दैनिक सकाळ दि.२ नोव्हे. २००७
एकट्यानेच "समाजसेवा' केल्याने "घाट्या'तील "वाटे'करी संतापले!
पुणे, ता. १ - ठरलेल्या "वाट्या'त "घाटा' झाल्यामुळे महापालिकेतील एका समितीच्या माननीयांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाल्याची चर्चा सध्या महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे. .......
"दिलेला शब्द पाळा,' असा इशारा इतरांनी दिल्यामुळे तेथील प्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीनंतर "अँटीचेंबर' मधील बैठकीत प्रमुखांना हा जाब विचारण्यात आला, तेव्हा शब्द पाळण्याचे आश्वासन पुन्हा देऊन प्रमुखांनी अखेर या "बंडखोरांना' शांत केल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांपासून हे "वैचारिक मतभेद' सुरू आहेत. यावरून काही काळापूर्वी बालगंधर्व रंगमंदिरात झालेले "विचारमंथन' महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते.
तेव्हा याची चर्चा पुन्हा होऊ नये, यासाठी त्या बैठकीत तोडगा काढण्यात आला होता. त्यास उभयतांनी मान्यता दिली होती. त्यानुसार प्रमुखांनी ५५ टक्के, तर सदस्यांनी ४५ टक्के "समाजसेवा' करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक महिना- दीड महिन्यानंतर ठरल्यानुसार सर्व "कार्य' सुरळीत पार पडले. परंतु, मध्यंतरी प्रमुखांनी काही विषयांबाबत "समाजसेवे'ची सगळीच जबाबदारी आपल्या एकट्याच्या खांद्यावर उचलली. त्यामुळे इतरांना "त्यागा'ची संधी मिळाली. मात्र, सदस्यांनी मन मोठे करीत "सबुरी'ची भूमिका घेतली. मात्र, दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्यामुळे "गांजलेल्या' सदस्यांनी याचा जाब विचारण्याचा निर्णय घेतला. अखेर गेल्या आठवड्यातील बैठकीनंतर सदस्यांनी "अँटीचेंबर'मध्येच प्रमुखांसमवेत पुन्हा "विचारमंथन' केले. अखेर सदस्यांच्या या हाकेला "ओ' देऊन प्रमुखांनी पुन्हा दिलेला शब्द पाळण्याची हमी दिली, तेव्हाच हे "मंथन' थांबले. मात्र, या आश्वासनामुळे मिळालेली खुशी किती दिवस टिकणार, हा प्रश्न त्यांच्या मनात कायम असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिक्रिया
3 Nov 2007 - 6:50 pm | तो
बातमी आवडली. आता अवतरणातील शब्दांचे अर्थ सांगा पाहू..
4 Nov 2007 - 5:26 pm | प्रकाश घाटपांडे
या "टोपी" खाली दडलय? कुणी तरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय ? या गाण्याची आठवण आली कि नाही?
प्रकाश घाटपांडे
3 Nov 2007 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बातमी अधिक वाचनीय होते, असे वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4 Nov 2007 - 11:21 am | देवदत्त
सुरुवातीला मला वाटले की तुम्ही ती अवतरण चिन्हे टाकलीत.
मूळ बातमीतही तसेच पाहून गंमत वाटली.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद :)
4 Nov 2007 - 2:50 pm | संकेत
ही अवतरण चिन्हे "अशी' का? म्हणजे सुरुवातीला ड्बल कोट आणि शेवटी शिंगल? त्याला काही अर्थ आहे का?
4 Nov 2007 - 3:20 pm | प्रकाश घाटपांडे
ही अवतरण चिन्हे "अशी' का? म्हणजे सुरुवातीला ड्बल कोट आणि शेवटी शिंगल? त्याला काही अर्थ आहे का?
यात कुठलाही अर्थ / अनर्थ / अन्वयार्थ दडलेला नाही. स्वार्थ तर नाहीच नाही.
प्रकाश घाटपांडे
4 Nov 2007 - 4:48 pm | विसोबा खेचर
ही अवतरण चिन्हे "अशी' का? म्हणजे सुरुवातीला ड्बल कोट आणि शेवटी शिंगल? त्याला काही अर्थ आहे का?
मीही हेच विचारणार होतो...
तात्या.
23 Mar 2008 - 9:46 am | सृष्टीलावण्या
वाकवावी तशी वाकते हेच मराठीचे खरे वैभव... आता शहाणा शब्दच पहा ना..
शहाणा माझा बाळ,
शहाणाच आहेस,
कोण शहाणा लागून गेलास इ.इ.
म्हणूनच मी म्हणेन की वरील अवतरणे संदर्भाने खुलून दिसत आहेत.
>
>
मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...