साहित्यः
१ कोवळा दुधी
२ टोमॅटो बारीक चिरलेले
१ कांदा बारीक चिरलेला
३-१/२ टेस्पून बेसन
१ टेस्पून काजू
२-३ लसूण पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
१/२ मिरची
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
१-१/२ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून पंजाबी गरम - मसाला (नसल्यास रोजचा गरम - मसाला वापरावा)
मीठ चवीनुसार
१ टीस्पून कसूरीमेथी
बारीक चिरलेली कोथींबीर
तेल
पाकृ:
प्रथम दुधीचे साल काढून किसून घ्या.
हलकेच पिळून रस काढून घ्या.
दुधीच्या किसात आता बेसन, थोडा गरम - मसाला, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालून कोफ्ते तयार करून घ्या.
तुम्ही कोफ्ते डीप फ्राय करु शकता. मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे.
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, कांदा, आले + लसूण, मिरचीचा तुकडा आणी काजू घाला.
थोडेच पाणी घालून मुलायम वाटून घ्या.
कढईत तेल गरम करा व जीर्याची फोडणी करा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगला परतून घ्या
त्यात आता उरलेले लाल तिखट, गरम - मसाला, धणेपूड, मीठ, कसूरीमेथी चुरडून घाला व तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
त्यात दूधीचा रस व थोडे पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद गॅसवर शिजू द्या. ( ग्रेव्ही कितपत दाट / पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला.)
सर्व्ह करायच्या ५ मिनिटे आधी गरम ग्रेव्हीत तयार कोफ्ते घाला. खूप आधीपासून घातले तर कोफ्ते मऊ होऊन फुटू शकतात.
वरून कोथींबीर पेरा व नान, रोटीबरोबर दुधी कोफ्ता करी सर्व्ह करा :)
दूधीचे कोफ्ते चटणीबरोबर ही नुसते खायला छान लागतात.
प्रतिक्रिया
16 Nov 2013 - 5:08 pm | स्पंदना
आहा!
सरस!! काय फोटोज आहेत!!
दिल कोफ्ता-नान हो गया!!
16 Nov 2013 - 7:43 pm | पप्पु अंकल
+१०००
शब्द संपले.....
16 Nov 2013 - 5:11 pm | त्रिवेणी
नेहमी नेहमी वेगळी प्रतिक्रिया काय द्याची. ते नान ची पण रेसिपी दे ना.
16 Nov 2013 - 5:34 pm | शिद
झकास्स्स्स्स्स...चं!!! <जिभल्या चाटणारी स्मायली कल्पावी>
16 Nov 2013 - 5:35 pm | शिद
जिभल्या चाटणारी स्मायली कल्पावी
16 Nov 2013 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा
16 Nov 2013 - 6:37 pm | रेवती
वाह! सुरेख फोटू. पाकृ माझ्याकडेही अशीच आहे पण मनासारखे कधी झाले नाहीत गं. आता अगदी हेच प्रमाण घेऊन करून बघते.
16 Nov 2013 - 8:00 pm | इष्टुर फाकडा
आजच करणेत येईल. खूप दिवस तुमच्या पाक्रुची वाट बघत होतो ! नेहमीप्रमाणेच भारी :)
16 Nov 2013 - 8:06 pm | प्यारे१
कत्रिना कैफ सुंदर दिसतेच्च्च्च.
सानिका ची पाकृ नेटकी नि देखणी असतेच्च्च्च्च.
नथिंग न्यू.
>>>मी आप्पेपात्रात कमी तेलात तळून घेतले आहे.
हा बदल आवडला. :)
16 Nov 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि
आयडीया एकदम झक्कास...
17 Nov 2013 - 2:48 pm | खादाड
फोटो नेहेमीप्रमाणे भारी !! :)
17 Nov 2013 - 3:59 pm | अजया
सानिका,आजच केली होती. मस्त झाली. तुझे प्रमाणही अगदी परफेक्ट आहे! फोटोसाठी कॅमेरा आणेपर्यंत लेकाने कोफ्ते गट्टम करायला सुरुवात केली,त्यामुळे फोटो बाजुलाच रहिला,कोफ्ते वाचवता,वाचवता!!
19 Nov 2013 - 5:09 am | सानिकास्वप्निल
बनवून बघीतलीस आणी आवडली पाकृ म्हणून धन्यवाद ग :)
18 Nov 2013 - 3:43 pm | Mrunalini
वा वा.... सहिच.. मस्त दिसतायत कोफ्ते. :)
18 Nov 2013 - 6:57 pm | मधुरा देशपांडे
मिपावर नवीन आहे परंतु याआधीच्या तुमच्या काही पाककृती करून पहिल्या आहेत. त्यामुळे ही प्रतिक्रिया सर्वच पाककृतींसाठी. कोफ्ते करून बघेन नक्की.
19 Nov 2013 - 5:26 pm | हासिनी
खतरा फोटो आलाय शेवटचा.मस्त दिसतेय डिश अगदी.
करून पहायची आहे.
:)
20 Nov 2013 - 2:54 pm | पियुशा
नुसत्या रेसेप्या काय दाखवतेस ग ? कधी तरी आमंत्रण तरी दे जेवणाच ;)
मस्त रेसेपि !
20 Nov 2013 - 3:52 pm | सानिकास्वप्निल
अग्गो बाई!! तूला आता आमंत्रण हवे होय...यायचे की कधीही :)
धन्स..
20 Nov 2013 - 4:11 pm | कपिलमुनी
तोंपासु !
विकांताला करण्यात येईल ..
20 Nov 2013 - 4:39 pm | झकासराव
लाळेचा झरा सुरु झाल... :)
20 Nov 2013 - 7:16 pm | रेवती
काल दुधी घेऊन आलीये. सानिके, तू वापरलेल्या दुधीचे वजन किती असेल? हनुमानाची गदा असावी तसा मला मिळालाय.
20 Nov 2013 - 11:44 pm | सानिकास्वप्निल
दुधीचे वजन जवळ - जवळ ४०० ग्रॅ होतं.
21 Nov 2013 - 12:21 am | रेवती
ओक्के. आता करते ही पाकृ.
21 Nov 2013 - 1:07 am | प्यारे१
दुधी उरला तर दुधी हलवा करा.
पिस्ता बर्फी न घालता.
कुठे गेले आद्य बल्लवाचार्य श्री श्री गणपा जी ठाकूर?
माझ्या लक्षात बिचार्याची तीच पा कृ राहिली आहे.
21 Nov 2013 - 8:48 pm | रेवती
अहो प्यारेश्वर, दोन गदा आणाल्या होत्या दुधीच्या. एकाचा हलवा केलाय, पिस्ताबर्फी न घालता. दुसर्याची कोफ्ताकरी केली. गणपा सध्या सुट्टीवर असला म्हणून काय झालं, तो मिपा बघत असणारच! ;)
20 Nov 2013 - 8:40 pm | पैसा
दुधीची खीर नाहीतर गोड भाजी एवढेच करत आले इतकी वर्षे. हे कोफ्ते एकदा करून बघितले पाहिजेत!
21 Nov 2013 - 8:46 pm | रेवती
कालच ही करी करून बघितली. पहिल्यांदा मला दुधी कोफ्ते जमले आणि एकूणच पाकृ छान झाली. नुसते कोफ्ते खायला चांगले लागले. आता येकदम कान्फिडन्स आलाय जणु!
22 Nov 2013 - 1:40 pm | सानिकास्वप्निल
धन्यवाद रेवती :)
23 Nov 2013 - 3:31 pm | त्रिवेणी
तुमच्या कडच्या करीचा फोटू
21 Nov 2013 - 10:30 pm | निवेदिता-ताई
झकास................ :)
22 Nov 2013 - 4:36 pm | सूड
कोफ्ते करुन पाहीन, तळून होईस्तवर र्हायलेच शिल्लक तर करीचं बघावं ;)
22 Nov 2013 - 8:15 pm | सुहास..
भोपळ्याशी शालेय जीवनापासुन घट्ट नाते असल्याने भोपळा कधीच आवडला नाही ;)
हा प्रकार मात्र मस्त आहे ..करके देखेंगे :)
24 Nov 2013 - 9:04 am | मदनबाण
मला दुधी अजिबात आवडत नाही त्यामुळे पास !
1 Dec 2013 - 12:33 pm | सुहास्य
दुधि चे कोफ्ते करताना ते गोल गोल करणे ही एक कलच आहे ...अत्त आपे पात्र वपरुन मस्त गोल गोल करत आले ....मस्त आयडियाची कलपना ...:) :)
31 Dec 2013 - 9:48 pm | आनंदराव
आमच्या सौं नी आज केली होती.
31 Dec 2013 - 10:07 pm | आनंदराव