भारत हा एक प्रगतीशील देश आहे ज्यामध्ये आधुनिक विज्ञान आणि प्राचीन संस्कृतीचा योग्य मिलाप झालेला दिसून येतो. या भूमीला तपस्वी आणि ईश्वरी अधिष्ठान प्राप्त संत महात्मांचा सहवास लाभलेला आहे. या महान संस्कृतीचा पाया हा बऱ्यापैकी श्रद्धेवरती वसलेला आपल्यास पहावयास मिळतो. मात्र काही काही वेळा ही आंधळी श्रद्धा आधुनिक विज्ञानावरती मात करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश मधील उन्नाव मध्ये याचा आता प्रत्यय येतो आहे. या छोट्याश्या गावाला अगदी आमीरखानच्या "पिपली लाइव" चित्रपटासारखे स्वरूप आले आहे. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असे म्हणतात मात्र कोणाच्यातरी (साधू ?) स्वप्नातील सोन्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा झाडून कामाला लागलेल्या आहेत. एकीकडे आपण जादूटोणा - अंधश्रद्धा विधेयक देशामध्ये लागू करण्याच्या बाता मारतो आणि दुसरीकडे अश्या गोष्टींना खतपाणी घालत आहोत हा किती मोठा विरोधाभास आहे. त्या (संधी) साधूचा शिष्य हा देशाचा कृषी राज्यमंत्री आहे तो त्या स्वप्नावर विश्वास ठेवून सरकारी यंत्रणा राबवताना दिसतो आहे. दुसरीकडे देशाचे कृषिमंत्री मा. पवार साहेब म्हणतात कि, अश्या गोष्टीने (अंधश्रद्धेला) बुवाबाजीला खतपाणी मिळेल आणि अश्या गोष्टी घडता कामा नये.
आपला समाज किती भ्रामक कल्पनेच्या पाठीमागे लागलेला आहे याची प्रचीती वरील सर्व प्रकरणातून दिसून येत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला म्हणतात ती प्रसारण व्यवस्था (media, news channels ) सुध्दा केवळ TRP वाढवण्याच्या नादात वस्तुस्थिती लक्षात न घेता याची बातमी रंगवून लोकांपुढे मांडत आहे.
विचार करण्याची गोष्ट आहे, ज्या इंग्रजांनी भारतामध्ये व्यापारी दृष्टीकोन ठेऊन राज्य केले ज्यांनी कोहिनूर सारखा हिरा आणि भारतातील बहुतांश सोने आपल्या देशात घेऊन गेले त्यांच्या नजरेतून हे एक हजार टन सोने कसे चुकले हा मोठा प्रश्न आहे ? शिवाय केवळ स्वप्नात दिसले म्हणून सोने शोधणे हे कितपत रास्त आहे ?
उन्नाव मध्ये "पिपली लाइव"
गाभा:
प्रतिक्रिया
22 Oct 2013 - 5:34 pm | मुक्त विहारि
लवकरच काय ते समजेल.
22 Oct 2013 - 6:09 pm | मुक्त विहारि
"दुसरीकडे देशाचे कृषिमंत्री मा. पवार साहेब म्हणतात कि, अश्या गोष्टीने (अंधश्रद्धेला) बुवाबाजीला खतपाणी मिळेल आणि अश्या गोष्टी घडता कामा नये."
ह्यांचा काय संबंध?
23 Oct 2013 - 1:07 pm | psajid
ह्यांचा काय संबंध?
हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच होतं कि, एकाच खात्याचे मंत्री (राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री) असूनही त्यांच्या भूमिकेत किती विरोधाभास आहे त्यांचा दोघांचा प्रत्यक्ष त्या खात्याचे काम करत असताना एकमेकांशी किती समन्वय ? (co-ordination) असेल. यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची भूमिका एकच असेल का ? याविषयी मन सांशक होतंय हे सांगण्याचा प्रयत्न होता ! (आदरणीय मा. पवार साहेबांनी या सोने शोधण्याच्या मोहिमेला केलेला विरोध म्हणजे त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतेय या प्रकरणामध्ये त्यांनी बुवा बाजी ला विरोध केलेला दिसतोय आहे )
23 Oct 2013 - 2:06 pm | मुक्त विहारि
(आदरणीय मा. पवार साहेबांनी या सोने शोधण्याच्या मोहिमेला केलेला विरोध म्हणजे त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतेय या प्रकरणामध्ये त्यांनी बुवा बाजी ला विरोध केलेला दिसतोय आहे )
का कुणास ठावुक पण मला "सिंहासन" मधला निळू फुले म्हणजे मीच असे वाटायला लागले आहे.
23 Oct 2013 - 1:22 pm | मंदार कात्रे
तुमचा मुद्दा बरोबर आहे साजिद , नुसते शेती खातेच नव्हे ,तर एकूणच सध्याच्या केन्द्रीय आणी राज्य मन्त्रिमण्ड्ळातील मन्त्र्यान्च्या वागण्या आणि बोलण्यातील ''समन्वय'' शोधुनही सापडणार नाही. राश्त्रवादी आणि कोन्ग्रेस यान्चे नाते विळ्या-भोपळ्याचेच आहे, पण तुम्ही आम्ही भाउ -दोघे मिळून खाउ या नीतीने हे सरकार चालु आहे .
23 Oct 2013 - 2:07 pm | मुक्त विहारि
हातात घड्याळ कशाला?
प्रार्थनेची वेळ लक्षांत ठेवायला
23 Oct 2013 - 9:28 pm | अर्धवटराव
कि काहितरी बनाव रचुन त्या बाबाच्या मागे उत्तर प्रदेशचे जनमत उभे करायचे व त्याच्या तोंडुन सत्ताधारी पक्षाला अनुकूल वक्तव्य वदवुन घ्यायचे असा काहितरी राजकारणी डाव असेल. पण अजुन तरी तसं काहि झालं नाहि.
अवांतरः इंग्रजांनी कितीही लुटालूट केली तरी असे भूमीखालचे, तळघरातले वगैरे सगळंच गुप्तधन त्यांना ठाऊक असायची शक्यता नव्हती. तेंव्हा असे गुप्तधन भारतात अनेक ठिकाणी अजुनही सापडु शकते.
23 Oct 2013 - 9:49 pm | चित्रगुप्त
जयपूर जवळ आमेरचा किल्ला आहे, त्याच्या अगदी वरती डोंगरावर 'जयगढ' हा किल्ला आहे. इंदिरा गांधींनी पुढाकार घेऊन खुद्द भारतीय पुरातत्व खात्यातर्फे इथे प्राचीन खजिना खोदून काढण्याची मोठी मोहीम चालवली होती. हा संपूर्ण भाग त्याकाळी कडेकोट बंदोबस्तात असून अन्य कुणालाही तिकडे जाण्याची बंदी होती. या प्रकल्पातील एक उच्च अधिकारी माझ्या परिचयाचे होते. काही महिने झाल्यानंतर तिथे काहीही मिळले नाही असे सरकारी पातळीवर घोषित करण्यात आले.
याबद्दल वस्तुस्थिती काय होती, हे माझ्या त्या परिचितांनी सांगितले नाही.
23 Oct 2013 - 9:54 pm | विद्युत् बालक
पद्मनाभन येतील सोन्याचे पुढे काय झाले? कोणाच्या xxxx मध्ये गेले ते सोने?
एकाएकी त्याची बातमी बंद झाली चानेल्स वरती