मिस्त्री-मेहतां नी उधळलेली मुक्ताफ़ळे आणि ती चोखण्यातच धन्यता मानणारे मराठी महाभाग !
सुकेतु मेहता नावाच्या या माणसाने त्याच्या MAXIMUM CITY ( BOMBAY LOST AND FOUND) या पुस्तकात THE 1992-1993 RIOTS या नावाच्या प्रकरणात खालील मुक्ताफ़ळे मराठी माणसांच्या नावाने उधळलेली आहेत. त्यातील काही भाग हा मुळ व अनुवादा सहीत खालील प्रमाणे आहे. या संपुर्ण पुस्तकात या माणसाचा मराठी माणसांविषयी असाच विकृत दृष्टीकोण भरलेला आढळतो.
The Shiv Sena is made up mostly of Maharashtrian Hindus, who call themselves “sons of the soil.” The Maharashtrians were people who had been born here and were not consumed by immigrant striving:a race of clerks. Their ambitions were modest, practical: a not-too-long workday; a good lunch from the
tiffin sent from home at midday; one or two trips to the cinema a week; and, for their children, a secure government job and a good marriage. They did not crave designer clothes. They did not want to eat expensive foreign food at the Taj.
शिवसेना ही मुख्यत्वेकरुन अशा महाराष्ट्रियन हिंदुं चा भरणा असलेली संघटना आहे जे स्वत:ला “भुमिपुत्र” म्हणबुन घेतात. महाराष्ट्रियन हे असे लोक आहेत जे येथेच (मुंबई) त जन्मले आणि जे कधीही स्थलांतरा च्या संघर्षात उतरले नाहीत ही एक कारकुनांची जमात आहे. यांच्या (मराठी लोकांच्या) महत्वाकांक्षा म्हणजे अगदी मर्यादीत, व्यावहारीक, यांना कामाचे तास जास्त नकोत, एक घरुन आलेला डब्बा दुपारी चेपायचा, आठवड्यातुन एक-दोन दा सिनेमा ला गेले, मुलांसाठी एक चांगली सरकारी नोकरी आणि लग्न उरकल की झाल.यांनी कधीही डिझायनर कपड्यांची इच्छा नाही बाळगली. यांना कधी महागडे विदेशी फ़ुड ताज मध्ये जाउन खावे असे नाही वाटले.
I did not know many Maharashtrians when I was growing up. There was the world I lived in on Nepean Sea Road, and there was another world whose people came to wash our clothes, look at our electric meters, drive our cars, inhabit our nightmares. We lived in Bombay and never had much to do with Mumbai. Maharashtra to us was our servants, the banana lady downstairs, the textbooks we were forcefed in school. We had a term for them: ghatis—literally, the people from the ghats, or hills. It was also the word we used, generically, for “servant.” I was in the fourth standard when Marathi became compulsory.How we groaned! It was a servants’ language, we said. We told each other a story about its genesis. All
the peoples of India had their languages, except the Maharashtrians. They went to Shiva and asked to be given a language. The god looked around, saw some pebbles, threw them in his brass pot, and shook it around. “Here’s your language,” he said. What did we know of the language that contains the poetry of
Namdeo, Tukaram, Dilip Chitre, Namdeo Dhasal?
मी जेव्हा मोठा होत होतो तेव्हा मला फ़ारसे महाराष्ट्रियन लोक माहीत नव्हते, मि नेपियन सी रोड वरील एका वेगळ्या च विश्वात राहत होतो. आणि या मराठी लोकांचे एक दुसरे च विश्व होते आणि या दुसर्याा विश्वातील लोक हे मराठी लोक आमचे कपडे धुण्यासाठी येत असत, आमचे इलेक्ट्रीक मीटर्स तपासत, आमच्या गाड्या चालवित असत ( ड्रायव्हर्स), आणि हे (मराठी) आमच्या भितीदायक दु:स्व्प्नांचा एक भाग होते.आम्ही कायम “बॉंम्बे”मध्ये राहत होतो आणि या “मुंबई” शी आमचा काहीही संबंध नव्हता महाराष्ट्र म्हणजे आमच्यासाठी काय होता तर आमचे नोकर. जिन्याखाली केळे विकणारी बाई, शाळेत आमच्या वर लादण्यात आलेली मराठी ची क्रमिक पुस्तके हा होता. आमच्या कडे या लोकांसाठी (मराठी) एक शब्द होता तो म्हणजे “घाटी” याचा शब्दश: अर्थ म्हणजे घाट कींवा डोंगरावरची लोकं. हा घाटी शब्द आम्ही आमच्या नोकरांसाठी पर्यायवाची म्हणुन वापरीत असु. मी चौथी त असतांना आम्हाला शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आणि काय संताप झाला होता आमचा. आम्ही म्हणालो अरे ही (मराठी) तर आपल्या नोकरांची भाषा आहे. मग आम्ही मराठी चा जन्म कसा झाला याची एक गोष्ट एकमेकांना सांगत असु. ती अशी की भारतातल्या प्रत्येक लोकांकडे स्वत:ची एक भाषा होती फ़क्त मराठी लोक सोडुन मग काय झाल ते सर्व ( मराठी लोक) भगवान शंकरा कडे गेले आणि त्यांनी स्वत:साठी एक भाषा मागितली. मग देवाने काय केलं आजुबाजुला बघितल, त्याला काही दगड दिसली त्यांन ती एका पितळाच्या भांड्यात टाकली आणि जोरजोरात हलविली आणि म्हणाला हं ही घ्या तुमची भाषा !.आम्हाला कुठे माहीत होत की ही ती भाषा आहे की ज्यात नामदेव, तुकाराम ,दिलीप चित्रे ,नामदेव ढसाळ यांनी कविता लिहील्या आहेत ?
But all the time there was a Maharashtrian underclass, emerging, building itself. And now it had gained political power, strength, and a desperate confidence. It was advancing closer and closer to the world I grew up in, the world of the rich and the named. Many of the people on Nepean Sea Road were aghast not so much that the mobs were hunting out Muslims from the tall buildings but that they had dared to come to Nepean Sea Road at all. The arrogance of ghatis demanding to see the building directories! The other Bombay now sneaks in through our streets, lives among us, doesn’t like us being rude to it, occasionally beats us up. The riots of 1992 and 1993 were a milestone in the psychic life of the city, because its different worlds came together with an explosion. The monster came out of the slums.
पण सतत हा खालचा निन्मवर्गीय मराठी लोकांचा वर्ग उदयाला येत होता स्वत:ला घडवीत होता.आणि आता तर यांनी (मराठींनी) राजकीय ताकद ,शक्ती,आणि तीव्र आत्मविश्वास ही कमावला होता.हे मराठी हळुहळु आमच्या श्रीमंतांच्या आणि प्रतिष्ठीत लोकांच्या जगा कडे चाल करुन येत होते होते. बहुसंख्य नेपियन सी रोड वासियांना या गोष्टीची खंत नव्हती की या मराठी लोकांच्या झुंडी मुस्लिमांना शोधत आमच्या उंच इमारतींमध्ये फ़िरत होत्या पण सर्वात मोठि खंत-वेदना ही होती की हे मराठी (घाटी) नी अखेर आमच्या नेपियन सी रोड वर येण्याची /पाय ठेवण्याची हिंमत केली होती. या घाटींचा उद्दामपणा चा कळस म्हणजे हे घाटी आम्हाला आमच्या बिल्डींग च्या डीरेक्टरी ज बघण्याची मागणी करीत होते.ही दुसरी मुंबई आता चोर पावलाने जी आमच्या बरोबर राहत असे ,जी क्वचित प्रसंगी आम्हाला बदडत असे,जीला आमची मिजास खपत नसे, तीने आता आमच्या रस्त्यांत परीसरात घुसखोरी केलेली होती.१९९२ आणि १९९३ चे दंगे हा या शहराच्या मानसविश्वा तील एक मैलाचा दगड होता.कारण की या दंग्यांनी दोन वेगवेगळ्या जगां ना एका स्फ़ोटा ने जवळ जवळ आणलं होतं. आता ( मराठी )राक्षस झोपडपट्ट्यांतुन बाहेर पडला होता.
सु (?) केतु मेहता च्या वल्गनां ना माझे उत्तर
१-भुमिपुत्र आहोतच आणि अभिमानाने म्हणवुन घेणारच आता ज्यांना भुमिच नाही अशा भटक्या कुत्र्यांनी जे भटकत भटकत अन्नाच्या शोधार्थ दाही दिशां ना भटकत असतात अशा भ.कु.नी यावर भुंकुन आपल नैराश्य व्यक्त केल तर आम्ही याला त्यांच्या च भाषेतील एक म्हण शिकवु की “ हाथी चले बाजार तो कुत्ते भौके हजार “.
२-म्हणे आम्ही कारकुनांची जमात , अरे बोइंग चे व्हाइस प्रेसीडेंट दिनेश केसकर, जयंत नारळीकर, किर्लोस्कर , गरवारे हे कारकुन आहेत का ? मग मेहता ज्यांच्या नावावरुन “ मेहता खोलु क्या तेरा खाता ? “ ही अश्लिल म्हण तुमच्याच लोकांमध्ये प्रचलित आहे ते कारकुंडे नाही त तर कोण आहेत? कुठल्याही मा.गु. च्या दुकानावर जो कुबड काढुन, मान मोडुन, वह्यामध्ये डोके खुपसुन बसलेला ढापण्या असतो त्याचे आडनाव १० पैकी ९ वेळा मेहता च कसे काय हो असते.? कारण मेहता ही जमात च मुनीमांची (कारकुंड्याची) आहे.
३-म्हणे महागडे फ़ुड ताज मध्ये ? अरे एक च सांग तुझी विठ्ठल कामतांच्या ऑर्कीड या सप्ततारांकीत हॉटेल मध्ये जाउन एक वेळ च जेवण जेवण्याची आणि बिल देण्याची ( भांडे घासावे न लागता बिल देण्याची ) लायकी आहे का ? अरे हो पण तिथे तर भटक्या कुत्र्यांना प्रवेश च नसतो.
४-म्हणे कामाचे तास ? अरे बरोबर च आहे ना हे बघ दोन प्रकारची कामे असतात एक जे करायला मुळात अफ़ाट जातिवंत प्रतिभा लागते जी सर्वात महत्वाची कामे असतात आणि एक ज्याला साध्या मराठीत हमाली कामे म्हणतात. जीचे उत्तम उदाहरण म्हणजे जी मेहता लोक मान मोडुन दिवसभर करतात ती चोपड्यांची कामे. आता हमाला ला काय न की तासांच च महत्व फ़ार असतं कारण बिगारी जो असतो ना त्याला तासांवर रोजा वर च पैसे मिळतात. कामगाराच कस असत २ तास एक्स्ट्रा काम २ तास ओव्हर टाइम मिला फ़िर मै मस्त दारु पिया इ. तर तुझ म्हणण आणि तास मोजण तुला शोभत.
५-म्हणे मी एका वेगळ्याच विश्वात राहत होतो अगदी खरय तुझ म्हणण सिझ्रोफ़्रेनीक लोकांच ना एक वेगळच विश्व असत. वेगळेच भास होतात हो या लोकांना आणि काहीबाही आवाज ही ऎकु येत असतात बर का. आणि आता जर का तुला स्वप्नांत परत मराठी लोक दिसु लागले ना तर मला सांग तुला ठाण्याला आनंद नाडकर्णिंच्या आय़.पी.एच. मध्ये माझ्या खर्चाने घेउन जातो.
६- खर च माझ च चुकल बाबा तुझी मेंटल कंडीशन लक्षात यायला अंमळ उशिरच झाला हो. आता तुला मी काही काही बोलत नाही रे मोत्या आता तुझा इलाज करण हाच एक योग्य मार्ग आहे. तुझ्या तोंडी लागुन माझी चुक च झाली.
या लेखाची मुळ प्रेरणा
मिसळ पाव वर एका सदस्याने रोहींग्तन मिस्त्री च्या एका पुस्तकावरील शिवसेने ने आणलेल्या बंदीच्या विरोधात एक लेख लिहीलेला आहे. याच रोहींग्तन मिस्त्रि ने वरील सुकेतु मेहता च्या या पुस्तकाची जी प्रशंसा केलेली आहे ती याच पुस्तकात सुरुवातीला दिलेली आहे ती या शब्दात जशी च्या तशी देत आहे.
“A brilliant book. [Mehta] writes fearlessly about the horror and wonder that is Bombay. One by one, he reveals its multiple personalities: maleficent Bombay, bountiful Bombay, beckoning temptress of hope, manufacturer of despair—city of dreams and nightmare city. Best of all, reading this book helps one understand why Bombay can be an addiction.” —Rohinton Mistry, author of Family Matters and A Fine Balance
आता याचा अनुवाद टंकण्याचा उत्साह माझ्यात शिल्लक नाही. तर खंत एकाच गोष्टीची वाटते की जो रोहींग्त्न मिस्त्री स्वत: अशी विचारसरणी मराठी माणसांविषयी बाळगतो आणि मराठी माणसांचा इतका मोठा अपमान जो सुकेतु मेहता ज्या पुस्तकांत करतो त्याची अशा शब्दात प्रशंसा करतो त्या रोहींग्तन मिस्त्री चा विरोध करण्याऐवजी त्याचे समर्थन एक मराठी माणुस च करतो याहुन मोठे दुर्देव ते काय असेल ?
एक महत्वाचा खुलासा आणि माफिनामा
आणि सर्वात शेवटी एक जाहीर करतो की मि शिवसैनिक नाही. आणि त्याचप्रमाणे कुठल्याही पक्षाचा अथवा विचारसरणी चा इझम चा झेंडा कधीही घेउन फ़िरत नाही. जे जेव्हा जसे योग्य वाटते ते तसे कोणाला कीतीही चुकीचे वाटले तरी त्याची तमा न बाळगता इमानदारीने व्यक्त करीत असतो. आणि या लेखातील विचार हे माझ प्रामाणिक वैयक्तीक विचार प्रकटन आहे.आणि हा लेख लिहीतांना माझा जिभेचा संयम सुटलेला आहे आणि त्यामुळे सभ्यतेचे ,भाषेचे संकेत मा़झ्या कडुन नक्कीच मोडले गेलेले आहेत यावीषयी सध्या माझ्या मनात खिन्नता दाटुन येत आहे...यासाठी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो पण शब्द मागे घेण्याची इच्छा ही नाही हे देखील सांगतो.
प्रतिक्रिया
पुस्तक वाचलेले नाही पण वर जे
+१११११११
+१११
सहमत.
गवि यांस आता माझा पक्ष मांडण्यासाठी आणखी एक पुरावा देतो.
लेख बहुधा "सरकॅसिझम" मोड मधे
आततायी
असे म्हणतात,हे मारवाडी लोक
.
मिपा संपादकांनी असा दिशाभुल करणारा लेख काढुन टाकावा.
अगदी सहमत
का बरे?
कैच्याकै लेख
या लेखाच्या लेखकाला लिखाणातला
ह्म्म्म..
मला तर बुवा हे पुस्तक आवडलं.
पुस्तक