गाभा:
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-de...
वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते . काही वर्षापूर्वी भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी आठवां …
अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा?
प्रतिक्रिया
20 Dec 2013 - 7:14 am | मारकुटे
हेच अल्पसंख्य समुदायाने केले की कौतुक केले जाते
उदा मांसाहारी नकोत परिसरात कत्तलखाने नकोत वगैरे इत्यादी
20 Dec 2013 - 11:14 am | अर्धवटराव
लोकांना मिळुन मिसळुन राहण्याचा चान्स नाहि मिळाला तर ते एकमेकांचे सुख-दु:ख शेअर कसे करतील? संवाद साधायला, एकमेकांना समजुन घ्यायला सोबत राहणं आवश्यक आहे ना? विशिष्ट सामुदायीक कॉलनी तयार होण्याचे दुरगामी परिणाम भयंकर असतील ना...
20 Dec 2013 - 1:32 pm | उद्दाम
इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते .
नेमक्या कोणकोणत्या मुहल्ल्यात कधीकधी त्रास झाला तुम्हाला, याची यादी दिलीत तर बरे होईल.
आम्ही तर आजवर अशा मोहल्ल्यातच अधिक सुखाने जगलो आहोत. पुढेही जगणार आहोत.
संपादित
21 Dec 2013 - 8:54 pm | ग्रेटथिन्कर
मुस्लिमच कशाला ,दलित, आदिवासी, ओबिसी सर्वांनाच असा विरोध केला जातो, जो चूकीचा आहे.
आमच्या गावामध्ये ब्राह्मण आळीत जूने वाडे पाडून रीडेव्हलपमेंट केल्यानंतर तिथे फक्त ब्राह्मणांनीच फ्लॅट घ्यायचे असा अलिखित नियमच आहे काही अपवाद आहेत नारायण पेठ, सदाशिवात झालेल्या अपार्टमेंट्सच्या सदस्यांची नावे बघा लक्षात येईल..
मराठ्याची शेती फक्त मराठ्याला, माळ्याची शेती माळ्यालाच विकायची, असाही अट्टाहास असतो...
जैन मारवाडी शाकाहारी/ मांसाहारी असे डीस्क्रीमीनेट करतातच..
मुस्लिमांना मात्र याचा जास्त त्रास होतो...
यावर उपाय ऐकच प्रत्येक विकसकाला ठराविक फ्लॅट्स सोडत (लॉटरी) पद्धतीने एलॉट करायला लावायचे, तेही समाज कल्याण खात्याच्या निरीक्षकासमोर ...हाच यावर उपाय आहे.
22 Dec 2013 - 3:59 pm | सचीन
अहो अशा फालतू मेण्टालिटी मुळेच आपल्या देशात आरक्षणाची पाळी आली. आणि जे आरक्षण मिळतेय ते हि बऱ्याच जणांना पटत नाही . घटना कारांनी घोडचुका केल्यात म्हणतात काही विद्वान.
23 Dec 2013 - 9:43 pm | सचीन
लोकांच्या मागासलेल्या विचारांमुळे मुळे आता ह्या क्षेत्रात हि आरक्षण आणले गेले पाहिजे.
21 Dec 2013 - 11:24 pm | बाळकराम
मंदार कात्रे, तुम्ही हा विनोदाने लेख लिहिला आहे अशी आशा करतो. नाहीतर, हे असले विचार घातकी आणि आमच्या सारख्या सुजाण हिंदूना लाज आणणारे आहेत. "मुस्लिम नकोत", "हिंदू नकोत" वा इतर कोणी नकोत अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनिटिव्ह जाहिराती तुम्हाला गुन्हा वाटत नसतील तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या डोक्यावर इलाज करुन घ्यावा. ६०-७० वर्षापूर्वीपर्यंत "डॉग्ज अँड इंडियन्स नॉट अलॉऊड" असे अपमानास्पद फलक भारतात दिसत असत. ते जेव्हढे अपमानास्पद तेव्हा वाटत होते त्यापेक्षाही हे जास्त वाटतील कारण हे फलक (वा जाहिराती) हे आपल्याच लोका नी लिहिलेले आहेत. तुमच्या सारख्या शिकलेल्यांना संस्कृती शिकवायची गरज पडणं हे आजच्या भारताचं दुर्दैव! तुमचा मुस्लिमांचा (वा मुस्लिम दहशतवाद्यांचा) तिरस्कार एका मर्यादेपर्यंत जरूर समजू शकतो पण या तर्हेचा घाऊक तिरस्कार मात्र अनाकलनीय आहे. तुम्हाला शुभेच्छा, लवकर बरे व्हा!
21 Dec 2013 - 11:34 pm | आनंदी गोपाळ
+ कितीही :)
22 Dec 2013 - 3:36 am | राजेश घासकडवी
अरे देवा! असे बुरसटलेले, भेदभावाची तळी उचलून धरणारे विचार अजून सुशिक्षितांकडून मांडले जातात! धन्य आहे.
आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं समजून घेता येतं. पण इतर धर्मियांचा इतका घाऊक पातळीवर तिरस्कार? हिटलरने आपल्याच देशातल्या ज्यूंना जी वागणूक दिली त्याची आठवण होते. 'अस्पृश्यांच्या सावलीनेही विटाळ होतो' वगैरे विचारसरणी याच जातकुळीची!
गेट वेल सून.
22 Dec 2013 - 3:38 am | राजेश घासकडवी
गैरसमज होऊ नयेत म्हणून - माझ्या वरील प्रतिसादातील +१ हे बाळकराम यांना आहे, आणि गेट वेल सून हा भाग धागाकर्त्यांसाठी आहे.
30 Dec 2013 - 10:03 am | मंदार कात्रे
हेच अल्पसंख्य समुदायाने केले की कौतुक केले जाते
22 Dec 2013 - 4:01 pm | सचीन
हा आजार बरा होणारा नाही
30 Dec 2013 - 10:02 am | मंदार कात्रे
सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते . काही वर्षापूर्वी भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी आठवां …
22 Dec 2013 - 12:35 am | काळा पहाड
बाळकराम, लवकर प्रौढ व्हा. आणि ते डोळे जरा उघडा. पोपटपंची ला हे सगळं ठीक आहे, पण सुदान ते फिलिपाईन्स मध्ये काय चाललंय हे जरा पेपर विकत घेवून वाचत जा. आणि स्वत्:च्या पैशाने विकत घेवून वाचा. काँग्रेस कडून मिळणार्या पगारात नव्हे.
22 Dec 2013 - 2:21 am | बाळकराम
तुम्हाला सुद्धा शुभेच्छा! लगेच "पोपटपंची" वगैरे दिवे पाजळून तुम्हाला कशाची गरज आहे ते तुम्ही दाखवून दिलंच आहे. पण तरी तुम्ही म्हणता आहात तर पेपर विकत घेऊन वाचतोच आता! नाहीतरी आम्हा अडाण्यांना काय कळतं यातलं? आम्ही आपले इंग्लंड- अमेरिका अशा मागासलेल्या भागात राहातो- इकडे कशाला येतोय पेपर-बिपर आणि काय? ( बाकी एक कळलं नाही- सुदान- फिलिपाईन्स भागात घडणार्या गोष्टींचा संबंध पुण्या-मुंबईत "नो मुस्लिम्स" अशा जाहिरातीशी कसा काय लागतो ते ब्रम्हज्ञान आम्हा अडाण्यांना जरा पाजाल काय?)
23 Dec 2013 - 12:17 am | काळा पहाड
संपादित
सदस्यांनी जे काही मुद्दे मांदायचे असतील ते कृपया वयक्तिक पातळीवर न उतरता मांडावेत.
फुकटात सेक्युलरवाद्यांना पोसायला "इंग्लंड- अमेरिका" म्हणजे भारत नव्हे,
22 Dec 2013 - 12:41 am | ग्रेटथिन्कर
भारत म्हणजे सुदान आणि फिलिपाईन्स नव्हे, इथला मुस्लिम हिंदू जैन आधी भारतीय असतो...
22 Dec 2013 - 8:37 am | हुप्प्या
मक्का आणि मदिना ह्या दोन्ही शहरात बिगरमुस्लिमांना पाऊलही ठेवायला बंदी आहे. तसे कुणी केले तर शिरच्छेदाची शिक्षा आहे. बिगरमुस्लिम लोक जर ह्या शहरात पाऊल ठेवते झाले तर त्या पवित्र जागांवर विटाळ होतो असा इस्लामचा आदेश आहे. आणि तो जगभराचे मुस्लिम शिरोधार्य मानतात. अगदी भारतातलेही. ही दोन्ही स्थाने निर्विवादपणे मुस्लिमांची सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्रे आहेत. प्रत्येक धार्मिक मुस्लिम ह्या जागांची यात्रा करणे हे आपले कर्तव्य मानतो. परंतु ह्या बंधनाविरुद्ध कुणीही बोलत नाही. उलट त्याचे समर्थनच करतात. त्या गावातील प्रार्थनास्थळापुरते बंधन असते तर एक वेळ समजले असते. पण पूर्ण गावात असे पावित्र्यरक्षण करणे अनाकलनीय आहे. एखादा हिंदू वा ख्रिस्ती त्या शहरात समजा गवंडी काम करुन गेला तर नक्की कसला विटाळ होतो बरे? नाही तेव्हा समानतेचे नगारे बडवणारे इथे असा भेदभाव का करतात बरे?
भारत अरब देशांना नोकर पुरवतो. मोलमजूरी करणार्यांपासून गवंडी, सुतार, तेलक्षेत्रातले कामगार तसेच संगणक तज्ञ आणि विविध क्षेत्रातले अभियंते भारतातून नोकरी करायला अरबी देशात जातात. अनेक वर्तमानपत्रात त्या नोकर्यांच्या जाहिराती येतात. जेव्हा मक्का मदिना शहरातल्या नोकरीची जाहिरात असते तेव्हा "केवळ मुस्लिमांनीच ह्या नोकरीकरता अर्ज द्यावेत" अशी ठळक तळटीप असते. आणि तशी तळटीप ह्या भारतातील वर्तमानपत्रात देण्यात कुणालाही गैर वाटत नाही. त्यावर बंदी घालावी अशी मागणी होत नाही. मग मुस्लिम नको अशी जाहिरात दिली तर ते का खटकावे?
22 Dec 2013 - 9:04 am | माझीही शॅम्पेन
अगदी नेमकी प्रतिक्रिया बाकीचे सर्व धर्म आपले हित जपण्यात मग्न असताना हिन्दुनी वेगळ ते काय कराव ?
इथे सर्व धर्म समान आहेत इत्यादी फंडे मांडण्यारनी स्वता:च्या मुली आणि आणि बहिणी अल्प-साख्यंक समुदायात करायची ठरवली तर चालेल का हेही स्पष्ट कराव
(अ-पुरोगामी) शॅम्पेन
22 Dec 2013 - 10:41 am | राजेश घासकडवी
वा वा, आपण सौदी अरेबियाचा आदर्श बाळगावा का? किती खाली घसरावं म्हणायचं याला? सौदीमध्ये त्यांना वाट्टेल तो गोंधळ घालू देत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातल्या बुद्ध मूर्ती पाडल्या, म्हणून आपल्यालाही चर्च पाडायची परवानगी हवी म्हणून हट्ट धरणार का तुम्ही? काहीतरीच बुवा तुमचं.
The Constitution declares India to be a sovereign, socialist, secular, democratic republic, assuring its citizens of justice, equality, and liberty, and endeavors to promote fraternity among them.
22 Dec 2013 - 11:34 pm | हुप्प्या
सौदी अरेबियाचा आदर्श आपण ठेवावा असा मूर्खपणाचा दावा मी दूरान्वयानेदेखील केलेला नाही. तो महान निष्कर्ष आपण काढला आहे.
मुद्दा असा आहे की भारताने देशातील वर्तमानपत्रात अशा वंशभेदी जाहिराती देणे कसे चालते? त्याची पार्श्वभूमी म्हणून मी तिथले नियम सांगितले.
जेव्हा दक्षिण अफ्रिकेत गोरे वंशद्वेष्टे राज्य करत होते तेव्हा भारताने अशी भूमिका घेतली नाही की त्यांना त्या देशात जो घोळ घालायचा तो घालू द्या. उलट दक्षिण अफ्रिकेतल्या मालावर, अन्य उत्पादनांवर बहिष्कार घातला.
निव्वळ मुस्लिमांनीच अर्ज द्यावेत अशा जाहिरातींवर बंदी का नाही घातली ? भारतातील वृत्तपत्रे ही पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. त्यावर सरकारी नियंत्रण असते. मग ह्या बाबतीत ते नियंत्रण का नाही वापरले? हा भेदभाव चालू दिला कारण तथाकथित पुरोगामी लोक अशा भेदभावांकडे काणाडोळा करुन आपले पुरोगामी नाणे कसे खणखणीत वाजते आहे असे जणू सिद्ध करत असतात!
ह्या पार्श्वभूमीवर कुणी मुस्लिम नकोत अशी जाहिरात दिली तर त्याविरुद्ध गळा काढणे दुटप्पीपणाचे आहे.
23 Dec 2013 - 2:40 am | राजेश घासकडवी
सौदी अरेबियात मक्का मदिनेत काम करण्यासाठीच्या सौदी सरकारच्या अटी सांगणं वेगळं आणि भारतात तशा अटी बनवणं वेगळं आहे.
असो. अनेकदा 'ते कसे धर्मांध आहेत बघा, आणि त्यांचा धर्मांधपणा कसा चालवून घेतला जातो. आणि आम्हीच धर्मचकणेपणा केला तर बोल लावतात' वगैरे युक्तिवाद ऐकू येतात. तेच जर चालू ठेवायचे असतील मला त्यात रस नाही. कारण त्यांचं त्यांनी बघावं, आपलं आपण बघू.
तुम्हालाही गेट वेल सून म्हणतो.
या लेखावर अजून प्रतिसाद देण्याची इच्छा नाही कारण इथे भगवा थयथयाट सुरू झालेला आहे हे स्पष्ट आहे. मिपावरती इतर अनेक सुजाण व्यक्तिमत्वं आहेत. ती अशा अतिरेकी, टोकाच्या भूमिकांना तात्त्विक विरोध दाखवण्याचाही प्रयत्न का करत नाहीत कोण जाणे. कदाचित हा थयथयाट त्यांनाही पहावत नसावा.
22 Dec 2013 - 2:20 pm | बाळकराम
सौदी अरेबिया वा तत्सम आखाती देश हे स्वतःला मुस्लिम देश म्हणवतात, त्यामुळे ह्या जाहिराती खटकत नाहीत. भारत हा डिक्लेअर्ड हिंदू राष्ट्र नाही. आणि सौदीने आपल्याच देशात फक्त सुन्नी लोकांना परवानगी, शियांना नाही अशातर्हेच्या जाहिराती दिल्या असतील तर मला सांगा. सौदी लोकांचं काय धोरण आहे याच्याशी आपल्याला काय करायचंय? परदेशी लो़कांमधल्या कुठल्या लोकांना (हिंदू वा मुसलमान) नोकर्या द्यायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. इथे आपण एक भारतीय दुसर्या भारतीयाला त्याच्या धर्मावर आधारित डिस्क्रिमिनेट करतोय त्याच्या बद्दल बोलतोय.
22 Dec 2013 - 4:07 pm | सचीन
आपल्या इथे वधू वर पाहिजे अशा ज्या जाहिराती असतात त्यात सरळ एससी एसटी क्षमस्व असे लिहिले जाते.क्षमस्व तर क्षमस्व पण जाहिरात करण्याची गरजच काय. कदाचित असा समज असावा कि आपण अशा जाहिराती दिल्या तर एससी एसटी लोकांच्या फौजा आमचे स्थळ स्वीकार करा म्हणून आपल्या दाराबाहेर उभ्या राहतील.
30 Dec 2013 - 10:05 am | मंदार कात्रे
+१००
30 Dec 2013 - 10:06 am | मंदार कात्रे
+१०० हुप्प्या जी
22 Dec 2013 - 8:58 am | वामन देशमुख
+१
22 Dec 2013 - 12:25 pm | राजेश घासकडवी
(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/all.js#xfbml=1"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs); }(document, 'script', 'facebook-jssdk'));
Post by Best Vines Online.
22 Dec 2013 - 2:44 pm | llपुण्याचे पेशवेll
जरूर, तो जर लोकसमुदायाचा निर्णय असेल तर लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला (किंवा समूहाला) आपला शेजारी कोण असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असे नक्की वाटते.
अहो कात्रे, भिवंडीमधे मोहल्ल्यात जायला भिती पोलिसांनाच वाटते. आठवा बरे ठेचून मारलेले ३ पोलिस. विचारजंती प्रतिक्रिया सोडून द्या. त्या तशाही दुर्लक्ष करण्याजोग्याच असतात.
22 Dec 2013 - 3:10 pm | बाळकराम
लोकशाही राष्ट्रात प्रत्येकाला (किंवा समूहाला) आपला शेजारी कोण असावा हे निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असे नक्की वाटते.
असं असेल तर मग, मुंबईत शाकाहारी जैन्/गुजराती लो़कांनी उच्चभ्रू वसाहतींत फक्त शाकाहारीच (पक्षी: जैन्/गुजराती) पाहिजेत असं ठरवलं तर मग तुमच्यासारखे लोक का विव्ह्ळत होते मग? आमची मुंबै इ. ?
आणि लोकशाहीत धर्मावर आधारित शेजारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. आपल्या सोईप्रमाणे लोकशाहीची व्याख्या करु नका.
22 Dec 2013 - 5:40 pm | llपुण्याचे पेशवेll
१. हो ना गुजराथी मारवाड्यांनी त्यांच्या गुजराथ, राजस्थानमधे ठरवावे काय ते. इथे आपण्/आम्ही म्हणजे मराठी सत्तधीश. अशावेळी सरकारच्या मतदारांनी सरकारवर दबाव आणून सरकारला हस्तक्षेप करायला लावणे उचित. आणि हो जैन लोक शाकाहारी ब्राम्हणाना घरे विकताना /भाड्याने पाहीले आहे. पूर्वी ब्राम्हणाना देत सरळ सरळ. हल्ली तुम्ही पाळ्ता का असे विचारून देतात. सरकार किंवा यंत्रणेतले लोक त्यात पडत नाहीत कारण या तथाकथित व्यापारीवर्गाकडून त्यांनी निवडणूकीचे वेळेस पैसे काढलेले असतात. :)
आणि लोकशाहीत धर्मावर आधारित शेजारी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. आपल्या सोईप्रमाणे लोकशाहीची व्याख्या करु नका.
हे कोण ठरवणार लोकशाही म्हणजे काय ते? आणि लोकशाहीत लोकांना त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा मान राखला जात नसेल तर ती लोकशाही काय कामाची?
22 Dec 2013 - 6:27 pm | बाळकराम
राजे, तुम्ही आधीच्या प्रतिसादात म्हणता- लोकशाहीत आपला शेजारी निवडण्याचे स्वातंत्र्य हवे आणि इथे म्हणता-
अशावेळी सरकारच्या मतदारांनी सरकारवर दबाव आणून सरकारला हस्तक्षेप करायला लावणे उचित
वदतो व्याघातन्यायाचे उदाहरण इथे चांगले लागू पडते. आधी नीट काय म्हणायचेय ते ठरवा, घाई नाही. :)
हे कोण ठरवणार लोकशाही म्हणजे काय ते? आणि लोकशाहीत लोकांना त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा मान राखला जात नसेल तर ती लोकशाही काय कामाची?
भारतातील लोकशाही कशा प्रकारची असावी हे आधीच ठरलेले आहे- तुम्ही त्यादिवशी वर्गात हजर नव्हतात! :) त्यामुळे, आता इथली लोकशाही तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या सोईची धर्माधिष्ठित लोकशाही जिथे असेल तिथे (म्हण्जे- पाकिस्तान, सोमालिया, नेपाळ, ग्रीस वा इ. ) जाऊन स्थायिक होण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेच, त्याचा जरूर लाभ घ्यावा. पण भारतात राहायचं असेल तर लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या मान्य करण्यावाचून आणि तसे वागण्यावाचून गत्यंतर नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो- हिंदूमहासभेचे अग्रणी नेते, जहाल हिंदुत्ववादी श्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते. तेव्हा, १९४६-१९५० पर्यंतच्या काळात अशाप्रकारची चर्चा झालेली आहे (ती संसदेच्या कागदपत्रात त्याचे मिनट्स स्वरुपात पाहायला उपलब्ध आहे) या साधकबाधक, उलटसुलट चर्चांचे फलस्वरुप म्हणजे आजची घटना आहे. आणि त्यातही वैधानिक मार्गाने बदल करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. तो करायचा असेल तर तुमचे बहुमतातले सरकार निवडून आणा आणि काय ते बदल करा. पण तोपर्यंत आहे ते चालवून घ्या.
22 Dec 2013 - 6:46 pm | llपुण्याचे पेशवेll
वदतो व्याघातन्यायाचे उदाहरण इथे चांगले लागू पडते. आधी नीट काय म्हणायचेय ते ठरवा, घाई नाही. Smile
कदाचित तुम्ही नीट समजून घ्यायचे कष्ट घेत नसाल. सांगायचे ते सोदाहरण स्पष्ट केलेच आहे. पुन्हा वाचा.
सुसंगती अशी आहे की सरकराने गुजराथी मारवाड्यांना समजवाचे कष्ट जसे घेतले नाहीत किंवा हस्तक्षेप केला नाहीब कींवा अन्य कोणी केला नाही तसे केवळ 'मुसलमान' या चित्रात आले म्हणून अन्याय झाला म्हणून गळे काढू नयेत.
भारतातील लोकशाही कशा प्रकारची असावी हे आधीच ठरलेले आहे- तुम्ही त्यादिवशी वर्गात हजर नव्हतात! Smile त्यामुळे, आता इथली लोकशाही तुम्हाला पटत नसेल तर तुमच्या सोईची धर्माधिष्ठित लोकशाही जिथे असेल तिथे (म्हण्जे- पाकिस्तान, सोमालिया, नेपाळ, ग्रीस वा इ. ) जाऊन स्थायिक होण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेच, त्याचा जरूर लाभ घ्यावा. पण भारतात राहायचं असेल तर लोकशाहीची सर्वमान्य व्याख्या मान्य करण्यावाचून आणि तसे वागण्यावाचून गत्यंतर नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो- हिंदूमहासभेचे अग्रणी नेते, जहाल हिंदुत्ववादी श्री श्यामाप्रसाद मुखर्जी हे घटना समितीचे सदस्य होते. तेव्हा, १९४६-१९५० पर्यंतच्या काळात अशाप्रकारची चर्चा झालेली आहे (ती संसदेच्या कागदपत्रात त्याचे मिनट्स स्वरुपात पाहायला उपलब्ध आहे) या साधकबाधक, उलटसुलट चर्चांचे फलस्वरुप म्हणजे आजची घटना आहे. आणि त्यातही वैधानिक मार्गाने बदल करण्याचा मार्ग उपलब्ध आहे. तो करायचा असेल तर तुमचे बहुमतातले सरकार निवडून आणा आणि काय ते बदल करा. पण तोपर्यंत आहे ते चालवून घ्या.
असेल असेल. घटना घटना काय म्हणतात ती परीवर्तनीय पण आहे म्हणे. त्यामुळे संख्याबळावर त्यात हवे ते बदल करताही येतात.
आणि आहे ते चालवून घेतच आहोत. मुसलमानांसारखे बॉम्बस्फोट करून बाबरी बाबरी करत ओरडत नाही सुटत आहोत.
जसे तुम्ही म्हणता की तुमचे सरकार आणा आणि कायदे बदला तसं तुमचे फ्लॅट घ्या आणि द्या मुसलमानांना भाड्याने. दुसर्यानी काय करायचे हे तुम्ही ठरवू नका.
26 Dec 2013 - 12:06 am | विजुभाऊ
ओ पेशवे काका. थोडे समजून घ्या
फक्त शाकाहारी / कांदा लसूण बटाटे वगैरे न खाणारे लोकच सोसायटीत असावे अशाप्रकारचा आग्रह जैन धर्मीय लोकानी ठेवला होता. तुम्ही सर्व गुजराथी/मारवाडी समाज हा जैनच असतो असे का गृहीत धरताय?
गुजराथी / मारवाडी या भाषा आहेत. जैन धर्मीयांमध्ये मराठा जैन देखील येतात हे तुम्हाला माहीत आह का? ( उदा: कर्मवीर भाउराव पाटील हे जैन मराठा होते)
उगाच भाषा आणि धर्माची गल्लत करु नका .महाराष्ट्रात जसे केवळ मराठा नाहीत इतर जातीय धर्मीय देखील आहेत तसेच
गुजराथ किंवा राजस्थान मधे इतर समाज देखील आहे. आणि सर्वच राजस्थानी किंवा गुजराथी व्यापारीच असतात हे चुकीचे गृहीतक सोडून द्या.
26 Dec 2013 - 10:23 am | llपुण्याचे पेशवेll
आले लगीच विजुभाऊ. अहो, एका मराठी संस्थळाचा मालक जैनच असून मराठा जैन आहे हे आम्हाला चांगले माहीत आहे. हल्लीच तो जैन-पाटील आडनाव लावू लागला आहे. ;-)
जैनांच्या डायरेक्ट जाहीराती असतात पेप्रात 'केवळ जैन बांधवांसाठी म्हणून' मुंबईच नाही तर पुण्यातही असतात. सकाळसारख्या पेपरातही पाहीलेल्या आहेत मी स्ततः.
मुंबईतला प्रकार केवळ जैन लोकांनी दिलेल्या जाहीरातींमुळे नव्हता त्यात गुजराथी शाकाहारी कुटुंबही होती नक्कीच हे त्यावेळे त्या गोष्टीचा विरोध करणार्या शिवसेनेच्या तेव्हाच्या सभासदाकडून मी कन्फर्म देखील केले होते. तेव्हा ९२ च्या दंगलीत आम्ही तुमची दुकानं वाचवली आणि तुम्ही आता आमच्या लोकांना विरोध करतांय? असा प्रतियुक्तिवाद तेव्हाच्या दहिसरमधल्या काही सोसायट्यात लढवला आणि उपयोगातही आला होता.
26 Dec 2013 - 11:18 am | विजुभाऊ
जैन पाटील आडनाव तो लग्नानंतर लावु लागलाय.
सगळे गुजराथी " दुकानदार"च असतात. हा मात्र तुमचा अजूनही ठाम समज दिसतोय. असो.....
26 Dec 2013 - 12:06 pm | llपुण्याचे पेशवेll
तो सोडला तर अन्य अनेक जैन पाटील कोल्हापूर भागात दिसतील. महाराष्ट्राच्या अन्य भागात अनेक अपाटील मराठी जैन दिसतील.
स्पष्ट लिहीलेले असूनही समजून न घेण्याची केस इथे स्पष्ट दिसते आहे. असो. बरे व्हा लवकर. किंवा बरे होण्यासाठी फोन करा माझा नंबर तुमच्याजवळ आहेच.
22 Dec 2013 - 5:11 pm | पिंपातला उंदीर
अशी विचार रत्न गोळा करण्यासाठी तर आपण आंतर जालावर येत असतो . अशी विचार मौक्तिक वाचली की आयुष्याच सार्थक झाल असे वाटते . संपादित
लोकाना काय कळणार की देशसेवेचे व्रत पूर्ण करण्यासाठी आपण यवनी प्रदेशात राहून त्यांनाच शिव्या घालण्याची कामगिरी कशी शिताफीने पूर्ण करत आहात ते . धन्यवाद मंदार कात्रे .
22 Dec 2013 - 5:35 pm | रमेश आठवले
सदनिकांची इमारत किंवा आळी यामध्ये विशिष्ट धर्म नको किंवा जात नको असे घडते हे सत्य आहे. अगदी युरोप मध्ये सुद्धा शहराच्या काही भागात ज्यू धर्माच्या लोकाना राहू देत नसत. त्यांची वेगळ्या भागात वसती असे आणि त्या वसतीला घेटो असे म्हणत असत. ही गोष्ट चांगली नाही पण ती एक जगरहाटी आहे/होती.
आपल्या इथे तर सेक्युलर सरकार असताना काश्मीर मधून जवळ जवळ सर्व हिंदुना अनधिकृत पणे बाहेर काढले गेले आहे
22 Dec 2013 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll
आपल्या इथे तर सेक्युलर सरकार असताना काश्मीर मधून जवळ जवळ सर्व हिंदुना अनधिकृत पणे बाहेर काढले गेले आहे
अहो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते. झालेच तर काश्मिरला स्वातंत्र्य कसे योग्य हे सांगायचे.
22 Dec 2013 - 6:08 pm | बाळकराम
सगळीकडे असतातच, तो एक समाजशास्त्रीय फिनॉमिनॉ आहे म्हणा हवं तर. आपल्याकडेही जातिविशिष्ट वसाहती आहेतच की- जसे की ब्राम्हण आळी, गवळीवाडा, माळी गल्ली, महारवाडा इ.. लोक साधारणपणे कळपाने राहाणं पसंत करतात आणि जोपर्यंत दुसर्या समाजाला हेतूपूर्वक डिस्क्रिमिनेट केलं जात नाही तोपर्यंत अशी रचना निरुपद्रवी मानावी. इथे लंडनमध्येही पोलिश, भारतीय, आफ्रो-कॅरेबिअन लोकांची दाट वस्ती असलेले भाग आहेत. उदा. भारतीय वा देसी लोकांचे सोउथॉल, वेम्बली, हॅरो, हॉन्स्लो, ईलिंग इ. तशाच प्रकारे पोलिश इ लोकांच्या पण. सर्वसाधारणपणे, कुणाला यात प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा पोलिश एम्प्लॉयर्स जेव्हा इथे नोकरभरतीच्या जाहिराती फक्त पोलिश भाषेतून द्यायला लागले तेव्हा गदरोळ उठला. "मुस्लिम नकोत" वा "एससी एसटी क्षमस्व" अशा जाहिराती याचप्रकारे डिस्क्रिमिनिटरी आहेत.
बरोबर आणि चूक यातला फरक अचूक कळणं म्हणजे सुसंस्कृतपणा, नाहीतर ते नुसती बुद्धिमैथुन. दुर्दैवाने, हेच सांगण्यची वेळ जास्त येते. (हे तुम्हाला उद्देशून नाही, गैरसमज नसावा)
22 Dec 2013 - 5:47 pm | आनंद घारे
भिवंडी येथे पोलिस चौकी उभारण्यावरून घडलेल्या दंगलीची पार्श्वभूमी
हा मुद्दा गैरलागू होतो कारण दंगल जमावाने केली होती. वसाहतीमध्ये परधर्माच्या कोणा एकट्या दुकट्या माणसाला जागा दिली तर तो दंगल करू शकणार नाही.अशा परिस्थितीत जर एखाद्या समुदायाने / सोसायटीने / बिल्डर ने आमच्या परिसरात विशिष्ट पंथाचे /समाजाचे लोक नकोत अशी भूमिका घेतली ,तर तो गुन्हा कसाकाय व का ठरावा?
कोणत्या कायद्याखाली हा गुन्हा ठरतो? याबद्दल कोणीच काही लिहिलेले नाही. ही गोष्ट योग्य की अयोग्य असणे आणि हा गुन्हा असणे किंवा नसणे यात फरक आहे.23 Dec 2013 - 5:32 pm | विकास
अनेकांनी वर मुद्दे मांडले आहेतच. पण जात-धर्म-भाषा वगैरे कुठल्याच गोष्टींवर आधारीत घर विकणे असता कामा नये. आणि अशा गोष्टींच्या आधारे एखाद्यास स्वतःचे घर करण्याची संधी नाकारणे, हा गुन्हाच आहे.
23 Dec 2013 - 7:55 pm | राही
सहमत. असे डिस्क्रिमिनेशन, मग ते कुणाकडूनही असो, गुन्हाच ठरायला हवे.
आमच्या परि
23 Dec 2013 - 8:06 pm | राही
प्रतिसाद अर्धवट असतानाच चुकून प्रकाशित केला गेला.
आमच्या परिसरात सध्या पुनर्विकासाची लाट आहे. ज्यांच्या इमारती पुनर्विकसित होतात त्यांना दुसरी भाड्याची घरे शोधणे भाग असते. या लोकांचा अनुभव असा आहे की नजिकच्या परिसरात पुष्कळ फ्लॅट्स रिकामे आहेत आणि ते सर्व बहुधा एकाच कम्यूनिटीच्या मालकीचे आहेत. ह्यांच्या अटी अत्यंत जाचक असतात. सहा सहा महिन्यांचे-कधी कधी वर्षाचेही- भाडे आगाऊ तर मागतातच शिवाय केव्हाही येऊन किचन तपासणी केली जाईल हेही असते. 'आम्ही शाकाहारी आहोत' इतके आश्वासन पुरेसे नसते. मिश्राहारी आहोत असे सांगितले तर आतही येऊ दिले जात नाही.
23 Dec 2013 - 9:54 pm | क्लिंटन
तुमच्या परिसरात नक्की काय चालू आहे याची कल्पना नाही पण घरमालकांना आपल्या घरी मांसाहारी जेवण बनवले जाणे मान्य नसेल तर त्यात त्यांचे नक्की काय चुकले?मी समजा माझ्या घरी काही नियम कटाक्षाने पाळत असेन (उदाहरणार्थ चपला घालून एका ठराविक बिंदूपुढे न जाणे, घरी मांसाहार, दारू, सिगरेट इत्यादींना स्थान नसणे) तर तेच नियम मी ज्याला घर भाड्याने देईल त्यानेही पाळावेत असे मला वाटले तर त्यात काय चुकले?अर्थातच सगळे मराठी म्हणजे मांसाहारी अशा स्वरूपाचे स्टिरिओटायपिंग करणे चुकीचे आहे.पण आक्षेप जर घरी मांसाहारी खाणे बनविण्यावर असेल (मराठी किंवा अन्य कोणी असण्यावर नव्हे) तर त्यात काही चुकले असे मला तरी वाटत नाही.
25 Dec 2013 - 11:24 pm | राही
तथ्य आहे खरे. विकताना देखील हेच तत्त्व लागू पडेल का, जरी विक्रीनंतर मूळ मालकाचा हक्क रहात नसला तरी?
24 Dec 2013 - 5:14 am | निनाद मुक्काम प...
जर्मनीत खुल्या जाहिराती दिल्या नाही तरी तुर्की लोकांच्या विभागात घर घेणे किंवा तुर्की लोकांना घर भाड्याने देणे जर्मन टाळतात.
माझ्या अरबवंशीय मित्राला जर्मनीत भाड्याने घर मिळवतांना नाकी नऊ आले.
माझा भारतातील व परदेशातील मुस्लिमांचा अनुभव असा आहे की जेव्हा ते एखाद्या सोसायटी किंवा कामावर एखाद दुसरे असतात तेव्हा ते दबून असतात, मात्र जरा त्यांची संख्या वाढली की मुजोर होतात,
आपला शेजार कोण असावा हे ठरविण्याचा हक्क सगळ्यांना आहे , माझ्या मते भारतात सोसायटी मधील सर्व सदस्यांनी ठरवले तर एखाद्या व्यक्तीला जागा मिळू शकत नाही ,
अनिल धवन सेक्रेटरी असलेल्या इमारतीत इमरान हाश्मी ह्यास जागा घेण्यास सर्वांनी मनाई केली होती ,
मुंबईत पारशी लोकांच्या वसाहतीत फक्त पारशी राहतात व ते जागेचे व्यवहार शक्यतो आपल्या समूहात करतात.
26 Dec 2013 - 11:21 am | उदय
इतर ठिकाणांचे माहित नाही, पण टेक्सासमध्ये individual घरमालक कुठल्याही कारणास्तव, कुणालाही घर विकायला नाही म्हणू शकतो. फक्त अशावेळी घरमालक रिअल्टरचे कमिशन देणे लागतो. (the seller may be liable for the broker’s commission if a buyer is ready, willing and able).
घर भाड्याने द्यायचे असेल तर धर्म हा प्रोटेक्टेड क्लास आहे, त्यामुळे अपार्टमेंटमध्ये नकार देऊ शकत नाहीत, पण स्मोकिंग नको, पाळीव प्राणी नकोत हे म्हणू शकतात. घरमालक (of upto 4 houses) जर रिअल्टरला न वापरता घर भाड्याने देत असेल, तर तो कुणालाही नाही म्हणू शकतो.
ता.क. मी लायसेन्स्ड रियल्टर आहे.
24 Dec 2013 - 9:18 am | प्रसाद१९७१
लेखकाशी पूर्ण सहमत.
मंदार - तुम्ही काहीही चुकीचे लिहिलेले नाहीये. ९९ एकर वरची ती जहीरात पण चुकीची नाहीये.
कोण मूर्ख आपल्या शेजारी ही आफत ओढवून घेइल?
25 Dec 2013 - 10:35 pm | यसवायजी
(एकमेका सहाय्य करु या तत्वावर) काही 'फक्त शिक्षक'/ LIC एजंट्स/ डॉक्टर्स यांच्या सोसायट्या असल्या तर मला काही वावगे वाटत नाही. शेजारी राहणार्या इंजीनीयरला का त्रास व्हावा त्यात?
जर समजा उद्या मी कुठेतरी परदेशी असे ठरवले की आम्ही भारतीय एकत्र राहू, काय प्रॉब्लेम आहे काय कुणाला?
जातींच उदाहरण एवढ सोपं नाहीय माहित्ये,
पण तरी ज्यांना कुणाला झिंग्यांच्या वासानेच उलटी होते, 'रक्ती'चं साधं नाव ऐकलं तरी घाम फुटतो, अशा लोकांनी ठरवलं की बाबा, आपण एकमेकांना ओळखतो, इतरांना त्रास न देता आपणच वेगळे राहू. कुणाला बंदी आहे असं नाही, पण प्रवेश फक्त शाकाहार्यांनाच आहे. अर्थात शाकाहार हा अजुनही काही विशिष्ठ जातीत बहुतकरून पाळला जातो ही वस्तुस्थीती आहे. मग बाहेर आम्ही भले सर्वांच्या गळ्यात-गळे घालून हिंडतो.
अजुन विचार चाललाय.. बदलायला तयार आहे..
(घरी तुप-मेतकुट-भात, आणी बाहेर झिंगे/रक्ती काहीही चालणारा/चापणारा)
25 Dec 2013 - 11:18 pm | पुष्करिणी
कोणत्याही जाती-धर्म-आहाराच्या सिंगल मुली-स्त्रीयांना घर ( आख्खा फ्लॅट किंवा शेअरिंग कसही ) मिळायला काय काय आणि किती अटी घालतात हे माहित असेल तर वर लिहिलेली नोटीस फारच दुय्यम आहे.
आणि या अटी फक्त घरमालकच नव्हे तर अख्खी सोसायटी घालते. येण्या-जाण्याची वेळ, भेटायला येणारे लोक, घातलेले कपडे आणि तत्सम दैनंदिन जीवनातल्या सर्व गोष्टींवर अटी/नियम असतात.
26 Dec 2013 - 12:16 am | विजुभाऊ
अहो एका सोसायटीत मला जागा भाड्याने मिळवताना सोसायटीने फक्त विवाहीत/ कुटुंबीयानाच जागा देता येईल अशी अट घातली होती. त्यातसुद्धा अॅग्रीमेंटवर नवराबायको दोघांच्या सह्या हव्यात .....
त्या अटीने माझी इतकी त्रेधा तिरपीट उडवली विचारु नका. अर्थात मिपाकरानी मला त्यासाठी बरेच सल्ले दिले.
ते सगळे सल्ले या इथे http://misalpav.com/node/14496