छायाचित्र परिक्षण - २

सूर्य's picture
सूर्य in काथ्याकूट
20 Jul 2008 - 8:13 pm
गाभा: 

मँगलोरहुन उडुपीला जाताना सुरतकल येथे एन.आय.टी.के नावाचे कॉलेज आहे. कॉलेज कॅम्पसचा भाग म्हणुन एक बीच आहे. (इथे शिकलो असतो तर किती बरे झाले असते ;) ). उडुपीहुन परत मॅगलोरला येताना संध्याकाळ्च्या सुमारास इथे थांबुन सुर्यास्त बघण्याचा योग आला. कॅमेराचा उपयोग करण्याची संधी मी सोडली नाही. त्यापैकीच एक चित्र इथे ड्कवीत आहे. जरुर परिक्षण करा.

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

20 Jul 2008 - 8:16 pm | प्रियाली

तुम्ही आमच्या गावी काय करत होता बॉ? फोटो मात्र सुरेख.

- प्रियाली उडुपीकर

सूर्याचे आणखी एक चित्र

DSC01091

सूर्य's picture

21 Jul 2008 - 8:04 am | सूर्य

अरे वा!! तुम्ही उडुपीकर का.. तुमचे गाव फार छान आहे बरे का. आम्ही तिथे सेंट मेरिज आयलँड बघायला गेलो होतो. तुम्ही डकवलेले चित्र सुद्धा छान आहे.

-सूर्य

प्रमोद देव's picture

20 Jul 2008 - 8:19 pm | प्रमोद देव

सुंदर!!!!!!!!!
(स्वगत)सूर्याने स्वतःचेच छायाचित्र कसे काढले असेल बॉ? :?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सूर्य's picture

21 Jul 2008 - 8:09 am | सूर्य

धन्यवाद प्रमोदकाका.

- सूर्य.

शितल's picture

20 Jul 2008 - 8:19 pm | शितल

खुप खुप सु॑दर असे वाटते मस्त किनार्‍यावर बसुन सुर्यास्त पहावा.

सूर्य's picture

21 Jul 2008 - 8:11 am | सूर्य

धन्यवाद शितलताई. अजुन काही अशी चित्रे मि.पा. वर चढवीनच.

-सूर्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मावळत्या दिनकराचे दोन्हीही फोटो सुंदर आहेत.

सूर्याने स्वतःचेच छायाचित्र कसे काढले असेल बॉ?

सहमत आहे, एक सुर्य दुस-या सुर्याचा फोटो काढतो, अप्रतिम कल्पना आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(सुर्याचा मित्र )

सूर्य's picture

21 Jul 2008 - 8:12 am | सूर्य

धन्यवाद सर.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 8:15 am | विसोबा खेचर

केवळ अप्रतीम फोटो..! क्लासच!

तूर्तास तरी अनुष्काच्या फोटूला रजा देऊन आम्ही हाच फोटू आमच्या संगणकावर वॉलपेपर म्हणून लावला आहे! :)

तात्या.

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:42 pm | सूर्य

तात्या, तुम्ही अनुष्काच्या फोटोला रजा देउन हा फोटो लावला हे आमचे भाग्यच. ही आम्हाला मिळालेली जबरदस्त दाद आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

- सूर्य.

रविराज's picture

21 Jul 2008 - 8:17 am | रविराज

एवढी छान छायाचित्रे तुम्ही कशी काय टिपता राव!
तुम्ही टिपलेली अजुन काही चित्रे पहायला आवडतील!!

रविराज

अमित.कुलकर्णी's picture

21 Jul 2008 - 10:41 pm | अमित.कुलकर्णी

असेच म्हणतो.
तुमच्या बाकीच्या फोटोंसारखच हा ही अतिशय सुंदर फोटो आहे.

-अमित

सूर्य's picture

22 Jul 2008 - 7:35 am | सूर्य

अमित आणि रवी दोघांनाही धन्यवाद ;)

प्राजु's picture

21 Jul 2008 - 8:21 am | प्राजु

अतिशय सुंदर आहे हे चित्र... मावळणारा सूर्य मनाला वेड लावतो. ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

21 Jul 2008 - 8:21 am | यशोधरा

सूर्य, तुम्ही टिपलेला सूर्यास्त अतिशय आवडला. किरमिजी, धूसर सायंकाल सुरेख!

सहज's picture

21 Jul 2008 - 8:33 am | सहज

किनारा, समुद्र वरुन नजर बरोबर त्या मावळत्या सुर्यावर जाउन खिळते.

फोटो आवडला.

ध्रुव's picture

21 Jul 2008 - 9:31 am | ध्रुव

छायाचित्र सुरेखच आहे. पण सुर्यास्ताच्या गुलाबी/लाल छटा अजून आल्या असत्या तर जास्त आवडले असते
चित्राला शोभेल अशी चौकट छान दिसेल.

अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ)...
--
ध्रुव

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:44 pm | सूर्य

अवांतरः छायाचित्र परिक्षणाला देताना छायाचित्राची सगळी माहिती दिलीत तर आवडेल. उदा. कॅमेरा, त्याची सेटींग्स वगैरे (एक्सिफ)..

या पुढच्या चित्रांना नक्की ही माहीती देइन.

- सूर्य.

झकासराव's picture

21 Jul 2008 - 10:17 am | झकासराव

प्रकाशचित्र आवडल. :)
प्रमोद काकानी केलेली नावाची गम्मत देखील छान.
अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती. रिजन इन्जिनिअरीन्ग कॉलेज चे नाव बदलुन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी झाले आहे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:47 pm | सूर्य

अवांतर : सुर्यराव तिथे शिकायच होत तर तुम्हाला त्यांची बहुद्धा वेगळी प्रवेश परिक्षा असेल ती द्यावी लागली असती.....

हो ना.. तिथेच तर आमचे घोडं मार खातं ;)

श्रीमंत दामोदर पंत's picture

21 Jul 2008 - 11:18 am | श्रीमंत दामोदर पंत

केवळ अप्रतीम फोटो आहे..................
आजुन असतील तर मि.पा.वर चढवा ना राव............

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:49 pm | सूर्य

हो.. अजुन आहेत ना. सगळी इथे चढवणार आहेच. आणि नवीन काढल्यानंतर आधी मि.पा. वर चढवुन मगच ब्लॉग वर चढवण्याचा मानस आहे.

- सूर्य.

मनस्वी's picture

21 Jul 2008 - 1:52 pm | मनस्वी

छान चित्र आहे सूर्या सुर्यास्ताचं.. पण १ च का टाकलेस?

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सूर्य's picture

21 Jul 2008 - 4:49 pm | सूर्य

अजुन पोस्ट करतो लवकरच.

धमाल मुलगा's picture

21 Jul 2008 - 2:03 pm | धमाल मुलगा

वाह ! क्या बात है!

केवळ अप्रतिम!
बाकी, आमच्या सुर्यरावांचा हा तिसरा डोळा नेहमीच कमाल करत असतो.
एकापेक्षा एक झक्कास फोटु टिपत फिरतात सुर्यराव.

सुर्यास्तावेळची ही निसर्गाची रंगपंचमी केवळ अवर्णनिय.

सुंदर. सुर्या, आणखी फोटो येऊदे :)

सूर्य's picture

21 Jul 2008 - 4:50 pm | सूर्य

धन्यवाद धमाल.

सुंदर. सुर्या, आणखी फोटो येऊदे

जरुर.

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 12:39 am | चतुरंग

चित्रात डावीकडे तो काळ्या लाटेचा पॅच आलाय ना त्यामुळे नजर सूर्यबिंबावर न ठरता डावीकडे ओढली जाते आहे.
चित्र तिकडून थोडे क्रॉप केले आणि तो लाटेचा भाग काढला तर कसे वाटेल?
(माझ्याकडे फोटॉशॉप नाही त्यामुळे मी काही खेळ करु शकत नाही)

चतुरंग

सूर्य's picture

22 Jul 2008 - 12:58 pm | सूर्य

डावीकडे काळा भाग आहे जरा. ब्राईट केल्यावर प्रकाशाचा भाग खुपच ब्राईट दिसत होता म्हणुन तसेच ठेवले. क्रॉप करुन सुद्धा चित्र थोडे वेगळे आणि चांगले दिसेल. इथे किनार्‍यापासुनचा भाग दिसावा म्हणुन तसेच ठेवले आहे.

- सूर्य.

कोलबेर's picture

22 Jul 2008 - 5:29 am | कोलबेर

सूर्यराव, मस्त चित्र.
थोडासा काँट्रास्ट कमी वाटल्याने थोडासा वाढवुन आणि चौकट टाकुन पुन्हा देत आहे.

- कोलबेर

ध्रुव's picture

22 Jul 2008 - 9:57 am | ध्रुव

+१
हे जास्त आवडलं
--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 10:26 am | विसोबा खेचर

तू कॉन्ट्रास्टबाबत जो बदल केलास तो मला आवडला परंतु त्या काळ्या चौकटीमुळे मूळ चित्राची शोभा नाहीशी झाली आहे
असं माझं मत आहे...

तात्या.

सूर्य's picture

22 Jul 2008 - 12:49 pm | सूर्य

धन्यवाद वरुण. तुम्ही केलेल्या बदलामुळे रंग उठुन दिसतायत. मी सुद्धा आता जिम्प किंवा फोटोशॉप डाउनलोड करावे म्हणतो.

- सूर्य.

मदनबाण's picture

25 Jul 2008 - 10:23 am | मदनबाण

सॉलिड आहे रे भाऊ ,,मस्तच टिपलाय..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda