अलिबाग परिसरात फिरायला जाणेबाबत माहिती हवी आहे.

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in भटकंती
3 Jan 2014 - 3:28 pm

नमस्कार मंडळी,

शनिवार रविवार दोन दिवस कुटूंबासहित अलिबाग ला जायचे आहे.

सोबत दोन छोट्या मुली ( वय वर्षे ३ व १ ) आहेत.

अलिबाग चा बीच फरसा चांगला नाही असे ऐकले आहे.
पण अलिबाग च्या शेजारील बाकी बीचेस बद्दल चांगले आणि वाईट असे दोन्ही गोष्टी वाचल्या.

नागव,
अक्शी,
किहिम,
आवस

या पैकी कोणता बीच जास्त सेफ आहे ?
तसेच घरगुती पण सर्व बसिक अ‍ॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का?
छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठीकाण असेल तर कृपया सुचवावे.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

3 Jan 2014 - 3:57 pm | कपिलमुनी

हा बीच सेफ आहे ..रहाण्याच्या सोयी चांगल्या आहेत..

स्मिता श्रीपाद's picture

3 Jan 2014 - 4:06 pm | स्मिता श्रीपाद

राहाण्याच्या सोयींबाद्दल काही माहिती आहे का ?
काही कॉन्टॅक्ट नंबर किवा वेबसाईट चे नाव वगैरे.

नितीन पाठक's picture

3 Jan 2014 - 4:10 pm | नितीन पाठक

अलिबाग पासून साधारण एक तासावर ' काशिद ' बीच आहे. गाव एकदम छोटे आहे. बीच सुरेख आहे. रहावयाची सोय पण ब-यापैकी आहे. एक दोन रिसोर्ट आहेत पण माझ्यामते महाग आहेत. घरगुती सुध्दा सोय आहे. काशिद बीच वरून मुरूड जंजिरा येथे पण जाता येते. साधारण 20 किमी अंतर आहे. हा बीच सुरक्षित आहे. जर दिवसा लवकर पोहोचला तर बीच वर गर्दी अजिबात नसते. बीच अतिशय छान आहे. काशिद बीच ते मुरूड जंजिरा या रस्त्यावर जाताना समुद्र आपल्या बरोबर असतो. जरूर जा आणि आम्हा सगळ्या " मिपाकरांना " कळवा.

आनंदराव's picture

3 Jan 2014 - 4:10 pm | आनंदराव

आवास बीच चांगला आहे. तिथे शिरगांवकर यांचे रिसॉर्ट आहे. मी जाउन आलो आहे. फ्यामिली साठी उत्तम ! शाकाहारी, मांसाहारी जेवण तसेच मद्यपानाची पण सोय आहे. तुम्ही जरी मद्यपान वगैरे करत नसाल तरी इतर मद्यपींकडुन कोण्ताही त्रास होउ देत नाही.
बाकि आवास मधे बघण्यासारखे काहिहि नाही. तुम्हाला हवे असेल तर रिसॉर्ट चे डिटेल्स देतो.

भुमन्यु's picture

4 Jan 2014 - 4:38 pm | भुमन्यु

१. आवास मध्ये करमरकरांचे सुन्दर शिल्प दालन आहे (मराठी शाळेपासून साधारणतः १ कि. मी.)
२. आवास मध्ये बीच पुर्ण रिकामा असतो.
३. जोगळकर कॉटेज पण राहण्यासाठी चांगले आहे. (त्यांच्याकडे सोलकढी आणि कोकम सरबत उत्तम मिळते)

--- राहुल ---

कवितानागेश's picture

3 Jan 2014 - 4:19 pm | कवितानागेश

इथे मागे २ वेळा राहिलेय.
http://www.holidaygb.in/alibaug-cottage.htm
चान्गले आहे
tripadvisor वर अजून ठीकाणं माहित होतील.

बजेट ? त्यावर बरेच बदल होतात.

घरगुतीचाच आग्रह का?

प्रकाश जनार्दन तेरडे's picture

3 Jan 2014 - 5:16 pm | प्रकाश जनार्दन तेरडे

आलीबाग जवळिल आक्शी गावात 'कुलपे' नावचे घरि उत्त्म प्रकरे राहण्याचि सोय होइल.

रघुपती.राज's picture

3 Jan 2014 - 5:27 pm | रघुपती.राज

किहिम येथे हे चान्गले आहे:
http://nandanvanholidayhome.com/contact-us.html
मी गेलो होतो. अनुभव उत्तम.
रुपये २५०० प्रति दिन. रूम मधे उत्तम सोयी आहेत. कुटुम्बाकरिता उपयुकत आहे. घरगुती जेवन आहे.
किहिम बीच पासुन दोन मिनिटावर आहे.
मुम्बइवरुन जानार असाल तर लोन्च ने जा. मुलान्न मजा येते.
शुद्ध ले़खन बद्दल माफ करा.

मला चिंटूची एक कार्टून स्ट्रिप आठवली..

वैताग आलाय घरच्या जेवणाचा.. आज घरी स्वयंपाक नको.. मस्त बाहेर कुठेतरी खाऊया असं म्हणत चिंटू, आई आणि बाबा घराबाहेर पडतात, आणि दुसर्‍या चौकटीत "घरगुती जेवण मिळेल" असं लिहीलेल्या एका खानावळीत शिरताना दिसतात. ;)

स्मिता श्रीपाद's picture

3 Jan 2014 - 5:41 pm | स्मिता श्रीपाद

सोबत दोन छोट्या मुली आहेत त्यांची गैरसोय होउ नये म्हणुन घरगुती चा आग्रह आहे.
नागाव मद्धे कोनिच राहिले नाहिये का अजुन ?

मी स्वतः अलिबागमधे पाचेक वेळा, नागावमधे एकदा, आक्षीत एकदा, काशिदला सहासात वेळा इ इ अशा रितीने राहिलेलो आहे. एका दिवसात जाऊनयेऊनही ही ठिकाणं केली आहेत. या भागाचा भरपूर अनुभव असल्यानेच तुम्हाला स्पष्टपणे बजेट विचारलं आणि घरगुतीविषयीचे गैरसमजही दूर करता यावेत यासाठी त्याविषयी सवाल केला.

इथे अगदी पाचशेपासून दीड दोन हजारात घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. मीही अनेकदा घरगुतीत राहिलो आहे. पण सर्व पर्याय पाहता एकदाच मजा करायला जायचं तर जरा खर्च करुन परफेक्ट अघरगुती तारांकित रिसॉर्टमधे जावंत असं मनापासून सांगतो.

अगदीच दुर्गंधीयुक्त, वासाड चादरींचं आणि डासांनी भरलेलं अंधारं घर नको असेल तर साध्या पण चांगल्या अकोमोडेशनलाही इथे २ - २.५ हजार तर लागतातच. पुन्हा जेवण सेपरेट. दोन मोठे आणि दोन लहानगे यांच्या जेवणाचा खर्च २४ तासात (ब्रेकफास्ट, लंच, दुपारच्या चहानाश्ता,डिनर धरुन) २००० किमान होतो.

जराजरी स्टँडर्ड हॉटेल घेतलं तर हजार आणखी वाढतात.

म्हणजे राहण्याखाण्यावर मिळून तसे ६ -७ हजार जातातच.

नऊ हजारच्या दरम्यान खर्च केलात तर प्रकृती रिसॉर्ट्स काशिद इथे तुम्हाला उत्तम ५ स्टार हेरिटेज रिसॉर्टमधे वीकेंडला राहता येईल. (शनिवार चेक इन रविवार चेक आउट). यामधे सर्व जेवणे इन्क्लुडेड.

रिसॉर्टमधेच अफलातून मल्टिक्विझिन जेवण, लहान मुलांनासुद्धा भरपूर चॉईस असलेले डिनरचे वीसतीस पदार्थ (डायनिंग सेक्शनमधे), लाईव्ह पास्ता कॉर्नर, ब्रेकफास्टलाही मोठे लोक आणि पोरं तृप्त होतील इतकी व्हरायटी.

सर्व अनलिमिटेड..

संध्याकाळी चहा आणि बारीकसा नाश्ता..

दोन उत्तम प्रतीचे अत्यंत मेंटेन केलेले स्विमिंग पूल्स, लहान मुलांसाठी सुरक्षित किड्स पूल. रिसॉर्टचं आवारच मैलोगणती पसरलेलं आणि अप्रतिम सुंदर.. बागा इतक्या उत्कृष्ट मेंटेन केलेल्या पहिल्यांदा पाहिल्या. प्रशस्त बागा, त्यात हॅमॉक्स.. आणि खोल्या तर इतक्या झकास की बाहेर पडू नये..

सगळीकडे फिरायला सतत चालू असलेल्या गोल्फ कार्ट्स.

प्रायव्हेट बीच, पब्लिकच्या गराड्यापासून दूर.. रिसॉर्टवरुन तिथे जायला कायमची बैलगाडी..

रात्री जेवणासोबत लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम..

जास्त पैसे देऊन का होईना, पण त्याच्या दुप्पट वसुली होते याची खात्री.

इतकं टंकन करण्यात माझा काडीचाही फायदा नसतानाही या रिसॉर्टची स्तुती करत सुटलोय यातच सर्व आलं.

कुटुंबासाठी सुंदर मेमरीज पैशात मोजता येत नाहीत.

तस्मात जर बजेट काढणं शक्य असेल तर तीनचार हजाराच्या फरकासाठी प्लीज कॉम्प्रमाईज करुन एखाद्या घरगुती बंगल्याच्या वळचणीला डास मारत अन लिमिटेड थाळी खात वीकेंड घालवू नका ही विनंती..

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2014 - 2:53 am | प्रभाकर पेठकर

वाचनखुण कशी साठवायची?????

पण धागा साठवायला धाग्याचे मुख्य कण्टेण्ट संपले कि प्रितिक्रिया सेक्शन सुरु होण्यापुर्वी उजव्या हाताला वा.खु. साठवायची लिंक क्लिकवा.

प्रभाकर पेठकर's picture

4 Jan 2014 - 1:04 pm | प्रभाकर पेठकर

मला गविंच्या सर्वसमावेशक प्रतिक्रियेसाठी वाचनखुणेची सोय हवी होती. पण शेवटी संपूर्ण प्रतिक्रिया कॉपी करून नोटपॅडवर चिकटवून संग्रहीत केली आहे.
धन्यवाद.

मी तर कोकणचा नाद सोडलाय .

समुद्र ,मासे ,पिणे यातलं काहीही करायचं नसणाऱ्याने कोकणच काय कोणताही किनारा गाठू नये .

थोडासा अनुभव घेण्यासाठी 'कोकण पर्यटन' (विनोद तावडे यांचे ?)तर्फे एखादी सहल करून पाहा .
गवि + .

स्नेहानिकेत's picture

3 Jan 2014 - 9:14 pm | स्नेहानिकेत

नागाव बीच छान आहे. पण हल्ली तिथे खूपच गर्दी असते. अलिबाग पासून जवळच वरसोली बीच देखील छान आहे. अजूनही बर्‍यापैकी शांत समुद्र किनारा!!!! नागाव मध्ये देखील खूप चांगले पर्याय आहेत. तुम्ही स्वतः ची गाडी घेऊन जाणार आहात का?

सुनिल पाटकर's picture

3 Jan 2014 - 10:37 pm | सुनिल पाटकर

काशिद बीच उत्तम..मुरुड जंजिरा किल्ला , चौल रामेश्वर मंदिर्,शितला देवी आणि दत्त मंदि, अलिबागचा कुलाबा
किल्ला, साळावचे बिर्ला मंदिर , नांदगाव्चा सिध्दिविनायक्, करमरकर म्युझियम, राहण्याच्या सोयी भरपुर आहेत

नितिन थत्ते's picture

4 Jan 2014 - 5:13 pm | नितिन थत्ते

नागाव येथे शिंत्रेवाडी नावाचे उत्तम रिसॉर्ट आहे. घरगुती सदृश (हॉटेलातील पदार्थ उदा. पंजाबी-चायनीज जेवणात मिळत नाहीत) पण उत्तम व्यवस्था आहे. नुकताच जाऊन आलो आहे. विविध साइजच्या ग्रुपसाठी वेगवेगळि सोय आहे. बीच ऑलमोस्ट प्रायव्हेट असल्यासारखा आहे.

काँटॅक्ट- ठाणे- ०२२२५३६०६२६ किंवा ९८२०३३३८९२.

सत्याचे प्रयोग's picture

4 Jan 2014 - 5:55 pm | सत्याचे प्रयोग

नागाव बिचला गेलो होतो दिवाळीत घाण वाटला बिच बिचचा आनंद घ्यायचा असेल तर तळकोकणातच जा

गंगाधर मुटे's picture

18 Oct 2019 - 2:58 pm | गंगाधर मुटे

६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ८ व ९ फेब्रुवारी २०२०ला नियोजित आहे. त्या अनुषंगाने हि माहिती माझ्यासाठी उपयुक्त ठरली.
धन्यवाद !

जालिम लोशन's picture

19 Oct 2019 - 3:11 pm | जालिम लोशन

कोणत्याही समुद्रकिनारी भिजण्यापुर्वी हे लक्षात असु द्यात. सध्या मल्टिड्रग रेझिस्टटं फंगल इनफेक्शन साथ चालु आहे विशेषतः महानगरिय सांडपाणी ज्या समुद्रात मिसळले जाते त्या समुद्रकिनार्‍यांवर. काळजी घ्या.

धर्मराजमुटके's picture

19 Oct 2019 - 7:51 pm | धर्मराजमुटके

शक्यतो अलिबाग ला फिरायला जाऊच नये. तुम्ही मुंबईत राहत असाल तर लोक तुम्हाला "अलिबाग से आयेला है क्या ?" असा प्रश्न कधीही विचारु शकतात. :)

जॉनविक्क's picture

19 Oct 2019 - 7:58 pm | जॉनविक्क

तुम्हाला "अलिबाग से आयेला है क्या ?" असा प्रश्न कधीही विचारु शकतात. :)

तुम्हाला "अलिबाग से घुमके आयेला है क्या ?" असा प्रश्न कधीही विचारणार नाहीत ?

चारु राऊत's picture

20 Oct 2019 - 11:02 am | चारु राऊत

आमच्या वरसोलि गावाचा किनारा पण छान आहे अलिबाग पासून1 किलोमीटर दूर आहे गावात रिसॉर्ट्स पण आहेत

चारु राऊत's picture

20 Oct 2019 - 11:02 am | चारु राऊत

आमच्या वरसोलि गावाचा किनारा पण छान आहे अलिबाग पासून1 किलोमीटर दूर आहे गावात रिसॉर्ट्स पण आहेत

चारु राऊत's picture

20 Oct 2019 - 11:03 am | चारु राऊत

आमच्या वरसोलि गावाचा किनारा पण छान आहे अलिबाग पासून1 किलोमीटर दूर आहे गावात रिसॉर्ट्स पण आहेत

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2019 - 4:57 pm | चौथा कोनाडा

+१
वरसोली खुपच छान आहे, आवडलं मला.