नमस्कार लोक्स,
मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.)
कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा.
पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली. म्हणुन आईकडून जळगावहून ट्रॅवल मार्फत मागवुन घेतली.
तर मंड्ळी या जेवायला.
साहित्य-
कटरले- ½ किलो,
हरबर्याची डाळ- भिजवुन ½ वाटी,
लसूण चटणी- 3 चमचे,
हळद- ½ टे. स्पुन,
जिरे- ½ टे. स्पुन,
मोहरी- ½ टे. स्पुन,
तेल- आपल्या डायटनुसार(पण या भाजीला तेल जरा जास्तच लागते)
कृती-
कटरले आधी 1 तास तरी पाण्यात घालून ठेवायचे, कारण यातल्या बारीक काट्यामध्ये माती असते ती सगळी निघायला मदत होते.
आता कटरले बारीक चिरून घ्यावेत, जर आत मध्ये लाल निघाले तर टते टाकून द्यावे, त्याची चव थोडी कडसर लागते.
थोड्या जास्त तेलाची फोडणी करून त्यात जिरं, मोहरी टाकावी.
मोहरी तडतडली की त्यात हळद, लसूण चटणी टाकावी.
कटरले टाकून 5 मिनिट एक वाफ येऊ द्यावी.
आता त्यात भिजवलेली हरबरा डाळ टाकावी.
भाजीच्या कढईवर बसेल अश्या मापाचे झाकण ताट किवा ताटली वापरावी आणि त्यात पाणी घालावे. म्हणजे त्या ताट किवा ताटलीतील पाण्याच्या वाफेवर भाजी छान शिजेल.
भाजी शिजायला 20-25 मिनिटे लागतात.
भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ टाकावे. झाली भाजी तयार.
प्रतिक्रिया
4 Aug 2013 - 8:16 pm | विजुभाऊ
कटरले की करटोली?
4 Aug 2013 - 8:18 pm | त्रिवेणी
नक्की माहित नाही,
पण आमच्याकडे(खांदेशात) कटरले म्हणतात.
4 Aug 2013 - 8:41 pm | अभ्या..
आमच्यात कर्टुले म्हणतात.
धन्यवाद
5 Aug 2013 - 4:41 pm | पियुशा
पहिल्यांदाच ऐकल बुवा ह्या भाजीबद्द्ल दिसतेय तर छान :)
@ अभ्या लग्न झाल का रे तुझ ? ;)
4 Aug 2013 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर
ही तर आपली करटोली. इथे मस्कतमध्येही मिळतात. आता करून पाहतो (आणि अर्थात खातो).
छायाचित्रांऐवजी ही जोडण्या टाकण्याची इस्टाईल आवडली. तरीपण, डायरेक्ट छायाचित्रे पाहणे सोयीचे होते. असो.
4 Aug 2013 - 8:55 pm | Bhagwanta Wayal
रानभाजीमद्ये सर्वात महाग भाजी म्हणजे कर्टूले, पण खायाला खुपच छान लागतात. रेसेपी आवडली.
4 Aug 2013 - 8:55 pm | त्रिवेणी
नाही हो काका,
मी फोटोच टाकायचा प्रयत्न करते प्रतेकवेळी पण मागच्या बाकावरील विद्यार्थिनी असल्यामुळे कितीही शिकवले तरी जमत नाही आहे.
4 Aug 2013 - 9:05 pm | प्रभाकर पेठकर
सहज गंमत केली. राग नसावा.
4 Aug 2013 - 9:18 pm | त्रिवेणी
नाही हो काका खरच राग नाही आला.
पण खरच फिश फ्राय च्या रेसिपीच्या वेळी सुध्या बिरुटे सरांनी गणपा यांची फोटो अपलोड करण्याची लिंक दिली होती, मी त्या प्रमाणे आपलोडायचा प्रयत्न करते पण काय चुकते तेच कळत नाही.
4 Aug 2013 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रे लेखनाच्या चौकटीतच व स्पष्ट दिसावित म्हणून खालीलप्रमाणे प्रयत्न करून पहा:
१. Image URL: येथे चित्राची लिंक पेस्ट करा.
२. Alternative text: येथे फक्त एक स्पेस (स्पेसबार वापरून) टाका.
३. Width x Height:
अ) प्रथम चित्रांच्या लांबी-रुंदीचे आकडे न OK वर क्लिक करून पूर्वपरिक्षण करून पहा. जर चित्रे लेखनाच्या चौकटीत असतील तर अजून काहीही करायची गरज नाही... प्रकाशीत करा. अश्या चित्रांचा आकार (लांबीचा अथवा रूंदीचा मोठा आकडा टाकून) वाढविल्यास त्यांची स्पष्टता कमी होते.
ब) चित्रे लेखनाच्या चौकटीबाहेर जात असल्यास (वरचा पर्याय योग्य असल्यास हा पर्याय बाद समजा) :
प) मिपाच्या माहितीचा उजवा कॉलम असेपर्यंत (Powered by gamabhana पर्यंत) : लांबी ६८० ठेवा
फ) Powered by gamabhana च्या खाली : लांबी जास्तीत जास्त ८६० ठेवा
रूंदीची जागा नेहमीच रिकामी ठेवा, मिपा आपोआप योग्य मापाची रूंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.
4 Aug 2013 - 9:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
"...प्रथम चित्रांच्या लांबी-रुंदीचे आकडे न OK वर क्लिक करून पूर्वपरिक्षण करून पहा...." ऐवजी "प्रथम चित्रांच्या लांबी-रुंदीचे आकडे न टाकता OK वर क्लिक करून पूर्वपरिक्षण करून पहा." असे वाचा.
4 Aug 2013 - 9:56 pm | त्रिवेणी
धन्यवाद सर,
मी नक्की प्रयत्न करेन
4 Aug 2013 - 9:10 pm | सानिकास्वप्निल
आम्ही पण करटोली म्हणतो
खूप आवडते ही भाजी :)
5 Aug 2013 - 8:07 am | शिल्पा ब
मी एकदा हॉटेलात खाल्ली होती थोडी. कुठे मिळाली तर करुन बघेन.
5 Aug 2013 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा
ह्या भाजी ची चव नक्की कशी लागते? :)
5 Aug 2013 - 10:25 am | त्रिवेणी
नक्की सांगता नाही येणार, मी तुमचा प्रश्न वाचल्यावर बराच विचार केला यावर पण दुसर्या कोणत्या भाजीच्या चवीशी याची चव compare करून नाही सांगता येणार.
बेस्ट वे तुम्ही ही भाजी खायला घरीच या, तुम्हाला आताच आमंत्रण देते.
5 Aug 2013 - 11:40 am | दिपक.कुवेत
हि पाहिली आहेत पण अजुन कधी ह्यांची भाजी खाल्ली नाहि. वेल अआ बरोबर मी पण येतोच खायला कसे?
5 Aug 2013 - 2:50 pm | अत्रुप्त आत्मा
@ वेल अआ बरोबर मी पण येतोच खायला कसे?>>> तुमच्या संगाट येऊ आम्ही... पण येताना ते रबडी/मँगो /पायनॅपल खंड वगैरे घेऊन या! त्येची लै आठवान हुतीया! मनातनं जातच नै! :)
5 Aug 2013 - 2:43 pm | त्रिवेणी
नक्की वाट पाहते.
5 Aug 2013 - 7:50 pm | अनन्न्या
आमच्याकडे पण करटोली म्हणतात याला!
5 Aug 2013 - 8:07 pm | त्रिवेणी
कधी येतेय ते सांग, वाट पाहते.
कोकम आगळ पिताना तुझी आठवण येते.
गणपतीत ये,नक्की जमव.
10 Aug 2013 - 8:29 am | एका
या भाजीला 'रानकारली' असेहि नाव एकले आहे.
10 Aug 2013 - 9:08 am | निवेदिता-ताई
मी पहिल्यांदाच पहाते आहे ही भाजी.
10 Aug 2013 - 9:29 am | पैसा
कडवट असतात का? (रानकारली असतील तर.)
10 Aug 2013 - 1:29 pm | त्रिवेणी
नाही पैसा ताई कडवट नाही म्हणता येणार, पण जी कटरली खूप मोठी व आतुन लाल बियांची असतात तीच फक्त कडवट असतात.
10 Aug 2013 - 1:31 pm | त्रिवेणी
सर्व वाचकांचे व प्रतिसादकर्त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.
22 Oct 2013 - 9:14 pm | पिंगू
आम्ही ह्या भाजीला कंटोली म्हणतो आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते.
बाकी ही भाजी चवीला भारीच लागते.