मला मदत, मार्गदर्शन हवे आहे.
माझी मुलगी, वय वर्षे ८, गेली दीड-दोन वर्षे पुण्यात भरतनाट्यम् शिकते आहे. तिच्या ग्रुपला ह्या वर्षी पुण्यात झालेल्या नॅशनल हार्मनी 'भाव-राग-ताल' ह्या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
ही स्पर्धा 'अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे' या संस्थेने आयोजित केलेली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतुन लोक आले होते, इतर राज्यातुनही (आसाम, पंजाब, हरियाणा इ.) आले होते.
भरतनाट्यम मध्ये मात्र दाक्षिणात्य कोणी आलेले दिसले नव्हते.
या उत्तेजनार्थ बक्षिसामुळे तिला पुढील स्पर्धेसाठी सरळ प्रवेश मिळाला आहे असे आम्हाला समजले आहे. 'कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' ही स्पर्धा दुबई येथे डिसेंबर २०१३ मध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये जगभरातुन स्पर्धक येणार आहेत असे आयोजकांकडून समजले. मुलीला ही मोठी संधी आहे, एक्स्पोजर मिळेल, फिरायलाही मिळेल अस एकूण स्वर वाटतो.
स्पर्धेच्या आयोजकांनी अशा स्पर्धा पुर्वी सिंगापुर, बँकॉक, दुबई येथे आयोजित केल्या आहेत. त्यांचा वृत्तांत व माहिती नेटवर उपलब्ध आहे. पण जर कुणाला या स्पर्धांबद्दल फर्स्ट-हॅन्ड माहिती असेल, अनुभव असेल तर तो कृपया येथे मांडावा किंवा व्य. नि. ने संपर्क साधावा ही विनंती. मुलीला स्पर्धेसाठी पाठवावे किंवा कसे याचा विचार करत आहोत.
माझा स्वतःचा एवढ्या लहान वयात मुलांनी अशा स्पर्धांमधून सहभागी होण्यावर विश्वास नाही. आधी कला एकाग्रपणे व्यवस्थित शिकावी, अन्य प्रलोभनांकडे दुर्लक्ष करावे असे मला वाटते. त्याहीपेक्षा एखादी स्पर्धा जर चेन्नई, बेंगलोर, तंजावर येथे झाली तर नृत्य-कौशल्याचा खरा कस लागेल असे मला वाटते. जाणकारांची मदत, मार्गदर्शन मिळेल तेवढे योग्य निर्णय घेणे सोपे होईल.
मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे..
प्रतिक्रिया
31 Aug 2013 - 12:34 am | संजय क्षीरसागर
बालश्री मिळाली आहे. तुम्हाला त्याचा फोन हवा असल्यास व्य. नि. करावा. पण एकूण नृत्याविष्कार पाहता भरतनाट्यमपेक्षा कथ्थक बेस्ट आहे असे सुचवीन.