दान

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
21 Nov 2013 - 8:04 pm
गाभा: 

दानं संविभाग:असा शंकराचार्यांचा दाखला देवून विनोबा भावे भूदानाचे समर्थन करीत (पक्षी: दान म्हणजे समान वाटप आणि म्हणून दान देणारा श्रेष्ठ नही आणि घेणारा कनिष्ठ नाही).. (संदर्भ : गुण गाईन आवडी)

दान देण्याचे अनेक फायदे तसेच ते देण्यास उद्युक्त करणारे अनेक दाखले आपल्याला सापडतात, दान देणारा 'दानशूर' म्हणविला जातो.

परंतु दान स्वीकारणारा कनिष्ठ का समजला जातो? "एक वेळ भिक्षा मागावी पण दान घेऊ नये" अशी काहीशी वाक्ये वाचली आहेत...

रक्त /विद्या/धन आदींचे दान स्वीकारलेच गेले नाही तर दात्याचा उद्देशच राहत नही...

एखाद्या गोष्टीची नितांत गरज असतांना समोरून देऊ केलेली तीच गोष्ट स्वीकारणे ह्यात गैर ते काय?

का काही मूलभूत गफलत होते आहे माझी?

प्रतिक्रिया

आपल्याकडे पुष्कळ आहे पण पुण्य पदरी पडाव म्हणून एखादी गोष्ट दिली तर त्याला दान म्हणता येणार नहि. किवा एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज नाही म्हणून दुसर्याला देणा ह्याला सुधा दान म्हणता येणार नाही .
दानत असताना दान करण्यापेक्षा ती नसताना दान करनं जास्त महत्वाच अहे असं मला वाटतं . घासातला अर्धा घास दुसर्याला काढून देणं म्हणतात तसं

एक वेळ भिक्षा मागावी पण दान घेऊ नये.
असं म्हणणार्यांनीच भिक आणि दान ह्याच्यातला फरक सांगावा . कारण भिक काय आणि दान काय घेणार्यावर देणारयाच ऋण राहतच नं .

याचे समर्पक उत्तर देइल काय याबाबत जाणुन घ्यायला मजा येइल.

अगोचर's picture

27 Nov 2013 - 5:51 am | अगोचर

पूर्वी एकेकाळी केकादु (केस कापण्याचे दुकान) मधे "तुमने क्या खोया जो तुम लाये थे" असे सडेतोड तत्वज्ञान मांडणारा एक फलक होता. त्या संदर्भावरुन असे म्हणावेसे वाटते की दान म्हणजे केवळ आभास आहे,

आयुष्यातलं पहिलं वस्त्र म्हणजे लंगोट..... त्याला खिसा नसतो.
शेवटचं वस्त्र म्हणजे गुंढाळलेली पांढरी चादर...... तिला पण खिसा नसतो.
तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी मरत असतात.

नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

वगैरे मिपाक्रांच्या सह्या आठवल्या !

बाकी अवांतर : दान दुहेरी उपयोगी पडते (घेणार्याला एकदा, आणी देणार्याला एकदा (समाधानामुळे))

पैसा's picture

27 Nov 2013 - 9:48 am | पैसा

परंतु दान स्वीकारणारा कनिष्ठ का समजला जातो? "एक वेळ भिक्षा मागावी पण दान घेऊ नये" अशी काहीशी वाक्ये वाचली आहेत...

नक्की कुठे वाचलंत सांगू शकाल का? कारण कोणत्याही परिस्थितीत भीक मागणे स्वीकारार्ह नाही. मात्र मोठमोठ्या समाजोपयोगी संस्था चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दानांची आवश्यकता भासतेच.

अगदी खेड्यातही रस्ते बांधणे इ. कामांसाठी लोक पैसे देऊ शकत नसतील, पण श्रमदान तर करतातच. दान अमूक एका गोष्टीचं होतं असंही नाही. कर्ण सर्व याचकांना दान देत असे असे म्हणतात. इंद्र कर्णाकडे आला तो याचक होऊन असे म्हटले आहे. भिक्षुक होऊन आला असे नाही. कारण इंद्राला स्वतःचा जीव जगवण्यासाठी कवचकुंडले नको होती तर त्याचा उद्देश अर्जुनाला धोका होऊ नये हा होता.

यावरून भीक ही स्वतःसाठी मागितली जाते तर दान हे दुसर्‍या काही उद्देशाने, तिसर्‍या कोणाचे भले व्हावे यासाठी असा काहीसा अर्थ मला तरी लागतो. त्यामुळे दान हे भीक मागण्यापेक्षा वाईट कसे याचा उलगडा होत नाही.