार ट्राय केले.. लै भारी लागतं एकदम. :)

१) हे मलबेरी वालं.
https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/1535416_564829733603317_1239798629_n.jpg

२) आणी हे स्ट्रोबेरीमधे!
https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/1545614_565402043546086_1092250021_n.jpg

इन्दुसुता's picture

5 Jan 2014 - 10:56 pm | इन्दुसुता

आवडली...

रेवती's picture

5 Jan 2014 - 11:36 pm | रेवती

Masta! :)

कवितानागेश's picture

6 Jan 2014 - 5:00 pm | कवितानागेश

वॉव! :)

अनिरुद्ध प's picture

6 Jan 2014 - 5:15 pm | अनिरुद्ध प

पा क्रु आवडली वा खु साठवण्यात आली आहे.

अनिरुद्ध प's picture

6 Jan 2014 - 5:15 pm | अनिरुद्ध प

पा क्रु आवडली वा खु साठवण्यात आली आहे.

_मनश्री_'s picture

7 Jan 2014 - 5:58 pm | _मनश्री_

बघून तोंडाला पाणी सुटल
खुप छान प्रेझेन्टेशन

मदनबाण's picture

8 Jan 2014 - 3:17 pm | मदनबाण

आहाहा... :)

{लिची प्रेमी} ;)

मुक्त विहारि's picture

8 Jan 2014 - 3:25 pm | मुक्त विहारि

झक्कास

इशा१२३'s picture

10 Jan 2014 - 3:11 pm | इशा१२३

सोपी आणि मस्त पाकक्रुती!

अनन्न्या's picture

10 Jan 2014 - 4:11 pm | अनन्न्या

आंबा घालून करून पाहता येईल, पण अजून चार महिने थांबायला पाहिजे.

पैसा's picture

15 Jan 2014 - 11:48 am | पैसा

पाकृ, प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच मस्त!