पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस सहावा

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in भटकंती
26 Dec 2013 - 5:11 pm

आज पटटायाला बाय बाय करुन मेन सीटि आणि टुर मधला शेवटचा थांबा बँकॉक कडे प्रयाण करायचं होतं. ड्रायव्हर दुपारी १२:३० ला येणार होता. ब्रेकफास्ट करता करता कळलं कि पट्टाया बीच ईबीस हॉटेलच्या पाठिच आहे. मग काय चेक आउट करुन बॅगा रीसेप्शन काउंटरवर ठेवल्या आणि आम्हि उरलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठि बाहेर पडलो.

१. जाता जाता हॉटेलच्या आवारात आणि थोडि आजुबाजुची फोटोग्राफि केली

1.1

1.2

1.3

२. अहाहा परत एकदा ते नीतळ पाणि दृष्टिस पडलं. नजर गेली तो वरती पॅरॅसेलींगच्या छत्र्या घिरटया घालत होत्या ते पाहिल्यावर पुखेत मधला अनुभव ताजा झाला. बीचचा परीसर नेहमीच भुरळ पाडतो.

2.1

2.2

2.3

2.4

३. तसा हा रस्ता साधारण ४-५ कि.मी. चा पट्टा जो बीचच्या कडेकडेनी होउन जातो. ह्या पट्ट्याला "सॅमसंग वॉकिंग स्ट्रीट" म्हणतात. जस जस पुढे जाउ तशी दुतर्फा विक्रिची दुकानं, थाई मसाज पार्लस, कॅसीनोज/बार लागत जातात. एकवेळ आपल्याकडचे पैसे संपतील पण कॅसीनोज/बार काहि कमी होणार नाहित. थाई लोकं आहेत मात्र कष्टाळु. बार म्हणा, स्वःताचे छोटे छोटे व्यवसाय म्हणा पुरुषांबरोबर बायकाहि तितक्याच अग्रेसर दिसल्या. पट्टाया मधे आल्यावर पहिल्या दिवशी जे नुसतेच उंडारलो त्यापेक्षा ईथे चक्कर टाकली असती तरं.......असो हळहळण्याशीवाय आम्हि काहिच करु शकत नव्हतो.

3.1

४. नाईटलाईफ हिच लाईफ लाईन असल्यामुळे दिवसा सगळ्या बार मधे शुकशुकाट होता

4.3

4.1

4.2

५. रस्ता जीथे संपतो तीथुन अजुन पुढे पार वर पर्यत जाता येतं. वरुन पट्टाया बीच आणि त्याचा परीसराचं मोठं विहंगम दृष्य दिसतं. चालत जाण्यायेवढा वेळ हातात नव्हता म्हणुन एक टुकटुक (थाई रीक्षा) भाडयावर घेतली. सगळं फिरुन झाल्यावर ड्रायवर आम्हाला परत हॉटेलवर सोडणार होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गर्द झाडितुन माग काढत आम्हि वर पोहचलो. वरती गेल्यानंतरच दृष्य मात्र देखण्यालायक होतं.

5.1

5.2

5.3

5.4

5.5

5.6

5.7

5.8

5.9

६. सगळं नजरेत साठवत पटटाया सीटिचा निरोप घेतला आणि आम्हि बँकॉक कडे प्रस्थान केलं

6.1

७. तशी ईबीस ची हॉटेल्स ऑल ओवर बँकॉक मधे अगदि मोक्याच्या ठिकाणी आहेत. पुर्ण टुरभर सतत ह्या ना त्या रुपात आमचा पाण्याशी संर्पर्क येत होता. खर तरं ईबीस बँकॉकचं हे हॉटेल त्याच्या लोकेशनमुळेच आम्हि सीलेक्ट केलेलं होतं. "छाओप्राया" नदिकाठि वसलेल्या ह्या हॉटेलात सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं डिनर घेताना एक वेगळाच आनंद लाभत होता. दुसर्‍या दिवशी तर डिनर घेताना मस्त रीमझीम पाउस पडत होता. वातावरण ईतकं धुंद होत कि आम्हि दोघं ते सुख, तो निवांतपणा अनुभवत होतो. बर्‍याच गत गोष्टिंना उजाळा मिळाला. शाळेत एकत्र केलेल्या खोड्या/मजा आठवली. सगळ्या चिंता, काळज्या सोडुन बीयरचे घुटके घेत पाउस अनुभवत होतो. तृप्त मनाने डोळे मिटले (कायमचे नाहि बरं). दुसर्‍या दिवशी टेंपल टुर करायची होती.

8.1

8.2

8.3

8.4

8.5

8.5

8.6

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2013 - 1:43 am | डॉ सुहास म्हात्रे

आता सहल रंगत चाललिय. फोटोही मस्त आहेत.

अजया's picture

28 Dec 2013 - 8:45 am | अजया

बँकॉक कधीही कंटाळा न आणणारं शहर आहे.तिथला ट्रॅफीक सोडून! प्रत्येकाला आवडण्यासारखं काहितरी तिथे आहेच.