राजस्थानी मिश्र डाल आणि बेसन पुरी

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म
5 Aug 2013 - 4:44 pm

Rajasthani-Dal-Puri

मिश्र डाळीसाठी साहित्यः

चणा डाळ १/४ वाटी
अख्खे मसूर १/४ वाटी
उडीद डाळ १/४ वाटी
तूर डाळ १/४ वाटी
मुग डाळ १/४ वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
तिखट १ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा
आलं १"
टोमॅटो १ मध्यम
कोथिंबीर मुठभर
मीठ चवीनुसार.
साजूक तुप २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून)

तयारी: सर्व डाळी धुवून घ्या. आलं बारीक चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. कोथिंबीर चिरुन घ्या.

कृती:

सर्व डाळी + हळद कुकर मध्ये घालून त्यात ५ वाट्या पाणी घाला आणी ५ शिट्ट्या होऊ द्या.
डाळी शिजल्यावर जरा (जास्त नाही) घोटून घ्या. मीठ घालून ढवळा.
आता एका फ्राय पॅन मध्ये साजूक तूप घेऊन ते तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की त्यात आलं घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घालून परता. तिखट घाला. त्यावर कोथिंबीर घालून परता. हे सर्व आता डाळीवर ओतून नीट मिसळा.

पुर्‍यांसाठी साहित्यः

बेसन १ वाटी
जीरं १/२ लहान चमचा
कलोंजी १/४ लहान चमचा
हिंग १/४ लहान चमचा
तिखट १ लहान चमचा
आमचुर पावडर १ लहान चमचा.
कोथिंबीर मुठभर
राईचे तेल १ मोठा चमचा (टेबल स्पून)

कृती:

सर्व जीन्नस मिसळून आवशक्यतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळा आणि पुर्‍या लाटून तळा.

लोणच्याबरोबर सादर करा.

शुभेच्छा..!

ही डाऴ चवीला कांही ग्रेट लागत नाही. पण सर्व डाळींचे मिश्रण असल्याकारणाने आरोग्यदायी आहे. आठवड्यातून एकदा करावीच.

पुर्‍यांचा आनंद घेण्यासाठी डाळ हवीच असे नाही. ह्या पुर्‍या नुसत्या लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर, चहाला साथसंगत म्हणूनही, मस्तं लागतात.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

5 Aug 2013 - 5:06 pm | कपिलमुनी

पावसापाण्याचं गरम गरम पुर्‍या आणि चटणी ! अहाहा ...
पाणी सुटले !
मस्तच पाकृ !!

काका या पुर्‍यांमध्ये गव्हाचे पीठ बिलकुलच नाही टाकायचे का?
या महिन्यात कास पठारला जाणार आहे तेव्हा पुर्‍यांची शिदोरी घेवून जाईन.
(पुरी प्रेमी)त्रिवेणी

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2013 - 5:11 pm | प्रभाकर पेठकर

नाही. ह्या आपण करतो त्या खार्‍यापुर्‍या नाहीत. गव्हाचे पीठ अजिबात घालायचे नाही. ह्या पुर्‍या जास्त फुगत नाहीत पण फार खुसखुशीत होतात. चवीत वेगळेपणा आणायचा असेल तर आलं-लसूण पेस्ट आणि एखाद चमचा (टेबल स्पून) दही घालायला हरकत नाही. पण मुळ राजस्थानी पाककृतीत ते नाही.

त्रिवेणी's picture

5 Aug 2013 - 5:18 pm | त्रिवेणी

थांकु काका

छान फोटो व पाकृ. पुर्‍या करताना अनेक जिन्नसांमधील एक म्हणून बेसन माहित होते पण फक्त बेसनाच्या पुर्‍या ही नवीन पाकृ आहे. डाळीचा फोटू आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Aug 2013 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा. मी तर नुसत्या- कोरड्या पुर्‍या खाणे पसंत करेन. :)

-दिलीप बिरुटे

भावना कल्लोळ's picture

5 Aug 2013 - 5:22 pm | भावना कल्लोळ

पाकू खुपच छानच … काका तुमच्या पोस्ट मुळे आमच्या खाद्य माहिती मध्ये खूप भर पडते आहे. धन्यु त्या बद्दल.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2013 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा

@ह्या पुर्‍या नुसत्या लसणाच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर,चहाला साथसंगत म्हणूनही,मस्तं लागतात.> या वर्णनामुळे भयंकर वाट लागल्या गेली आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/hungry.gif

अनिरुद्ध प's picture

5 Aug 2013 - 6:43 pm | अनिरुद्ध प

ह्या पुर्या एकट्याने सम्पवायचा डाव दिसत आहे.(माझा काकबली नाही काढलास तर पोटात दुखेल बर)*

दिपक.कुवेत's picture

5 Aug 2013 - 7:39 pm | दिपक.कुवेत

मला सुद्धा आत्ताच्या आत्ता पुर्‍या उचलुन खाव्याश्या वाटत आहेत. आल्याच्या चहाचे घोट घोट पित हा प्रतिसाद लिहितोय.....

अनन्न्या's picture

5 Aug 2013 - 7:48 pm | अनन्न्या

पण दोन्ही वेगवेगळे चांगले वाटेल, असेही रोजच्या आमटीला काहीतरी वेगळी चव हवीच असते.

प्रचेतस's picture

5 Aug 2013 - 8:17 pm | प्रचेतस

देखणी आणि चमचमीत एकदम.

सानिकास्वप्निल's picture

5 Aug 2013 - 9:15 pm | सानिकास्वप्निल

बेसन पूर्‍या आवडल्या
वेगळा प्रकार दिसतोय, नक्की करुन बघायला हवे.
फोटो व कृती छान .

सस्नेह's picture

5 Aug 2013 - 10:23 pm | सस्नेह

टेस्ट मात्र डाळ एके डाळ अन डाळ दोनी डाळ अशी काहीशी असेलसे वाटते .

अख्या बेसनाच्या असल्याने चवीष्ठ लागत असणार, ह्याची खात्रीच पटली. डाळही रुचकर लागत असावी.

मुक्त विहारि's picture

6 Aug 2013 - 12:36 pm | मुक्त विहारि

मस्तच..

उद्दाम's picture

6 Aug 2013 - 1:13 pm | उद्दाम

छान. सुंदर

पैसा's picture

6 Aug 2013 - 7:28 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच वेगळी आणि मस्त पाकृ.

स्पंदना's picture

7 Aug 2013 - 3:59 am | स्पंदना

डाळीची फोडणी वेगळी आहे, म्हणजे वेगळा फ्लेवर येणार आमटीला.
पुर्‍या तर मस्तच!!

दीपा माने's picture

7 Aug 2013 - 7:27 pm | दीपा माने

एकदम मस्त नवीन प्रकारच्या पुर्‍या! धन्यवाद प्रभाकर पेठकर.