कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism)
परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ... पैसे, हुंडा या गोष्टीना कल्पनेतही थारा नव्हता ... मग असे झालेच कसे..????
पण खरी स्टोरी ऐकली आणि प्रचंड संताप झाला ... नवर्या मुलीला साखरपुड्यानंतर साक्षात्कार झाला कि तिचं आता दुसरयाच मुलावर प्रेम बसले आहे .. आणि तरीही वडिलांच्या इज्जतीसाठी तिने पहिल्याच मुलाशी लग्न केले कारण साखरपुडा मोडायचा नव्हता ... पण तिचे ते प्रेम प्रकरण लग्नानंतर चालूच राहिले .. हे जेव्हा सासरच्यांच्या लक्षात आले तेव्हा पुढचा धोका ओळखून मुलीच्या बापाने आधीच मुलीच्या सासरच्यांवर हुंडाबळीच्या खोट्या केसेस टाकल्या आणि इतकेच नाही तर 3० लाख दिलेत तरच केसेस काढू अशी धमकी पण दिली ... आता याला काय म्हणावे ... चोर तो चोर वर शिरजोर...
भारतातले हुंडा विरोधी कायदे हे असे exploit होतात कारण ते पूर्णता स्त्रियांच्या बाजूने झुकते माप देतात .. ज्यांना खरी गरज आहे त्यांना असा कायदा आहे.. हे ही माहित नसते... आणि उच्च शिक्षित मुली व त्यांचे पालक या कायद्यांचा असा गैरवापर करतात...आदरणीय सुप्रीम कोर्टाने पण अश्या गैरवापरांची दखल घेऊन या कायद्याला Legal Terrorism असे म्हटले आहे ... जी निष्पाप कुटुंबे अश्या खोट्या केसेना बळी पडून स्वताची जिवाभावाची माणसे गमावतात त्यांना कोणीच वाली नसतो.. परवाच दिल्ली कोर्टात अशाच एका तरुणाने कोर्टाच्या इमारतीतून उडी मारून जीव दिल्याचे ऐकले ... काही महिन्यांपूर्वी बेंगळूर मध्ये हि एका संगणक तज्ञाने अशाच कारणासाठी आत्महत्या केली ... सुरुवातीला वाटले कि अशी माणसे केस लढून आपले निर्दोषत्व सिद्ध का करत नाही. पण भावाच्या मित्राकडून कळले कि हा कायदा इतका मानवताविरोधी आहे .. .कि मुलीच्या सासरच्यांना घरातुन हाकलून अख्खं घर सुद्धा मुलीला देता येण्याची तरतूद यात आहे ... शिवाय केस चालू असे पर्यंत मुलीला खर्चापोटी दर महिना २० - २५ हजार पर्यंत सुद्धा पोटगी देण्याची आज्ञा कोर्ट करु शकते..म्हणजे गुन्हा सिद्ध होण्या आधीच अटक आणि अवास्तव खर्चाच्या ओझ्याने सासरची मंडळी पाणी मागू लागतात...
खरच खूपच अविश्वसनीय आणि विदारक सत्य आहे हे .. त्या मुळे आज काल अशा हुंडा बळीच्या बातम्या ऐकल्या की संशयाची सुई प्रथम स्त्री कडेच जाउ लागली आहे ...
प्रतिक्रिया
23 Aug 2013 - 4:24 pm | आशु जोग
इतका कडक कायदा आहे
म्हणजे कायद्याच्या रक्षकांना तडजोड शुल्क म्हणून खायला चान्स असणार.
23 Aug 2013 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
हे जर सत्य असेल तर अशा केसेस मधे स्त्री संघटनांनी पुढे येउन स्त्रियांना उपयुक्त असलेल्या कायद्याचे बळ वाढवले पाहिजे.
23 Aug 2013 - 7:14 pm | नित्य नुतन
उलट स्त्री संघटनाच अशा कायद्यांना पाठबळ देतात ... कारण स्त्री स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनातूनच तर अशा स्त्री संघटनांनी हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडले होते.. दुसरी गोष्ट म्हणजे अशा स्त्री संघटनांमध्ये बहुतांश स्त्रिया स्वत: वकील आहेत .. तेव्हा पोलिस आणि वकील यांच्या तुंबड्या भरणाऱ्या कायद्यांना ते कशाला विरोध करतील?
23 Aug 2013 - 4:51 pm | यसवायजी
माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत अशीच केस झाली. मधुचंद्राच्या पहिल्या रात्री मुलीने सांगीतले की तीला लग्नात इंटरेस्ट नाही. (मग कशाला केलं लग्न?)
घटस्फोट!!. मुलीकडच्यांनी (वकीलाने) १ कोटी मागितले. बिचारा जागेवरच हर्ट-अटॅक येऊन कोसळला.
(लग्नाआधीच घाबरलेला)
23 Aug 2013 - 5:57 pm | स्पंदना
संतापजनक!!
अश्याने खरोखरच्या पिडीता कायद्याला मुकतील.
लाज कशी वाटत नाही अस वागायला माणसांना?
23 Aug 2013 - 6:06 pm | प्रसाद गोडबोले
भारतातला कायदा, हिंदु मॅरेज अॅक्ट, अत्यंत बायसड आहे असे बर्यच जणांकडुन आधीही ऐकले आहे ...
हिंदुंनी पर्सनल लॉ बोर्ड काढण्याचा विचार केला पाहिजे . जेणे करुन असले कायदे फाट्यावर मारता येतील ....
23 Aug 2013 - 7:30 pm | अनिरुद्ध प
हा धन्दा झाला आहे,माझ्या मित्राच्या भावाचे लग्न झाले आणि सात दिवसात मुलगी माहेरी निघुन गेली,आणि घट्स्पोटा साठी अर्ज केला,मग मान्डीवली करुन घटस्पोट मन्जुर झाला,त्याचे काही लाखच नुकसान झाले,नन्तर बाहेरुन असे कळले की त्या मुलीचे नन्तर काही वर्षात तीन घटस्पोट झाले.अशी माझ्या अजुन काही मित्रान्ची उदाहरणे आहेत.
23 Aug 2013 - 8:14 pm | उपास
कॉलिंग युयुत्सु!
24 Aug 2013 - 2:46 am | मराठीप्रेमी
दुर्दैवी आहे हे सगळे. सर्वसामान्यपणे गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपी हा गुन्हेगार होत नाही, पण या कायद्याप्रमाणे हे उलट दिसतय.
24 Aug 2013 - 3:26 am | शिल्पा ब
बापरे!! घरच्यांच्या दबावामुळे नको असलं तरी लग्न करून मग असं काहीतरी होतं . हा अरेंज म्यारेज प्रकार बंद व्हायला हव. नको तिथे "संस्कृती"चं स्तोम कशासाठी?
स्वतःचं अन दुसर्याच सुद्धा मानसिक संतुलन घालवायचा प्रकार.
I feel bad for the guy.
24 Aug 2013 - 4:07 am | शिल्पा ब
अजून एक प्रश्न म्हणजे : जर नवरा सरळ घटस्फोटासाठी तयार असेल तर पोलिस वगैरे कशासाठी? का फक्त पैसे उकळायचा धंदा आहे?
24 Aug 2013 - 11:23 am | नित्य नुतन
अगदी अगदी शिल्पा तै ... पैसे उकळण्यासाठीच हे सगळे चालु आहे... भारतात स्त्रियांसाठी केलेले कायदे इतके आंधळे आहेत की एक दिवसाचं लग्न आणि ५० वर्षांचे लग्न या दोन्हीसाठी सारखेच नियम आहेत.. कलम ४९८अ हे कधी कधी माकडाच्या हातातले कोलीत बनते. आकडेवारी नुसार या कलमान्तर्गत ९८ % केसेस ह्या फेक आणि फ़क्त पैसे उकळण्यासाठीच नोंदवाल्या जातात ... http://www.498a.org/ या पत्त्यावर याची अधिक महिती मिळेल..
4 Sep 2013 - 3:39 pm | उद्दाम
नवरा सरळ घटस्फोटाला नेहमीच तयार असतो, बायकोच तयार नसते .
4 Sep 2013 - 3:57 pm | संजय क्षीरसागर
स्त्रीवर्गाचं अजून इकडे लक्ष गेलेलं दिसत नाही.
25 Aug 2013 - 12:02 am | नित्य नुतन
शिल्पा तै, आहो या घटनेतील लग्न अरेंज म्यारेज नव्हे... हा चक्क प्रेमविवाह आहे ... आणि तो ही आंतरजातीय आणि आंतरराज्यीय ....आता बोला
25 Aug 2013 - 12:22 pm | खबो जाप
शिल्पा ताई प्रेमविवाह हा सुद्धा अरेंज म्यारेज चाच प्रकार आहे ; ह्यामध्ये १०० पैकी ७० - ७५ वेळा मुलगा किव्हा मुलगी घर्च्याच्या विचार न करत त्यांच्यावर दबाव टाकून स्वतः स्वताचे लग्न अरेंज करतात, स्वतालाच विश्वास नसणाऱ्या प्रेमाला सर्वस्व मानून लग्न करायला भाग पडतात नंतर त्यांना कळते की घरचे म्हणत होते तेच बरोबर होते; मग आपल्या जोडीदारावर राग काढायला किव्हा धडा शिकवायला हे असले प्रकार ज्यास्त घडत आहेत.
मी असे म्हणत नाही कि घरच्यांनी ठरवलेली सगळीच लग्ने १००% यशस्वी होतात, पण नक्कीच त्यात संस्कृती मुल्य ज्यास्त असते. त्यामुळे संस्कृती च्या नावाने ओरड करणे मला काही पटत नाही.
उद्या बहुसंख्य लोक मराठी बोलत नाहीत म्हणून "मराठी किव्हा मराठी संस्कृती"चं कशासाठी? म्हणणे बरोबर नाही ना …
अरे जिथे कुणालाच माहित नाही अशा ठिकाणी जावून चोरून केलेल्या लग्नाला आजच्या युस अन्ड थ्रो जमान्यात किती महत्व दिले जायील, की दोन्ही घरच्या संमतीन १० लोकांच्या साक्षिन केलेल्या लग्नाला महत्व मिलेल.
आंतरजातीय आंतरराज्यीय विवाह जरूर व्हावेत पण त्यापूर्वी आपले किव्हा आपल्याला आवडणार्या च्या घरचे किती अनकूल आहेत ह्याचा विचार करायला नको का ?
आणखी कायद्या बद्दल - हा कायदाच नाती मोडायला निघाला आहे,मुलीना जर खरच त्रास होत असेल तर न्याय मिळालाच पाहिजे तिला पूर्ण अधिकार आहे घटस्फोट मागण्याचा, पण जरा काय झाल कि एकत्र बसून उपाय शोधण्या पेक्षा मला घटस्फोट पाहिजे तुला तुरुंगाची हवा दाखवते वगेरे प्रकार होत आहेत.
स्त्री स्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनातूनच निर्माण झालेल्या स्त्री संघटनाच (सगळ्याच नव्हे) मुलीना पहिला सल्ला तू हो पुढ आम्ही बघतोच असाच देतात
दुसरा मुद्दा मालमत्ता वाटण्याचा - मुलगी हि मालमत्तेतील बरोबरीची हिस्सेदार असते हे बरोबरच आहे, पण होते असे जेव्हा एखादा गरीब भाऊ कर्ज काढून पैसे जमवून बहिणीचे लग्न करून देतो आणि बहिण कायद्याने अर्धा हिस्सा मागायला येते तेव्हा भावाने काय कराव, भावू म्हणतो ठीक आहे अर्धा हिस्सा घे आणि माझे परत तोंड बघू नकोस.
आणखी पहिलाच आपल्या नवर्याला आई वडिलांना सोडून वेगळे राहायला भाग पाडणाऱ्या मुलीना काय अधिकार आहे त्याच्या आई वडिलाच्या मालमत्तेत हिस्सा मागण्याचा ?
काही मुद्दे राहिले असतील तर त्यावर परत बोलू …
30 Aug 2013 - 10:02 am | llपुण्याचे पेशवेll
खपो जाब यांच्या प्रत्येक मुद्याशी सहमत. यात अजूनही एक प्रकार येतो तो म्हणजे आंतरजातीय, आंतरराज्यीय बरोबरच आंतरधर्मीय विवाह. यात बहुतेक वेळा मुलांच्या हट्टापायी मुले लग्नं करतात पण संस्कारांच्या, वर्तणु़कीच्या फरकामुळे (कंपॅटीबिलिटी) मुलींचे घरात पटत नाही मग त्या मुलाला वेगळे काढू पाहतात, मुलांना ते मान्य असतंच असं नाही मग पुढे सुरुवात होते या अशा प्रकाराना. मग खपो जाब यांनी म्हटल्याप्रमाणे सूडबुद्धीतूनही खटले दाखल केले जातात. वेगवेगळे विवाह कायदे असल्याने आंतरधर्मीय विवाहात नेमके किती नुकसान होते हे माहीत नाही पण ते आंतरजातीय, राज्यीय विवाहात मात्र होते.
वरील विधान सरकटीकरण केल्यासारखे वाटत असले तरी बहुतेक आंतरजातीय, राज्यीय, धर्मीय विवाहात झालेल्या घटस्फोटात पुढे आलेली कारणे मी पाहीलेल्या घटनात अशी होती.
24 Aug 2013 - 1:41 pm | दत्ता काळे
पूर्वी मुलीची चौकशी तिच्या आसपास राहणार्यांकडे करून होत असे.
अॅरेंज काय अन् लव्ह मॅरेज काय .. लव्ह मॅरेजमध्ये संबधित मुलगी किंवा मुलगा उठवळंच (हा असांसदीय शब्द वाटेल पण तसा नाहीये ) असेल तर काय करणार? घटना घडल्या कि जबाबदारी वैयक्तिक होऊन जाते, एवढंच.
माझ्या एका मित्राच्या मित्राचे लव्ह मॅरेज झाले. त्याला नंतर मुलगीही झाली. काही वर्षानी त्याची बायको तिच्या नोकरीतल्या बॉसबरोबर निघून गेली.
तो मित्र दिसला कि वाईट वाटते. तो आपल्या मुलीला शाळेत सोडताना, आणताना अधूनमधून दिसतो.
24 Aug 2013 - 2:40 pm | टवाळ कार्टा
WTF
25 Aug 2013 - 12:43 pm | दादा कोंडके
भारतात सामाजिक विषमता खूप आहे. त्यामुळे सरसकट देशात एकच कायदा करायचा झाल्यास त्याचा गैरवापर होणं सहाजिकच आहे. जो पर्यंत सामाजिक विषमता कमी होत नाही किंवा या 'कायदेशीर दहशतवादाचा' बळी पडलेल्या पुरुषांची संख्या, पुरुषप्रधान संस्कृतीत बळी पडलेल्या स्त्रियांच्या ५०% एव्हडी होत नाही तो पर्यंत हे असंच चालणार.
25 Aug 2013 - 9:16 pm | मनीषा
मला वाटते... कायदा वाईट नसतो तर त्याचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणारे लोक वाईट असतात.
जर या कायद्याअंतर्गत एखाद्या स्त्री ने तक्रार दाखल केली, तर लगेच तिच्या सासरच्यांना दोषी न समजता, तटस्थपणे आणि निरपेक्ष बुद्धीने सर्वकष चौकशी करून, मगच जर कायदेशी कारवाई केली तर या कायद्याचा होणारा दुरूपयोग टळेल आणि ज्या स्त्रीया खरोखरच संकटात आहेत त्यांना न्याय देखिल मिळू शकेल.
25 Aug 2013 - 9:55 pm | पैसा
हुंडाबळींना संरक्षण म्हणून हा कायदा केला पण त्याचा असा दुसर्याला त्रास देण्यासाठी वापर व्हायला लागला तर नंतर खर्या हुंडाबळींना न्याय मिळणे दुरापास्त होईल. एकूण आता बर्याच लोकांना मेहनतीशिवाय सुलभतेने पैसा पाहिजे आहे असं वाटतं. त्यासाठी कोणताही विधिनिषेध बाळगायची गरज वाटत नाही. स्वतःच्या आईवडिलांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी नको असताना लग्न करणारी ही मुलगी दुसर्याच्या प्रतिष्ठेचा मात्र बेदरकारपणे बळी देते हे टोकाच्या स्वार्थीपणाचे उदाहरण आहे.
26 Aug 2013 - 12:31 pm | नित्य नुतन
खरंच पैसा ताई ... घोर कलियुग चालू आहे याची साक्षच पटली
26 Aug 2013 - 1:36 pm | अनिरुद्ध प
सहमत
25 Aug 2013 - 9:56 pm | सासवड्कर
स्त्री पुरुष समानता असे आपण म्हटले तरी अजूनही लग्न खर्च बहुतेकदा वधू पक्षच करतो . वर पक्षाचा कमी जास्त वरचष्मा असतो . मुळीच लग्ना नंतर सासरी जतत. मुलींनी लग्ना नंतर आपल्या आईवडिलांना सोडून जायचे आणि नवऱ्याच्या आईवडिलांची करायची हि कल्पना इतकी घट्ट बसली आहे कि मुलीचे सासरी येणे हीच एक मोठी तडजोड आहे हे अनेकजण लक्षातच घेत नाहीत .
महाराष्ट्रात अजून सुध्दा हुंडा बळीचे प्रकार चालू आहेत . अशा घटनांमध्ये घटना सासरी घडलेली असल्याने मुलीला पुरावे मिळणे अवघड जाते . सासरच्या काही चांगल्या वागणाऱ्या व्यक्ती असल्या तरी त्या आपल्याच घरातल्या लोकांच्या विरोधात कोर्टात साक्ष देत नाहीत .त्यामुळे कायदे बनवण्यात आले आहेत. एखाद्या वेळेस त्याचा गैर वापर सुध्दा होत असेल . वर दिलेल्या घटनेत तर कायद्या पेक्षा पोलिसांचीच चूक जास्त वाटते .
26 Aug 2013 - 12:28 pm | नित्य नुतन
बरोबर आहे सासवडकर सर .. सरकारने कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते.. पण अशा प्रसंगातही पोलिस पैसे उकळण्यासाठी मुलाच्या कुटुंबास वेठीला धरतात .. इतकेच नव्हे तर वरील प्रसंगात मुलीच्या वडिलांनी पोलिसांना काही हजार रु देऊन ... २००० किमी दूर राहत असलेल्या मुलाच्या कुटुंबाला arrest करण्यासाठी पाठवले... (आंतरराज्यीय विवाह)... आणि तुम्ही म्हणता तसे एखाद्या वेळी गैरवापर असता तर ठीक होते पण आजकाल सर्रास असे प्रकार घडत आहेत.. हा कायदा संपूर्णपणे मुलीच्या बाजूने असूनही या कायद्यामध्ये conviction rate फक्त २% आहे ... आता बोला .. आणि IT क्षेत्रातील तरुणी या मध्ये आघाडीवर आहेत ... स्वतः लाखांमध्ये package घेत असूनही पोटगी साठी खोटे पुरावे सादर करायला सुद्धा घाबरत नाहीत ... कारण या कायद्यानुसार जरी तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाले तरीही मुलीला कुठलीही शिक्षा होत नाही .. कारण तशी तरतूदच या कायद्यात नाही .... आणि महिला संघटना अशी तरतूद करण्याच्या विरोधात आहेत..कारण अशी तरतूद केल्यास महिला तक्रार करण्यास घाबरतील असा शोध त्यांना लागला आहे..
30 Aug 2013 - 10:06 am | llपुण्याचे पेशवेll
मुळीच लग्ना नंतर सासरी जतत. मुलींनी लग्ना नंतर आपल्या आईवडिलांना सोडून जायचे आणि नवऱ्याच्या आईवडिलांची करायची हि कल्पना इतकी घट्ट बसली आहे कि मुलीचे सासरी येणे हीच एक मोठी तडजोड आहे हे अनेकजण लक्षातच घेत नाहीत .
तडजोड? लग्नं ही मुलींची शारीरीक आणि भावनिक गरज नसते का? मग तडजोड करायची नसेल तर घरजावई होण्यास तयार नवरा बघावा.
आणि अनेक ठीकाणी लग्नानंतर मुलगा-मुलगी वेगळे घर घेऊन राहतात तिथे हो?
26 Aug 2013 - 12:24 pm | उद्दाम
प्रत्येक हिंदू पुरुषाने आधी मुसलमान व्हावे आणि मगच लग्न करावे, अशा अनुमानाला पोहोचलेला ( बायकोने पोहोचवलेला )
-----उद्दाम खान
26 Aug 2013 - 1:05 pm | दादा कोंडके
रोचक मत. या अनुमानापर्यंत कसे आलात हे कळू शकेल काय?
- मुद्दाम घुसेन
1 Sep 2013 - 11:46 am | उद्दाम
आण्णा, बाई किंवा बाईकडचे लोक भिकारचोट असले की भले भले लोक गारद झाले आहेत.
थोरल्या म्हाराजांना 'सोयरा' करणारीनेच विष घातले, असे ऐकून आहे. खरे आहे का ते?
आणि धाकल्या म्हाराजांबद्दल तर काय सांगायचं? खुद्द सख्ख्या मेव्हण्यानेच त्याना औरंगजेबाच्या ताब्यात दिले. हे तरी नक्कीच खरे आहे ना?
त्यामुळं पुरुषानं १०० रुपये खर्च करुन स्ट्याम्प पेपर करुन मुकाटपणे धर्म बदलावा आणि मग लग्न करावं. बाई / माहेरचे वरचढ होऊ पहातात म्हटले की एका फटक्यात तिला घालवून दुसरीला आणण्याची आपली सोय बघावी.
---- गेली अनेक वर्षे रिकाम्या अंथरुणात एकटाच झोपणारा आणि १०० रु खर्च न केल्याबद्दल हळहळणारा...
उद्दामराव एकलिंगे
4 Sep 2013 - 2:57 pm | बॅटमॅन
थोरल्या महाराजांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला नव्हता.
बाकी चालूद्या.
4 Sep 2013 - 3:37 pm | उद्दाम
मग नेमका कशाने झाला? गुढगी रोगाने का?
-- अॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी सर्वांना विचारुनही गुढगी रोग म्हणजे काय हे न समजलेला.
उद्दाम
4 Sep 2013 - 3:57 pm | बॅटमॅन
मेहेंदळ्यांच्या शिवचरित्रात पाहून सांगतो काय लिहिले आहे ते. विषप्रयोग नाही इतके कन्फर्म. तदुपरि गुढगी रोग म्हंजे माहिती नाही. काही ठिकाणी विशिष्ट ताप, अतिसार, इ. च्या झटक्यात गेले असेही उल्लेख आहेत.
4 Sep 2013 - 3:25 pm | मालोजीराव
चुकीचं ऐकून आहात
29 Aug 2013 - 1:03 pm | कपिलमुनी
आमच्या ओळखीमधल्या एका मुलीचे लग्नानंतर अफेयर होते .. त्या प्रियकराने हिला फसवल आणि पळून जायला नकार दिला ..
हिने आत्महत्या केली ...आता सासरचे सर्व जण आत मधे आहेत ..हुंडा बळी म्हणून ..पेपर ..न्यूज मधे बातमी आली ...स्त्री मुक्ती वाल्यांचा मोर्चा झाला ..
चर्वित चर्वण झाले ..
आणि कायदा आंधळा स्त्रीयांच्या बाजूने !!
29 Aug 2013 - 1:22 pm | नित्य नुतन
अरे बापरे बाप ... आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या हुंडाबळींवर कडी ...
विश्वासच बसत नाही
पोलिस, स्त्री मुक्ती वाल्यांना प्रचंड ज्ञानार्जनाची आवश्यकता आहे ..
त्या मुलीच्या सासरकडील माणसांचे देव रक्षण करो ...
29 Aug 2013 - 1:19 pm | प्रभाकर पेठकर
माझ्या एका मित्राचे त्याच्या पत्नीशी वाद होते. परिस्थिती पराकोटीला पोहोचली तेंव्हा तो घटस्फोटासाठी त्याच्या वकिल मित्राकडे गेला. वकिलाने त्याला चहा वगैरे पा़जून शांत केले आणि समजवून सांगितले बायकोने ठरविले तर तू रस्त्यावर येशील. सर्व कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. तेंव्हा घटस्फोटाचा विचार सोड.
29 Aug 2013 - 1:34 pm | सौंदाळा
अशीच केस, पण मुलाचा जोरात चालणारा बिझनेस होता. वकीलाने दिलेल्या सल्ल्यानुसार मुलाने बिझनेस कागदोपत्री आई, भाऊ वगैरेंच्या नावावर केला आणि स्वतः बेकार झाला (ऑन पेपर) आणि बायकोला पोटगी देण्यास असर्थता दर्शविली.
(या घट्स्फोटात कोण बरोबर कोण चुक हे मला माहीत नाही पण दोन्ही बाजुचे लोक घटस्फोटासाठी काय गेमा खेळु शकतात हे सांगायचे होते)
29 Aug 2013 - 3:14 pm | प्रभाकर पेठकर
माझ्याही ओळखीत, एकाने बायकोला घटस्फोट देण्याआधी गुपचुप आपली सगळी मालमत्ता, रोकड भावाच्या नांवावर हस्तांतरीत केली. घटस्फोट झाला. बायको आणि दोन मुलींच्या चरितार्थासाठी बर्यापैकी रक्कम द्यावी लागली. पण, समस्या अशी झाली की नंतर भावाने मालमत्ता आणि रोकड परत करण्यास चक्क नकार दिला.
आता भावाच्या नांवाने खडे फोडीत बसला आहे.
5 Sep 2013 - 11:59 am | ब़जरबट्टू
=)) =) =))
धिंगाणाच नुसता....
29 Aug 2013 - 1:29 pm | सौंदाळा
अशी केस ऐकली आहे. मित्राच्या गावात झालेला प्रकार. बिचार रोज पोलिस्स्टेशनला जेवणाचे डबे घेऊन जायचा मुलाकडच्या लोकांसाठी.
अजुन एक तिडीक जाणारा प्रकार म्हणजे 'लग्नाचे अमिष दाखावुन बलात्कार'.
स्वखुशीने (मग भलेही अमिष दाखवुन असेल, भुलथापांना बळी पडुन असेल) सज्ञान मुलीने लग्नाआधी शारीरिक संबध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न झाले नाही (मुलानेच प्रतारणा केली, गैरफायदा घेतला असे समजु) तर आधी स्वखुशीने ठेवलेला शारीरिक संबंध नंतर बलात्कार होतो का? कायदा काय सांगतो?
29 Aug 2013 - 1:44 pm | पिलीयन रायडर
मला असं वाचल्या सारखं वाटतय की काही दिवसांपुर्वी अशा केस मध्ये शाररिक संबंधाना बलात्कार मानु नये असा निकाल दिलाय.
30 Aug 2013 - 7:01 am | निनाद मुक्काम प...
लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध हा बलात्कार मानू नये असा व अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीर संबंध ठेवले तर तो बलात्कार समजू नये असे दोन महत्त्वाचे निर्णय कोर्टाने अलीकडे दिले
कॉलेज मधील जोडपी पळून गेल्यावर मुलीकडचे अनेकदा ती अल्पवयीन असल्यावर त्या मुलावर अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करतात व जरी मुलीने आमचे एकमेकावर प्रेम आहे असे सांगितले तरी मुलाची रवानगी तुरुंगात व्हायची
आता ह्या प्रकाराला आळा बसेल
30 Aug 2013 - 9:45 am | संजय क्षीरसागर
तो बलात्कार समजू नये
असा कोणत्या कोर्टानं आणि केव्हा निर्णय दिलाय?
30 Aug 2013 - 1:16 pm | गवि
याबाबत फार उलटसुलट निकाल आणि घटना वाचायला मिळतात. अल्पवयीन, शरीरसंबंध, लग्न, परस्परसंमती, जबरदस्ती आणि सहभागी पार्ट्यांचा धर्म या सर्व मिश्रणातून एकापेक्षा एक बुचकळ्यात टाकणारे निकाल / बातम्या वाचलेल्या आठवतात. त्यातल्या नमुन्यादाखल काही. जरुर वाचा. पुरेसा गोंधळ होण्याची खात्री.:
लेटेस्टः
लिंकः
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-08-26/news/41455571_1_...
काही अंश चोप्य पस्ते:
टायटलः Consensual sex with minor not crime, Delhi court says
त्या आधी २००८ मधे:
लिंकः
http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Minors-marriage-valid-rules-HC...
टायटलः
Minor's marriage valid, rules HC
काही भागः
त्यानंतर एक २०१० मधले पहा:
लिंकः
http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Consensual-sex-with-minor-term...
टायटलः
Consensual sex with minor termed rape even in case of marriage: HC
काही मजकूरः
आणि एका २०१० च्याच केसमधे पहा:
लिंकः
http://m.mumbaimirror.com/index.aspx?Page=article§name=News%20-%20Ci...
टायटलः HC to ask minor if she was forced to marry
काही मजकूरः
30 Aug 2013 - 4:19 pm | संजय क्षीरसागर
यावर एक ज्योक आहे:
एका विवाहिताकडे एक सुरेख मुलगी आकर्षित होते. तिचा अल्लडपणा पाहून, नेमक्या नको त्या वेळी, तो विचारतो
`बाय द वे', हाऊ ओल्ड आर यू?'
`वाय? आएम थर्टीन' ती बिन्धास्त सांगते.
तो परत कपडे घालतो. ती बघतच राहते. आणि विचारते :
`आर यू स्युपरस्टिशियस ऑर व्हॉट?'
___________________
आपल्याकडे बालविवाहाला बंदी आहे. आणि समाजसंकेतानुसार शरीरसंबंध हा सज्ञान लोकांचा व्यवहार आहे. या दोन बेसिक गोष्टींवरून अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध बेकायदा ठरतो.
30 Aug 2013 - 8:02 pm | चिगो
बरोबर, संक्षी.. पण 'समाजसंकेत' आणि मुलामुलींचे ' सज्ञान' व्हायचे वयदेखील बदलायला लागले असतांना कायद्यालापण बदलायला नको का? ;-) इथे गारोहिल्समध्ये वयात आलेली मुलगा मुलगी संबंध ठेवतात, आणि सगळं जुळत असेल तर लग्नपण करतात.. आईबापांच्या लग्नात पोरांनी सामिल असणं, हे काही धक्कादायक वगैरे नाही इथे..
2 Sep 2013 - 2:35 pm | संजय क्षीरसागर
अर्थाअर्थी संबंध नाही.
इकडे तशी धमाल चालू झालीये पण अजून चौफेर पसरलेली नाही.
5 Sep 2013 - 4:36 pm | चिगो
अहो, निस्ती धमालच नाही हो, लग्नेही होतात कायदेशीर वयाच्या आधी..
5 Sep 2013 - 7:20 pm | संजय क्षीरसागर
मला वाटलं ते वर्च्युल जगातच आपल्या पुढे आहेत पण अॅक्च्युल जगात सुद्धा त्यांनी मजल मारलीये? अरे आपण बालविवाह बंद केले ते त्यांनी चालू केले. म्हणजे ते मागे आहेत आपल्या!
9 Sep 2013 - 10:32 pm | चिगो
काहीतरी घोटाळा होतोय, संक्षी.. मी भारतातल्या मेघालयातील गारोहील्समधल्या आदिवासी लोकांबद्दल बोलतोय.. तुम्ही मला उसाच्या देशातल्या मिपाकरांशी कन्फ्यूज केलंत का काय?
9 Sep 2013 - 11:27 pm | संजय क्षीरसागर
माझा भूगोल कच्चा आहे. कारण शाळेत मित्रांनी एक फंडा काढला होता : ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता विचारयाचा नाही.... पण मेघालयात तर बालविवाहाला बंदी हवी.
10 Sep 2013 - 3:28 pm | चिगो
पण बघत कोण बसणार? तसेही ७ वर्षापर्यंत शिक्षा असलेले गुन्हे, जर त्यात दोन्ही पक्ष गारो असतील तर हिल कौंसिलच्या कोर्टात जातात, ज्यांचा कारभार माशाल्लाह असतो.. ;-)
10 Sep 2013 - 11:32 pm | संजय क्षीरसागर
11 Sep 2013 - 7:05 pm | चिगो
हा तर आहेच, पण फार महत्त्वाचा नाही.. इतका नसला, तरी बर्यापैकी मोकळेपणा गारो हिल्समध्ये पाहीला आहे.. बाकी बेवर्ली हिल्स आणि गारो हिल्समध्ये लाख फरक आहेत.. दोन्ही बघितल्याने फारच चांगल्याने ठाऊक आहे..
11 Sep 2013 - 10:44 pm | संजय क्षीरसागर
आणि ते नेमक्या हव्या त्या गोष्टी उचलतात!
29 Aug 2013 - 2:10 pm | नित्य नुतन
फक्त शारीरिक संबंध असतील आणि लग्न झालेले नसेल तरीही ते लग्न मानले जावे असाही कुठे तरी निर्णय झाल्याचे वाचल्यासारखे वाटते .. नीट आटवत नाही ...
29 Aug 2013 - 3:17 pm | पिलीयन रायडर
हो...हे ही वाचलय..
म्हणजे संबंधाना लग्नात कन्वर्ट करता येईल.. पण त्याला बलात्कार म्हणता येणार नाही..
30 Aug 2013 - 10:10 am | llपुण्याचे पेशवेll
मद्रास हायकोर्टाने बहुधा निकालात असे म्हटले कोणत्यातरी. की लग्नाचं वचन देऊन शारीरीक संबंध ठेवले आणि काही कारणाने लग्नं होऊ शकले नाही तर ते शारीरीक संबंध म्हणजे बलात्कार किंवा फसवणूक होत नाही.
30 Aug 2013 - 10:53 am | कपिलमुनी
शारीरिक संबंध ठेऊन मुलीने लग्नाला नकार दिला तर तो मुलावर बलात्कार असेल का ?
30 Aug 2013 - 11:34 am | संजय क्षीरसागर
बलात्काराची व्याख्या `वरून खाली' अशी केली गेली आहे. पुरुषाला `वर' म्हणत असले तरी कायद्याच्यादृष्टीनं तो खाली आहे. हा वरवर जरी अन्याय (पक्षी पुरुषावर बलात्कार) असला तरी कायद्याला ते मान्य नाही.
30 Aug 2013 - 12:49 pm | कपिलमुनी
रीटायर झाल्यावर वकीलीची सनद घेउन जनहीत याचिका दाखल करून या सर्वांचा कीस पाडायची फार इच्छा आहे ..
30 Aug 2013 - 1:08 pm | संजय क्षीरसागर
लग्न हे देण्याघेण्याचं नातं आहे.
30 Aug 2013 - 2:08 pm | कपिलमुनी
काही प्रवृती कायद्याचा गैरवापर करतात..किंवा कायदा प्रत्येक वेळी पुरुषांना दोषी ठरवतो ..जसे वरती चर्चिल्या प्रमाणे फक्त पुरुष दोषी ठरतो ...अशा कायद्यांचा कीस पाडला पाहिजे
31 Aug 2013 - 10:52 am | संजय क्षीरसागर
थोर कवि गदिमा लिहून गेले आहेतच; पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा, ...दोष ना कुणाचा. ते तमाम पुरुष जातीला लागू आहे. तरी व्यथित न होता मुनीश्री आपण, कायद्याच्या किसापेक्षा, किसमीस या पर्यायाची निवड करून सुखात आयुष्य व्यतित करा.
29 Aug 2013 - 4:57 pm | सूड
लग्नाआधी मुलीचं गावाबाहेरच्या दरवेषांच्या वस्तीतल्या एकाशी प्रेमप्रकरण चालू होतं. लग्न झालं, त्यानंतरही तिचं त्याला भेटायला जाणं चालूच होतं. मुलाला ही गोष्ट कळायच्या आत तिने आणि तिच्या प्रियकराने नवर्याला गावाबाहेर बोलवून त्याचा खून केला. खून म्हणजे सरळ शिर धडावेगळं!! वर्षभराने तपास लागला त्यात हे सगळं कळलं.
मित्राकडून असं ऐकलंय की या वस्तीतून जायला भले भले घाबरतात, कारण हे लोक छोट्या वादासाठी पण सरळ हाणामारीवर उतरतात.
29 Aug 2013 - 5:05 pm | बाप्पू
अशा प्रकारामध्ये सत्य असत्य तपसन्याआधिच पोलिस आणि समाज नवरयाला आनि त्यच्या नातेवाइकाना गुन्हेगार समजुन मोकळे होतात... तसेच व्रुत्तपत्रामध्ये पण मुलगा आणि त्याच्या नातेवाइकांची नावे छापुन येतात. (सत्य असत्य तपसन्याआधिच) कारण सर्व कायदे स्त्रियांच्या बाजूने आहेत. पण आता त्यांचा गैर फायदा घेणार्यांचे वाढ्ते प्रमाण चिंताजनक आहे... :(
29 Aug 2013 - 11:22 pm | आनन्दिता
माझा एक जवळचा मित्र आहे.. खुप चांगला , आणि सालस, ३ वर्षांपुर्वी त्याचं लग्न झालं. टिपिकल अरेंज मॅरेज.. साखरपुडा आणि लग्न यात २-३ महिन्यांचं अंतर... या काळात दोघांचं फोनवर बोलणं ही व्ह्यायचं... लग्न झालं आणि हनिमुन साठी म्हणुन दोघं मनाली वगैरे ला गेले... तर ती हलकट मुलगी तिकडुन परस्पर पळून गेली... फोन करुन चार ओळी बोलली ...की मी अमक्या तमक्या वर प्रेम करते, त्याच्या बरोबरच आयुष्य काढणार आहे.. मी माझ्या घरच्यांसमोर निघुन जाउ शकत नव्हते त्यामुळे लग्न करावं लागलं...
हा बिचारा पुर्ण कोलॅप्स होऊन परत आला.. त्यावर ही अशक्य कडी म्हणजे... ती मुलगी ज्याच्यासाठी पळून गेली होती त्याने तुझं लग्न झालंय असं सांगुन हाकलुन दिली, तेव्हा परत सासरीच आली... घटस्पोट द्यायला ही तयार नाही... तिच्या आई-वडीलांना हे सगळं माहीत असुनही त्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न लावुन दिलं...
आणी आता पोरीला नांदवा नाहीतर " हूंड्याची केस टाकतो" अशा धमक्या हि द्यायला सुरुवात केली...
माझ्या मित्राची साधीसुधी फॅमिली अगदी होरपळून निघाली... शेवटी आम्हा मित्रांपैकीच काहीजणांनी ओळखीतल्या एका मोठ्या पोलिस ऑफिसरला सर्व सांगुन त्याच्याकरवी त्या सगळ्यांना डोस टाकले.. तुमच्या मुलीची सगळी प्रेमपत्रं, sms रेकॉर्ड्स आमच्या कडे आहेत आणि, तो प्रियकर ही साक्ष देणार आहे बसा आता तुरुंगात अशी हुल ही दिली... आणि कसाबसा काहीही न देता घटस्फोट मिळवला...
पण या सगळ्यात माझ्या सज्जन मित्राची प्रचंड वाताहात झालीय...
29 Aug 2013 - 11:38 pm | काळा पहाड
भीष्म/विचीत्रवीर्य - अंबा - शाल्व
फक्त अंबेचे आई वडील महाभारतात अशा "घाणेरड्या रक्ताचे" नव्हते.
30 Aug 2013 - 11:30 am | नित्य नुतन
भयंकर ... इतक्या उठवळ मुली असू शकतात हे कायदे बनवणार्यांच्या लक्षात कसे येत नाही ..आणि सध्याच्या काळात अशांचीच संख्या जास्त आहे...
NCW (National Commision of Women) च्या अध्यक्षा कोणीतरी मोघे म्हणून आहेत .. त्यांना एकदा अशा कायद्याच्या गैरवापराबद्दल विचारले असता त्यांनी सरळ हात वर केले ... म्हणाल्या की असा गैरवापर मी तरी पाहिलेला नाही ... एव्हढ्या मोठ्या पदावर डोळे झाकून काम करतात वाटतं ..
30 Aug 2013 - 1:03 pm | संजय क्षीरसागर
एवढा मोठा खर्च झाल्यावर (आणि मनालीसारख्या रम्य स्थळी गेल्यावर) निदान हनिमून तरी पूर्ण करायचा होता. अशी धरसोड वृत्ती काय कामाची?
>शेवटी आम्हा मित्रांपैकीच काहीजणांनी ओळखीतल्या एका मोठ्या पोलिस ऑफिसरला सर्व सांगुन त्याच्याकरवी त्या सगळ्यांना डोस टाकले.. तुमच्या मुलीची सगळी प्रेमपत्रं, sms रेकॉर्ड्स आमच्या कडे आहेत आणि, तो प्रियकर ही साक्ष देणार आहे बसा आता तुरुंगात अशी हुल ही दिली... आणि कसाबसा काहीही न देता घटस्फोट मिळवला...
बेस्ट! तुमच्या मित्राला सांगा अशी मुलगी वेळी-अवेळी, काहीही सोडून गेली असती... झालं ते बरंच झालं.
29 Aug 2013 - 11:49 pm | काळा पहाड
माझा मागचा प्रतिसाद का उडवण्यात आला हे कळलं नाही. पण एक करोड? त्याच्या पाव किंमतीत कोणीही सासरचं सारं घर सुपारीवर "निर्मनूष्य" करू शकतो.
29 Aug 2013 - 11:58 pm | संजय क्षीरसागर
ही सुपारी कुठून आणली?
30 Aug 2013 - 12:03 am | काळा पहाड
जेल मधल्या जेवणापेक्षा बरीच असावी ना? एखादा उद्योग उभा राहू शकेल त्या मुळं.
30 Aug 2013 - 12:22 pm | संजय क्षीरसागर
यापरता सुपारी व्यवस्थित कुटून तीत ज्येष्ठमधपूड, गुंजपत्ता, थंडाई आदी द्रव्ये मिसळून भोजनपश्चात मुखशुद्धीस वापरल्यास घरच्याघरी निद्रालाभ होईल असे वाटते.
30 Aug 2013 - 4:25 pm | काळा पहाड
अशा गोष्टी मुळेच मराठी माणूस उदयोगात मागे असतो असे मानले जाते. आम्ही निद्रा घेतली तरी ते युपी बिहार कट्टे वाले आहेत ना आमचे उद्योग बळकवायला. मी तर इकडे एजन्सी काढायचा विचार करत होतो आणि तुम्ही असले झोपा काढायचे सल्ले द्या.
31 Aug 2013 - 12:05 am | संजय क्षीरसागर
एवढी भयंकर रिस्क घेऊन सुपारीचा धंदा करण्यापेक्षा तुम्ही या विषयावर मराठी सिरियल काढावी. आणि एपिसोड लेखनाचे काम इथल्या एकेका सदस्यावर सोपवावे. यात सर्व मराठी माणसांचे हित सामावले आहे.
6 Sep 2013 - 3:30 pm | अनिरुद्ध प
सुपारी कच्ची कि भाजलेली(पक्की) कि मिश्र(कच्चा-पक्का),हे जरा सान्गीतलत तर घरी करुन बघीन म्हण्तो.
30 Aug 2013 - 12:16 pm | llपुण्याचे पेशवेll
माझ्या एका चुलत भावाच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे. जुलै महीन्यात लग्नं झाले. लग्नानंतर ८ व्या दिवशी मुलगी पळून गेली दागदागिने घेऊन आणि दुसर्या मुलाबरोबर रजिस्टर मॅरेज केले. या लग्नाचे अजून रजिस्ट्रेशन झालेले नसल्याने ते शक्य झाले किंवा काय माहीत नाही पण ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे छुपी तयारी आधीपासून चालू होती हे नक्की. बाई ८व्या दिवशी घरातून पळून जाऊन दुसर्याबरोबर लग्नं करत्या झाल्या. निराश झालेल्या आमच्या भावाने व त्याच्या आईवडीलानी दुसरीकडे लग्नं करुन जाते तर जाऊदे, घरच्या दबावाखाली लग्नं केलं असेल असे म्हणून नाईलाजाने का होईना मान्यता दिली. परंतु दिलेले दागिने तरी परत दे अशी विनंती केल्यावर तिने ते मला माझ्या नविन लग्नाचे म्हणून भेट म्हणून ठेऊन घेतलेत असे तिने म्हटले.
आता पुढे काय झाले ते मला माहीत नाही. कदचित असे विचारणे म्हणजे पण जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते असे वाट्ले म्हणून विचारले नाही.
30 Aug 2013 - 1:14 pm | संजय क्षीरसागर
काय या मुली! अर्थात, आठ दिवस संसार केला म्हणजे तिच्याही काही अपेक्षा असणार. पण धीस इज टू मच.
30 Aug 2013 - 3:11 pm | मालोजीराव
पुपे ८ व्या दिवशी रजिस्ट्रेशन झाले म्हणजे २२ दिवस अगोदर पासून तयारी होती…म्यारेज रजिस्ट्रार ला ३० दिवस आधी नोटीस द्यावी लागते बहुतेक…
30 Aug 2013 - 4:20 pm | काळा पहाड
__/\__
30 Aug 2013 - 5:55 pm | नित्य नुतन
मला वाटतं या केस मध्ये, पहिला नवरा तिच्या वर केस टाकू शकतो कारण एक लग्न झालेले असताना तिने दुसरे लग्न केलेले आहे .. लग्नाचे फोटो हा सुद्धा लग्न झाल्याचा पुरावा असतो ... मुलीला चांगलाच धडा शिकवत आला असता ... किमान दागिने तरी परत मिळवता आले असते ...
30 Aug 2013 - 6:12 pm | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे. त्याला सांगितले आहे कायदेशीर कारवाई कर म्हणून. पण तो तेव्हा बोलायच्या मनःस्थितीत नव्हता म्हणून मी विषय वाढवला नाही.
31 Aug 2013 - 11:02 am | संजय क्षीरसागर
नाही तर काय. फर्स्ट नवर्याला काहीही चूक नसतांना निष्कारण सालंकृत कन्यादान करायला लागलं.
5 Sep 2013 - 2:24 pm | उद्दाम
पण केस केली तरी बाईवर कारवाई होत नाही, असे वाटते.
पुरुषाला द्वि भार्या प्रतिबंधक कायदा लागू होतो. त्याने दुसरे लग्न केले तर तो गुन्हा.
पण बाई साठी द्विपतीप्रतिबंधक कायदा आस्तित्वात नाही. ( असे वाटते.) त्यामुळे बाई कायदेशीर रीत्या दोघांची बायको म्हणून राहू शकते.
आता फार्फार तर त्या पहिल्या बिचार्या नवर्याला बाईने ब्रीच ऑफ फेथ / काँट्रॅक्ट केले या बेसवर कोर्ट बाईपासून तत्काळ ( म्हणजे अगदी १ दिवसात नव्हे, पण जास्त त्रास न देता) घटस्फोट देऊन मोकळे करेल. पण बाई दुसर्याबरोबर नांदते येथपासून ते कोर्ट कज्जा वगैरे सगळे पुरावे नवर्यालाच आणावे लागतील. बाईला शिक्षा होणार नाही. बाई स्वेच्छेने गेल्याने त्या दुसर्या पुरुषावरही बाईला फूस लावल्याचा गुन्हा दाखल होणार नाही.
5 Sep 2013 - 3:14 pm | संजय क्षीरसागर
आहो, बाईचं जाऊं द्या, तीची `छुपी तयारी' आधीच झाली होती. दागिने का परस्पर वळते केले? हा मुख्य प्रश्न आहे.
5 Sep 2013 - 3:30 pm | नित्य नुतन
बाई वर मानहानीचा दावा टाकता येईल .. शिवाय चोरीचा दावाही टाकता येईल .. द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्त्रीला पण लागू होतो, शिक्षेचे स्वरूप सारखेच आहे का हे गुगलावे लागेल ..पण वेळेवर केल्या तर बर्याच गोष्टी करता येतात... अर्थात या करता वकिली सल्ला घ्यावा लागेल ...
5 Sep 2013 - 3:38 pm | संजय क्षीरसागर
स्त्रीधन कायद्याखाली नवर्याची सरकारी इतमामानं वरात निघेल. आणि मानहानी म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा म्हणायचंय का तुम्हाला? त्यानं दागिन्यांचा आणखीनच लफडा होऊन बसेल.
6 Sep 2013 - 12:56 am | विश्वनाथ मेहेंदळे
(नवर्याने)दिलेले दागिने भौ. त्याला स्त्रीधन कायदा लागु होतो ??
6 Sep 2013 - 2:21 pm | उद्दाम
नवर्याने दिलेले दागिनेही बायकोचेच असतात.
बायको दागिने घेऊन आठ दिवसात पळाली. आता तुम्ही तिला अजून डिवचलेत तर हा नवरा नपुंसक आहे, आठ दिवसात याने मला काही केले नाही, म्हणून मी पळाले, अशी बाईने बोंब ठोकली तर काय करणार?
6 Sep 2013 - 3:06 pm | संजय क्षीरसागर
एकदा त्याची मनःस्थिती ठीक झाली की तो काय वाट्टेल ते करून दाखवेल.
30 Aug 2013 - 9:01 pm | बाबा पाटील
चौकीला थोडेफार मॅनेज करुन्,त्या पोरीच्या सगळ्या खानदानावर केस टाका,पोरीवर सेक्च्यल हॅरेषमेंट ची टाकता येइल्,पुरावेच उभे करायचे म्हटले तर सगळच करता येत्,फक्त पोरग भक्कम पाहिजे, स्त्री जातीवर कधी अन्याय करु नये,पण त्या स्त्रीत्वाचा फायदा घेउन एखाद घर जर बर्बाद करत असतील तर त्यांना जागेवर आणलच पाहिजे....
30 Aug 2013 - 11:11 pm | शिल्पा ब
बरोबर. फक्त इथे स्त्री ऐवजी 'कोणीही" शब्द चालेल.
31 Aug 2013 - 1:33 am | आनन्दिता
+१
मी वर लिहीलेल्या घटनेत आमच्या मित्रांनी ती पोरगी आणि तिचे हलकट घरचे या सगळ्यांना वाईट्ट रडवलंय... आयुष्यात कुणालाही फसवायच्या आधी ते १०० वेळा विचार करतील..
1 Sep 2013 - 11:40 am | उद्दाम
कसे, मलाही सांगा, मलाही असे करायची इच्छा आहे.
5 Sep 2013 - 2:25 pm | उद्दाम
इतका सुंदर धागा आणि युयुत्सू का नाहीत ?
11 Sep 2013 - 1:36 am | खटपट्या
माझ्या नात्यातला मुलगा रीक्शाचालक होता. त्याचे लग्न महीला पोलीसाबरोबर झाले होते. मुलगी वेगवेगळ्या बन्दोबस्तासाठी बरेच दीवस बाहेर असायची. नवर्यापेक्षा पोलीस शिपायान्बरोबर सम्पर्क जास्त येवू लागला. एका शिपायाबरोबर पळून गेली. मुलाने दुसरे लग्न केले आहे.
आपल्याच कार्यक्षेत्रातल्या मुला/मुलीबरोबर लग्न करावे का....? नेहमी हे शक्य होईलच असे नाही...
11 Sep 2013 - 1:55 am | संजय क्षीरसागर
...असा प्रश्न होताच. पण त्यानं आपली योग्य ती सोय केली हे बरं झालं.