Royal Palms, आरे कॉलनी, गोरेगाव

नित्य नुतन's picture
नित्य नुतन in काथ्याकूट
17 Dec 2013 - 2:09 pm
गाभा: 

माननीय मिपाकर महोदयांसी,
विनंती विशेष ...
पत्रास कारण की, मुंबईमध्ये घर (१ bhk) घेणे विचाराधीन आहे... बर्याच संशोधनांती Royal Palms, Aarey Colony, गोरेगाव चे location परवडेबल वाटते आहे ... पण आंतरजालावर या project बद्दल फारच वाईट प्रतिक्रिया दिसत आहेत ...
एक दोन मित्र जे तिथे राहत आहेत त्यांच्या मते या area मध्ये ह्या किमतीत चांगले deal आहे..
पाण्याचा थोडासा problem असला तरीही ....connectivity चांगली आहे.. इत्यादी इत्यादी ...

मिपाकरांपैकी कोणी या area बद्दल जाणत असल्यास फार मदत होतील ...

धन्यु,
- मायानगरीप्रेमी

प्रतिक्रिया

रॉयल पाम्स आरे कॉलनी इथे कनेक्टिव्हिटी चांगली?

तसं असेल तर नवीनच डेव्हलपमेंट आहे ही.

एक प्रचंड रहदारीचा अन ट्रॅफिकजामचा पण जंगलातून जाणारा रस्ता असं त्या कनेक्टिव्हिटी देणार्‍या रस्त्याचं वर्णन करता येईल.

बाकी परिसर निसर्गरम्य असला तरी जंगलाच्या मध्यात असलेल्या कोणत्याही जमिनीविषयी मुंबईत नवीन व्यवहार करताना ताक फुंकूनच नव्हे तर फ्रीझमधे ठेवून थंड करुनच प्यावे.

शिवाय बिबट वगैरेंच्या सहज संचारामुळे लहान मुलांना मोकळेपणी खेळायलाही सोडता येत नाही.

नित्य नुतन's picture

17 Dec 2013 - 3:09 pm | नित्य नुतन

धन्यु गविजी..
कदाचित आपणांस माहित असेल, गोरेगाव चेकनाका पासून ३ किमी आत आहे हा प्रोजेक्ट ...
मीरारोड वरून गोरेगावला रोज २० किमी (one sided ) प्रवास करण्यापेक्षा हा ऑप्शन जरा बरा वाटत होता ..
शिवाय SBI, LIC इ ... बँका गृहकर्ज देत आहेत ... कायदेशीर stamp duty registration सुद्धा होत आहे. मित्राने एका वकिलाकडून कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्याचे समजते.
एखाद्या प्रोजेक्ट च्या विश्वसनीयतेकरीता या गोष्टी पुरेशा आहेत का?

बिबट्या वगैरे बद्दल मीही वाचले होते
आंतरजालावर २ वर्षापूर्वीच्या अशाच प्रतिक्रिया बघितल्या ... नवीन काहीच सापडले नाही
२ वर्ष पासून राहणाऱ्या मित्राने रॉयल पाल्म्स मध्ये कधी बिबट्या वगैरे पाहिला नसल्याचे सांगितले ...

नाहीतर शेवटचा पर्याय म्हणजे पुण्याच्या घरात कायमचे स्थानापन्न व्हावे असे आता वाटू लागले आहे ...
फक्त पुण्याची तितकी सवय नाही म्हणून .... लांबणीवर टाकले जात आहे

आदिजोशी's picture

17 Dec 2013 - 3:01 pm | आदिजोशी

आंतरजालावरच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. नका घेऊ तिथे फ्लॅट. बांधून इतकी वर्ष झाली तरी घरं शिल्लक आहेत ह्यावरून काय ते समजा.

नित्य नुतन's picture

17 Dec 2013 - 5:55 pm | नित्य नुतन

तिथे जाऊन चौकशी केली असता एजंट कडून असे समजले की जुन्या बिल्डिंग मध्ये फारशा सदनिका उपलब्ध नाहीत... ज्या जुन्या (४ ते ५ वर्ष) पुनर्विक्रीकर्ता आहेत त्या ४ ते ५ लाखांनी महाग (नवीन सदनिकांच्या तुलनेत) आहेत ... नवीन बिल्डिंग मधेच फिल्डिंग लावावी लागेल ...
एजंट वर फारसा विश्वास नाही ... अजून चौकशी करणं चालू आहे ..

कवितानागेश's picture

17 Dec 2013 - 5:07 pm | कवितानागेश

SBI लोन देत असेल तर कागदपत्रे नीट असतीलच.
पण घरे विकली गेली नसतील तर जरा अजून चौकशी आवश्यक आहे.
शिवाय एक सोपा उपायः जे तिथे राहतायत त्यान्च्याकडे ४ दिवस पाहुणे म्हणून जा. बघा कसं वाटतय ते! ;)

नित्य नुतन's picture

17 Dec 2013 - 5:46 pm | नित्य नुतन

उपाय मस्तच आहे.. अंमलात आणता येतो का ते बघते ....

मुक्त विहारि's picture

17 Dec 2013 - 6:18 pm | मुक्त विहारि

घर = सामान्य माणसाच्या जीवाला अतिशय त्रास देणारी, घर-घर करायला आणि गरागरा फिरवणारी वस्तू.ज्यात विकणारा श्रीमंत होत जातो तर विकत घेणारा कर्जबाजारी होत जातो.

आणि आजकाल फसवणूक खूप वाढली आहे.(विशेषतः मुंबईत,) त्यामुळे जरा जपूनच.वाडवडीलांचे घर असेल तर नको त्या भानगडीत पडू नका.

मी फसलो तरी इतरांनी फसू नये, ह्या काळजीने मत व्यक्त केले.