प्रो.देसाई म्हणतात........

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
18 Jul 2008 - 10:59 pm
गाभा: 

"लोक अलिकडे जरा आपमतलबी,हलक्या मनाचे आणि सहनशिलतेचं वावडं, जास्त असलेले झाले आहेत.इतके लोक संतापी झालेले मी पाहिलेले आठवत नाहीत.कुणी भगवी टोपी घातली कां कुणी हिरवी टोपी घातली म्हणून लोक कोणत्याही थराला जातील असं मला तरी आठवत नाही.जरा गर्दीत कुणाला चुकून धक्का लागला तर अशा थराला प्रसंग जातो हे पण मला आठवत नाही.
काय झालं आहे या लोकानां?"
प्रोफेसर देसाई मला त्यादिवशी अगदी वैतागून सांगत होते.

मला म्हणाले,
" जराशी सहनशिलता नक्कीच कामी येते.बरेचसे लोक हल्लीच्या जमान्यात फारच टेन्शन ठेवून असतात.तसंच ते कुठला ही प्रसंग असो त्याला तोंड द्दयायला फारच कमी सोशिक झाले आहेत.असले लोक लवकर म्हातारे होणार.सोशीक लोक जास्त तरूण राहणार.
काही वर्षापुर्वी सेल फोन,किंवा मोबाईल फोन म्हणजे एक श्रीमंती काम होतं.आणि त्यावेळी लोकांच्या घरी लॅन्ड फोन पण होते.पण आता लोक घरच्या फोनचा नंबर कधी मागतच नाहीत.काय आपण एव्हडे बिझी असतो कां? बरेच वेळां लोक घरीच नसतात.
का असं समजायचं की बिझीनेस इतका महत्वाचा झाला आहे की कुणालाही कुणीही मनात आल्याबरोबर हवा असावा. का लोकांना बॉसचा फोन आला नाही तर जेवण घशा खाली जात नसावं.
आणि इंटर्नेट बाबत बोलायचं झाल्यास कुठल्याही जेवण घेण्याच्या जागी जावं तर बरेच जण मांडीवर लॅपटॉप घेवून जेवण करतानासुद्धा काम करताना पाहून एखाद्दया इलेक्ट्रॉनीकच्या दुकानात गेल्या सारखं वाटतं.

मी मात्र शांत असतो.कसं म्हणाल तर मला रात्री शांत झोप लागते.आणि ज्याना माझ्याशी काम करायचं असेल त्यांचीशी मी काम करीत असतो.
खरं सांगू का, माझ्याकडून पण असाच कधी तरी पुर्वी कामाच्या टेन्शनमुळे प्रमाद झाला होता.माझ्या बरोबर काम करणारा माणूस फारच आळशीपणा करून कामात कुचराई करताना पाहून मी त्याच्यावर खूपच गरम झालो होतो.मला तसं करायला नको होतं. शांतपणे मी तो प्रसंग हाताळू शकलो असतो.पण त्यामधून शिकलो आणि तसा प्रसंग पुन्हा होवू नये म्हणून खूप काळजी घेतो.

दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून नेहमीच "होयगावडा" होण्याची जरुरी नसते.कधी कधी उलट पण सांगावं लागतं,पण ते सन्मान ठेवून सांगता येतं.शांत असणं म्हणजे काय सांगायचं किंवा काय करायचं असं नसून कसं सांगायचं आणि कसं करून घ्यायचं
हे असतं.
म्हणून म्हणतो शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

कळत नाहीये. आपला विचार पटतो आहे.. पण मन त्यासाठी तयार नाही. कारण आजपर्यंत मी माझ्या स्वभावाचे दोन एक्स्ट्रीम्सच पाहिले आहेत. शांत रहाणं हे कधीच नाही जमलं आजपर्यंत. राग आलेला असला तरी आणि आनंदात असले तरी.. शांत रहाणं खरंच नाही जमलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Jul 2008 - 1:06 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
प्रयत्न करा काहिही कठिण नाही.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

(पण लोकांच्या त्रस्त गडबडीला बघून प्रो. देसायांनी वैतागून जायला नको होते, असे वाटते.)

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Jul 2008 - 2:28 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपलं म्हणणं बरोबर आहे.ते वैतागले हे माझं म्हणणं आहे.ते मात्र सांगताना शांत होते
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jul 2008 - 11:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब,

शांत रहावं म्हणजेच चांगल्या गोष्टी करता येतात आणि सुखाने रहाता येतं.
सहमत आहे, पण तरुण वयात शांत राहता येईल का ?
सोशीक होता येईल, शांत नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jul 2008 - 6:35 am | श्रीकृष्ण सामंत

डॉ.दिलीपजी,
आपल्या प्रतिक्रीये बद्दल आभार.सोशीक रहाणं आणि शांत रहाणं ह्यात खूपच "थीन लाईन" आहे.नव्हेतर सोशीकता ही शांततेची पूर्व तयारी आहे.आणि ह्या दोनही वृत्तिवर सर्व साधाराणपणे शिक्षणाचा प्रभाव असतो.अपवादात्मक उदाहरणं सोडल्यास सुशिक्षीत तरूणाकडून सारासार विचाराची अपेक्षा असते. लोकशाही असलेल्या पाश्चिमात्य देशात तरूण असलेली जनता उठसुट चिडाचीड करीत नाहित. असं प्रो.देसायांच ऑबझरवेशन आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 6:45 am | धोंडोपंत

सामंतसाहेब,

उत्तम उद्बोधक विचार. सहमत आहोत. लेख प्रभावी आहे.

मास्तर,

शांत राहणे जमेल का? या विचाराला शांत राहण्याचे फायदे आणि अशांततेमुळे स्वतःच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यांची मीमांसा उपयोगी पडेल असे वाटते.

डोकं फिरवून आम्ही आजपर्यंत खूप नुकसान करून घेतले आहे.

तुका म्हणे उगी रहावे| जे जे होईल ते ते पहावे||

हे धोरण उत्तम आहे. अनेक समस्या आपोआप सुटत असतात. आपण निष्कारण स्वतःचा रक्तदाब वाढवत असतो असे अनुभवाअंती आम्हाला कळलेले आहे.

आपला,
(तटस्थ) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jul 2008 - 9:36 am | श्रीकृष्ण सामंत

धोंडोपंतजी,
आपले विचार वाचून बरं वाटलं.आपण म्हणता ते सत्य आहे.आणि आपला अनुभव अनमोल आहे.
आपल्या साईटवर मी गेलो.फार इंटरेस्टिंग आहे.मी वरचेवर आपल्या साईटला जरूर भेट देईन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

ऋषिकेश's picture

20 Jul 2008 - 3:37 pm | ऋषिकेश

हं विचार करण्यासारख्या लेख! धन्यवाद!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश