बिटकॉईन

मारकुटे's picture
मारकुटे in काथ्याकूट
27 Dec 2013 - 12:07 pm
गाभा: 

मध्यंतरी बिटकॉईन काय आहे असा धागा काढला होता आणि काही विचारणा केली होती. बहुधा धागा टाकतांना काही चूक झाली असावी म्हणून धागा प्रकाशित झाल्यावर काही काळाने तो अप्रकाशित करण्यात आला. असा धागा गायब झाल्यावर का गायब झाला, अप्रकाशित झाला याची कारणे समजली नाहीत. कूणाला विचारवे ते कळाले नाही. नशीबाचे भोग असे मानून स्वस्थ बसलो.

दुसर्‍या कूणीतरी बिटकॉईनवर लेखन सुरु केले होते. ते सुद्धा मनसेच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे थंडावलेले दिसते. बिटकॉईनवर इंग्रजीत बरंच काहीतरी लेखन सापडते पण नक्की मुद्दे क्लिअर होत नाहीत. असो.

हे सर्व सांगायचं कारण 'बिटकॉइन' चलनापासून सावध रहा! असा आरबीआयने दिलेला इशारा.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/--/articleshow/27994254.cms?

मंड्ळी, आरबीआयने नक्की काय विचार करुन हा इशारा दिला असावा? बिटकॉईन हा काही भयानक प्रकार आहे का? नक्की काय आहे हे सर्व त्रांगड?

प्रतिक्रिया

हो... मध्यंतरी बिटकॉइन बद्धल वाचल होत खरं... म्हणे सध्या त्याची चलती असुन भाववाढ झाली आहे.
अजुन या बद्धल वाचायला वेळ मिळाला नाही,इथे कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी भर टाकावी.

प्रसाद भागवत's picture

27 Dec 2013 - 12:56 pm | प्रसाद भागवत

होय, मीच मध्यंतरी या विषयावर लिहिले होते, मात्र व्यस्ततेमुळे पुढील भाग लिहावयाचा राहिला. क्षमस्व. लवकरच तो पुर्ण होईल असे पहातो.

लोकसत्ता मधे आज बिटकॉईन बद्द्ल दोन लेख आले आहेत लिन्क देत आहे

१) http://www.loksatta.com/vishesh-news/bitcoin-a-different-currency-323058...

२)http://www.loksatta.com/vishesh-news/bitcoin-currency-323057/?nopagi=1

प्रसाद भागवत's picture

1 Jan 2014 - 11:31 am | प्रसाद भागवत

धन्यवाद, छान माहिती मला पुढील लेखनांतुन सांगावयाचे बहुसंख्य मुद्दे या लेखांत समाविष्ट आहेत तेंव्हा माझे काम वाचले.