जातीधर्माविषयक लेखन - मिपाचे धोरण!

आणिबाणीचा शासनकर्ता's picture
आणिबाणीचा शासनकर्ता in काथ्याकूट
14 Jul 2008 - 11:38 pm
गाभा: 

मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.

या चर्चांमधून काहीही निष्पन्न होत नाही, उलटपक्षी अशा लेखनातून/चर्चांमधून बर्‍याचदा सभासदांमध्ये एकमेकांच्या जातीधर्मावर आणि पर्यायाने एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर उतरून चिखलफेक केली जाते. आणि त्यामुळे या संकेतस्थळाची शांतता भंग पावते असे मिपा व्यवस्थापनाला वाटते!

बर्‍याच सभासदांच्या तक्रारींवरून मिपा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलेला आहे.

मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!

तरी कृपया या पुढे कुणीही येथे या संदर्भात लेखन/चर्चा करू नये अशी मिपाच्या सर्व सन्माननीय सभासदांना कळकळीची विनंती. असे लेखन येथे आढळल्यास ते येथून काढून टाकले जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी!

सदर बंदी हा मिपाच्या धोरणाचा एक भाग समजावा व सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती!

-- जनरल डायर.

प्रतिक्रिया

शितल's picture

14 Jul 2008 - 11:42 pm | शितल

मिपाने खुप चा॑गले धोरण अ॑गिकारल्या बद्दल आ॑नद आहे.
आपण सगळे मानव आहोत हेच मेन आहोत.
आणि जात एकच माणुसकीची. :)

विकास's picture

15 Jul 2008 - 12:11 am | विकास

उत्तम आणि गरज असलेला निर्णय!

जात-पात हे विषय १००% बंद करावेत असे कळकळीने वाटते... फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल:

उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक?

कृपया हे मी वाद घालण्यासाठी लिहीत आहे असे समजू नका...फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते.

हितचिंतक

सर्किट's picture

15 Jul 2008 - 12:21 am | सर्किट (not verified)

नियमाचे शब्द अधिक "रिफाईन" करणे गरजेचे आहे असे वाटते.

कुठल्याही जाती-पाती, धर्म-पंथ ह्यांची अवहेलना करणार्‍या लेखनावर बंदी घातली, तर कसे ?

तसेच, त्यात श्रद्धास्थांनाचा समावेश व्हावा का ?

मला वाटते, की मिसळपावासारख्या सर्व समावेशक संकेतस्थळावरील अनेक सदस्यांची अनेक श्रद्धास्थाने असू शकतील. त्यामुळे श्रध्हास्थानांचा ह्यात समावेश केला, तर प्रत्येक वेळी लिखाण करताना कुणाची हेटाळणी होत नाही ह्याचा सर्वांना विचार करावा लागेल, आणि पर्यायाने येथील वाहतूकही कमी होईल.

- (नियमप्रेमी कायदेपंडित) सर्किट

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2008 - 12:28 am | मुक्तसुनीत

कुठलेही श्रद्धास्थान असो , त्याबद्दल प्रश्न विचारण्याच्या बाबतीत , त्यातील खटकलेल्या बाबींवर टीका करण्याच्या बाबतीत कुठलीही गोष्ट वर्ज्य - "सॅक्रोसँक्ट" - मानण्याचे कारण नाही. अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे.

वरील तत्व मान्य न केल्यास कशावरही काहीही नकारात्मक बोलणे अशक्य होईल. कारण कुणीही त्यावर हरकत घेऊ शकेल. पर्यायाने , त्या टीकात्मक लिखाणाला केराची टोपली दाखवू शकेल.

सर्किट's picture

15 Jul 2008 - 12:42 am | सर्किट (not verified)

अपमानवाचक मजकूर लिहीणे आणि टीका करणे यात फरक आहे.

श्रद्धास्थानांच्या बाबतीत ह्यातला फरक धूसर असतो, हा आजवरचा अनुभव आहे. (स्वतःच्या) श्रद्धास्थानांबद्दल टीका ही अपमानवाचक वाटू शकते. उदाहरणच द्यायचे झाले तर मागे स्वरभास्कर भीमसेन जोशींच्या "पितळी तांब्यातून" पिण्याच्या सवयी बद्दल कुणी टीका केली होती. त्यावेळी झालेली धुमश्चक्री आठवा.

म्हणूनच धर्म आणि जातींबरोबरच श्रद्धास्थानांचाही सदर नियमात अंतर्भाव व्हावा असे वाटते.

- (इतिहासाचे अवजड ओझे वाहणारा ) सर्किट

इनोबा म्हणे's picture

15 Jul 2008 - 12:37 am | इनोबा म्हणे

उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक?
या मताशी सहमत. याबाबतीतले धोरण ठरवणे आवश्यक वाटते.

तरीही जनरल डायर यांच्या जाती-धर्म विषयक धोरणाला आमचा पाठींबा आहे. आजकाल या विषयाशी निगडीत सदस्यनाम ही येत आहेत. अशा सदस्यनामांविरोधातही धोरण आखायला हवे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 1:57 am | विसोबा खेचर

फक्त "धर्म" हा शब्द गोची करू शकतोअसेपण वाटते! त्यामुळे धर्म विषयक कोणचे लिखाण चालणार नाही हे स्पष्ट करावे लागेल:

मला वाटतं हा शाब्दिक छल होईल!

उदाहरणादाखल - कालच पिडांनी लिहीलेला नास्तिक हा चर्चात्मक लेख. लेख चांगला आहे आणि मला व्यक्तिशः तो आवडला. पण आता कोणी त्याबद्द्ल तक्रार केली तर? उद्या "गणपती विसर्जन कसे करावे" अथवा काश्मीर मधे अमरनाथ मंदीराच्या जागेवरच्या वादावरून या वर कोणी काथ्याकूट चालू केली तर तो विषय धार्मिक का सामाजीक?

अर्थातच सामाजिक!

विकासराव, हे धोरण तारतम्याने घ्यायचे आहे जे कृपया समजून घ्या. जातीपाती, धर्मावरून सभासदांमध्ये आपापसात चिखलफेक होऊ नये म्हणूनच हे धोरण आहे. शब्दश: अर्थ न घेता या धोरणामागील तारतम्यभाव कृपया ध्यानात घ्या एवढीच विनंती आहे!

फक्त नियमाला अपवाद करायची वेळ आली तर या संदर्भात उद्या अपवादच नियम होवून बसेल असे वाटते.

??

ह्या धोरणामागचा तारतम्यभाव आपल्या ध्यानात आला नाही याचा खेद वाटतो!

असो,

तात्या.

ता क - 'नास्तिक' हा लेख अजूनही इथेच आहे, उडवला गेला नाहीये आणि जाणारही नाही. कारण तो तेवढ्या सेन्सिबल पद्धतीने लिहिला गेला आहे! पिडांकाकांनी त्यात आस्तिक किंवा नास्तिक या कुणाही बदल व्यक्तिश: काहीही भाष्य केलेले नाही. जे काही लिहिले आहे ते संपूर्णपणे स्वत:बद्दल लिहिले आहे. त्यात कुणालाही काहीही टोमणे मारण्यचा प्रकार नाही म्हणूनच ते लेखन धर्म, देवपूजा याबद्दल असले तरीही ते इथे चालेल. मी तारतम्यभाव म्हणतो तो हाच! शेवटी ही आभासी दुनिया आहे आणि काही गोष्टी समजून-उमजूनच कराव्या लागतात. आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येकच गोष्ट, नियम काही शब्दात अन् कायद्याच्या भाषेत स्पष्ट करता येत नाहीत, व्यक्तिश: मला तरी ते शक्य नाही!

छ्या! आपल्याच माणसांना समजवतांना दमलो! नको वाटतं च्यायला! :)

तात्या.

विकास's picture

15 Jul 2008 - 2:13 am | विकास

धन्यवाद!

खुलाशाबद्दल नाही (तो माहीत होता आणि तसाच हवा आहे)...पण धन्यवाद हे आपला माणूस म्हणल्याबद्दल :-)

आणि हो पिडांच्या लेखाला नावे ठेवली अथवा विरोध केला असे वाटत असेल तर त्यातील माझी प्रतिक्रीया अवश्य वाचा.

प्रियाली's picture

15 Jul 2008 - 2:50 am | प्रियाली

मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!

हे वाचून घाम फुटला. #:S

आपली
(खोडसाळ) प्रियाली.

विकास's picture

15 Jul 2008 - 3:15 am | विकास

मिपाच्या व्यवस्थापनाला सर्व जाती, घर्म, उपजाती, पोटजाती, व पंथांबद्दल आदर आहे!

याचा अर्थ मला केवळ "घर्मा"वर लेख लिहायची बंदी आहे, धर्मावर नाही...

खुलाशाबद्दल धन्यवाद!

पण मग याचा अर्थ पिडांचे लेखन निर्दोष असून मिपासाठी योग्य आहे पण चतुरंगची "सख्यारे घामट मी तरूणी" ही कविता मात्र परत लिहायला अथवा त्यावर चर्चा करायला बंदी करायला हवी... :?

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 10:07 pm | चतुरंग

आमच्या 'घामट तरुणीला' सोडा अशी कळकळीची विनंती, तिने बिचारीने कुणाचे काय बरे घोडे मारले आहे? ;)

(स्वगत - रंग्या, आता विडंबने करताना, चाल, मात्रा, वृत्त, यतिभंग, मीटर, काफिया, रदिफ बरोबरच 'धर्म' ह्या नवीन डायमेन्शनचाही विचार करायला हवा बरं! ;) )

चतुरंग

टारझन's picture

15 Jul 2008 - 3:03 am | टारझन

माझ्या सारख्या नविन लोकांना लिहावे की नाही या बाबद संभ्रम निर्माण होईल असे वाट्टे... पहिलाच लेख "फुक्कटचे पाटील" हा खरे तर समाजातील एक प्रवृत्ती विनोदी अंगाने दाखवण्यासाठी लिहीला. पण ते लिखाण जात-नाम-ई ई ला टर्गेट करून लिहीलय अशी टिका झाली. तो लेख अत्यंत हलका-फुलका असून देखिल टिका झाली होती...

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

आंबोळी's picture

15 Jul 2008 - 10:51 am | आंबोळी

मिसळपाव डॉट कॉम (मिपा) या संकेतस्थळावर जात, पात, पंथ, धर्म या विषयाबाबत लेखन करण्यास/चर्चा करण्यास मिपा व्यवस्थापन आजपासून पूर्णपणे बंदी घालत आहे.

अत्यंत योग्य निर्णय. मी याचे स्वागत करतो.

आंबोळी

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 1:15 pm | केशवसुमार

डायरशेठ,
अतिशय योग्य निर्णय..अभिनंदन आणि धन्यवाद..
असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी असे वाटते..
(समाधानी)केशवसुमार

छोटा डॉन's picture

15 Jul 2008 - 1:19 pm | छोटा डॉन

केसु म्हणतात ते अतिशय योग्य ...
आजकाल अशा लोकांचे पेव फुटले आहे.
त्यात चर्चांमध्ये फक्त "कुठल्यातरी जातीविरुद्ध गरळ" ओकली जाते ...

सबब, असे लेखन करणार्‍या सदस्याचे सदस्यत्व बंद करण्याची ही तरतूद नियमावलीत करावी

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

15 Jul 2008 - 5:54 pm | आनंदयात्री

सहमत .. सहमत !
त्रिवार सहमत .. डायरशेठ चा हा निर्णय आवडला.