परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ...
आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .
पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे .
मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी. पण काही डॉक्टर्स फक्त पैशासाठी आणि आपल्या हॉस्पिटल्स च्या यशाची टक्केवारी वाढावी म्हणून चक्क दुसर्या एखाद्या धडधाकट व स्पर्म काऊंट चांगला असणार्या पुरुषाचे बीज वापरतात . अशाने भले जोडप्याला अपत्यप्राप्तीचा आनंद (?) मिळत असेलही , पण धार्मिक ,आध्यात्मिक आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील घोर फसवणूक आहे . कारण यातून निपजणारी संतती मूळ पुरुषाच्या डीएनए शी विपरीत असते.... साहजिकच त्याचे संस्कार ,संसृती आणि वंश निराळा असतो. म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच !
या विषयाबद्दल जनजागृती होवून असे गैरप्रकार करणार्या डॉक्टर्स वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया
13 Dec 2013 - 11:58 pm | वडापाव
असे गैरप्रकार करणा-या डॉक्टर्सचं पितळ उघडं पडलं आणि ते या डॉक्टर्सची मदत/ डॉक्टर्सकडून फसवणूक झालेल्यांना कळलं तर या फसवणूकीमुळे जन्माला आलेल्या निष्पाप मुलांचा स्वीकार फसवणूक झालेली जोडपी त्यापुढे करतील का? त्या बालकांनी त्या जोडप्याला त्याच्या जन्मापासून ते डॉक्टरचं पितळ उघडं पडेस्तोवर किती लळा लावलाय यावर कदाचित त्याचं भवितव्य अवलंबून असावं.
14 Dec 2013 - 3:51 pm | तुमचा अभिषेक
आई तीच असते ना.
स्विकार केला गेला पाहिजे, अर्थात कठीण जाईल भल्याभल्यांना हे ही खरेच. पण त्यांनीही हे असे घडलेच नाही असे मानून पुढे जावे.
14 Dec 2013 - 12:24 am | विनोद१८
यात धक्कदायक ते काय ???? कदाचित तुम्हाला ते आज समजले म्हणुन धक्का बसला. या आजच्या व्यावसायिक जगात अशा पद्धतीनेच ग्राहकान्ची सर्रास फसवणूक विविध व्यावसायिकान्कडून वेगवेगळ्या क्षेत्रात होत असते. आपल्या येथे 'व्यावसायिकता' म्हणजे आपल्या ग्राहकाना सराइतपणे, सफाइदारपणे व बेमालूमपणे केवळ लुटणे असाच समज असतो. त्यान्च्या अज्ञानाचा फयदा घेतला जातो. आपल्या येथे तर जरा जास्तच घेतला जातो.
मी मागे माझ्या एका प्रतिसादात ' आपल्या देशात काहीही होउ शकते ' असे लिहिले होते, ते काही मिपामित्रान्ना आवडले नव्हते. मी म्हणतो त्याचे हे एक उदाहरण.
या विषयाबद्दल जनजागृती होवून असे गैरप्रकार करणार्या डॉक्टर्स वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
अशी जनजागृती या देशात खरोखरीच होउन तो सुदीन दिसो.
14 Dec 2013 - 12:59 am | स्रुजा
मला नाही वाटत या बाबतीत फसवणूक करणं इतकं सोपं असेल. निदान भारतात तरी फ्रेश sperm sample आणि cryopreserved sample वापरून येणाऱ्या निकालात फरक आहे. cryopreserved चा अर्थात च success rate कमी आहे.
शिवाय गर्भधारणेसाठी एक च स्पर्म पुरतो . जर motility पण कमी असेल तर अशा वेळी बाहेर काढलेल्या एग्ग्स मध्ये स्पर्म inject केला जातो.
स्त्री च्या शरीरातून एग्ग्स बाहेर काढल्यावर sperm inject करून गर्भ तयार करायचा खर्च जास्त असतो . जर स्पर्म motility आणि count चांगला आहे पण इतर काही कारणाने IVF करावं लागलं असेल तर एग्ग्स आणि sperms स्त्री च्या शरीराबाहेर पण naturally एकत्र येऊ दिले जातात. अशा प्रकारच्या उपचारांचा खर्च कमी असतो कारण त्यात sperm inject करावा लागत नाही . वैद्यकीय तज्ञ यावर जास्त प्रकाश टाकू शकतील पण माझी माहिती तरी अशी आहे .
काही ठिकाणी तुम्ही म्हणता तसा प्रकार झाला ही असेल पण हॆ खूप दुर्मिळ आहे.
14 Dec 2013 - 2:44 pm | शैलेन्द्र
मुद्दा success rate चा नाही, फ्रेश स्पर्म, दुसर्या व्यक्तीचेही वापरता येतात, पण मला नाही वाटत की कोणताही डॉक्टर पेशंटच्या पुर्व-परवाणगीशिवाय हे करेल, कारण, बायोलॉजीकल पीता ठरवणे हा आज डाव्या हाताचा मळ आहे.
याला intra-Cytoplasmic sperm Injection म्हणतात. काउंट लो असेल तर तुम्ही तिन-चार वेळच्या उत्सर्गातुन स्पर्म एकत्र करुन त्यात प्रतवारी ठरवुन चांगले स्पर्म वापरु शकता.
14 Dec 2013 - 1:32 am | उपाशी बोका
काही दिवसांपूर्वी मित्राबरोबर बोलताना गर्भचिकित्सा आणि त्यातून होणारी मुलींची हत्या हा विषय निघाला, तेव्हा मी म्हणालो की आता गर्भनिदान करायला सोनोग्राफीला बंदी घातली आहे. लोकशिक्षण हा १००% उपाय आहे, पण जरातरी बरे झाले ना? तर तो मला म्हणाला, अरे तू कुठल्या जमान्यात राहातोस? आता अशी पद्धत आहे की मुलगा असेल तर रिपोर्टवर डॉक्टर निळ्या पेनाने सही करतो आणि मुलगी असेल तर काळ्या पेनाने सही करतो. तू काय भ्रमात आहेस की काय? हे ऐकून माझेच व्यवस्थित लोकशिक्षण झाले.
14 Dec 2013 - 1:39 am | रुस्तम
काय काय डोकी लावत असतात हे डॉक्टर... (क्रुपया मिपा वरील डॉक्टरानी राग मानू नये.)
14 Dec 2013 - 10:41 am | उद्दाम
यात अनेक प्रकारे डोकी लावलेली आहेत. मुलगा असेल तर मंडेला या, मुलगी असेल तर फ्रायडेला या. मुलगा असेल तर डॉक्टर गणपतीच्या फोटोकडे जातो. मुलगी असेल तर देवीच्या..
14 Dec 2013 - 3:54 pm | तुमचा अभिषेक
पण हे लावलेले डोके, कोडवर्ड समोरच्या पेशंटला कसा माहित असतो, कुठून कळतो, त्या माहितीच्या सोर्सलाच आत घ्यायचा ना..
15 Dec 2013 - 1:49 am | कपिलमुनी
मुलगा : जय श्री क्रिश्ना
मुलगी जय माता दी ...
14 Dec 2013 - 10:36 am | मुक्त विहारि
मेरा भारत महान
14 Dec 2013 - 4:50 pm | विनायक प्रभू
आणखीन एक जोजीमोजी???
हे राम....
14 Dec 2013 - 7:13 pm | सुबोध खरे
मी स्वतः लष्कराच्या वंध्यत्व केंद्रात आणी दोन खाजगी रुग्णालयात प्रत्यक्ष काम केले आहे. इतर काही ठिकाणी ते कसे चालते तेहि पाहीलेले आहे.जर नवर्याच्या वीर्यात जर मुळीच शुक्राणू नसतील( AZOOSPERMIA) तर दात्याचे (डोनर) शुक्राणू वापरले जातात. पण जर शुक्राणूचे प्रमाण कमी असेल तरी वेगवेगळ्या प्रणालिनी ते वाढवता येते. माझ्या जवळच्या नातेवाईकाचे शुक्राणू फक्त वीस हजार असताना(साधारण प्रमाण हे दोन ते पाच कोटी शुक्राणू एका मिली मध्ये असते) आमच्या केंद्रात(लष्कराच्या) त्याचा इलाज करून त्याचा मुलगा आता सोळा वर्षाचा आहे.
आय व्ही एफ ला दोन पर्याय असतात एक म्हणजे नवर्याचे (HOMOLOGOUS) किंवा दात्याचे(DONOR).
त्यामुळे शुक्राणू चे प्रमाण कमी असेल तर वरील प्रमाणे शुक्राणू संहती करण (SPERM CONCENTRATION) करून ते वाढवता येते.पण ते शून्य असेल तर त्याची पूर्ण तपासणी होते कि शुक्राणू ची निर्मितीच होत नाही कि शक्राणु वाहक नळी(नसबंदी तील नस)बंद आहे वगैरे.
मूळ निर्मितीच होत नसेल तर दात्याचे शुक्राणू वापरण्याशिवाय पर्याय नसतो.
दात्याचे शुक्राणू वापरण्या अगोदर त्या स्त्रीची आणि तिच्या नवर्याची लेखी परवानगी घेतली जाते आणि ती त्या केंद्रात कायमची नोंद म्हणून ठेवली जाते. कारण एखादा माणूस यदाकदाचित उलटला तर ते केंद्र बाराच्या भावात जाईल आणि तो डॉक्टर आयुष्यातून उठेल कारण ते मुल माझे नाही हे डी एन ए चाचणीत सहज सिद्ध करता येते. तेंव्हा जोडप्याला न सांगता कोणी डॉक्टर असे शुक्राणू वापरणे शक्य नाही. ते म्हणजे काही भाजी नाही कि बाजारात जाऊन विकत घेतली. शुक्राणू पेढी साठी असंख्य सरकारी परवाने लागतात. शुक्राणू द्रव नायट्रोजन मध्ये साठवून ठेवावे लागतात आणी त्याचा खर्च स्वतःच्या खिशातून कोण डॉक्टर करेल? तो रुग्णाच्या खिशातूनच काढणार.
खाजगी रुग्णालयात आय व्ही एफला एक लाखाच्या वर खर्च येतो त्यामुळे तेथे येणारे लोक हे "गरीब" नसतात . त्यामुळे ते पोलिसांकडे किंवा न्यायालयात जाण्याची शक्यता बरीच आहे तेनव्हा असे सरसकट कोणतेही केंद्र करणे शक्य नाही
"हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे."असे सरसकट बिनबुडाचे विधान करण्याअगोदर आपण थोडा विचार करावयास हवा होता असे मला वाटते.
वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार भरपूर आहे(जितका इतर क्षेत्रात आहे जवळ जवळ तितकाच) पण या तर्हेने आपली मान आयुष्यभरासाठी अडकवून घेईल इतके डॉक्टर मूर्ख नसतात असे मला वाटते.
14 Dec 2013 - 8:33 pm | शैलेन्द्र
+१११११११
14 Dec 2013 - 8:46 pm | तुमचा अभिषेक
+७८६