पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस चौथा-पाचवा/भाग २

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in भटकंती
12 Dec 2013 - 5:06 pm

=======================
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४
=======================

दुपारची वामकुक्षी घेउन आम्हि फ्रेश झालो आणि मिनी सयाम बघायला बाहेर पडलो. मिनी सयाम म्हणजे प्रत्येक देशातील वर्ल्ड फेमस स्टॅच्यु/प्रतिक घेउन त्यांच्या छोटया प्रति बांधल्यात. येण्यार्‍या फोटोत त्या पुढे दिसतीलच. पण एवढया सगळ्या भाउगर्दित आपल्या भारताचं प्रतिनिधीत्व करणारं काहिचं नसाव ह्याचा खेद वाटला!

१. मिनी सयामचं प्रवेशद्वार. दारातच असलेला हा मस्याकॄती पुतळा लक्ष वेधुन घेतो

1.1

1.2

२. थाई रावण

2.1

३. जरा पुढे गेल्यावर हि फ्रान्सची वास्तु लागते

3.1

४. नाम डे मुन: कोरीया

4.1

५. आयफेल टॉवर आणि पॅरीस डि चॅलीओट: पॅरीस

5.2

5.1

६. सिंगापुर/ऑस्ट्रेलीया

6.1

७. रीओ-डि-जानीरो: ब्राझील

7.1

८. ऑटोमीयमः बेल्जीयम

8.1

९. टाइन-टॅनः चायना

9.1

१०. शेषाधीत विष्णु आणि लक्ष्मी; वरती ब्रम्हा

10.1

११. अमेरीकेचं काहि (च) नाहि असं कधी कुठे होईल का??

11.1

11.2

१२. ग्रीस; मागे ईजीप्त

13.1

१३. आता काहि थाई प्रतिकृती......ह्यातलं काहि काहि आम्हि बँकॉक मधे प्रत्यक्ष बघणार होतो

14.1

vat

14.3

14.4

14.5

१४. ईतर असचं काहि. बागेत हिरवळ मात्र सगळिकडे आहे. बघुनच ईतकं प्रसन्न वाटतं ना. कोण त्या चालण्यार्‍या हिरवळिकडे हळुच बघतयं :D

15.3

15.1

15.2

15.4

15.5

15.6

१५. अशीच काहि ईतर थाई मंदिरे

16.1

16.2

16.3

१६. पिकासा (ईटली)

17.1

१७. लंडन ब्रिज

18

१८. ह्याला नक्कि काय म्हणतात माहित नाहि पण राज कपुरच्या "संगम" पिक्चर मधे पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतय. पाण्यात पैसे टाकुन आपल्या मनातील ईच्छा पुर्ण होतात असं म्हणतात.

19

१९. ड्रायव्हरला यायला अजुन वेळ होता तेवढयात माझ्या मित्राचं लक्ष "गो-कार्ट" कडे गेले. मग अनपेक्षीतपणे चालुन आलेली संधी आम्हि थोडिचं सोडणार? चला कोणाला कोणती गाडि हवी आहे बोला??

20.2

२०. स्पीड चा थssssssर्रार अनुभवायला सज्ज......और येsssssssअपनी तो निकल पडि

21

21.1

२१. आमचं कार्टिंग झाल्यावर एव्हाना पोटात कावळ्यांनी पण "गो-कार्टिंग" सुरू केलेलं. मग काय पिझ्झा हटच्या गार्लिक ब्रेड, मेन पिझ्झा आणि ह्या अफलातुन चवीच्या मॉकटेलनी त्यांना ब्रेक लावला :D

22.1

२२. असचं टिवल्या-बावल्या करत, नाईट लाईफची मजा (दुरुनच बरं) पहात हॉटेलवर परतलो. उद्या दुपारी चेक आउट करुन फायनल डेस्टिनेशन आणि टुरचा थेवटचा थांबा बँकॉक कडे प्रयाण करायचं होतं

23

23.1

23.2

23.3

23.4

प्रतिक्रिया

कोमल's picture

12 Dec 2013 - 5:14 pm | कोमल

ए धतड ततड धतड ततड..

ठाकूरजी इज बॅक..
लैच भारी..

प्रतिकृती पण किती सुरेख आहेत. खरी ठिकाणे तर नादखुळा असतील

अक्षया's picture

12 Dec 2013 - 5:23 pm | अक्षया

+ १

का नाही ...याचे आश्चर्य वाटते. शेषशाय़ी विष्णू आहेत - कारण तिथल्या राजाचे नाव राम आहे.

यसवायजी's picture

12 Dec 2013 - 6:04 pm | यसवायजी

फोटो मस्त आलेत. पण 'ताज' नाही?? :(

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 6:16 pm | प्यारे१

छानच.

ताज महालाला विसरले की काय हे लोक?

शैलेन्द्र's picture

12 Dec 2013 - 8:09 pm | शैलेन्द्र

बनवायला जमत नाही हो, कठीण आहे.

तसं नसेल, ताजमहाल बनवल्यानंतर हात तोडायची पद्धत आहे. म्हणून कुणी रिस्क नसेल घेतली.

शैलेंद्र, प्यारे, सापडला हो सापडला. ते मिनि सायम लिहिलय त्या फटूमध्ये भिंतीवर तयार केलाय. बाकी तो खरा दिसेल असे तयार करायला अवघड आहे म्हणून कोणी वाटेला जात नसावेत. ;)

प्यारे१'s picture

12 Dec 2013 - 10:31 pm | प्यारे१

तुम्ही लेख नीट वाचत नाही नि तुमचं निरीक्षण नाहीच्च.
हे पहा लेखक काय म्हणतोय.
>>>पण एवढया सगळ्या भाउगर्दित आपल्या भारताचं प्रतिनिधीत्व करणारं काहिचं नसाव ह्याचा खेद वाटला!

ताजमहाल आग्र्याला आहे नि आग्रा उत्तरप्र देशात नि उत्तरप्रदेश भारतात नि वर लेखक म्हणतो भारताचं प्रतिनिधीत्व करणारं काही नाहीच्च. तरीही उगाच कशालाही सापडला म्हणून तुम्हाला जे वाटतंय ते मुळात तसं नाहीये.
तुम्ही निव्वळ भ्रमात आहात. लेखकाचं ठीके एकवेळ पण मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला कळणार नाहीच्च.

-चार ओळी लिहीता लिहीता थकलेला प्यारे.
('म'ला कसं काय जमतं कुणास ठाऊक? )

दिपक.कुवेत's picture

13 Dec 2013 - 11:28 pm | दिपक.कुवेत

रेवतीतै म्हणते तसं मला कसं दिसलं नाहि?? असो. नुसतं चित्र बघुन ज्यांना माहित आहे त्यानांच कळणार. खरी प्रतिकॄती तयार केली असती तर अजुन मजा आली असती. पण प्यारे भौ तुमचा प्रतीसाद कुछ पल्ले नहि पडा

अरे मिनि सियाम लिहीलेला फोटो पहा. त्यात भिंतीवर डाव्या हाताला ताजमहालचं चित्र आहे.

बाकी रेवती 'तै' नाही 'आज्जी' आहे. माझा प्रतिसाद एका ख्यातनाम 'दार्शनिका'च्या( सातत्यानं अगाध विद्वतेचं दर्शन घडवणाराला दार्शनिक म्हणतात आमच्याकडं ;) ) प्रतिसादाची नक्कल करण्याचा क्षीण प्रयत्न होता.
असो!