पोळीचा लाडू

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in पाककृती
17 Aug 2013 - 2:28 pm

मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू

साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप

कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल. ते त्या मिश्रणात टाका. तूप किती टाकायचे यासाठी स्वतःची तर्कबुद्धी वापरा. मिश्रण हाताने चोळून / कुस्करुन झाल्यावर त्याचे लाडू बनवा. शक्यतो छोटे आकार घ्या करायला व खायला सोपे जाते.
टीप- एखाद्याला हे मिश्रण लाडू या स्वरुपात आवडत नाही तर अशा वेळी ते तसेच मिश्रण या स्वरुपात ठेवले तरी चालते. ह दूध घालून ही चांगले लागते.
आहे की नाही झटपट पाककृती? आळशी वाचक यात आपापल्या वकूबानुसार यात भर घालू शकतात अथवा उपसाही करु शकतात.

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

17 Aug 2013 - 6:07 pm | अनन्न्या

आणि लगेच त्याची पाकॄ. आली.

चित्रगुप्त's picture

17 Aug 2013 - 6:14 pm | चित्रगुप्त

मला पहाटे उठण्याची सवय याच पाकृमुळे लागली. म्हणजे सगळे उठायच्या आत हे लाडू करून मटकवायचे आणि चित्रे काढायला गावाबाहेर निघून जायचे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 8:57 pm | प्रभाकर पेठकर

नापास.

छायाचित्र कुठाय?

तरीपण, लहानपणचा अत्यंत आवडता पदार्थ. आजी करायची. हल्ली बरेंच दिवसांत लहान झालोच नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Aug 2013 - 9:03 pm | प्रकाश घाटपांडे

याचे छायाचित्र वाचकांनी आपल्या मनःचक्षुसमोर उभे करावे.चला आपल्या अकाऊंटवर एक का होईना पण पाककृती चढली.
घरात जर बायकोने पोळी केली नसेल तर ही पाककृती करता येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2013 - 2:01 am | प्रभाकर पेठकर

म्हणजे साहित्यातः

स्वतःची बायको = १ नग असे पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2013 - 10:34 am | डॉ सुहास म्हात्रे

जास्त नग असल्यास तुमचा आक्षेप आहे काय? चवीत फरक पडेल काय? ;)

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2013 - 5:03 pm | प्रभाकर पेठकर

ते प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून आहे. आम्हाला १ नगच भारी पडतो.

नित्य नुतन's picture

26 Aug 2013 - 5:09 pm | नित्य नुतन

ह ह पु वा :-)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2013 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

पेठकर काका...! =)) =)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2013 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> छायाचित्र वाचकांनी आपल्या मनःचक्षुसमोर उभे करावे.
मनःचक्षुसमोर पोळीच्या लाडवाची कृती आणि पोळीचा लाडु उभा करुन आम्ही मटकावून टाकला आहे. :)

-दिलीप बिरुटे

पाषाणभेद's picture

18 Aug 2013 - 3:59 am | पाषाणभेद

जयहिंद सर.
मीठ किती टाकायचे? :-)

बाकी मस्त आहे ही पाकृ. शाळेपणी डब्यात हा लाडू असायचा.

स्पंदना's picture

18 Aug 2013 - 4:06 am | स्पंदना

शाळेपणी

आहा! नविन शब्द!

अनुप ढेरे's picture

18 Aug 2013 - 9:19 am | अनुप ढेरे

पीठीसाखर घातलेल्या लाडवांमध्ये मौज नाही. गूळ घातलेला लाडूच खरा,,,

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2013 - 9:58 am | प्रकाश घाटपांडे

मी लहानपणी तूप गुळ दशमी चा लाडू खात असे. तो तर अजून भन्नाट लागतो. दशमी ऐवजी भाकरी पण चालते. पण दशमी जास्त चांगली. माझ्या डोळ्यासमोर हे लिहिताना फक्त बाजरीची हेच अभिप्रेत आहे. ज्वारीच्या भाकरीचा फारसा अनुभव नाही.

तिमा's picture

18 Aug 2013 - 11:09 am | तिमा

ह्याच लाडूला, बाहेरुन साय गुंडाळली तर आणखीनच चांगली चव लागते.

आदूबाळ's picture

18 Aug 2013 - 12:31 pm | आदूबाळ

पाकृची सुरुवात

घरात पोळ्या उरवाव्यात. त्यासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी घरी जेवायला येतो असे सांगून आयत्या वेळी टांगावे आणि बाहेरूनच हादडून यावे. आई/बायकोच्या शाब्दिक फटकार्‍यांना तोंड देण्यास तयार रहावे. त्यासाठी वयोवृद्ध साधू नाहीतर मिसळणार्‍यांचा अभिमान यांना आश्रय दिल्यास सोपे पडते. "संपवतो ना उद्या सकाळी" असे म्हणून पोळीच्या लाडवांची कौटुंबिक पार्श्वभूमी तयार करावी.

(हीच तयारी फो ची पो किंवा फो ची भा यासाठीही उपयुक्त आहे)

अशी हवी.

अनुप ढेरे's picture

18 Aug 2013 - 12:40 pm | अनुप ढेरे

+१

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Aug 2013 - 1:01 pm | लॉरी टांगटूंगकर

ख्या ख्या!!!
वयोवृद्ध साधू नाहीतर मिसळणार्‍यांचा अभिमान =) =)

त्रिवेणी's picture

18 Aug 2013 - 1:12 pm | त्रिवेणी

मलाही आवडते पण गुळ घालुनच.

चिचिन's picture

18 Aug 2013 - 1:14 pm | चिचिन

यात अजुन थोडे पदार्थ टाकले कि मलिदा तयार होतो, उदा... डाळवे... खोबर खिस

प्रकाश घाटपांडे's picture

18 Aug 2013 - 1:58 pm | प्रकाश घाटपांडे

काळा गुळ वापरुन कुणी ही पाककृती केली आहे काय? हा गुळ विनाकारण कुप्रसिद्ध झाला आहे

प्रसाद गोडबोले's picture

18 Aug 2013 - 4:55 pm | प्रसाद गोडबोले

मलाही हा प्रकार आवडतो .
१६ सोमवारच्या उद्यापनालाही असाच काहीसा प्रकार करतात ( त्याला काही विशेष नावही आहे बहुधा )

म्हैस...'s picture

18 Aug 2013 - 7:56 pm | म्हैस...

( त्याला काही विशेष नावही आहे बहुधा )..................चुरमा असे म्हणतात त्याला

पैसा's picture

26 Aug 2013 - 6:04 pm | पैसा

अंडे घालून.........

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 6:13 pm | अनिरुद्ध प

आमचा ओढा मात्र,लाडु पेक्षा फोड्णीच्या पोळी कडेच जास्त असतो.

टोपीवाला's picture

26 Aug 2013 - 6:16 pm | टोपीवाला

गुळ/तुपाच्या भानगडीत कशाला पडता राव, फ़्स्ट क्लास कांदे ( महाग असले तरी ) तमातर घालून फोडणी द्या, कोथिंबीर टाका; आणि फडशा पाडा. वाटल्यास आमची मदत घ्या ( फक्त फडशा पडण्या पुरती )

विकास's picture

26 Aug 2013 - 6:52 pm | विकास

पोळीचा लाडू हा एक आवडता पदार्थ आहे. आमच्या लेकीस देखील आवडतो. मला स्वतःस पिठीसाखर (आणि अर्थात तूप) घालून आवडतो. तसेच फोडणीची पोळी पण छान लागते - नुसती अथवा दही घालून.

बाकी वर फोटोंचा विषय आल्याने मी गुगलून पाहीले तर पहीलाच फोटो हा मिपावरील "पूनम ब" यांनी दिलेल्या पोळीच्या लाडवाच्या (आणि मोदकांच्या) पाककृतीचा दिसला! त्यातील सर्वच फोटो पहाण्यासारखे आहेत. खाली फक्त त्यातील लाडवाचा फोटो डकवत आहे...

Policha Ladoo

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 7:19 pm | अनिरुद्ध प

लै झ्याक दिसतायत,पन मोतिचुर का काय म्हन्तात त्या सारके दिस्तायत.

विकास's picture

26 Aug 2013 - 7:23 pm | विकास

पोळीचूर आहेत ते! :)

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 7:34 pm | अनिरुद्ध प

बरका सायेब

गौरीबाई गोवेकर's picture

4 Sep 2013 - 12:52 pm | गौरीबाई गोवेकर

मी पण असेच करते पण आधी तूप कढईत गरम करून त्यात चिरलेला गुळ जरा तापवून घेते. त्याची मऊसर पेस्ट झाली की मग भुगा केलेली पोळी टाकते याने गोडपणा सगळीकडे सारखा पसरतो.

ऋषिकेश's picture

4 Sep 2013 - 1:37 pm | ऋषिकेश

गुळ व तुप एकत्र करून जरा गॅसवर खरपूस वितळवून मग चुरा घालावा. अधिक खमंग लाडु लागतो

प्यारे१'s picture

4 Sep 2013 - 7:57 pm | प्यारे१

मस्तच पाकृ काका. फक्त फोटो नसल्यानं नापास झालेला आहात. :)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2013 - 8:09 pm | प्रकाश घाटपांडे

फोटो नसला तरी या निमित्ताने माझ्या नावावर एक पाककृती जमा झाली हे काय थोड आहे का? तेवढेच ज्ञानप्रकाशात

प्रकाश घाटपांडे's picture

6 Feb 2019 - 5:31 pm | प्रकाश घाटपांडे

इशाच्या आईने माझी पाककृती चोरली असावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2019 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

धागा पाहून, "तुला पाहते रे... पाहून या धाग्याची कोणाला तरी आठवण आलेली दिसते आहे" हे लिहायला आलो होतो. पाहतो तर, खुद्द धागालेखकाने इशाच्या आईवर पेटंट चोरल्याचा आरोप केला आहे. =)) =)) =))