मिपाकरांच्या माहितीकरता...

आणिबाणीचा शासनकर्ता's picture
आणिबाणीचा शासनकर्ता in काथ्याकूट
18 Jul 2008 - 7:30 pm
गाभा: 

मिपाकरांच्या माहितीकरता -

मिपावरील सध्याच्या कार्यकारी मंडळात काही बदल केले आहेत. काही नावे कमी केली आहेत तर काही नव्याने घातली आहेत. सध्या या कार्यकारी मंडळातील मंडळी खालीलप्रमाणे आहेत.

चतुरंग,
केशवसुमार,
धोंडोपंत,
विकास,
नीलकांत,
प्रा डॉ दिलिप बिरुटे
प्रियाली
विसोबा खेचर.

मिपावर टाकल्या जाणार्‍या लेखांमध्ये व प्रतिसादांमध्ये गरज वाटल्यास योग्य ते बदल करण्याचा, किंवा वेळप्रसंगी ते संपूर्ण लेखनच काढून टाकण्याचा या मंडळींना पूर्ण अधिकार आहे. तसेच सभासदांना काही तांत्रिक अडचण आल्यास (उदा चित्र टाकणे वगैरे,) तर सभासद मंडळी या कार्यकारी मंडळापैकी कुणाही सदस्याला पोष्टकार्ड अथवा खरड लिहून कळवू शकतात.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

ही मंडळी मिसळपावाचे कार्य वेळात वेळ काढून आपुलकीने आणि चोख बजावतील याबद्दल पूर्ण विश्वास वाटतो.

नंदन's picture

18 Jul 2008 - 11:17 pm | नंदन
ऋषिकेश's picture

19 Jul 2008 - 10:01 am | ऋषिकेश

असेच म्हणतो..
सर्व नव्या मंडळींना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन..

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वरदा's picture

18 Jul 2008 - 7:58 pm | वरदा

नवीन आणि जुन्या कार्यकारी मंडळ सदस्यांचे अभिनंदन....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

एकलव्य's picture

19 Jul 2008 - 10:03 am | एकलव्य

नवीन आणि जुन्या कार्यकारी मंडळ सदस्यांचे अभिनंदन....

आमच्याही अशाच शुभेच्छा!

प्रमोद देव's picture

18 Jul 2008 - 7:58 pm | प्रमोद देव

कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा!
माझ्याकडून आपल्याला अपेक्षित सहकार्य नेहमीच मिळेल ही खात्री बाळगा!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मुक्तसुनीत's picture

18 Jul 2008 - 8:01 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो .

मिसळपावच्या इतिहासातील हे महत्त्वाचे आणि पुढचे पाऊल ठरावे.

ध्रुव's picture

18 Jul 2008 - 8:05 pm | ध्रुव

मिसळपावच्या इतिहासातील हे महत्त्वाचे आणि पुढचे पाऊल ठरावे.
असेच.

सर्व मंडळींना शुभेच्छा.
--
ध्रुव

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jul 2008 - 8:05 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत... सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

प्रमोद देव's picture

18 Jul 2008 - 8:32 pm | प्रमोद देव

तात्या ह्या कार्यकारिणीतलं स्त्रियांचं प्रतिनिधित्व अजून वाढवता येणार नाही काय?

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

टारझन's picture

18 Jul 2008 - 8:39 pm | टारझन

प्रमोद सर मुद्याचे कारण समजू शकलो नाही ! स्त्रीया जास्त असल्याने काय फरक पडेल ? ( हा आता त्या जर गृहीणी असतील तर थोडा जस्त वेळ देऊ शकतील, इतकच)

(स्त्री-पुरूष भेदभाव न माननारा) कुबड्या खवीस

तू भारी ...तर जा घरी...

प्रमोद देव's picture

18 Jul 2008 - 8:48 pm | प्रमोद देव

अहो आरक्षण म्हणून नाही तर समानता म्हणून मी असं म्हटलं! (ह्यातून वाद निर्माण व्हावा अशी मुळीच इच्छा नाही आणि दुर्दैवाने तसा होणार असेल तर संपादकांनी माझा प्रतिसाद त्वरीत उडवून टाकावा ही विनंती.)
इथल्या स्त्री सदस्याही मिपावर सक्रिय आहेत आणि त्याही कोणत्याच बाबतीत मागे नाहीयेत. तेव्हा त्यांच्यावरही जबाबदारी सोपवायला हरकत नसावी इतकेच.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

सुचेल तसं's picture

19 Jul 2008 - 9:30 am | सुचेल तसं

प्रमोदकाकांशी सहमत.

मला वाटतं की प्राजु आणि/अथवा वरदा ह्या सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या नावाचा विचार केला जावा.

http://sucheltas.blogspot.com

प्राजु's picture

18 Jul 2008 - 9:52 pm | प्राजु

देव काकांशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 8:03 pm | केशवसुमार

दंगा करणार्‍या मुलाला वर्गाचा मॉनिटर करतात!! 8}
कोण म्हणाले रे हे ?? जरा समोर तर ये :W
(वर्गात दंगा करणारा)केशवसुमार [(

मुक्तसुनीत's picture

18 Jul 2008 - 8:18 pm | मुक्तसुनीत

आधी होता केशा
दैवयोगे जाहाला खाशा
तरी त्याचा येळकोट जाईना !
:-)

शितल's picture

19 Jul 2008 - 6:04 am | शितल

केशवसुमारजी,

लै भारी
आता पुढच्या वेळी तुम्हाला त्या म्॑डळात नक्की जागा देऊ. :)

शितल's picture

19 Jul 2008 - 6:05 am | शितल

अरे तुम्ही तर अग्रक्रमावर आहात द्॑गा करण्यात

विजुभाऊ's picture

18 Jul 2008 - 8:13 pm | विजुभाऊ

दंगा करणार्‍या मुलाला वर्गाचा मॉनिटर करतात =)) =)) =))

अरे बापरे ( मेलो आता बाई मारणार ) मी नाय मी नाय मी नाय
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सर्किट's picture

18 Jul 2008 - 11:17 pm | सर्किट (not verified)

नवीन मंडळाचे अभिनंदन. मंडळाची नावे जाहीर केल्याने मंडळींवरची जबाबदारी वाढलेली आहे, पण तरी ते मिसळपावाच्या निश्चित धोरणाची योग्य ती अंमलबजावणी करतील, असा विश्वास वाटतो.

- सर्किट

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 11:31 pm | बेसनलाडू

(अभिनंदक+शुभेच्छुक)बेसनलाडू

देवदत्त's picture

19 Jul 2008 - 12:13 am | देवदत्त

कार्यकारी मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा :)

विजुभाऊ's picture

19 Jul 2008 - 3:04 pm | विजुभाऊ

सर्वाना शुभेच्छा
कार्यकारीणीचा कालावधी काय असतो? सदस्य होण्यासाठी काय निकष आहेत हे समजेल काय ? त्यांच्यावर कोणत्या जबाबदार्‍या असतात? सदस्यांची निवड कशी होते?
कधीकाळी कोण्या सदस्याला कार्यकारणीत यावेसे वाटले तर त्याला मार्गदर्शन होईल
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

छान छान! नवीन कार्यकारी मंडळाला शुभेच्छा!

(स्वगत - रंगा, हुरळून जाऊ नकोस, दोन दोन विडंबकांना एकदम वेसण घालण्याची ही एक चाल असू शकते तेव्हा सावध रहा आणि कच्च्या मालाचा शोध चालूच ठेव! :B )

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

22 Jul 2008 - 4:41 am | पिवळा डांबिस

वरील संपूर्ण संपादकमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!

मिपावर टाकल्या जाणार्‍या लेखांमध्ये व प्रतिसादांमध्ये गरज वाटल्यास योग्य ते बदल करण्याचा, किंवा वेळप्रसंगी ते संपूर्ण लेखनच काढून टाकण्याचा या मंडळींना पूर्ण अधिकार आहे.
एक सूचना: जर संपादकमंडळाला टाकल्या गेलेल्या लेखात काही बदल करण्याची गरज भासली तर त्यांनी तो परस्पर करण्याआधी मूळ लेखकाला व्यनि पाठवून त्यांचे हेतू कळवावेत. जर लेखकाला तो बदल मान्य नसेल तर त्याला स्वत:हूनच तो लेख मागे घेण्याची मुभा असावी. कदाचित लेखकाच्या आपल्या लेखात (विशेषतः वैचारिक लेखनात) प्रकट केलेल्या भावना जिव्हाळ्याच्या असू शकतात आणि अशा प्रसंगी तो आपला लेख बदललेल्या स्वरूपात बघण्यापेक्षा संपूर्णतः मागे घेणे तो जास्त पसंत करू शकतो. सबब, परस्पर बदल केलेला लेख त्या लेखकाच्या नांवावर लागला जाऊ नये!

कबीरजीने कहा है,
"ऐसी बानी बोलिये की कोई न बोले झूठ,
और ऐसी जगह बैठीये की कोई न बोले ऊठ"

कबिराचा चेला,
डांबिसकाका
:)

विकास's picture

22 Jul 2008 - 5:45 am | विकास

एक सूचना: जर संपादकमंडळाला टाकल्या गेलेल्या लेखात काही बदल करण्याची गरज भासली तर त्यांनी तो परस्पर करण्याआधी मूळ लेखकाला व्यनि पाठवून त्यांचे हेतू कळवावेत. जर लेखकाला तो बदल मान्य नसेल तर त्याला स्वत:हूनच तो लेख मागे घेण्याची मुभा असावी. कदाचित लेखकाच्या आपल्या लेखात (विशेषतः वैचारिक लेखनात) प्रकट केलेल्या भावना जिव्हाळ्याच्या असू शकतात आणि अशा प्रसंगी तो आपला लेख बदललेल्या स्वरूपात बघण्यापेक्षा संपूर्णतः मागे घेणे तो जास्त पसंत करू शकतो. सबब, परस्पर बदल केलेला लेख त्या लेखकाच्या नांवावर लागला जाऊ नये!

हे १००% टक्के मान्य! या व्यतिरीक्त जो कोणी सभासद असे लेखन उडवेल त्याने त्या मोकळ्या झालेल्या जागेत तसे स्पष्ट नावानिशी लिहावे. त्यामुळे कोणी उडवला, कसा उडवला ह्या संबंधात गोंधळ उडणार नाही.

दुसरा भाग म्हणजे लेख उडवणे हे इंडीयन पिनल कोड मधील फाशीच्या शिक्षेप्रमाणे असावे: रेअरेस्ट ऑफ दी रेअर!

मी हे दोन्ही नियम नक्की पाळेन असा शद्ब देतो.

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 5:48 am | प्रियाली

दुसरा भाग म्हणजे लेख उडवणे हे इंडीयन पिनल कोड मधील फाशीच्या शिक्षेप्रमाणे असावे: रेअरेस्ट ऑफ दी रेअर!

कोणत्या निकषावर उडवायचे?

खालील २ बाबींत दुमत नसावे -

१. मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय ढापलेले साहित्य
२. न वाचता येण्याजोगे साहित्य (आज असा लेख आला होता)

या दोन्ही प्रकारचे साहित्य मला सहज काढता येईल.

या व्यतिरिक्त अश्लील, भावना दुखावणारे इ. इ. साहित्य काढायचे का? काढायचे तर कोणत्या निकषांवर? - हे निकष कोण आणि कसे ठरवणार?

विकास's picture

22 Jul 2008 - 7:18 am | विकास

कुठल्याही प्रकाराचा लेख उडवण्याआधी या संबंधात एकत्रीत निर्णय घेता येतात आणि घ्यावेत असे वाटते. फारच अश्लील/अश्लाघ्य वगैरे असला तर तो लगेच॑ काढून टाकावा पण त्याआधीपण आधी म्हणल्याप्रमाणे जो कोणी काढेल त्याने/तिने तसे "मी हे केले, का केले" हे तेथेच जाहीरपणे सांगावे.

तसे नसले तर दुसरा उपाय म्हणजे आधी म्हणल्याप्रमाणे एकत्रीत निर्णय. त्यात बहुमत मिळेपर्यंत थांबून अथवा कालावधीची मर्यादा देऊन (उ.दा. : "जुलै २२, भारतीय वेळेच्या दुपारच्या ५:०० पर्यंत" असे काहीतरी) तो पर्यंत थांबवून उडवावा. या बाबतीतपण हा बहुमत असल्यामुळे संपादक समितीचा निर्णया आहे असे जाहीर सांगून उडवावे.

या दोन्ही वेळेस निकष सांगावेत. अगदी अल्पमतात असले तरी तसे देखील सांगावे की का उडवावासा वाटला नाही वगैरे...

मी जर कुठले लिखाण काढले तर मी तसे जाहीरपणे सांगीन याची जाहीर खात्री देतो आणि तशीच इतरांनीपण द्यावी. तसे न केल्याने येथे विसंवाद घडून गोंधळ झाला होता. तो न होण्यासाठी आपण घेत असलेल्या "ऍक्शन"ची जबाबदारी घेण्याची तयारी असावी.

मुक्तसुनीत's picture

22 Jul 2008 - 7:54 am | मुक्तसुनीत

विकासरावानी सुचविलेला मार्ग म्हणजे संयत , समतोल , सौजन्यशील विचारसरणीचा वस्तुपाठ आहे. मिपाच्या एके काळच्या खळाळाणार्‍या प्रवाहाचे एका नदात हळुहळू रूपांतर होत असताना विकासरावांसारखे घटक अत्यावश्यक आहेत.

झंप्या's picture

22 Jul 2008 - 7:59 am | झंप्या

वा वा वा! विकासराव तुमच्यासारखेच बाकीची मंडळी देखिल ऍक्शन घेतील अशी अपेक्षा आहे

येथील वाक्य उडवले गेले आहे! बाळ झंप्या, मिपावर अजून लोकशाही सुरू झालेली नाही हे लक्षात घे! तुझ्यासारखी काही भिकारचोट मंडळी फक्त मिपाचा विषय निघाला की इथे येऊन मिपाविरुद्ध हवं ते बरळून जातात म्हणून माझ्या अनुपस्थितीत ते उडवून लावण्याकरता काही मंडळींना अधिकार दिले आहेत असं समज! :) -- तात्या.

शिव्यांविषयी नविन मंडळाचे काय धोरण असणार आहे?

बाकी संपादकाही आपापली मते नोंदवण्याचे कष्ट घेतील का?

आता आमचे प्रतिसाद (ह्या प्रतिसादा सकट) उठसूठ उडवले जाणार नाहीत अशी अपेक्षा करावी का?

नाही, तूर्तास तरी अशी अपेक्षा करू नकोस! आणि हे समजूनच लिहिण्याचे कष्ट घे. कारण तुला लिहायला बरेच कष्ट पडतात, परंतु ते उडवून लावायला मला फक्त ५ सेकंद पुरतात!:) -- तात्या.

तुम्ही 'बहुमत' वगैरे शब्द वापरत आहात ते लोकशाहीत येतात इथे सध्या असलेल्या आणिबाणीची सांगता झाली असे समजावे का?

-झंप्या

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 3:46 pm | विसोबा खेचर

तुम्ही 'बहुमत' वगैरे शब्द वापरत आहात ते लोकशाहीत येतात इथे सध्या असलेल्या आणिबाणीची सांगता झाली असे समजावे का?

सध्या फक्त विचारविनिमय सुरू आहे, अद्याप लोकशाहीची सांगता झालेली नाही याची नोंद घ्यावी.

वरील कार्यकारी मंडळीतली मंडळी ही मिपाची हितचिंतक आहेत इतके जाणूनच त्यांना संपादनाचे अधिकार दिले आहेत! त्या अधिकारांचा ते कधीही गैरवापर करणार नाहीत याची खात्री आहे! मिपावरील सर्वसामान्य सभासदाने लिहिलेले, किंबहुना बरळलेले लेखन, आक्षेपार्ह वाटल्यास कुणाचीही परवानगी न घेता व कुंणालाही उत्तरदायी न राहता येथून काढून टाकण्याचे/अप्रकाशित करण्याचे पूर्ण अधिकार कार्यकारी मंडळाला आहेत. त्याकरता कार्यकारी मंडळातल्या संबंधित सभासदाला कार्यकारी मंडळातल्या इतर सभासदांशी चर्चा किंवा त्यांची परवानगी घेणे आवश्यक नाही! कारण आंतरजालावर प्रत्येकजणच काही सतत उपलब्ध नसतो, त्यामुळे परवानगी वगैरे घेत बसेस्तोवर मध्ये बराच वेळ लागू शकतो व ते आक्षेपार्ह लेखन तसेच प्रकाशित अवस्थेत अधिक काळ राहते! असे होऊ नये म्हणूनच कुणालाही कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही! काय आक्षेपार्ह अन् काय नाही, हे ठरवण्याचा तारतम्यभाव कार्यकारी मंडळातील प्रत्येक सभासदाकडे आहे हे जाणूनच आम्ही हे लिहीत आहोत!

कार्यकारी मंडळातील एखाद्या सभासदाचे लेखन जर मंडळातील इतर सभासदांना आक्षेपार्ह वाटले तर मात्र त्यांनी ते परस्पर काढून न टाकता अप्रकाशित करावे व तसे त्या सभासदाला कळवावे. परंतु असे सहसा होणार नाही कारण कार्यकारी मंडळातील सगळी मंडळी अत्यंत समंजस आहेत व वादा/भांडणाचे विषय वैयक्तिक पातळीवर न आणता योग्य त्या मुद्द्यातच मांडणारी आहेत, हे जाणूनच या कार्यकारिणीतल्या प्रत्येक सभासदाची निवड केली गेली आहे!

विसोबा खेचर हे सदस्य क्वचित प्रसंगी ह्याला अपवाद ठरतात व अचानक वैयक्तिक पातळीवर येऊन काहीही लिहू, बरळू शकतात आणि म्हणूनच त्यांचे आक्षेपार्ह वाटणारे लेखन कार्यकारी मंडळातील इतर सर्व सदस्यांना अप्रकाशित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत!

असो, मिपावरील लोकशाहीची पहिली फेज संपलेली असून येथे अद्याप आणिबाणीच सुरू आहे याची नोंद घ्यावी...!

अर्थात ज्यांना इथे येऊन निवांतपणे काही साहित्यिक, वैचारिक वाचायचे आहे, लिहायचे आहे, चर्चा-विचारविनिमय करायचा आहे त्यांच्या अभिव्यक्तिकरता मिपावर आजही पूर्ण स्वातंत्र्यच आहे! परंतु जर कुणाची केवळ मिपासंबंधीच काही म्हणणे, तक्रार असेल तर ती त्यांनी मला पत्राने अथवा खरडीने कळवावी. इष्ट आणि व्यवहार्य सूचनेचा अवश्य विचार केला जाईल!

परंतु त्याकरता लोकशाही पद्धतीने जाहीर विचारविनिमय करण्याची परवानगी आणिबाणीच्या गुणधर्मानुसार अद्याप तरी बहाल करण्यात आलेली नाही याचीही अवश्य नोंद घ्यावी!

असो,

तात्या.

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 3:59 pm | प्रियाली

सध्या फक्त विचारविनिमय सुरू आहे, अद्याप लोकशाहीची सांगता झालेली नाही याची नोंद घ्यावी.

सहमत आहे.

कार्यकारी मंडळातल्या संबंधित सभासदाला कार्यकारी मंडळातल्या इतर सभासदांशी चर्चा किंवा त्यांची परवानगी घेणे आवश्यक नाही! कारण आंतरजालावर प्रत्येकजणच काही सतत उपलब्ध नसतो, त्यामुळे परवानगी वगैरे घेत बसेस्तोवर मध्ये बराच वेळ लागू शकतो व ते आक्षेपार्ह लेखन तसेच प्रकाशित अवस्थेत अधिक काळ राहते!

अगदी खरे आहे आणि याची प्रचीती पूर्वी घेतली आहे. माझ्यामते चर्चा करत बसण्यापेक्षा लेखन अप्रकाशित करावे.

लोकशाही पद्धतीने जाहीर विचारविनिमय करण्याची परवानगी आणिबाणीच्या गुणधर्मानुसार अद्याप तरी बहाल करण्यात आलेली नाही याचीही अवश्य नोंद घ्यावी!

नोंद घेतली आणि त्याबद्दल तक्रार नाही. माझ्या अखत्यारित मी

१. लेखाचे सुशोभीकरण, तांत्रिक अडचण इ. बाबत मदत करण्यास तत्पर असेन.
२. अपुरे लेख, इतर स्थळांवरील इतर लेखकांचे ढापलेले लेख मी काढेन.
३. संपादन सहाय्य पुरवेन.

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 4:05 pm | विसोबा खेचर

माझ्या अखत्यारित मी

१. लेखाचे सुशोभीकरण, तांत्रिक अडचण इ. बाबत मदत करण्यास तत्पर असेन.
२. अपुरे लेख, इतर स्थळांवरील इतर लेखकांचे ढापलेले लेख मी काढेन.
३. संपादन सहाय्य पुरवेन.

इटस् सो नाईस ऑफ यू! :)

आपल्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल याची खात्री आहेच!

आपला,
(प्रियालीचा मित्र) तात्या.

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 3:07 pm | प्रियाली

मला असे वाटते -

एखाद्या वेळेस फक्त एक संपादक हजर असू शकतो आणि लेखन त्याला ताबडतोब काढण्याजोगे आहे असे वाटू शकते. लेखनावर एकदा प्रतिसाद येऊ लागले की तो लेख काढल्याचे दु:ख लेखक आणि प्रतिसादी दोघांनाही होते.

अशावेळेस माझ्यामते लेखन अप्रकाशित करून लेखकाला व्य. नि. किंवा खरड लिहून लेखन अप्रकाशित केल्याबद्दल कळवावे आणि इतर संपादकांशी संपर्क साधावा. जर, संपादकांचे मत लेख प्रकाशित करण्याकडे पडले तर तो लेख पुन्हा प्रकाशित करता येईल.

विकास's picture

22 Jul 2008 - 6:50 pm | विकास

अशावेळेस माझ्यामते लेखन अप्रकाशित करून लेखकाला व्य. नि. किंवा खरड लिहून लेखन अप्रकाशित केल्याबद्दल कळवावे आणि इतर संपादकांशी संपर्क साधावा.

इतकेच माझे म्हणणे आहे. व्यावहारीक दृष्ट्या सर्वसंमती/बहुमत वगैरे कायम होईलच अशातला भाग नाही. पण जेंव्हा केंव्हा एखादे काढले जाईल तेंव्हा कोणी आणि का काढले हा त्या काढण्यार्‍या व्यक्तीने संदर्भ ठेवून दिला तर चांगले होईल.

हे सर्व लिहायचे कारण प्रियालीने दुसरीकडे म्हणल्याप्रमाणे आधीचे काही अनुभव आहेत. येथे संपादक मंडळ काय करेल, कसे करेल ही चर्चा करण्याचा हेतू पण नव्हता आणि नाही. केवळ पिडांनी दिलेल्या प्रतिसादातील मुद्दे पटल्याने त्याला प्रतिसाद देताना लिहीले गेले इतकाचआहे.

याचा संबंध आणिबाणी आहे का लोकशाही आहे याच्याशी नाही. तर जी जबाबदारी आहे ती पाळताना काही नियम किमान काय असावेत या संदर्भात ते लिहीले गेले.

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 6:55 pm | प्रियाली

माझ्या वरील प्रतिसादात नाही. ज्यांच्या प्रतिसादात आहे त्यांनाही लिहा. :)

प्रियालीताई बर्‍या आहेत हो त्यांच्या नावावर काहीही खपवले तर चालते असा गैरसमज कृपया नको.

येथे संपादक मंडळ काय करेल, कसे करेल ही चर्चा करण्याचा हेतू पण नव्हता आणि नाही. केवळ पिडांनी दिलेल्या प्रतिसादातील मुद्दे पटल्याने त्याला प्रतिसाद देताना लिहीले गेले इतकाचआहे

.

सहमत आणि असहमत. पिडांनी प्रतिसाद दिल्याने सहमतीजनक उपप्रतिसाद आला हे ठीक परंतु संपादनाबाबत चर्चा करण्यास हा लेख काहीही गैर नाही. तो संपादनाशीच संबंधीत आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर केसचे उदाहरण आल्याने त्या अनुषंगाने आणखी प्रतिसाद येणे स्वाभाविक आहे.

विकास's picture

22 Jul 2008 - 7:12 pm | विकास

माझ्या वरील प्रतिसादात नाही. ज्यांच्या प्रतिसादात आहे त्यांनाही लिहा.

असे म्हणून प्रतिसाद उडवला नाहीत म्हणून आभारी आहे! :-) (ह.घ्या.)

बरेच प्रतिसाद सकाळच्या प्रहरी वाचले गेले. त्यातील प्रत्येकाला उत्तर देयचे म्हणजे जास्त झाले असते. त्यात आपण मांडलेल्या मुद्याशी (फॉर अ चेंज :)) सहमती असल्याने त्यात उपप्रतिसाद दिला इतकेच.

तेंव्हा हा डिसक्लेमरः आणिबाणि वगैरे संबंधातील विधानांचा आणि प्रियालींचा काही संबंध होता असे मला म्हणायचे नव्हते. ;)

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 7:14 pm | प्रियाली

त्यात आपण मांडलेल्या मुद्याशी (फॉर अ चेंज ) सहमती असल्याने त्यात उपप्रतिसाद दिला इतकेच.

हो ना! =D>

हा ही प्रतिसाद उडवत नाही बरं का! ;)

पिवळा डांबिस's picture

22 Jul 2008 - 10:12 am | पिवळा डांबिस

प्रिय प्रियालीताई,
आपण निर्देशित केलेल्या दोन्ही केसेसमध्ये दुमत होण्याचा प्रश्नच नाही.....
माझा रेफरन्स जे लेख ओरिजिनली लेखकाचे आहेत पण जे फारसे पॉप्युलर होण्याची शक्यता नाही वा एकंदरीत संपादकमंडळाच्या मताविरुद्ध जाणारे आहेत अशा लेखांसंबंधी होता....
कॄपया हे लक्षात घावे की हा फक्त "पिवळा डांबिस" ह्या लेखकापुरता मर्यादित प्रश्न नाही. मला खात्री आहे की मिपामालक त्या लेखकाचे लेख तसेच काही खास कारण असल्याशिवाय संपादित करणार नाहीत. प्रस्तुत लेखकानेही मिपामालकांच्या सहनशीलतेचा अंत कधी पाहिलेला नाही. परंतू सर्व लेखकांच्या वतीने हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही मर्यादा उल्लंघन झाले असेल तर माफ करा.....

आता आपण लिहिल्याप्रमाणे इतर निकष कुणी ठरवायचे व कसे?
माझ्या मते हेच तर संपादकमंडळाच्या पुढ्यातील मुख्य आणि निकडीचे काम आहे.....
तुम्हाला नाही वाटत असे?
:)

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 2:50 pm | प्रियाली

सर्वप्रथम मी प्रश्न विकास यांना विचारले. ते संपादन मंडळात असल्याने. अर्थात, आपण उत्तर दिलेत तरी हरकत नाही.

मी आपल्या प्रतिसादाबद्दल काहीच बोललेले नाही तेव्हा गैरसमज नसावा. त्यामुळे मी पुढील वाक्याकडे लक्ष देत नाही -

कॄपया हे लक्षात घावे की हा फक्त "पिवळा डांबिस" ह्या लेखकापुरता मर्यादित प्रश्न नाही. मला खात्री आहे की मिपामालक त्या लेखकाचे लेख तसेच काही खास कारण असल्याशिवाय संपादित करणार नाहीत. प्रस्तुत लेखकानेही मिपामालकांच्या सहनशीलतेचा अंत कधी पाहिलेला नाही. परंतू सर्व लेखकांच्या वतीने हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही मर्यादा उल्लंघन झाले असेल तर माफ करा.....

माझ्या मते हेच तर संपादकमंडळाच्या पुढ्यातील मुख्य आणि निकडीचे काम आहे.....
तुम्हाला नाही वाटत असे

मला असे वाटते म्हणूनच मी विचारून घेतले. मागे, असेच काहीसे झाल्याने येथील मूळ संपादक वैतागून निघून गेले होते.

आता पुढे,माझ्या प्रतिसादात मी विकास यांचेच वाक्य संदर्भ म्हणून उद्धृत केले आहे. त्याचे कारण ते रेअरेस्ट ऑफ द रेअर केसबद्दल बोलत आहेत. अश्लील आणि भावना दुखावणार्‍या लेखांबद्दल प्रत्येक व्यक्तिचे आपले मत असू शकते म्हणून प्रश्न विचारला.

असो, विकास यांच्या प्रतिसादातही आपल्या विषयी काहीच नाही. तेव्हा, प्रतिसाद वाचून कृपया तो कोणाला लिहिला आहे आणि का लिहिला असावा हे पहावे. नाहीतर जगातील प्रत्येक गोष्ट आपल्यालाच लागू होते असा गैरसमज होऊ शकतो.

कोलबेर's picture

22 Jul 2008 - 7:52 pm | कोलबेर

मागे, असेच काहीसे झाल्याने येथील मूळ संपादक वैतागून निघून गेले होते.

रांजणाच्या तळाशी बसलेला गाळ मुद्दाम दगड टाकून पुन्हा वर काढण्याची इच्छा नाही त्यामूळे जास्त खोलात जात नाही. पण संपादक वैतागले आणि सिस्टम फेल्युअर झाले ते मॅन्युअल ओव्हरराईडमू़ळे ..

मला काय म्हणायचे आहे ते प्रियालीताईंच्या लक्षात आले असावे. ;)

(वैतागलेला मूळ संपादक ?) कोलबेर :)

प्रियाली's picture

22 Jul 2008 - 7:54 pm | प्रियाली

माझ्या जबाबदार्‍या जाहिर केलेल्या आहेत. संकेतस्थळ चालकांविरुद्ध ब्र काढायचा नाही हे माझे धोरण तसे जुनेच. :D

(वैतागाच्या पार पलीकडे पोहोचलेली) प्रियाली

अनिल हटेला's picture

22 Jul 2008 - 7:27 am | अनिल हटेला

नवीन आणि जुन्या कार्यकारी मंडळ सदस्यांचे अभिनंदन....
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 7:40 pm | चतुरंग

कार्यकारिणीवरील सदस्य आपले लिखाण आकसाने काढून टाकतील की काय अशी भीती काही सदस्यांच्या मनात असेल तर ती अमान्य करण्याचे कारण नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण आले की शंका उत्पन्न होणे हा मानवी स्वभाव आहे. त्यावरचा उपाय म्हणजे कार्यकारणीवरच्या सदस्यांचे निर्णय हे जेवढे पारदर्शी असतील तेवढी विश्वासार्हता जास्त.
आता निर्णय पारदर्शी कसे ठेवता येतील ह्या बद्दल काही सूचना -
१ - अश्लील/अश्लाघ्य लिखाण - ताबडतोब काढून टाकणे.
२ - वैयक्तिक शेरेबाजी करणारे लिखाण/खोडसाळपणाने लिहिलेले - सदर सदस्याला व्य. नि. पाठवून जाणीव करुन देणे, योग्य बदल दिसल्यास ठीक अन्यथा तेवढे लिखाण काढून टाकणे.
३ - साहित्यचोरी - चोरी आहे ह्याची खात्री करुन ह्या प्रकारात लिखाण काढून सदस्याला व्य. नि. पाठवून तसे केल्याचे कळवावे.
४ -काही वेळा वर्तमानपत्रातला किंवा इतर ठिकाणचा दुवा देऊन ह्यावर आपले मत काय अशा स्वरुपाचे लिखाण (?) केले जाते - अशा ठिकाणी मूळ सदस्याने त्याचे/तिचे विचार आधी मांडावेत अन्यथा असे लिखाण ठेवावे किंवा नाही ह्याबद्दल कार्यकारिणी आपसात निरोपा-निरोपी करुन निर्णय करु शकेल.
लिखाण काढून टाकताना त्याठिकाणी कार्यकारिणीच्या सदस्याने आपले सदस्यनाव लिहून ते लिखाण का काढून टाकले आहे ते स्पष्ट लिहावे.
५ - नीलकांत/तात्या - 'कार्यकारिणी सदस्य' असा एक ग्रुप आय्-डी तयार करता येईल का? ज्यात कार्यकारणीतल्या सर्व सदस्यांना एकमेकात व्य. नि. पाठवताना प्रत्येक सदस्याला वेगवेगळा पाठवण्यापेक्षा एकच निरोप पाठवला की सगळ्यांना मिळून काम सुकर होईल.
(अर्थात एक काळजी घ्यावी लागेल - इतर कोणी चावटपणा करुन 'कार्यकारिणी सदस्य' ह्या नावाने सदस्य होऊ शकणार नाही ह्याची काळजी 'मिपा' चे सॉफ्टवेअर घेऊ शकले पाहिजे. नाहीतर गोंधळात गोंधळ!)

प्लेजिंग - मी एक जबाबदार सदस्य म्हणून संपादनाचे काम योग्य रीतीने करीन अशी ग्वाही देतो.
चतुरंग

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 7:56 pm | विसोबा खेचर

कृपया हा प्रतिसाद वाचावा, तूर्तास इतकेच पुरेसे आहे!

आपले अनेक मुद्दे चांगले आहेत परंतु ते सर्व मिपावर पूर्ण लोकशाही लागू होईल तेव्हाचे आहेत आणि तेव्हा त्याचा अवश्य विचार केला जाईल. तूर्तास तरी मिपावर अनिश्चित काळाकरता आणिबाणीच लागू आहे आणि आजपर्यंत जसे मिपाचे कामकाज सुरू राहिले तसेच यापुढेही सुरू राहील. मिपाचे सर्व सभासद हे मिपाचे मायबापच आहेत परंतु तूर्तास तरी मिपा कुठल्याच सभासदाला काहीच उत्तर देणे लागत नाही!

कार्यकारिणीवरील सदस्य आपले लिखाण आकसाने काढून टाकतील की काय अशी भीती काही सदस्यांच्या मनात असेल तर ती अमान्य करण्याचे कारण नाही.

मला तरी ही भिती अनाठायी वाटते! आणि त्यातूनच जर एखाद्याला अशी भिती वाटत असेल तर तूर्तास तरी तो त्याचा/तिचा प्रश्न आहे. मिपा किंवा मिपाची कार्यकारिणी कुणालाही उत्तर देणे लागत नाही! तूर्तास तरी मिपावर आणिबाणीच सुरू आहे हे वेळेवेळी स्पष्ट केलेले आहे! :)

तात्या.

योग्य वेळी ह्या मुद्द्यांचा विचार केला जाईल असे आपण म्हटले आहे ह्याची नोंद घेतली आहे, धन्यवाद!

चतुरंग