सिरके वाले प्याज़

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
24 Nov 2013 - 12:35 pm

नमस्कार मंडळी,

आजची रेसीपी शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट असली तरी सगळ्यांच्या हमखास परीचयाची आहे. हॉटेल मधे स्थीरस्थावर झालो कि समोर येण्यार्‍या दोन गोष्टि म्हणजे मेन्यु कार्ड आणि हे प्याज़ विथ भाजलेला पापड-दहि/पुदिना चटणी! त्यातुन हे कांदे अगदि छोटे असल्याने मेन्यु ठरवता ठरवता कधी गट्ट्म होतात तेच कळत नाहि आणि त्यांचा गुलबट/लालसर रंग तर फार आकर्षित करतो (निदान मला तरी). चला तर मग वेळ न दवडता कॄती पाहुया:

Pyaz 1

साहित्यः
१. सोललेले छोटे किंवा मद्रासी कांदे - १५ ते २०
२. व्हिनेगर - २ मोठे चमचे (व्हाईट किंवा तत्सम कुठलहि)
३. १/२ बिटाचे लंबगोलाकार तुकडे (हे ऑप्शनल आहे पण त्या कांद्याना गुलबट छटा ह्या बिटामुळेच यते)
४. १ कप पाणी
५. चवीप्रमाणे मीठ

कॄती:
१. सोललेले कांदे स्वच्छ एका कोरडया (किंचीत ओल्या) फडक्याने पुसुन घ्या. कांद्याना हलकेच चीरा द्या म्हणजे रस आतपर्यत मुरेल
२. सोललेलं बीट १ कप पाण्यात उकडवुन घ्या. फार शीट्या देउन मेण होईस्त उकडु नका. साधारण मउ होईल ईतपर्यंत शीजवा. गार झालं कि त्याचे चौकोनी किंवा लंबगोलाकार तुकडे करा. उकडलेल्या बीटाचं पाणी फेकुन देउ नका.
३. आता वरील बीटाच्या पाण्यात व्हिनेगर, चवीप्रमाणे मीठ घालुन (व्हिनेगर मधेहि मीठ असतं) सारखं करा. एकदम दोन चमचे घालण्यापेक्षा थोडं थोडं करुन व्हिनेगरचं प्रमाण वाढवुन चवीचा अंदाज घ्या म्हणजे फार आंबट होणार नाहि
४. सोललेल्या कांद्या/बीटाचे तुकडे स्वच्छ/कोरडया अश्या काचेच्या बाटलीत भरा
५. तयार केललं पाणी/सिरका कांदे/बीट बुडतील ईतपत बाटलीत घाला आणि झाकण घट्ट लावुन फ्रिज मधे ठेवा
६. १-२ दिवसात कांदे छान मुरतील. बघता काय मग घ्या......उचला एक एक कांदा आणि करा गट्ट्म.

Pyaz 2

ताकः ईकडे मिडल-ईस्ट मधे चीकन शवरमा/हमुस/फिलाफिल बरोबर किंवा कधी कधी सँन्डवीचमधे अस व्हिनेगर मधे मुरवलेलं गाजर, मुळा, फ्लॉवर (ब्लांच करुन) देण्याची पद्ध्त आहे. त्यांना 'तुरशी' म्हणतात. खास करुन शोरमा खाताना ह्या आंबट/तुरट तुरशीचे छोटे छोटे तुकडे शवरम्याची लज्जत अजुन वाढवतात.

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

24 Nov 2013 - 12:44 pm | सुहास..

छान ...

भारतात हे करून पहायला थोडा वेळ लागेल्;अ असे शरद पवार म्हणतात ;)

तुमचा अभिषेक's picture

24 Nov 2013 - 12:50 pm | तुमचा अभिषेक

छान टायमिंग साधलात डिशचा, अन दिसायलाही तोडीस तोड !

चित्रगुप्त's picture

24 Nov 2013 - 1:09 pm | चित्रगुप्त

असे करतात होय...
हाटेलात फार क्वचित जात असल्याने कधितरीच मिळणारा हा आवडणारा प्रकार आता घरीच करता येईल.
एकदा केलेले कांदे किती दिवस टिकतात? फ्रिज मधे ठेवावेत का?

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 11:00 am | दिपक.कुवेत

थोडे थोडे करा आणि लगेच संपवा. तसंहि व्हिनेगर मधे असल्याने खराब व्हायची शक्यता फार कमी आहे पण रीस्क नको आणि हो नेहमी फ्रिज मधेच ठेवा.

सानिकास्वप्निल's picture

24 Nov 2013 - 1:50 pm | सानिकास्वप्निल

छान व सोप्पी पाकृ .

ईकडे मिडल-ईस्ट मधे चीकन शवरमा/हमुस/फिलाफिल बरोबर किंवा कधी कधी सँन्डवीचमधे अस व्हिनेगर मधे मुरवलेलं गाजर, मुळा, फ्लॉवर (ब्लांच करुन) देण्याची पद्ध्त आहे.

हो इथे सुद्धा पिकल्ड अनियन, हॅलेपिनोज, बीटरुट, एग्ज, हे सॅंड्विचेस, रॅप्समध्ये घातले जाते.

चित्रगुप्त's picture

24 Nov 2013 - 3:20 pm | चित्रगुप्त

हो, इकडे हरियाणात सुद्धा प्याज, मूली, ककडी, टमाटर, पंचरंगा अचार हे ढाब्यांवर फुकट दिले जाते.

पैसा's picture

24 Nov 2013 - 3:23 pm | पैसा

पाकृ साठी धन्यवाद! कांदे घ्यायला परवडायला लागले की नक्की करीन!

भावना कल्लोळ's picture

27 Nov 2013 - 3:08 pm | भावना कल्लोळ

सहमत

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Nov 2013 - 3:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त रंगीत आणि फिलाफिल / शवर्मा रोलची चव अजून रंगतदार करणारी ! इतर कोणत्याही पदार्थांबरोबर व्हिनेगारमध्ये छान मुरलेले कांदे मस्तच लागतात !

फिलाफिल बरोबर अशा प्रकारच बीट खाल्लं होत पण नाही आवडली त्याची चव. बाकी कांदे मस्त दिसतायत.

स्पंदना's picture

25 Nov 2013 - 5:24 am | स्पंदना

फलाफल म्हणायचय का?

मुक्त विहारि's picture

26 Nov 2013 - 11:31 am | मुक्त विहारि

अय्या दिपूकाका , काकुने एवढे तीन तीन कांदे तुम्हाला रंगकाम करायला दीलेच कसे ??
खरच काकुचं कौतुक वाटतं बै मला तर :-/

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 11:08 am | दिपक.कुवेत

कसे बसे तीन मीळवले (फोटो काढण्यापुरते!). परत बोलीवर काय काय कबूल केलयं ते माझं मलाच माहित. बाकि कांदे असले/नसले तरी तुझे प्रतिसाद माझ्या डोळ्यात पाणी आणतात!

आता येथे लहाण कांदे शोधणे आले. ;)
बाकी अश्या कांद्याच्या रेसेपी टाकुन गरिब भारतीयांना चिडवल्याबद्दल निषेध.
(कालच स्काइपवर येताना कांदे आण असा निरोप ऐकलेली अपर्णा)

दिपक.कुवेत's picture

26 Nov 2013 - 11:05 am | दिपक.कुवेत

कांदे तसंहि डोळ्यात पाणी आणतात. पाकॄ टाकताना कांद्याचे भाव गगनाला भीडलेत असं कळलं असत तर पाकॄ पुढे ढकलली असती. असो प्वाणावलेले ड्वाले पुसण्यासाठि प्रत्येकाला एक एक रुमाल त्वरीत पाठवण्यात येईल.

त्रिवेणी's picture

26 Nov 2013 - 1:23 pm | त्रिवेणी

रुमाल नको
प्रत्येक प्रतिसादकर्त्याला 1-1 किलो कांदे पाठवा. मग डोळ्यातले अश्रु लगेच गायब होतील.

अनिरुद्ध प's picture

26 Nov 2013 - 12:41 pm | अनिरुद्ध प

पहात आहे,(बाकी कांदे दिसतात छान हो)

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2013 - 1:29 pm | प्रभाकर पेठकर

घरात सिरका तर आहेच, बीटरूटचा तुकडाही फ्रिजमध्ये सुकत पडला आहे त्याला लवकरात लवकर वापरणे गरजेचे आहेच. आता फक्त मद्रासी (किंवा सांबारचे) कांदे आणले की झाले.

अनन्न्या's picture

26 Nov 2013 - 6:40 pm | अनन्न्या

रंग मस्त आलाय बीट्चा!

अमेय६३७७'s picture

26 Nov 2013 - 7:54 pm | अमेय६३७७

छान दिसतायत.

हिरव्या देशातली हुच्च पाकृ !! ;)

नानबा's picture

27 Nov 2013 - 10:46 am | नानबा

या सूडची हुच्चची व्याख्या तरी काय आहे नक्की??
बोला सूडराव बोला.... ;)

पैसा's picture

27 Nov 2013 - 10:50 am | पैसा

३-३ कांदे वापरणारे नक्कीच हुच्चभ्रू असले पाहिजेत!

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 12:23 pm | दिपक.कुवेत

यु टु? आता सगळ्यांना कांदे आणलेच पाहिजेत.....बोला कोणाला किती किती हवेत?

पैसा's picture

27 Nov 2013 - 3:10 pm | पैसा

सोडतील का तुला? नाहीतर कांद्याचं स्मगलिंग करतो म्हणून धरतील! :-/

दिपक.कुवेत's picture

27 Nov 2013 - 4:51 pm | दिपक.कुवेत

त्या कस्टमवाल्यांना पण कांद्याची चीरीमीरी दिली कि हसत हसत सोडतील.

सुहास झेले's picture

27 Nov 2013 - 3:34 pm | सुहास झेले

भारीच... :)

सुहास्य's picture

1 Dec 2013 - 11:34 am | सुहास्य

दिपक ....धन्य आहेस...नक्किच करुन पाहिन...