गाभा:
आपल्याला कशाची गरज असते सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख?
नक्की कशासाठी आपली धडपड, वणवण चालू असते?
सत्य पूर्ण स्वरूपात कधी कुणासमोर आले आहे का? आणि तसे ते आले तर ते आनंद/समाधान/शांती/सुख देते का?
वरवर बघता सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख हे जणू एक आले तर बाकीच्यांना घेऊन येते असे काहीसे मानले जाते प्रत्यक्षात असे होते का? का तो एक आभास???
मुळात हे सगळे नक्की आहे काय?
"असेल ते मिटवा आणि नसेल ते भेटवा" मनाचा व्यापार इतका मर्यादित आहे का?
प्रतिक्रिया
24 Aug 2013 - 9:26 am | मुक्त विहारि
त्यामुळे आपला पास...
तरी पण "लग्न" केले की सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हरकत नसावी...
लग्न केले हे सत्य,
बायको रोज लाटण्याने मारत नाही ह्यात आनंद
आपण बनवलेले जेवण ती जेवत ह्यांत समाधान
सेजारी राहते किंवा वसते ती शांती
आपल्याला सगळ्या मूलीच झाल्या ह्यातच खरे सुख (उदा. http://www.misalpav.com/node/25463)
असे साधे सरळ आयुष्य असावे..
24 Aug 2013 - 9:32 am | अर्धवटराव
यंदा पाऊस पाणि तर ठीक झालाय... डॉलर रेट देखील चांगला आहे... क्रिकेट पण छानच सुरु आहे... नविन सिनेमा म्हणाल तर मराठी सिनिमे आहेत कि चांगले... मिपा वर बल्लवाचार्य आणि सुग्रीणी देखील फार्मात आहेत... आणि त्या जादुटोणा कायद्याला घाबरायची काहि गरज नाहिए... मग असं अचानक प्रेमभंग झाल्यासारखं धागा का काढलात?
अर्धवटराव
24 Aug 2013 - 1:30 pm | वामन देशमुख
बहूधा हो; कारण जे येते ते अपूर्ण आहे असे अजिबात वाटत नाही.
सानिकास्वप्नील* सांगतात तसे खाणे, सोत्री सांगतात तसे पिणे, आणि डॉ. खरे सांगतात तसे झोपणे यातून आनंद/समाधान/शांती/सुख मिळणार नाही तर काय वैराग्यप्राप्ती होणार आहे का?
* पेठकरकाका आणि इतर सर्व सुगरणी, बल्लव मला क्षमा करतील अशी अपेक्षा. कारण...
परसातल्या अंगणात वाळू घातले गहू.
लिस्ट मोठी आहे, नाव कुणा कुणाचे घेऊ?