आलि का मेट्रो ? म्हन्जे या नविन वर्शि तरि येइल का ? कि आपलि बोलाचि कढि आणी बोलिचाच भात ....या मेट्रो पाइ आम्हि मुंबईकराणी किति खास्ता खल्या , ते आंमचे आम्हाला ठाऊक , मुख्यंमंत्रि लाख झेंडा हलऊन जातात, दर वेळी पेपरात फोटो पण येतो छापुन ( हसरा फोटो येतो बर का ) पण ति मेट्रो बया काहि चालु होत नाहि....त्या मेट्रो रेल्वेच्या बांधकाम मजदुराणी जेव्हढा घांम गाळला नसेल तेवढा घाम बेस्टच्या ३४० क्रमंकाच्य प्रवाशि मंडळीनि गाळला आसेल आनि अजुनहि गाळत आहेत. ३४० बस म्हन्जे घाटकोपर ते अंधेरि प्रवासाचे एक -मेव सुलभ साधन. ( जे लोक घाटकोपर ते कर्जत/कसारा पट्यात रहातात त्यान्च्या साठि, आता अंदाज लावा किति प्रवासि ते ) या मेट्रोने घाटकोपर ते अंधेरि मार्गि आसा अढतळा निर्माण करुन ठेवला कि घाटकोपर ते साकिनाका प्रवासाला जिथे पुर्वि ७ मिनिट लागत होते तिथे सकाळच्या वेळी ४५ ते ५० मिनिट खर्चि पडू लागले, संध्याकाळी विचारु नका, हापिसातुन घरि जावेसे वाटायचे नाहि , आश्या तंडुबं बस भरुन येत आसत, हल्लि पाप केले तर बप्पा कान नाहि कापत घाटकोपर ते मरोळ /अंधेरि पट्यात नोकरि मिळऊन देतो, आणी म्हन्तो भोग आता आपल्या कर्माचि फळे, सकाळी बसचि रांग भारत केफे ते थेट झुनझन- वाला कोलेजला टेकते...संध्याकाळी येताना तर रांगच नस्ते, हापिसात दिवसभर काम कारुन ( आम्हि करतो हो ) संध्याकाळी ऊरलि- सुरलि ताकत या बसच्या चरणी वहायचि . साकिनाका सिग्न्ल विचारु नका , त्यचे वेगळे वर्णन करावे लागेल,( ''तेरि मां का, साकि -नाका '' हा वाकप्रचार कुठे उगम पावला असेल यंचि काल्पना वाचकाना आलिच आसेल ) आनि पोत्यतले सारे दयणीय श्ब्द खर्चि घालावे लागतिल, हे सारे या मेट्रो पाइ. आता आनखि आसवे गाळत बसत नाहि , जमेचि बाजु तेवढि सांगतो, या ३४० क्रं बसच्या रांगेत , आनेक जोड्प्याचि मने मात्र जुळुन आलि आहेत, आनेकंचि मांडवा पंर्यत सुध्दा गेलि आहेत. तसा मि या नरख यातनेतुन आता शाप मुक्त झालो आहे, ( प्रवासाचे म्हनत आहे मि , लग्नाचे नाहि ) पण मनातलि धास्ति आजुन जात नाहि ... पुढे -मागे मेट्रो माई चालु झाल्या कि आंम्हि मोकळे अभिमानाने सांगायला ''मि सुध्दा घाम गाळला आहे या मेट्रो साठि..............
( लेखनाच पहिला प्रय्तन )
प्रतिक्रिया
24 Dec 2013 - 7:10 am | बहुगुणी
खरंच पहिला प्रयत्न असेल तर छोटेखानी लेख खुसखुषीत झाला आहे (फक्त ते शुद्धलेखनाचं तेवढं बघा जमलं तर :-) चांगल्या वाचनाच्या प्रवाहात बरेच भोवरे आले आहेत!)
24 Dec 2013 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा
@तसा मि या नरख यातनेतुन आता शाप मुक्त झालो आहे, ( प्रवासाचे म्हनत आहे मि , लग्नाचे नाहि )>>> =))
24 Dec 2013 - 11:33 am | परिंदा
हे मेट्रोचे काम सुरु व्हायच्या आधी अंधेरी-घाटकोपर प्रवासाला ७ मिनीटे लागत होती? मेट्रोचे काम सुरु व्हायच्या आधीच अंधेरी स्टेशन ते सीप्झ या प्रवासाला ३०-४५ मिनीटे लागायची.
मेट्रोचे काम सुरु होऊन त्यात अजुनच भर पडली हे मात्र खरेच!
24 Dec 2013 - 5:29 pm | अनिरुद्ध प
लेख नीट वाचा त्यानी घाट्कोपर-साकिनाका असा प्रवास म्हटला आहे,अन्धेरी -घाटकोपर असा नाही.
24 Dec 2013 - 1:19 pm | जेपी
आवडेश . पुलेशु .
24 Dec 2013 - 1:35 pm | तिमा
मेट्रो झाली तरी बाजूचे रस्ते तसेच रहाणार आहेत, ओबडधोबड आणि वेड्यावाकड्या पेव्हर ब्लॉक्सचे! त्यामुळे बस प्रवास तेवढाच किंवा जास्त वेळ घेणार! फक्त मेट्रोनेच गेले तर सात मिनिटांत पोचणार!
24 Dec 2013 - 2:20 pm | मृत्युन्जय
हाहाहा. छान लिहिले आहे. पहिलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखनाबद्दल काही बोलत नाही. एवढे लिहिण्यासाठी पण किती त्रास झाला असेल त्याची कल्पना आहे. :) पुलेशु.
24 Dec 2013 - 5:44 pm | बॅटमॅन
च्यायला..मला वाटलं पुणे मेट्रो नामक मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ आहे त्याबद्दल आहे की काय. असो. मुंबैत आज ना उद्या येईलच मेट्रो.
24 Dec 2013 - 8:10 pm | सूड
>>हल्लि पाप केले तर बप्पा कान नाहि कापत घाटकोपर ते मरोळ /अंधेरि पट्यात नोकरि मिळऊन देतो
सहमत !! फक्त हे मेट्रोचं खोदकाम नुकतं सुरु झालं आणि आम्ही पुणं गाठलं.
(तब्बल दोन अडीच वर्ष ३४० चा प्रवासी)
29 Dec 2013 - 3:00 pm | उद्दाम
आमी सुद्धा ३४० पाहिले. मग त्यापेक्षा कांजुरमार्गावरुन ३९८, ४२५ वगैरे जास्त बरे वाटले. :)
9 Jun 2014 - 11:42 am | देव मासा
आली एकदाची , आज आनंदी आनंद झाला