साहित्यः
२०० ग्रॅम पनिर कुस्करून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरुन
१ गाजर किसून
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
२ बटाटे उकडून मॅश करुन
१ चमचा आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
२ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
गरजे नुसार मिठ
पाव ते अर्धा वाटी तेल
चाट मसाला
पाककृती
१) भांड्यात तेल गरम करुन त्यावर चिरलेला कांदा घाला.
२) कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजला की त्यावर आल-लसुण पेस्ट व मिरची कोथिंबीर पेस्ट घालून ढवळा.
३) वरील मिश्रणावर कोबी, गाजर घालून २-३ मिनिटेच परतवत शिजवा. चायनीज पदार्थांसारखेच जास्त शि़जू देऊ नका.
४) आता मॅश केलेले बटाटे, मिठ घालून पुन्हा चांगले ढवळून लगेच गॅस बंद करा.
५) हे मिश्रण एका ताटात पसरवा व जरा थंड होऊ द्या.
६) मिश्रण थंड झाले की त्यात पनिर व कॉर्नफ्लॉवर टाकून मिश्रण एकजीव करा.
७) आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट करा. व नॉनस्टीक पॅनवर जरासेच तेल घालून शॅलो फ्राय करुन घ्या. दोन्ही बाजू मध्यम आचेवर साधारण ५-६ मिनीटे शिजवा.
८) कटलेट तयार झाले की गरम असतानाच त्यावर चाट मसाला भुरभुरवा नुसते किंवा सॉस किंवा पुदीना चटणी बरोबर ह्याचा आस्वाद घ्या. :स्मित:
अधिक टिपा:
* ह्या कटलेटमध्ये इतर कोणतेही मसाले न वापरल्याने पनिर व भाज्यांचा अस्सल स्वाद येतो.
* लहान मुलांना तर खुपच आवडतात. शिवाय कोबी सारखी भाजी खाल्ली जाते.
* ह्यात अजुन कांद्याची पात, किंवा आपल्या आवडीच्या भाज्या थोड्या प्रमाणावर घालू शकता.
प्रतिक्रिया
25 Jul 2013 - 2:45 pm | धनुअमिता
आवडले.नक्की करुन बघणार.
25 Jul 2013 - 3:03 pm | मदनबाण
ह्म्म... वेगळीच पाकॄ.
25 Jul 2013 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा
25 Jul 2013 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर
व्हेज चखना म्हणून सुद्धा छान आहे.
25 Jul 2013 - 3:49 pm | चिंतामणी
पनीर प्रेमी परा,धमु कुठे आहेत?????????? :P
25 Jul 2013 - 3:53 pm | मी_आहे_ना
मस्त पाकृ.
25 Jul 2013 - 4:11 pm | जागु
धन्यवाद. हे जादू झाल्यासारख कोणी केल?
25 Jul 2013 - 4:26 pm | कवितानागेश
.
25 Jul 2013 - 4:49 pm | दिपक.कुवेत
छान दिसतायेत कटलेट.