गाभा:
मला आमच्या गावात असलेल्या एका "गोपाळकॄष्णाच्या मंदिराच्या भिंतीवर" व त्याखाली असलेल्या एका पुलाच्या भिंतीवर काही "शिलालेख" दिसले.
त्याचा अर्थ जाणुन घेण्याची उत्सुकता असल्याने आम्ही तेथेच काही ठिकाणी चौकशी केली पण ती "लिपी वाचण्यास व त्याचा अर्थ" सांगण्यास समर्थ अशी व्यक्ती मला सापडली नाही.
मिपाच्या टॅलेंटचा वापर करुन घेण्यासाठी मी व माझ्या मित्राने त्याचे काही "फोटो" काढले आहेत.
ते आता खाली "चिटकवतो " आहे.
कॄपया त्याचा अभ्यास करुन मला त्याचा अर्थ लावण्यास मदत करावी ....
कॄपया पहा आणि बघा काही उमजते का ?
आपल्या इथल्या "प्रियालीताई, विजुभाऊ, मुक्तसुनीत, चतुरंग, तात्या, विकासराव " सारख्या जाणकार लोकांची मदत हवी आहे ....
प्रतिक्रिया
13 Jul 2008 - 4:54 pm | प्रियाली
फोटो सुधारून दिले आहेत. त्यांवर टिचकी मारली असता ते सुस्पष्ट दिसतील.
फोटो नेमके कुठे मिळाले? (मंदिर, किल्ला का आणखी कोठे?) आणि अंदाजे कोणत्या काळातील असावेत?
माझे लिपीज्ञान अगदीच गबाळं ;) आहे. तरी ४थ्या चित्रातील शिलालेख चार भाषांत लिहिलेला दिसतो म्हणजे सरकारी* असावा असे वाटून गेले. एक लिपी उर्दूची नस्तलीक वाटते, एक देवनागरी (इथे देवनागरीतील प्रत्येक अक्षर तोडून लिहिले आहे), बाकीच्या कन्नड किंवा तेलुगू (इथे काला अक्षर भैंस बराबर पण तेलुगू वाटते) आणि इंग्रजी वाटते. तसेच पूल बांधण्याचा काळ विक्रम संवत्सर १८९६ , शालिवाहन शके १७६१ दिसत असून राजा नानकबक्ष बहादूर याने पूलाचे बांधकाम केले असे वाचता येत आहे. इंग्रजीतील साल ए.डी. १८३९ दिसते आहे. येथे हिंदू आणि इंग्रजी कालगणना मेळ खातात. म्हणजे, हे बांधकाम शिवकालीन नसून ब्रिटीश कालीन आहे. सुमारे १६९-१७० वर्षांपूर्वीचे.
गुरू नानक पंढरपुरात येऊन गेले होते. ते संत नामदेवांना गुरूस्थानी मानत. पंढरपुरांत शिखांचे प्रस्थ होते का/ आहे का? तसे असल्यास कोणा शिखाच्या कृपेने हा पूल बांधला गेला असावा असे वाटते.
पहिल्या चित्रातील शिलालेख नक्की देवनागरीत आहे. मी अद्याप लक्ष देऊन वाचला नाही. वेळ झाला की वाचते परंतु त्यात पैशांबद्दल काहीतरी लिहिल्यासारखे वाटले. बहुधा बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या पैशांचा जमा खर्च असावा.
अवांतरः त्यावर बहुधा "मुक्क्कामः हैदराबाद" असे देवनागरीत लिहिणार्याने ते मागाहून खरडलेले दिसते.
चू. भू. दे. घे.
* सरकारी बाबींबद्दल तयार केलेले शिलालेख प्रजेने वाचण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख भाषांत कोरण्याचा प्रघात होता.
13 Jul 2008 - 10:45 pm | छोटा डॉन
हे शिलालेख पंढरपुरच्या [ विठ्ठलाचे गाव ] एका भागात असलेल्या गोपाळपुरात "श्री गोपाळाकॄष्णाच्या मदिरातले व त्याच्या आसपासच्या " परिसरातले " आहेत.
काळ नक्की माहित नाही पण अंदाजे "शिवकालीन वा जस्ट त्याच्या नंतरचे" असावेत ...
अंदाजे मजकुर त्याच्या "बांधणी, कुणी बांधले, राजाचे नाव " वगैरे असावा पण नक्की माहित नाही ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
14 Jul 2008 - 4:11 am | प्रियाली
मला सुस्पष्ट वाचता आला नाही. :( श्री गोपालकृष्ण मंदिराच्या संबंधात पैशांची व्यवस्था कशी झाली त्याबद्दल आहे. पैसे खर्च केल्याने मंदिराचे बांधकाम झाले तत्सम काहीतरी सांगणारा शिलालेख आहे. इतरा कोणाला वाचता आला तर उत्तम आहे.
14 Jul 2008 - 2:46 pm | आंबोळी
शिलालेख : १
श्री गोपालकृष्ण प्रसन्न
श्री गोपालकृष्णाची ही निक
डीची बांधनुक श्री जनाबाई
-- शास : जो पैसा घेतात त्या
पैशाचे देवस्थान खर्च जावुन : जे
पैसे वुरले : ते हे काम केले : ग्राम
स्त गुरव यानि केले: खर्च --
जेषृ--सके
(लाल अक्षरे हा अंदाज आहे)
आंबोळी
14 Jul 2008 - 2:57 pm | छोटा डॉन
ह्या देवळाचे सर्व हक्क सध्या "गुरवांकडे" असतात, त्या अनुषंगाने त्यांचा उल्लेख असणे चुकीच नसावे ...
त्या मंदिरच्या आवारात "जनाबाईचे मंदिर" पण आहे ... त्यामुळे ते ही बरोबर ..
बाकी पहिली जी लिपी आहे ती "अरबी" असावी ...
दुसरी "कन्नड व तमिळ" नक्कीच नाही, त्यामुळे तेलगु असणे शक्य आहे ...
>>पंढरपुरांत शिखांचे प्रस्थ होते का/ आहे का? तसे असल्यास कोणा शिखाच्या कृपेने हा पूल बांधला गेला असावा असे >>वाटते.
नाही, असे कधीच नव्हते ...
शिख अगदी औषधाला म्हटला तरी शोधावा लागेल ...
>>तसेच पूल बांधण्याचा काळ विक्रम संवत्सर १८९६ , शालिवाहन शके १७६१ दिसत असून राजा नानकबक्ष बहादूर याने >>पूलाचे बांधकाम केले असे वाचता येत आहे. इंग्रजीतील साल ए.डी. १८३९ दिसते आहे.
हे पण बरोबर, पुल फार फार तर १५०-२०० वर्षे जुना असु शकतो ...
आत्ता वापरात नाही पण ५ वर्षापुर्वी पर्यंत वापरत होते ...
"शिवकालीन" असणे शक्य नाही ...
मंदिर पण जास्त जुने नसावे, मी नक्की माहिती "उद्या" सांगतो विचारुन ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....