काय करु

किर्ति's picture
किर्ति in काथ्याकूट
14 Jul 2008 - 2:19 pm
गाभा: 

8> मला एक मुलगा आहे
आणी माझी अशी इच्छा आहे कि मी एक मुलगी अडॉपट करवी
क्रुपया मला सल्ला द्यावा

प्रतिक्रिया

शेखर's picture

14 Jul 2008 - 2:43 pm | शेखर

किर्ति,
बेसनलाडू यांचा "अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखड" वाचा. एखादेवेळेस उपयोगी पडेल. खालील लिंक दिली आहे.

http://www.misalpav.com/node/2537

शेखर

मनिष's picture

14 Jul 2008 - 3:09 pm | मनिष

बोलू की नाही अश्या द्विधा मनस्थितीत आहे. माझ्या पहाण्यातल एक अनुभव सांगतो...तुम्ही ह्या दृष्टीने विचार करून बघा. आमच्या ओळखीत एका कुटुंबाने असे केले होते...पण ती दत्तक मुलगी १२-१३ वर्षाची झाल्यावर खूपच वेगळी आणि उद्धट झली. तिच्या मोठ्या बहिणीला खुप त्रास द्यायची आणि बर्‍याच वाईट सवयी लावून घेतल्या होत्या.....नंतर (आम्ही दुसरीकडे रहायला गेलो) परिस्थिती आणखीनच बिघडली म्हणे. अर्थात हे खुपसे त्या पालकांवर अवलंबून अस्ते.

मुल नसतांना दत्तक घेणे (स्वतःची मानसिक तयारी असेल तर) हे चांगलेच आहे, पण एक मुल स्वतःचे असतांना दुसरे मुल घेतांना खूप विचार करावा...त्या दत्तक मुलाच्या पौगंडावस्थेतल्या मनस्थितीची कल्पना करावी. घरातील दुसर्‍या मुलापेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना आयुष्याला ग्रहण लावू शकते...काहितरी चांगले करण्याच्या नादात, आपण नकळत त्याचे भावविश्व उध्वस्त तर करणार नाही ना, ह्याचा नीट विचार करावा.

सर्किट's picture

14 Jul 2008 - 11:20 pm | सर्किट (not verified)

शुभेच्छा !

- सर्किट

चतुरंग's picture

14 Jul 2008 - 11:30 pm | चतुरंग

स्तुत्य विचार!

चतुरंग

शितल's picture

14 Jul 2008 - 11:47 pm | शितल

विचार खुप चा॑गला आहे
मला वाटते समाजातील प्रत्येक कुटु॑बाने एक तरी मुल दत्तक घ्यावे.
मा़झाही हाच विचार आहे.
आणि मी तो तडीस नेणार आहे.
पण तुम्हाला एक मुल असेल तर तुम्ही दुसर्‍या मुलाला तेवढ्याच प्रेमाने वाढवु शकाल का हे तुम्ही स्वतःला विचारून पहा
आणि मन हो म्हणाले तर
एक चा॑गले कार्य तुमच्या हातुन होत आहे.